योगवसिष्ठ - मराठी
भगवद्गीता हे सार आहे तर योगवसिष्ठ हहा विस्तार आहे. भगवंतांनी जे ७ श्लोकांत सांगितले त्या गुह्य ज्ञानाचा विस्तार वसिष्ठ ऋषी नि ३६ हजार श्लोकांत केला आहे. ह्यातील काव्य प्रतिभा अलौकिक आहे. पण हे मराठी पुस्तक संस्कृत काव्याची शब्दशः भाषांतर नसून ८० ओवीचे एक स्वतंत्र पुस्तक आहे. ज्या प्रमाणे ज्ञानेश्वरांनी भग्वद्गीतेवर स्वतंत्र पद्धतीने टीका लिहिली ही सुद्धा एक स्वतंत्र टीका आहे.
संस्कृत भाषेंत ह्या पुस्तकाची रचना श्रीराम आणि वसिष्ठ ऋषी ह्यांच्या मधील संवाद म्हणून केली आहे, द्या दृष्टिकोनातून संस्कृत योगवसिष्ठ ह्याचे लेखक वाल्मिकी ऋषी ना समजले जाते.