महान संशोधक, गणिती इसाक न्यूटन : चित्रकथा
भौतिकशास्त्रांतील सर्वाधिक प्रसिद्ध आणि महत्वाचे संशोधक म्हणून न्यूटन ह्यांचे नाव अतिशय वर येते. इसाक न्यूटन अत्यंत विद्वान होते. त्यांनी अनेक गणिती शोध लावले पण ते प्रसिद्ध आहेत त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी. १६४२ मध्ये क्रिसमस च्या दिवशी न्यूटन ह्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रिंसिपिया हे पुस्तक लिहिले जयंत त्यांनी आपले संशोधन मांडले. ह्या त्यांच्या संशोधनाने गुरुतत्वाकर्षाचें गणिती ज्ञान ज्ञात झालेच पण केप्लर सारखया जुन्या संशोधकांचे विविध मत सुद्धा खरे आहे हे सिद्ध झाले. न्यूटन च्या शोधांनी गती म्हणजे नक्की काय हे जगाला समजले त्यातून नवीन वाहने, रॉकेट्स, समुद्राच्या लाटांची गती समजणे मानवाला शक्य झाले.
आज आम्ही एक प्रगत जगांत राहत आहोत ज्याचे खूप मोठे श्रेय न्यूटन ला जाते. न्यूटनचे आयुष्य म्हणूनच समजून घेणे आम्हाला महत्वाचे आहे आणि प्रेरणा दायी आहे.