मेरी क्यूरी - एक महान शास्त्रज्ञ - मराठी
मेरी क्युरी ह्या एक प्रसिद्ध महिला संशोधक होत्या. ज्या काळी महिला विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश सुद्धा मिळणे अशक्य होते त्या काळांत त्यांनी पॅरिस विद्यापीठांत प्राध्यापकाची नोकरी मिळवली. नोबेल prize मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला संशोधक होत्या, दोन नोबेल prize मिळवणाऱ्या त्या सर्वप्रथम संशोधक होत्या आणि एकमेव महिला संशोधक आहेत. इतकेच नव्हे तर संपूर्ण इतिहासांत त्या अश्या एकमेव महिला संशोधक आहेत ज्यां पूर्णपणे दोन वेगळ्या विषयांत नोबेल prize मिळवले.
१९०३ मध्ये त्यांना त्यांचे पती आणि आणखीन एक संशोधक ह्यांना संयुक्त भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले. काही महिन्यांत त्यांच्या प्राध्यापक पतीचा एका अपघांतान्त मृत्यू झाला. त्यांच्या पतीची नोकरी त्यांना मिळाली.
१९१० मध्ये रेडियम आणि पोलोनियम ह्या दोन नवीन एलेमेंट्स च्या शोधासाठी त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले.
आपल्या संपूर्ण आयुष्यांत त्यांनी असंख्य त्रास भोगले. पॅरिस मध्ये त्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. फ्रांस मध्ये त्या विदेशी होत्या तसेच त्या नास्तिक असल्याने चर्च ने सुद्धा त्यांना त्रास केला. पण ह्या सर्वांवर त्यांनी मात तर केलीच पण महिला वैज्ञानिकां साठी त्या एक प्रेरणा स्थान बनल्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक मुली वैज्ञानिक बनल्या.
ह्या पुस्तकांत आपण त्यांची जीवनी वाचू शकता.