गुलाम ते सैनिक - अमेरिकन मुलाची कथा
अमेरिकेत १८६१ ते १८६५ ह्या दरम्यान मोठे नागरी युद्ध घडले. ह्या युद्धाचा मूळ विषय होता काळ्या लोकांची गुलामगिरी आणि त्याविरुद्ध चा त्यांचा लढा . ह्या बालकथेंत आम्ही एका मुलाची जीवनगाथा जाणून घेतो ज्याने जन्म तर घेतला होता गुलाम म्हणून पण त्याने स्वहिमतीवर सैनिक बनून आपल्या लोकांना स्वातंत्र्य दिले.
गुलामगिरी हा मानवी इतिहासावर असलेले एक गालबोट आहे. आमच्या देशांत ज्या प्रमाणे गांधी, आंबेडकर, आगरकर, फुले इत्यादींनी शमते साठी आंदोलन केले त्याच प्रकारे अमेरिकेत अनेक लोकांनी लढा पुकारला. ह्या लढ्याचे रूपांतर शेवटी युद्धांत झाले आणि अमेरिकेत गुलामगिरी कमी झाली.