सैंडी आणि साइमन (सचित्र) - मराठी
सँडी आणि सायमन
सत्य घटनेवर आधारित गोष्ट
सँडी आणि सायमन
सत्य घटनेवर आधारित गोष्ट
निळ्याशार समुद्राने वेढलेल्या ग्रँड तुर्क नावाच्या बेटावर सायमन नावाचा वृद्ध माणूस राहात होता . त्याच्याकडे सँडी नावाचे छोटेसे गाढव होते
। सायमन एका टुमदार दगडी झोपडीत राहात होता . झोपडीवर लालचुटूक पत्र्याचे छत होते. झोपडीच्या शेजारी सायमनने खास सँडीसाठी छोटेसे खोपटे बांधले होते. सँडी त्यात सुखाने राहात होता . सायमनसोबत त्याच्या झोपडीत ब्लॅकी नावाचे मांजर राहात होते . अंगणात बुप्पर नावाचा कोंबडा आणि कलकलाट करणाऱ्या काही कोंबड्या राहात होत्या .
सायमनच्या घरापासून एक वाट खाली कॉकबर्न गावात जात होती .
दररोज सकाळी सूर्य समुद्रातून वर आल्यावर सायमन सँडीला गाडीला जुंपत असे . गाडीत काही रिकाम्या बादल्या असत . सायमन गाडी एका विहिरीपाशी नेत असे. तिथे तो एक - एक बादली विहिरीतील ताज्या गार पाण्यात बुडवत असे. सगळ्या बादल्या पाण्याने काठोकाठ भरून होईपर्यंत सँडी वाट पाहात असे . या कामाला किती वेळ लागतो हे सँडीला अचूक माहित झाले होते . योग्यवेळी सँडी नागमोडी वाटेवरून कॉकबर्न गावाकडे चालू लागत असे .
छोट्या गाढवाला आपले काम खूप आवडत असे . एका लाल फाटकापाशी सायमन गाडी थांबवत असे. तिथे तो पाणी देऊन रिकामी बादली परत घेत असे . हे होईपर्यंत सँडी वाट पाहात उभा असे. काम झाल्यावर सँडी चालू लागत असे . पुढे निळ्या किंवा पिवळ्या फाटकापाशी गाडी थांबवण्यासाठी सँडीला मुद्दाम सांगावे लागत नसे. सँडीला संपूर्ण रस्ता पाठ झाला होता .
दिवसअखेरीस, सायमन व सँडी घरी परतत तेव्हा ब्लॅकी मांजर आनंदाने गुरगुरत असे, बुप्पर कोंबडा मोठ्याने आरवून पंख फडफडवत असे आणि कोंबड्या गोल- गोल फिरून कलकलाट करत असत . सायमन बक्षीस म्हणून सँडीच्या पुढ्यात ताज्या पाण्याची बादली, थोडे मऊशार गवत आणि लुसलुशीत गाजरे ठेवत असे. लुसलुशीत गाजरे सँडीला अत्यंत प्रिय होती.
_ _ एके सकाळी सूर्य नेहमीसारखा समुद्रातून वर आला. पण सँडीला गाडीला जुंपण्यासाठी सायमन झोपडीबाहेर आला नाही . मग सँडी त्याच्या खोपटाबाहेर पडला. सायमनच्या झोपडीबाहेर येरझाऱ्या घालत तो कर्कश आवाजात रेकू लागला .
बुप्परने बांग दिली , कोंबड्यांनी कल्ला केला. पण सायमन किंवा ब्लॅकी यांतील कुणीही बाहेर आले नाही .
सायमन कुठे होता? ही काम करायची वेळ होती. सँडी सायमन आणि गाडीशिवायच विहिरीपाशी गेला. सायमनला पाणी भरायला तिथे जेवढा वेळ लागे, तेवढाच वेळ सँडी तिथे थांबला . मग फाटक उघडून तो नागमोडी वाटेने एकटाच गावाकडे निघाला. लाल फाटकाजवळ पोहोचल्यावर तो थांबला. तिथे पाणी देण्यात व रिकामी बादली परत घेण्यात सायमनला जेवढा वेळ लागे , तेवढाच वेळ सँडी थांबला . मग तो निळ्या फाटकापाशी गेला व तिथे थांबला आणि नंतर पिवळ्या फाटकाकडे निघाला .
मुले आपापल्या घरासमोर खेळत होती. त्यांनी सँडीला एकट्यालाच पिवळ्या घरासमोर थांबताना पाहिले. मुलांनी सँडीला विचारले, “ सँडी , सायमन कुठे आहे ?” सँडीने डोके हलवले आणि तो पुढे चालू
मुले सँडीच्या मागोमाग चालू लागली. सँडी ज्या ज्या फाटकापाशी थांबला तिथे तिथे मुलेसुद्धा थांबली . मुलांनी इतर मुलांनाही त्यांच्या घराबाहेर बोलावून सँडीच्या मागोमाग चालायला सांगितले .
लागला.
BAKE
गावाच्या मध्यवर्ती भागात पोहोचल्यावर एका बेकरीवाल्याने सँडी व मुलांची ही कवायत पाहिली. “ सँडी, सायमन कुठे आहे? “ त्याने छोट्याशा गाढवाला विचारले .
सँडीने डोके हलवले आणि तो चालू लागला.
सँडी एका कपड्यांच्या दुकानाजवळून जाऊ लागला. दुकानदाराने सँडी आणि मुलांची कवायत पाहिली . “ सँडी, सायमन कुठे आहे?” त्याने छोट्याशा गाढवाला विचारले .
सँडीने डोके हलवले आणि तो चालू लागला.
सँडी गावातील शेवटच्या घराच्या फाटकापाशी येऊन थांबला . मुलेसुद्धा थांबली. ते गावातील डॉक्टरचे घर होते. डॉक्टरांनी खिडकीतून मुलांना पाहिले. मग त्यांनी फाटकापाशी थांबलेल्या सँडीला पाहिले. डॉक्टरांनी त्वरित आपली उपचारांची बॅग उचलली व ते बाहेर आले. “ सँडी, सायमन कुठे आहे? “ त्यांनी सँडीला विचारले .
सँडीने डोके हलवले आणि तो नागमोडी वाटेने सायमनच्या दगडी झोपडीकडे चालू लागला.
डॉक्टर आणि मुलांची कवायत सँडीमागोमाग चालू लागली.
झोपडीजवळ येताच सायमनला बाहेर बोलावण्यासाठी सँडी जोरजोरात रेकू लागला. डॉक्टरांनी झोपडीचा दरवाजा ठोठावला .
आतून कण्हत आवाज आला, “ आत या .” डॉक्टरांनी दरवाजा उघडला. आत सायमन भिंतीला टेकून जमिनीवर बसला होता. त्याने त्याचा एक पाय उशांच्या थरावर ठेवला होता .
” काय झालं सायमन ?” डॉक्टरांनी विचारले. “ रात्री पाणी पिण्यासाठी उठलो. चुकून ब्लॅकीवर पाय पडला आणि घसरून पडलो . पायाला दुखापत झालीय . ब्लॅकीलाही लागलंय.” सायमन बोलला.
डॉक्टरांनी आपली बॅग उघडली आणि त्यातून एक लांब आणि एक छोटी मलमपट्टी काढली .
डॉक्टरांनी लांब मलमपट्टी सायमनच्या पायावर बांधली. मग त्यांनी छोटी मलमपट्टी ब्लॅकीच्या पंजाभोवती गुंडाळली .
” आता पाय ठीक होईपर्यंत कामावर जाऊ नका,” डॉक्टरांनी सल्ला दिला.
“पण मग गावातल्या लोकांना पाणी कोण देईल ?” सायमनने विचारले .
“ गावातल्या लोकांना पाणी सँडी पोहोचवेल,” खिडकीतून आत डोकावणारी मुले एकसुरात गात म्हणू लागली.
“ पण सँडीला गाडीला कोण जुंपणार ? विहिरीतून पाणी काढून बादल्यांमध्ये कोण भरणार ? “ सायमनने विचारले . ___ “ आम्ही सँडीला गाडीला जुंपू . आम्ही विहिरीतून पाणी काढून बादल्यांमध्ये भरू,” खिडकीतली मुले गात म्हणू लागली.
” पण सँडीला ताजे पाणी , मऊशार गवत आणि लुसलुशीत गाजरे कोण खायला देणार ? “ सायमनने विचारले . ___ “ आम्ही सँडीला ताजे पाणी, मऊशार गवत आणि लुसलुशीत गाजरे खायला देऊ ,” खिडकीतील मुले गात म्हणू लागली . “ सँडी घराघरात पाणी पोहोचवू शकतो,” डॉक्टर म्हणाले . “ सँडीला गावाचा संपूर्ण रस्ता पाठ आहे,” खिडकीतील मुले गात म्हणू लागली .
पुढे आठवडाभर रोज सकाळी सूर्य समुद्रातून वर आल्यावर मुले सायमनच्या घरी येऊ लागली . ते सँडीला गाडीला जुंपून विहिरीवर घेऊन जाऊ लागले . ते बादल्यांमध्ये पाणी काठोकाठ भरू लागले. मग सँडीसोबत सगळे गावात जाऊ लागले. सँडी लाल , निळ्या , पिवळ्या फाटकापाशी थांबू लागला. कॉकबर्नचे लोक सँडी आणि मुलांची वाट पाहात थांबू लागले. मुले प्रत्येक घरात पाणी देऊन रिकाम्या बादल्या सँडीच्या गाडीत ठेवू लागले . सगळेजण सायमनचा पाय बरा होण्याची वाट बघू लागले .
आणि एके दिवशी सायमन मुलांना म्हणाला, “ माझा पाय आता बरा झालाय.” सायमन पुन्हा काम सुरू करण्यास । उत्सुक होता. यापुढे त्याला मुलांची मदत लागणार नव्हती. सायमनचा पाय बरा झाला म्हणून मुले आनंदात होती. पण त्यांचे चेहरे उदास दिसत होते . सँडीसुद्धा डोके खाली झुकवून उभा होता .
सायमन हसून म्हणाला, “ ठीक आहे , आजचा दिवस तुम्ही सँडीसोबत येऊ शकता. __ मुलांनी एकच गलका केला. पण पुढच्या दिवशी ते पुन्हा उदास झाले. मग सायमनने त्या दिवशीसुद्धा त्यांना येऊ दिले. त्याच्या पुढच्या दिवशीसुद्धा मुले सोबत आली . त्याच्या पुढच्या दिवशीसुद्धा ! आणि मग प्रत्येक दिवशी म्ले सायमन आणि सँडीसोबत येऊ लागले .
। तर तुम्ही कधी कॅरेबियनच्या या विशेष बेटावर आलात तर एक वृद्ध मनुष्य, त्याचे छोटे गाढव आणि पाण्याने काठोकाठ भरलेल्या बादल्यांच्या गाडीचा शोध जरूर घ्या .
त्यांच्या मागोमाग गाणारी व नाचणारी मुलेही तुम्हाला दिसतील.
लेखकाचे मनोगत
ग्रँड तुर्क बेट कुठे आहे ?
Florida
Turks
and Caicos
Cuba
सँडी आणि सायमन ! ही गोष्ट एका सत्य घटनेवर आधारित आहे . गाढव आणि त्याचा मालक ग्रँड तुर्क बेटावरील कॉकबर्न गावातील लोकांना दररोज पाणी पुरवत असत. गाढवाला गावचा संपूर्ण रस्ता पाठ होता . एके दिवशी त्याचा मालक दुखापत झाल्यामुळे चालू शकत नव्हता. तेव्हा गाढव आपल्या गाडीशिवाय एकटेच गावातील प्रत्येक घराच्या फाटकापाशी गेले आणि थोडा वेळ थांबले . कारण दररोज ते हेच काम करत असे .
ग्रँड तुर्क हे एक वाळवंटासारखे बेट आहे. तिथे खूप कमी पाऊस पडतो. लोकांना नेहमी पाण्याची चणचण भासते . त्यामुळे त्यांना पावसाचे पाणी मोठमोठ्या भांड्यांमध्ये व पिंपांमध्ये भरावे लागे . अन्यथा पाणी छतावरून वाहून जाई. तिथे पाणी सोन्यापेक्षा मौल्यवान होते . ग्रँड तुर्कचे लोक भाग्यवान होते . त्यांच्याकडे नैसर्गिक ताज्या पाण्याच्या दोन विहिरी होत्या . पण त्या गावापासून दर होत्या . गावात ट्रक , कार अशी वाहने नव्हती. विहिरीतून पाणी काढून ते पाठीवर लादून घरी न्यायला खूप कष्ट पडत . पाण्याने भरलेली भांडी खूप वजनदार असत. त्यामुळे गाढव खेचत असलेल्या गाडीवरून पाणी गावात घेऊन जाणे सोयीस्कर पडत असे .
या कॅरेबियन बेटावर गाढव कुठून आले? काही मजूर समुद्रातून मीठ काढण्याच्या कामासाठी ग्रँड तुर्कला आले होते . त्यांनी जहाजातून गाढवही तिथे आणले. हे मजूर बर्म्युडा बेटावरून आले होते . ते कालव्यांद्वारे समुद्राचे पाणी बेटाच्या मध्यभागी आणत . तिथे पाणी उन्हात सुकून मीठ बनत असे . मीठ बनल्यावर ते गाढवाच्या पाठीवर लादून बंदरावर आणले जाई . तिथे मीठ साठवले जाई. शेवटी हे मीठ अमेरिका व युरोपला जाणाऱ्या जहाजांवर चढवले जाई . 300 वर्षांनंतर या बेटांवरील मीठाचा व्यापार कमी झाला. मीठ मिळवण्याच्या आधुनिक तंत्रांनी समुद्रातून मीठ काढण्याचे जुने तंत्र बाद करून टाकले.
North
Cree
North We
Grand Turk
Cockburn
Town
South
Wells
गाढवाबद्दल काही मजेदार गोष्टी
सुरुवातीला गाढव आफ्रिकेत राहात असत . ते पट्टे नसलेल्या झेब्यासारखे दिसत . तुम्ही कदाचित एक पट्टा असलेले गाढव पाहिले असेल . गाढवांचे कान लांब असतात. त्यामुळे ते दूरचे आवाज ऐकू शकतात . त्यांचे खूर असलेले पाय मजबूत असतात . चढण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. अगदी सुरुवातीला वस्तू तसेच लोक यांच्या वाहतुकीसाठी गाढवाची गाडी वापरत .
लोक गाढवाला पसंत करतात . ते पाळीव असतात आणि आपल्या मालकाप्रती प्रामाणिक व एकनिष्ठ असतात . गाढव खूप हुशार असते . थोडा धीर धरलात , दयाळू बनलात तर गाढवाला प्रशिक्षित करणे सोपे जाते . गाढव हट्टी नसते . पण ते एकसारखेच काम करणे पसंत करते .
गाढव गवत आणि पाने असलेली हिरवी रोपटी खातात . त्यांना फुले खायलाही आवडते. त्यामुळे घराचे फाटक बंद ठेवले पाहिजे . गाढवाची आई आपल्या मुलांना काय खायचे, काय नाही हे शिकवते . गाढवाच्या पिल्लाला फोल म्हणतात . नर गाढवाला जॅक म्हणतात तर गाढविणीला जेनी म्हणतात . गाढवाचा आवाज खूप मोठा असतो . तो दूरपर्यंत ऐकू जातो .
समाप्त