म्हातारी आजी आणि भात चोर - सचित्र - मराठी
म्हातारी आजी आणि भात चोर
” रोज रात्री एक चोर माझा भात चोरतो”, आजी म्हणाली. आणि निघाली राजाकडे मदत मागण्यासाठी . नेमका राजा गेला होता शिकारीसाठी जंगलात; पण सुदैवाने आजीला वाटेत चतुर मित्र भेटले .
तिला भेटलेल्या विंचू, कवठ , शेणाची गोवरी , वस्तरा, आणि सुसर या नव्या मित्रांच्या मदतीने ती चोराला की पकडते आणि त्यानंतर नेहमी आनंदाने तिचा आवडीचा भात खाते त्याची ही गोष्ट .
म्हातारी आजी आणि भात चोर
बेटसी बँग
2GOGROUP
Meen
Helcoasoo
एका गावात एक म्हातारी आजी रहात होती. तिला भात खप आवडायचा. रोज सकाळी ती भात शिजवायची आणि एका पाण्याने भरलेल्या तसराळ्यात ठेवून द्यायची. थोडेसे करमरेही ती चुलीवर ठेवून द्यायची, म्हणजे ते चांगले गरम रहायचे. त्यामुळे तिला दिवसभरात केव्हाही खाण्यासाठी तसराळ्यात भात आणि चुलीवर कुरमुरे कायम घरात असायचे.
तो उपटसुंभ चोर उगवेपर्यंत आजी अगदी समाधानी होती. पण मग तो चोर रोज रात्री येऊ लागला आणि तसराळ्यातून भात आणि चुलीवरून कुरमुरे चोरू लागला.
आजीने विचार केला, घेतली काठी हातात, आणि निघाली राजाकडे , चोराची तक्रार करायला.
वाटेत लागलं तळं . त्या तळ्यात होता एक विंचू.विंचवाने विचारलं , “ आजी, कुठे चाललीस? “
” अरे बाबा , रोज रात्री चोर शिरतो घरात, आणि माझा भात चोरतो. मी निघालेय राजाकडे त्याची तक्रार करायला “ .
विंचू म्हणाला, “ घरी परत जाशील, तेव्हा मला तुझ्याबरोबर घेऊन जा . मला घेऊन गेलीस तर तुझा फायदाच होईल”. “ हो हो, नक्की “ आजी उत्तरली .
आजी पढे रस्त्यावरून चालत राहिली. आणि मगतिला वाटेत लागलं एक कवठाचं झाड . नेमकं एक कवठ पडलं आजीच्या पुढ्यात आणि त्याने विचारलं , “ आजी, कुठे चाललीस ? “ “ अरे बाबा, रोज रात्री चोर शिरतो घरात, आणि माझा भात चोरतो. मी निघालेय राजाकडे त्याची तक्रार करायला “.
कवठ म्हणालं , “ घरी परत जाशील , तेव्हा मला तुझ्याबरोबर घेऊन जा . मला घेऊन गेलीस तर तुझा फायदाच होईल”.
” हो हो , नक्की “ आजी उत्तरली.
आजी पुढे चालत राहिली, थोड्या वेळातच तिला दिसला एक वस्तरा. वस्तऱ्याने विचारलं , “ आजी, कुठे चाललीस ? “ “ अरे बाबा, रोज रात्री चोर शिरतो घरात , आणि माझा भात चोरतो. मी निघालेय राजाकडे त्याची तक्रार करायला “. वस्तरा म्हणाला “ घरी परत जाशील . तेव्हा मला तड्याबरोबर घेऊन जा . मला घेऊन गेलीस तर तुझा फायदाच होईल “.
” हो हो , नक्की” आजी उत्तरली.
MAGAR
आजी राजवाड्याच्या दिशेने चालत राहिली. थोड्या अंतरावर तिचा पाय पडला शेणाच्या गोवरीत. गोवरी म्हणाली , “ आजी, कुठे चाललीस? “
” अरे बाबा. रोज रात्री चोर शिरतो घरात. आणि माझा भात चोरतो. मी निघालेय राजाकडे त्याची तक्रार करायला “. त्यावर गोवरी म्हणाली, “ घरी परत जाशील , तेव्हा मला तुझ्याबरोबर घेऊन जा . मला घेऊन गेलीस तर तुझा फायदाच होईल “.
” हो हो , नक्की “ आजी उत्तरली.
राजवाड्यात शिरण्यापूर्वी वाटेत आजीला लागली एक नदी. त्यात एक सुसर मस्त डुंबत होती. सुसरीने आजीला बघितलं आणि विचारलं , “ आजी, कुठे चाललीस? “
” अरे बाबा , रोज रात्री चोर शिरतो घरात, आणि माझा भात चोरतो . मी निघालेय राजाकडे त्याची तक्रार करायला “.
सुसर म्हणाली, “ घरी परत जाशील, तेव्हा मला तुझ्याबरोबर घेऊन जा . मला घेऊन गेलीस तर तुझा फायदाच होईल “.
” हो हो , नक्की “ आजी उत्तरली.
NOVAAAAAAAAAAAAAAAAAAICIOKhanaiana
QUE
HDMDEVOODOOTECH
T0000000
अखेरीस ती राजवाड्यात येऊन पोचली. पण नेमका राजा राजवाड्यात नव्हताच; तो गेला होता जंगलात , वाघाच्या शिकारीला . आता आजीला परत एक खेप करायला लागणार होती राजाच्या भेटीसाठी .
घरी परत जाताना, आधी ठरल्याप्रमाणे तिने सुसर , शेणाची गोवरी , वस्तरा, कवठ आणि विंचू, सगळ्यांना घेतलं बरोबर , तिच्या झोळीत ठेवलं आणि सगळे आले घरापाशी. .
घराजवळ आल्यावर सुसर म्हणाली, “ आजी, मला त्या घराबाहेरच्या तळ्यात सोड “ . गोवरी म्हणाली, “ मला पायऱ्यांच्या तळाशी ठेव “. वस्तरा म्हणाला, “ आणि मला गवतात , गोवरीच्या जवळ “. कवठ म्हणालं , “मला चुलीवर “. विंचू म्हणाला, “ माझी जागा तसराळ्यात , भाताच्या पातेल्याबरोबर “.
आजीने कुरमुरे खाल्ले, सगळ्या मित्रांना रात्रीसाठी शुभेच्छा दिल्या आणि ती बिछान्यावर झोपायला गेली .
NOOOOOOOK
MOCOOOddddagog0Eod GOBOG
000000
GOOOOOOOOOOOOOOOOK DODOC000000
Dand00000RSONOCIOX Soundcocee
मध्यरात्री चोर शिरला घरात . त्याने घरात डोकावून पाहिलं , आणि गेला नेहमीप्रमाणे भात चोरायला तसराळ्यापाशी. पण झालं भलतंच ! हातात भात येण्याऐवजी हाताला डसला विंच. विंचवाने इतके वेळेला त्याला डंख केला, की चोर वेदनेने अगदी हैराण झाला . कळवळून नाचायला लागला.
चोर तसाच काही कुरमुरे मिळतात का ते बघायला चुलीपाशी गेला. चुलीला हात लावताच कवठ एकदम फुटलंच. सगळ्या गरम बिया त्याच्या तोंडावर उडाल्या आणि त्या कवठ । फुटण्याचा आवाज तर चोराच्या कल्पनेबाहेरचा होता. तो घाबरून बाहेरच पळाला.
पण हाय रे दैवा ! गडद अंधारात त्याचा पाय शेणावरून घसरला आणि तो धपकन थेट गवतावर आदळला. अरेच्या ! तिथे तर वस्तरा लपला होता. आधीच शेणाने बरबटलेला , त्यात वस्तऱ्याची धार .. चोर किंचाळत कसाबसा उठला आणि सगळं धुवून टाकावं म्हणून घराबाहेर तळ्यापाशी
पाण्यात हात घातला मात्र ! सुसरीने असा चावा घेतला त्याच्या हाताचा! वेदना सहन न होऊन चोर किंचाळायला लागला.
गेला.
आजी पण खडबडून जागी झाली. “ चोर । चोर ! “ म्हणत उठली. त्याच्या मागे पळायला लागली. एवढ्या सगळ्या आवाजाने आता शेजारी पण जागे झाले . सगळ्यांनी एकत्र त्या चोराचा पाठलाग केला. इतक्या दूरवर ते गेले, की नंतर तो चोर कधी परत इकडे फिरकलाच नाही .
কথা
त्यानंतर मात्र आजीला तिला आवडणारा भात आणि करमरे , तिच्या नेहमीच्या तसराळ्यात आणि चुलीवर कायम मिळत राहिले !
समाप्त