प्रेमचंद यांचा निवडक कथा - मराठी

प्रेमचंद यांचा निवडक कथा - मराठी

प्रेमचंद यांच्या निवडक कथा

अनुवाद आराधना कुलकर्णी

प्रेमचंद यांच्या

निवडक कथा

आराधना कुलकर्णी

Table of Contents परिचय भूमिका प्रस्तावना प्रेमचंद ( 31 जुलै 1880 - 8 ऑक्टोबर 1936) हिंसा परमोधर्म: शिळ्या भाताचा नैवेद्य प्रायश्चित्त बालक अभिनेत्री पंच परमेश्वर

सौभाग्याचे शव कॅप्टन साहेब स्वत्व रक्षण विकतचे दुखणे बोध सभ्यतेचे रहस्य मुक्तिधन सव्वा शेर गहू बलिदान अनमोल रत्न

भूमिका मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्य खजिन्यातील काही वेगवेगळी रत्ने वेचून वाचकांपुढे ठेवताना मला अत्यंत आनंद होत आहे . प्रेमचंद हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ साहित्यिक . केवळ भारतातच नव्हे तर अवघ्या विश्वात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे नाव माहीत नसलेला साहित्य रसिक अगदी विरळा असेल . त्यांचा लेखन कालावधी स्वातंत्र्यपूर्व इ. स . 1901 ते 1936 हा होता . त्यांच्यापूर्वी साहित्याचे स्वरूप हे पौराणिक , धार्मिक व काल्पनिक असायचे. उर्दू व हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या प्रेमचंद यांनी साहित्याला मनोरंजनाच्या पायरीवरून उचलून वास्तवाच्या जमिनीवर आणले व हिंदी साहित्यात यथार्थवादाची सुरुवात केली. हिंदी कथा व कादंबरीच्या परंपरेचा त्यांनी इतका विकास केला की , त्यामुळे पूर्ण शतकातील साहित्यिकांना मार्गदर्शन मिळाले. भारतीय साहित्यातील दलित साहित्य व स्त्री साहित्याची मुळे त्यांच्या साहित्यात आढळतात . शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांना उपन्यास सम्राट ही उपाधी दिली. तसेच प्रेमचंद हे आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह मानले जातात . आदर्शवादी व्यक्तिमत्त्व असणारे प्रेमचंद हे प्रामाणिक समाजसुधारक , क्रांतिकारी व संवेदनशील लेखक , जागरुक नागरिक , कुशल वक्ता आणि व्यासंगी पत्रकार व संपादक होते. महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता . देशप्रेमाच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या सोजेवतन ( राष्ट्राचा विलाप) या पुस्तकावर ब्रिटिश सरकारने जप्ती आणली व त्यांच्या लेखनावर बंदी घातली . त्यानंतर त्यांनी स्वत : चे धनपतराय श्रीवास्तव हे नाव सोडून प्रेमचंद या नावानेलिखाणास सुरुवात केली. भारतीय ग्रामीण जीवन हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय होता. तत्कालीन समाजातील भ्रष्टाचार, जमीनदारी . कर्जखोरी. गरिबी यावर त्यांनी सातत्याने लेखन केले. सामाजिक परिस्थितीचे प्रामाणिक

विश्लेषण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. चौफेर पसरलेल्या जीवनाचे उभे - आडवे छेद घेत त्यांनी सर्व सामाजिक स्तरांमधून आपली कथापात्रे निवडली. उपेक्षित वर्गातील अतिसामान्य माणसांना कथाविषय बनवून त्यांना साहित्याचे नायक बनवले. शेतकरी , कामगार , स्त्रिया , दलित इ. च्या गंभीर समस्यांचे त्यांनी चित्रण केले. माणसांप्रमाणे पशुपक्षीदेखील त्यांचे कथाविषय बनले . समाजसुधारणा राष्ट्रीयता, स्वातंत्र्यसंग्राम या विषयांवर त्यांनी लेखन केले. त्यांच्या ऐतिहासिक कथा , प्रेमकथा तसेच बालकथाही लोकप्रिय ठरल्या आहेत . मानवी स्वभावाचेत्यांचे आकलन व ते शब्दांतून उतरवण्याची त्यांची हातोटी वाचकाला थक्क करणारी आहे. कथापात्रांची मानसिकता, त्यांच्या सुष्ट - दुष्ट प्रवृत्ती व त्यानुसार त्यांचेविचार एखाद्या मनोवैज्ञानिकाच्या कुशलतेने ते उघड करतात. गरिबांचे शोषण, धर्माच्या आडून अधर्मी आचरण , मैत्री व प्रेमाच्या बुरख्यातील विश्वासघात, धूर्तपणा, निर्दयता यांच्यासोबतच विशुद्ध मैत्री, प्रेम, बलिदान , कर्तव्य, न्यायप्रवणता, सहिष्णुता , पराकोटीचा भाबडेपणा या स्वभावलक्षणांवरही त्यांच्या कथा प्रकाश टाकतात . कोणत्याही काळात नैतिक मूल्यांचे महत्त्व कमी होत नसते. प्रेमचंद यांची कथा संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम व सर्व सांप्रदायिकतांना ओलांडून जाणाऱ्या मानवतेला सतत आवाहन करते. म्हणून त्यांचे साहित्य हे कालजयी मानले जाते . त्यांच्या सर्वच कथा केवळ गंभीर व समस्याप्रधान स्वरूपाच्या नसून त्यांनी विनोदी कथाही लिहिल्या आहेत . माणसाच्या सामाजिक वर्तनातील विसंगती व दुटप्पीपणा दाखवताना आपल्या शैलीला उपरोधिक विनोदाची झालर ते अतिशय खुमासदारपणे लावतात . स्वत : चा बाणेदारपणा जपणारा घोडा व मालकाला पळता भुई थोडी करणारी बकरी यांच्या विनोदी शैलीतील कथांमधून ते माणसाच्या स्वभावाचे कंगोरे बारकाईने दाखवतात . त्यांच्या कथानायिका या परिस्थितीपुढे दबलेल्या असल्या, तरी त्यांचे आत्मभान जागृत आहे. परकीय भूमीवर घडणाऱ्या प्रेमकथेला ते भारतीय वीराच्या बलिदानाशी जोडतात . त्या आशयाची अनमोल रत्न ही त्यांची पहिली कथा

असल्याचा उल्लेख आढळतो . प्रेमचंद यांच्या कथांचा अनुवाद हे खरे तर शिवधनुष्य. एका आंतरिक ऊर्मीने ते माझ्या लेखणीवर पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कथांची निवड मी या संग्रहासाठी केली आहे. या संग्रहात संवाद किंवा वर्णनातून पुढे सरकणाऱ्या काही कथांचा अनुवाद आहे, तर काहींचे रुपांतर आहे . प्रकाशक श्री . बाबा भांड, साकेत भांड, प्रतिमा भांड व संपूर्ण साकेत प्रकाशन परिवाराची मी अत्यंत आभारी आहे.

  • आराधना कुलकर्णी

प्रस्तावना

कोणत्याही देशावर आक्रमण होतं आणि ते केवळ देशापुरतं मर्यादित असतं , ( जसं इस्लामचं आक्रमण) तेव्हा देशाच्या सांस्कृतिक वारशात जो बदल होतो तो एकतर विरोधातून कठोरपणे उभा राहतो किंवा अगदी हळूहळू कातळातून पाणी झिरपत जावं तसा. पण जेव्हा आक्रमण मनावर , संस्कृतीवर होतं तेव्हा देश आणि मन परकीय संस्कृतीच्या प्रभावाने दिपून जातं , ज्यात ते आपलं स्वत्व , संस्कृती , भाषा, साहित्य या सर्वांनाच गौण समजू लागतं . भारतावरही दोनदा परकीय आक्रमणं झाली. पहिलं इस्लामी आक्रमण, ज्यात इस्लामी सत्ता आली. पण हे आक्रमण घाबरवून टाकणारं होतं , दिपवणारं नव्हतं . लोक आपल्या संस्कृतीरक्षणाला सज्ज होते. मात्र राज्यकर्त्यांची भाषा असल्याने उर्दूचा थोडाफार प्रभाव झिरपत झिरपत काही भारतीय भाषांपर्यंत गेला. विशेषत: हिंदीवर अधिक . दुसरं आक्रमण इंग्रजांचं . सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ, भौतिक सुधारणा घडवून आणणाऱ्या इंग्रजी संस्कृतीमुळे भारतीय मनाचे डोळे दिपले, ज्यात आपल्या भारतीय संस्कृतीचं भवताल धूसर झालं . मुस्लिम राजवट असतानाही हिंदी व मराठी साहित्य उत्कटपणे अभिव्यक्त होत होतं . मराठीमध्ये ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत संत वाङ्मय काव्यरूपात लिहिलं गेलं . नंतर पंडिती काव्यही आलं . पण यात प्रामुख्याने काव्य आणि भक्तिरसच आढळून येतो. भक्तिरसातून सामाजिक प्रबोधन आणि भक्तिरसातूनच उत्कट प्रेमाची अभिव्यक्ती ( मधुरा भक्ती) केली गेली. जे मराठीत होतं तेच हिंदीतही घडलं होतं . हिंदी व हिंदीच्या इतर प्रादेशिक भाषांमध्येही भक्तिरसात न्हाऊन निघालेली उत्कट साहित्यनिर्मिती झाली . यात प्रेमरसही होता ( मीराबाई), सामाजिक प्रबोधन, विषमता दूर करण्याचे प्रयत्नही होते ( संत कबीर) . पण ही साहित्यरचना प्रामुख्यानं काव्याच्या अनुषंगानंच होत गेली. अर्थात, परंपरेनं चालत आलेली

पौराणिक आख्यानंही अस्तित्वात होतीच . पण इंग्रजी आक्रमणानंतर भाषेमधली स्वत : ची अभिव्यक्ती काही काळ जणू हरपून गेली, त्या उत्कट भक्तिरसातल्या भावना हरवल्या . लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल म्हणणारी मीरेची आर्तता हरवली. इंग्रजीचा पांगुळगाडा घेऊन भाषा जणू नव्यानं चालू लागल्या . ख्रिश्चनाळलेल्या मराठीचं गद्य अवतरलं आणि त्याच वेळी हिंदीत जे गद्य निर्माण झालं ते भावनिक व वैचारिकदृष्ट्या विकसित झालं नव्हतं. हिंदीत ज्याला “तिलस्म ” आणि “ ऐय्यारी म्हणतात, अशा त-हेचं लिखाण त्या काळात होत होतं. म्हणजेच जादुई - काल्पनिक , ज्यात चमत्कार होते, ज्यातली पात्रं वास्तवातली नसल्यानं ओळखीचीही नव्हती , दैवी शक्तीची रेलचेल होती . आणि अशावेळी हिंदी साहित्यात प्रेमचंद रूपी ( धनपतराय श्रीवास्तव) सूर्य उगवला . प्रेमचंद स्वत : लहान खेड्यातून आले होते . त्यांची आर्थिक स्थिती ही यथातथाच होती . अनेक तहेचे अभाव त्यांनी आयुष्यात भोगले होते. मात्र त्यांच्या मनात होता प्रचंड सहानुभूतीचा झरा, माणुसकीची ओढ आणि अभिव्यक्ती सामर्थ्य हे सामर्थ्य होतं त्यांच्या शब्दांच्या साधेपणात . आजवरची जी काल्पनिकतेची परंपरा होती तिला त्यांच्या लिखाणानं छेद दिला आणि लिखाणात वास्तववाद आणला. उमराव, देवीदेवता, जादूगार यांची जागा शेतकरी, गरीब कारकून , भोळसर परोपकारी व्यक्तींनी घेतली. न्याय, सावकारीतील प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि माणुसकी ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती . आधीची साहित्यधाराच त्यांनी बदलून टाकली. जे साहित्य कोणत्याही कल्पनाविश्वात भराऱ्या मारत होतं ते एकदम जमिनीशी नातं सांगत लोकाभिमुख झालं . सामान्य व्यक्तीचा दर दिवशीचा दोन घासांचा संघर्षत्यांनी व्यक्त केल्यानं ते वास्तववादी साहित्य लोकांना आपलं वाटलं , आपल्या जीवनाचा आरसा वाटलं .

कथेतील अभिव्यक्त आयुष्याचा एक तुकडा जसा आहे तसा त्यांनी शब्दांत व्यक्त केला. सामान्य माणूस हा त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता . उत्पीडन , शोषण , अत्याचार , अन्याय त्यांनाही भोगावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या शब्दांत प्रत्ययकारिता होती . जमीनदारीचा दंश त्यांनी सहन केला होता. तोही त्यांच्या कथांमधून झळकला. आधुनिक हिंदीचा ( 1901 च्या काळातला) प्रवाह नव्हे, तर महासागर प्रेमचंदजींच्या रुपाने अवतरला . कसं आणि कोणावर लिहायचं हे त्यांनी सांगितलं . म्हणूनच भारतीय भाषांमध्ये त्यांचं मोलाचं स्थान आहे. आधुनिक हिंदीची एक अखंड धारा त्यांच्यापासून सुरु झाली. नंतर त्या धारेला वळणं असतील , स्थित्यंतरेही असतील; पण खरे उदाते प्रेमचंदच . म्हणूनच अशा महान साहित्य प्रवर्तकाचं साहित्य हिंदीतून मराठीत येणं आवश्यक होतं . त्यांचं बरंचसं साहित्य मराठीत आलंही आहे. पण अगदी निवडक कथा अनुवादित करण्याचं काम श्रीमती आराधना कुलकर्णी यांनी केलं आहे . त्यांच्या विचारांचेविविध पैलू या कथांमधून स्पष्ट होतील अशा कथा निवडण्याचं कौशल्यही त्यांनी दाखवलं आहे . यात मैत्रीमध्ये धोका देणारा मदारी जसा आहे तसेच आपल्या विरुद्ध निकाल दिला तरी मैत्री जागवणारे जुम्मन व अलगूही आहेत . एखाद्या स्त्रीवर निरतिशय प्रेम करून तिच्या गर्भातलं दुसऱ्या कोणाचं मूल अत्यंत प्रेमानं आपला समजणारा गंगू आहे. तसाच अगदी पहिल्या कथेतला मंदिर, मशीद एकसारखा मानणारा जामिद ही आहे . ही माणसं वरवर पाहता भोळसट वाटतात ; पण त्यांच्यातली आत्यंतिक माणुसकी त्यांना छक्क्यापंजापासून दूर ठेवते. देवाची पवित्र बाळं असल्यासारखी ही माणसं कथेला वेगळ्या उंचीवर नेतात. थोडी विनोदाची झालर असलेली विकतचे दुखणे ही एक बकरी पालनाची कथा आहे. खरं तर हा

एक किस्सा आहे; पण प्रेमचंदांची ओघवती शैली व तेवढेच सहज झालेले भाषांतर यामुळे ती कथा मनोरंजनात्मक ठरते. प्रेमचंदांच्या इतर करुणरसाकडे जाणाऱ्या कथांपेक्षा ही कथा वेगळी ठरते. एक बकरी सांभाळणं माणसाला केवढं मेटाकुटीला आणतं याचं वर्णन या कथेत आहे . पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विद्येची श्रीमंती अधिक मौल्यवान असते हा बोध या कथेतून व्यक्त होतो . थोडक्यात , विषय निवडीचं वैविध्य अनुवादकारानं सांभाळल्यानं प्रेमचंदांच्या शैलीचेविविध पैलू वाचकांपुढे येतात . दहा- बारा कथांच्या संग्रहातून हेच अपेक्षित असतं की , छोट्याशा अवकाशात लेखकाच्या लेखणीच्या सर्वरंगच्छटा याव्यात . आराधना कुलकर्णी यात निश्चितच यशस्वी झाल्या आहेत . यातली केवळ स्वत्व शिक्षण ही एका घोड्याची आणि त्याने केलेल्या फजितीची कथा फारशी वाचनीय वाटत नाही. प्रेमचंदांच्या मूळ कथा वाचल्या की , त्यांच्या भाषेचं साधेपण लक्षात येतं . साध्यासुध्या माणसांच्या या कथा तेवढ्याच साध्या भाषेत लिहिल्या आहेत . आराधना ताईंनी अनुवादही तेवढ्याच साध्या भाषेत केला आहे. भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला अलंकारिक , थोडी जड़ भाषा वापरण्याचा मोह होऊ शकतो . पण त्यांनी हा मोह पूर्णपणे टाळला आहे. हेच त्यांच्या अनुवादातील यशाचे गमक आहे. जर अवघड शब्द वापरले असते तर प्रेमचंद त्यातून हरवले असते . आराधनाताईंनी काही इंग्रजी पुस्तकांचा, तत्त्वज्ञानविषयक पुस्तकांचाही अनुवाद केला आहे. शिवाय अनुबंध हा त्यांचा स्वतंत्र कथांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे. त्यांच्या वैचारिक व भावनिक समृद्धतेचा या साहित्यप्रवासातून प्रत्यय येतो . महत्त्वाचा उल्लेख करायचा तो साकेत प्रकाशनाचा. साकेत प्रकाशनाने अनेक भाषातील नामवंत लेखकांचं साहित्य मराठीत आणलं आहे . त्यामुळे अनेक जगप्रसिद्ध साहित्यकृतींचा आस्वाद मराठी वाचकांना घेता येतो. खरं तर मराठी माणूस फर्ड इंग्रजी बोलतो- वाचतो . पण हिंदी बोलताना मात्र

” मैं इकडसे तिकडे गया इस लिये सर ने शिक्षा ( सजा ) दी “ असं हिंदी बोललं जातं . हिंदी आणि मराठीत शिक्षा या शब्दाचा अर्थ अगदी वेगळा आहे. पण हिंदीतली पुस्तकं मराठीत आणल्यानं लेखकाच्या लेखनाविषयीची उत्सुकता वाढून मूळ हिंदी लिखाण वाचण्याची इच्छाही वाचकाच्या मनात निर्माण होऊ शकते. योग्य त्या व्यक्तींकडून अनुवाद करवून घेणाऱ्या साकेत प्रकाशनाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. अनुवादक व प्रकाशकांचं अभिनंदन .

  • रेखा बैजल

प्रेमचंद ( 31 जुलै 1880 - 8 ऑक्टोबर 1936 ) आदर्शोन्मुख यथार्थवादी लेखक व हिंदी साहित्याचेपितामह म्हणून प्रेमचंद यांना ओळखले जाते. अध्यापन , साहित्य व पत्रकारिता ही त्यांची मुख्य कार्यक्षेत्रे होती .त्यांचेहिंदी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होते. मूलत: त्यांचे लेखन उर्दूत होते . त्या भाषेचे संस्कार घेऊन ते हिंदीत आले व हिंदी साहित्यातील महान लेखक ठरले. त्यांनी आरंभीच्या कादंबऱ्या उर्दूत लिहिल्या व नंतर त्यांचेहिंदीत भाषांतर केले. व्यावसायिक जीवनाची सुरुवात त्यांनी शिक्षकीपेशा स्वीकारून केली. नोकरी करत शिक्षण घेऊन ते बी . ए. झाले . त्यानंतर त्यांना शिक्षण विभागात शाळा तपासनिसाचे पद मिळाले. महात्मा गांधींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता . गांधीजींनी केलेल्या आवाहनानुसार त्यांनी शिक्षणविभागातील नोकरी सोडून दिली. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी काही काळ मर्यादा पत्रिका व माधुरी या पत्रिकांचे संपादन केले. काही काळानंतर स्वत: चे हंस हे मासिक पत्र तसेच जागरण नावाचे साप्ताहिकही सुरू केले. त्यांनी काही महिने अजिंठा सिनेटोन कंपनीत कथालेखकाची नोकरीही केली; परंतु ही फिल्मी दुनिया त्यांना आवडली नाही व त्यांनी ती नोकरी सोडून दिली. राष्ट्रभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या कथांचा संग्रह सोजेवतन ( राष्ट्राचा विलाप) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता . त्यावर राष्ट्रद्रोहाचा ठपका ठेवून सरकारने तो जप्त केला व त्यांच्या लेखनावर बंदी आणली. त्यानंतर त्यांचे मित्र व जमानापत्रिकाचे संपादक मुंशी दयानारायण निगम । यांच्या सल्ल्यानुसार धनपतराय श्रीवास्तव हे आपले खरे नाव सोडून ते प्रेमचंद या नावाने लिहू लागले.

1901 ते 1936 या कालावधीत त्यांनी विविध प्रकारचे विपुल लेखन केले. त्यात 300 पेक्षा अधिक कथा, 15 कादंबऱ्या , 3 नाटके , 10 अनुवाद, 7 बालपुस्तके व अनेक लेख आहेत . त्यांच्या साहित्याचा अनुवाद इंग्रजी, मराठी, रशियन, जर्मनसहित अनेक भाषांमध्ये झाला आहे . भारतीय ग्रामीण जीवन हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजव्यवस्था , जमीनदारी , सरंजामशाही, औद्योगिकीकरण यांचा समाजजीवनावर असलेला प्रभाव व परिणाम यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसून येते . राजाराणी, रहस्य व रोमांच यांनी भरलेल्या मनोरंजनाच्या वातावरणातून हिंदी साहित्याला वास्तवाच्या जमिनीवर प्रथम उतरवले ते प्रेमचंद यांनी . अशा रीतीने ते एका साहित्यिक युगाचे प्रवर्तक ठरले. ते सामान्य भारतीयांचे लेखक होते. निम्न व मध्यमवर्गातील सामान्य माणसाला कथाविषय बनवून त्यांनी वास्तव जीवनाचे चित्रण केले. शेतकरी, कामगार , स्त्रिया , दलित इ. उपेक्षित वर्गातील माणसे त्यांच्या साहित्याचेनायक होते . ग्रामीण समाजातील गंभीर समस्यांचे त्यांनी वास्तव चित्रण केले. भूतकाळाचे गौरवगायन व भविष्यकाळाविषयी अतिरंजित कल्पना या दोन्ही गोष्टींना टाळून त्यांनी वर्तमानकालीन परिस्थितीचे विश्लेषण केले. हे करताना त्यांनी सोप्या , सहज बोलीभाषेचा वापर केला आहे. शोषितांच्या दु: खाला वाचा फोडताना त्यांची लेखणी सौम्य व कनवाळू भासते तर सामाजिक व आर्थिक विषमतेवर लिहिताना ती उपहासगर्भ, तरी संयत ठरते. सांप्रदायिकता , भ्रष्टाचार, जमीनदारी , कर्जखोरी , गरिबी व वसाहतवाद या विषयांवर ते जीवनभर लिहीत राहिले. त्यांनी अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाची स्थापना केली. लेखकाने समाजाच्या अग्रणी राहून प्रगतीची वाट दाखवावी व जो स्वभावाने प्रगतिशील नाही तो लेखक असूच शकत नाही, अशी त्यांची भूमिका होती . आठ दशकांपूर्वी त्यांनी जे लिहिले ते आजही लोकप्रिय आहे. त्यांचे साहित्य आजही समाजजीवनाचा व मानवी प्रवृत्तींचा आरसा आहे.

हिंसा

परमोधर्म :

या जगात असे काही लोक आहेत, जे कोणाचे नोकर नाहीत, तरी सर्वांची चाकरी करतात. त्यांना स्वत : चे विशेष काम नसते, तरीपण क्षणभर उसंतही नसते. जामिद हा अशाच लोकांपैकी एक होता . कुणाच्या अध्यात ना मध्यात. एकदम निश्चित राहणारा आणि उदार मनाचा. कोणी जरासे हसून गोड बोलले की , लगेच मदतीला धावून जायचा. गावातला कुणी आजारी पडला की , हा लगेच दिमतीला हजर . वैद्याकडे जाण्यास किंवा जडीबुटीसाठी वणवण करण्यास रात्री - अपरात्रीदेखील तयार असायचा. गरिबावरचा अन्याय त्याला सहन होत नसे. प्राणाची पर्वा न करता तो अन्यायाच्या विरोधात जायचा. असे अनेक प्रसंग त्याच्या जीवनात आले होते. अशावेळी पोलिसांशीदेखील त्याचा वाद होत असे . असा असूनही लोकांच्या दृष्टीने मात्र तो बावळट होता. एका अर्थाने ते बरोबरही होते . दुसन्यांची कामे स्वत : वर ओढवून घेणाऱ्या व त्यासाठी कितीही कोसांची पायपीट करणाऱ्या माणसाला शहाणा कसे म्हणावे ? सर्वजणत्याला स्वार्थासाठी राबवून घ्यायचे. रोजच्या दोन घासांसाठी तो इतरांवर अवलंबून होता . काही थोड्याफार लोकांना त्याची काळजी वाटायची . अधूनमधून ते त्याची कानउघाडणी करायचे. तो इतरांसाठी इतकी मरमर करतो; पण आजारी पडला तर घोटभर पाणी कोणी पाजणार नाही, असे त्याला समजावयाचे. बऱ्याचवेळा ते ऐकून ऐकून एक दिवस त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने गाव सोडायचे ठरवले व वाट मिळेल त्या दिशेने निघाला.त्याचे सामानही फारसे नव्हते. दोन दिवसांनी तो एका मोठ्या शहरात पोहोचला. तेथील उंच इमारती, मोठे , रुंद व स्वच्छ रस्ते , सुंदर बंगले, घरे, मंदिरे , मशिदी या सर्वांची त्याच्यावर विलक्षण

छाप पडली. त्याला शहर आवडले. त्याच्या छोट्या खेड्यात एकही मंदिर किंवा मशीद बांधलेली नव्हती. मुसलमान लोक एका ओट्यावर नमाजपठण करायचे व हिंदू लोक एका झाडाखालच्या देवाची पूजा करायचे. जामिद फार धार्मिक होता. शहरातील देवळे व मशिदी पाहून त्याला वाटले की , तेथील लोक धार्मिक आहेत आणि म्हणूनच प्रामाणिक, सत्यवादी , दयाळू व सहिष्णू आहेत . शहरात फिरताफिरता संध्याकाळ झाली. थकून तो एका देवळाच्या ओसरीत बसला. देऊळ खूप मोठे होते . कळस सोन्याचा होता . देवाची संगमरवरी मूर्ती झगमगत होती . आवार मात्र अस्वच्छ होते. सगळीकडे घाण व कचरा पसरला होता . जामिदला अस्वच्छता आवडत नसे. त्याने झाडूचा शोध घेतला; पण सापडला नाही. नेसत्या धोतराच्या सोग्याने त्याने ओसरी झाडणे सुरू केले. ते पाहून देवळात दर्शनासाठी आलेले लोक आश्चर्यचकित झाले व त्याच्याविषयी आपसात बोलू लागले. एक जण म्हणाला, “ मुसलमान दिसतोय, मेहतर असेल म्हणूनच स्वच्छता करतोय . “ दुसरा म्हणाला, “ स्वत : च्या धोतराने सफाई करतोय , वेडा आहे बहुतेक . “ आणखी एकजण म्हणाला, “तिकडचा फितूर तर नसेल ? एकाने त्याला हटकले व विचारले, “ अरे ए! कोण आहेस तू ? कुठून आलास ? “ “ साहेब, मी एक प्रवासी आहे. देवळात जरा विश्रांतीसाठी बसलो होतो. कचरा दिसला म्हणून साफ करतो आहे. “ “ तू मुसलमान आहेस ना ? “ “ कोण हिंदू आणि कोण मुसलमान ! श्रीकृष्ण भगवान तर सर्वांचेच ठाकूर आहेत ना ? “ “ तू ठाकूरजींना मानतोस? “ “त्यांना कोण मानत नाही साहेब ? ज्याने जन्म दिला त्याला मानायचेनाही तर कोणाला ? “ जामिदचा कामसू स्वभाव लोकांना आवडला. त्याला तेथेच राहू द्यावे यावर सर्वांचे एकमत झाले. एक हवेशीर खोलीत्याला राहायला दिली . मानसन्मान व सुग्रास अन्न त्याला मिळू लागले . दोन- चार माणसे सतत त्याच्याजवळ असायची. आपल्या गोड आवाजात तो रोज भजने गाऊ लागला. लोक

त्याच्यावर फिदा झाले. देवळातील गर्दी वाढू लागली. देवानेच हे सावज पाठवल्याचा विश्वास लोकांना वाटू लागला . एके दिवशी त्यांनी जामिदला नवे कपडे घातले व त्याचे मुंडन केले. त्याच्या हस्ते सर्वांना मिठाई वाटली. त्यांची उदारता व धर्मनिष्ठा पाहून तो भारावला. त्याच्या गावी त्याला मूर्ख समजले जात होते, शहरात मात्र जणू तो लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. भजन- कीर्तन करणे त्याला फारसे वेगळे नव्हते; कारण ते तो गावीही करायचा . सत्यनारायणाच्या कथेलाही बसायचा ; पण फार मोठा फरक हा होता की , तिकडेत्याला काहीकिंमत नव्हती व इकडे सगळे जणूत्याचे भक्त झाले होते . एके दिवशी नेहमीप्रमाणे जामिद अनेक लोकांसमोर पोथी सांगत होता . अचानक रस्त्यावरील आरडाओरड कानी आली. सर्वांचे लक्ष तिकडेगेले. एक बलदंड तरुण एका म्हाताऱ्या माणसाला मारहाण करत होता . त्या तरुणाने गंधाचा मोठा टिळा लावला होता . गळ्यात जानवे दिसत होते . म्हातारा सुटकेसाठी गयावया करत होता ; पण तरुण थांबायला तयार नव्हता . म्हाताऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून जामिदचे रक्त उसळले. रस्त्यावरून धावत जाऊन तो दोघांच्यामध्ये पडला. त्या तरुणाकडून त्याला समजले की , म्हाताऱ्याच्या एका कोंबडीने त्या हिंदू तरुणाच्या घरात घुसून घर विटाळले होते आणि शिक्षा म्हणून तो म्हाताऱ्याला मारत होता. पुन्हा म्हाताऱ्यावर हात उचलला तर त्याचे परिणाम वाईट होतील. अशी समज जामिदने त्याला दिली ; पण तरुणाला आपल्या ताकदीवर गर्व होता . जामिदला न जुमानता तो म्हाताऱ्याच्या अंगावर धावून गेला . मध्ये पडत जामिदने त्याला स्वत: च्या अंगावर घेतले. दोघांची झटापट सुरु झाली . जामिददेखील सशक्त तरुण होता . त्याने त्या तरुणावर सहजतेने मात करून खाली पाडले. त्याक्षणी वेगळे काही घडले . देवळात बसून दुरून हा तमाशा पाहणारी भक्तमंडळी धावत तेथे गेली व त्यांनी जामिदवर हल्ला चढवला. जामिद आश्चर्याने थक्क झाला . त्या टिळाधारी तरुणाला सोडून लोक आपल्याला का मारत आहेत , हे त्याला समजेना . लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण केली. मग ते आपसात

बोलू लागले, “ शेवटी विश्वासघात केलाच ना ? जातीवर गेला. “ “ कधी यांच्याकडून भलेपणाची आशा करू नये. शेवटी ते एकमेकांनाच साथ देणार. वाईट माणूस वाईटच वागणार . “याला कुणी विचारत नव्हतं . देवळात झाडू मारत होता . अंगभर कपडाही नव्हता. आपण त्याला आसरा दिला. मान दिला, माणसात आणलं ; पण तो आपला होऊ शकत नाही. “ - “ अहो ! त्याचा धर्मच वेगळा. तो त्याच वळणावर गेला. “ जामिद वेदनांनी विव्हळत रस्त्याच्या कडेला रात्रभर पडून होता . ज्या लोकांनी गौरव केला, त्यांनी अशी दुर्दशा करण्याचे दु: ख मारहाणीपेक्षा जास्त होते . या लोकांची सज्जनता आज कुठे गेली? त्या म्हाताऱ्याला वाचवणे हे सर्वांचेच कर्तव्य होते. मी तेच केले. मग असे का झाले ? देवासारखे वागणारे अचानक राक्षस का बनले ? कसाबसा उठून तो चालू लागला. थोड्याच अंतरावर त्याला तोच म्हातारा भेटला. तो म्हणाला, “ या अल्ला! खुदा कसम, तू मला वाचवलंस. तुला त्या दुष्टांनी खूपच मारहाण केली आहे. काल त्यावेळी आपले काजीसाहेब व सगळेजण मशिदीत होते, नाहीतर असं झालं नसतं . ते तुझी वाट पाहत आहेत. चल माझ्याबरोबर . आता मी, एकीऐवजी तीन - तीन कोंबड्या पाळणार आहे. बघू कोण काय करतं ? “ त्याने जामिदला काजी जोरावर हुसेनकडे नेले. ते वजू करत होते. जामिदला आनंदाने मिठी मारली व म्हणाले, “ वाहवा ! कधी तुला भेटेन असं झालं होतं . तू एकट्याने त्या काफिराची चांगली जिरवलीस. शेवटी मोमीनचे रक्त आहे. त्या काफिरांची काय मजाल! तुझ्या शुद्धीकरणाबद्दल मला समजलं होतं . अजून थोडे दिवस सबुरीने राहिला असतास तर तुझं लग्नही त्यांनी लावून दिलं असतं . सुंदर बायको आणि मोठं डबोलंही आणलं असतंस; पण असो! तुझ्यासारख्या अनुयायांची इस्लामला गरज आहे. जामिदला भेटण्यासाठी दिवसभर लोकांची गर्दी होती. त्याच्या हिमतीचा व कट्टरतेचा सर्वांना अभिमान वाटत होता . जामिद काजींच्या शेजारच्या खोलीत राहू लागला. त्याने धर्मग्रंथाचा अभ्यास

सुरू केला. एकदा एका रात्री अभ्यास संपवून जामिद आपल्या खोलीत नुकताच येऊन झोपण्याच्या तयारीत होता. दाराशी टांगा थांबल्याचा आवाज आला. कोण आले आहे हे बघण्यासाठी तो जिना उतरून खाली गेला. एक तरुण स्त्री व्हरांड्यात उभी होती व टांगेवालातिचे सामान उतरून देत होता . ती टांगेवाल्याला म्हणाली, “ हे घर नाही त्यांचे. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर मला आणले आहे. “ टांगेवाला म्हणाला, “ बाईसाहेब , हेच आहे तुमचे घर . तुम्ही वर जाऊन तर पहा. “ ती स्त्री जिना चढू लागली . त्या अनपेक्षित घटनेत काही तरी रहस्य आहे हे जाणवून जामिद चकित झाला. टांगेवाल्याच्या मागोमाग तोही वरती गेला. काजींनी त्यांना वरून पाहिले व खोलीच्या खिडक्या बंद करून घेतल्या . हातात तलवार घेऊन ते दारात उभे होते. त्यांना पाहून ती तरुणी विलक्षण दचकली. तिचा हात पकडून काजींनी तिला खोलीत खेचले. रहस्य अधिकच गूढ झाले. हा धर्म न्यायनीतिपरायण काजी त्या तरुणीची विटंबना करणार याची कल्पना जामिदला आली. रागाने टांगेवाल्याकडे पाहत तिने विचारले की , तू मला येथे का आणले ? काजी तलवार उगारून म्हणाले, “ तू आधी खाली बस आरामात . सगळं समजेल तुला . “ “ तू तर मौलवी दिसतोस. बायकांशी असं वागायला शिकवतो का तुमचा धर्म? “ ती म्हणाली. “ हो , काहीही आणि कसेही करुन काफिरांना इस्लामच्या मार्गावर आणावे. हा आमच्या खुदाचा हुकूम आहे. आले तर खुशीने नाही तर जबरदस्तीने. “ “ आमच्या लोकांनी तुमच्या लेकीसुनांना असंच वागवलं तर ? “ “ असं होतंच आहे. जसं तुम्ही वागाल तसंच उत्तर तुम्हाला मिळेल. आम्ही बेअब्रू करत नाही . आमच्या धर्मात घेतो . इस्लाम धर्म घेतल्याने इज्जत आणखी वाढते. तुझ्या समाजाने तर आम्हाला संपवण्याची शपथ घेतली आहे. लाच देऊन , फसवून , बळजबरीने आमचे लोक बाटवले जात आहेत . मग आम्ही कसे शांत राहणार? “

” ते शक्य नाही. हिंदू असे अत्याचार करू शकत नाहीत, असे वागणारे काही दुष्ट लोक असतील; पण खरा हिंदू असं कधी वागणार नाही. “ काजी काही विचार करत बोलू लागले, “ बेशक ! आमचीही काही बदमाश माणसं असं वागायची. शिकण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्याला आळा बसला आहे; पण घाबरू नकोस . तुला येथे काही त्रास होणार नाही. इस्लाम इतका स्त्रियांचा आदर दुसऱ्या कोणत्याच धर्मात होत नाही. मुसलमान पती आपल्या पत्नीवर जिवापाड प्रेम करतो व तिचेरक्षण करतो . हा माझा तरुण मित्र जामिद , तुझ्याशी निकाह करून तुला सुखात ठेवेल. “ काजीचेबोलणे ऐकून तिचा संताप अधिकच अनावर झाला. ती म्हणाली, मी तुला, तुझ्या धर्माला मानत नाही. तू माणूस नाहीस. पशू आहेस पशू ! प्राणापेक्षा मला माझी अबूर मोलाची आहे. तू खुशाल मला मारून टाक. “ एव्हाना जामिदला सर्व परिस्थितीची कल्पना आली होती . तो पुढे आला, काजी व टांगेवाल्यास ढकलून देत त्याने त्या स्त्रीचा हात धरून तिला खाली आणलं . तो म्हणाला, “ घाबरू नका, पत्ता सांगा . मी तुम्हाला घरी सोडतो. “ “ आज तुम्ही मला वाचवलंत. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. कोणत्याही धर्मात चांगले आणि वाईट लोक असतात , हे मला आज समजलं . “ एका रिकाम्या टांग्याला थांबवून त्यात चढत असताना वरून काजीने काहीतरी फेकून मारले; पण सुदैवाने ते टांग्यावर धडकले व जामिद वाचला. अहियागंजमधील तिचा पती राजकुमार पंडित याचे घर त्याला सहज सापडले . स्टेशनवर तिला घेण्यासाठी तो गेला होता ; पण चुकामूक झाली होती . त्यामुळे तो काळजीतच होता . ती तरुणी, इंदिरा , त्याला म्हणाली, “ सगळं सविस्तर नंतर सांगेन . आता एवढंच लक्षात घ्या की , या मुसलमानाची मदत मला मिळाली नसती तर मी तुम्हाला तोंड दाखवू शकले नसते. “

राजकुमार जामिदला म्हणाला, “ तुमच्या या उपकाराची फेड मी कशी करू ते सांगा . “ जामिदने उत्तर दिले, “माझ्यासाठी एवढंच करा की , तुमच्या या त्रासाचा सूड कोणत्याही गरीब मुसलमानावर घेऊ नका. “ एवढं बोलून जामिद तेथून निघाला. त्याच शांत व काळोख्या रात्री तो शहराबाहेर पडला. त्या शहरी विषारी हवेत त्याचा श्वास गुदमरू लागला .त्याला आपल्या गावाची ओढ लागली. तेथे प्रेम , सहानुभूती, सद्भावना म्हणजेच धर्म होता . धर्म आणि धार्मिक लोकांबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला.

शिळ्या भाताचा नैवेद्य

संध्याकाळी घरी येताच दीनानाथाने त्याला पन्नास रुपये पगाराची नोकरी लागल्याची बातमी गौरीला दिली. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिची देवश्रद्धा आणखी बळकट झाली . गेलं वर्षभर तो बेकार होता . थोडेफार असलेले दागिने मोडावे लागले होते. तरी घरभाडे बरेच थकले होते, कर्ज भरपूर झाले होते . दोन लहान वर्षांच्या मुलाला साधे दूधही देता येत नव्हते. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होती . देणेकरी मागे लागले होते. बिचारा दीनानाथ उजळमाथ्याने घराबाहेर पडू शकत नव्हता . आज मात्र देवाची कृपा झाली आणि संकट संपले . दीनानाथचा मालक स्वभावाने अतिशय रूक्ष; पण कामात अति हुशार होता . कचेरीत तोच सर्वांत जास्त काम करायचा. त्यामुळे कचेरीत येण्यास एक मिनिट उशीर करणे किंवा एक मिनिट लवकर जाणे अशी कुणाचीही हिंमत व्हायची नाही. मधली सुटी बरोबर पंधरा मिनिटांचीच असायची. पगार अचूकपणे एक तारखेला मिळायचा. बोनस व प्रॉव्हिडंट फंडची सोय होती . ओव्हरटाइम नसायचा. सणासुदीला सुटी मिळायची, एवढे सगळे असून कचेरीतील एकही माणूस आनंदी नसायचा. याला कारण केवळ मालकाचा तुसडा स्वभाव हेच होते. कितीही कष्ट केले तरी तो एका शब्दाने कौतुक करायचा नाही . दीनानाथची गोष्ट थोडी वेगळी होती. त्याला मालकाबद्दल काही अपेक्षा किंवा तक्रार नव्हती . तो अगदी जीव ओतून काम करायचा. वर्षभरात त्याने सर्व देणी फेडून टाकली. थोडाफार पैसा साठवला. तो काटकसरी व अल्पसंतुष्ट वृत्तीचा होता . छोट्याखर्चासाठी देखील पत्नीशी सखोल चर्चा करीत

असे . दीनानाथ आता गौरीसारखा पक्का आस्तिक झाला. नित्यनेमाने पूजा करू लागला. एकदा त्याच्या एका नास्तिक मित्राने देवाच्या अस्तित्वावर टीका केली. तेव्हा तो उत्तर देताना म्हणाला, “ देव आहे की नाही हा प्रश्न अजून सुटलेला नाही. तरीपण नास्तिक असण्यापेक्षा आस्तिक असावे हे बरे ; कारण खरेच जर देव असेल तर नास्तिकालाच नरकात जावे लागेल . आस्तिकाचा मात्र दोन्हीकडून फायदाच आहे. देव असेल तर ठीकच; नसेल तरी काय बिघडते ? पूजेत दोन चार मिनिटांचा वेळ जातो एवढेच काय ते. “ दीनानाथाच्या या दुतोंडी बोलण्यावर काय उत्तर द्यावे, हे त्या मित्राला सुचले नाही . एके दिवशी कचेरी सुटल्यावर मालकाने दीनानाथला बोलावले. त्याला मिठाई व पान देऊन आस्थेने विचारपूस केली. त्या अनपेक्षित अगत्याचा अर्थ दीनानाथला लागला नाही . त्याला वाटले त्याच्या चांगल्या कामामुळे मालक खूश आहेत. त्याचा आत्मविश्वास व देवावरील श्रद्धा लगेच वाढली . त्याच्या मनात आले, नक्कीच तो परमात्मा सर्वदर्शी व न्यायी आहे. नाहीतर मला बापड्याला कोण विचारते . मालक हसत हसत म्हणाला, “ तू मला कदाचित तुसडा समजत असशील; पण मालकाच्या नरम स्वभावाचा गैरफायदा घेऊन कुणी कामचुकारपणा करू नये म्हणून मी सर्वांना दोन हात दूर ठेवतो. तुझ्याबद्दल मात्र माझे मत चांगले आहे. तू प्रामाणिक व विश्वासू आहेस. म्हणून मी तुझी जबाबदारी वाढवतो आहे. पगारही पन्नास रुपयांनी वाढेल . “ दीनानाथच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मालकाचे पाय धरण्याची त्याची इच्छा झाली. तो कृतज्ञतेने मालकाकडे पाहत राहिला . एक मोठे रजिस्टर त्याच्या समोर ठेवत मालक म्हणाला, “ हे गेल्या वर्षीचे लेजरबुक आहे. यातलं फक्त एक पान बदलायचं आहे. यात अशा काही रकमांच्या नोंदी आहेत की , ज्यामुळे कंपनी फायद्यात आहे हे दिसून येते ; पण आपल्याला तसे दाखवायचे नाही . गेल्यावर्षी ज्याने हे लेजर

लिहिले त्या कारकुनाचे व तुझे अक्षर सारखेच आहे. ते पान पुन्हा लिही . कुणाला काही शंका येणार नाही . हे मी सर्वांच्या भल्यासाठी करतो आहे नाहीतर अनेकांच्या नोकऱ्या जातील, फारतर अर्ध्या तासाचे काम आहे. “ दीनानाथसमोर मोठी समस्या उभी राहिली. त्याच्याकडून चक्क अफरातफरीची अपेक्षा केली जात होती . यामागे लोकांच्या नोक - या वाचवण्याचा हेतू खरा होता की मालकाचा स्वार्थ, हे कळायला काही मार्ग नव्हता ; पण कोणत्याही परिस्थितीत तो भ्रष्टाचारच होता. त्यासाठी दीनानाथचे मन तयार होईना . तो घाबरत मालकाला म्हणाला, “मला माफ करा; पण मी हे काम करू शकत नाही . हा उघड उघड भ्रष्टाचार आहे. मालकाने विचारले, “ भ्रष्टाचार कशाला म्हणतात ? “ “ कोणत्याही हिशोबात फेरफार करणे हा भ्रष्टाचारच आहे. “ पण त्यामुळे जर शंभर लोकांची नोकरी टिकणार असेल तर मग तरीही तो भ्रष्टाचार ठरेल का ? आपल्या कंपनीची स्थिती वास्तवात एक आहे, तर कागदोपत्री ती वेगळी आहे. त्यात बदल केला नाही तर हजारो रुपयांचा नफा वाटावा लागेल व कंपनीचे दिवाळे निघेल . सर्वांना घरी बसावे लागेल. काही श्रीमंत भागीदारांसाठी इतक्या गरिबांचे नुकसान करावे असे मला वाटत नाही . परोपकारासाठी थोडासा भ्रष्टाचार केला तर आत्मा काही दुखावला जात नाही. “ यावर दीनानाथला काही उत्तर सुचले नाही . त्याला वाटले की , मालक जर खरंच बोलत असेल तर हे काम कठोर कर्तव्य मानून करायला हवे. तरीपण तो म्हणाला, “ जर ही गोष्ट जाहीर झाली तर माझा सर्वनाश नक्की होईल . चौदा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर माझे काय ? “ जोरात हसत मालक म्हणाला, “ जरी ही गोष्ट उघड झाली तरी मी अडकेन, तू नाही. कारण सारख्या अक्षरामुळे कोणते पान बदलले आहे ते कळणार नाही. “ आता दीनानाथ पराभूत झाला. पानाची नक्कल करणे त्याने सुरु केले.

त्या प्रसंगानंतर दीनानाथच्या मनात चोर लपून बसला. गौरीला त्याने काही सांगितले नाही. एका महिन्याने त्याला बढती मिळाली. पगार शंभर रुपये झाला. दोनशे रुपयांचा बोनस मिळाला , घरात समृद्धी दिसू लागली. त्याच्या मनावरचे अपराधाचे एक ओझे मात्र टिकून होते, त्याने घडल्या प्रकाराबद्दल गौरीला काही कल्पना दिली नाही . जो युक्तिवाद करून मालकाने त्याला पटवले होते , त्याच युक्तिवादाने गौरीचे समाधान होईल असा त्याला भरवसा नव्हता . त्याची ईश्वरनिष्ठा त्याला सतत भीती दाखवत होती . आपल्या अपराधाची भयंकर शिक्षा देवाकडून होणार आहे या भीतीने त्याला घेरून टाकले. आज ना उद्या तो शिक्षा करणारच आहे. ती जेवढी उशिरा मिळेल तेवढी ती भयंकर असेल. मुद्दलावरील व्याजाप्रमाणे ती वाढत जाईल. या विचारांनी त्याच्या जीवनातला आनंद व उत्साह पूर्णत : मावळला. काही दिवसांनी मलेरियाची साथ आली. त्याचा मुलगा आजारी पडला. दीनानाथचे प्राण कंठाशी आले. त्याच्या पापाचा दंड समोर उभा राहिला आहे असे त्याला वाटले. त्याने गौरीला विचारले, “ आपल्या बाबतीत देव इतका निर्दयी का झाला आहे ? “ गौरी म्हणाली, “ देव निर्दयीपणे वागतो तो पापी लोकांशी, आपण काय पाप केलंय ? “ “ तो पापी लोकांना कधीच क्षमा करत नाही का ? माणसाला कधी कधी असेही काम करावे लागते जे एकासाठी पाप तर दुसऱ्यासाठी पुण्य ठरते. “ तो पुढे म्हणाला, “ समजा एखाद्याचेप्राण वाचवण्यासाठी मला खोटे बोलावे लागले तर ते पाप आहे का ? “ गौरी म्हणाली माझ्या मते, “ ते खोटे बोलणे पाप नसून पुण्य आहे. “म्हणजे ज्या पापामुळे माणसांचे कल्याण होते ते पुण्य आहे, हे नक्की ? “ “ हो, नक्की ! “ दीनानाथच्या मनातली अमंगळशंका काही वेळासाठी तरी दूर झाली, एका आठवड्यात त्याचा मुलगा

ठणठणीत बरा झाला.

” मग काय त्याला निर्दयी मानता ? “ काही दिवस लोटले. दीनानाथ स्वत : आजारी पडला. ती नक्कीच दैवी शिक्षा होती आणि तो वाचणे । “त्याच्या इतका निर्दयी या जगात दुसरा कोणी नसेल. आपणच निर्माण केलेल्या मनुष्यरूपी अशक्य होते, या कल्पनेने त्याच्या साध्या तापाला भयानक रुप दिले. तापामुळे त्याची कल्पनाशक्ती खेळण्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा देण्यासाठी जो अग्निकुंडात ढकलतो, तो देव दयाळू असूच तीक्र झाली . त्याला यमदूत दिसू लागले. त्यांच्या हातातील भाले व गदा दिसू लागल्या . नरकातील शकत नाही. तो जितका दयाळू आहे, त्याच्या कैकपटीने तो निर्दयी आहे . अशा देवाची मी कल्पना अग्निकुंडाचे चटके बसू लागले. अंगाची आग होऊ लागली. डॉक्टरांच्या औषधांनी ती शांत होईना . करू शकत नाही . त्या कल्पनेचीच मला किळस येते आहे. प्रेमाला सर्वांत मोठी शक्ती मानले जाते . खरे तर दीनानाथ अंधश्रद्धाळू नव्हता, पौराणिक रहस्यमय गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता . तो व्यवहारात नसेल तरी तत्त्वज्ञानात प्रेमालाच जीवनाचे सत्य मानले आहे. विचारवंतांच्या मतेदेखील बुद्धिवादी होता आणि तर्कबुद्धीला पटल्यानंतरच त्याचा देवावर विश्वास बसला होता ; पण

प्रेम ही जगातील सर्वश्रेष्ठ संकल्पना आहे; परंतु तुझा देव शिक्षेची भीती दाखवून सृष्टीचे संचालन देवाच्या सोबत त्याची दया आणि शिक्षा या दोन्हीही गोष्टी आल्या . देवदयेने त्याला नोकरी व करतो. मग त्याच्यात व माणसात फरक काय ? अशा देवाची भक्ती मी करणार नाही . श्रीमंत माणसे सन्मान मिळाला, नाहीतर तो उपासमारीने झिजला असता ; पण अग्निकुंडात पडून भस्म होण्यापेक्षा देवाला मानतात . त्यांच्यासाठी तो दयाळू असेल; कारण ते इतरांना लुटतात, आमच्यासारख्यांना उपासमारी सोसणे सोपे असे त्याला आता वाटू लागले. त्याच्यावरील संस्कारांनी दृढ केलेल्या त्याची दया कधीच मिळत नाही . पदोपदी भीती मात्र वाटत राहते. हे करू नको, देव रागवेल. ते करू दंडभावनेने त्याच्या बुद्धी व आत्म्याला व्यापून टाकले. संस्कारांवर धडका मारणाऱ्या तर्क व

नको, देव शिक्षा करेल . प्रेमाने अधिकार गाजवणे ही मानवता आहे. भीती दाखवून अधिकार गाजवणे बुद्धिवादाच्या लाटा लगेच विरून जात होत्या . संस्कारांचा पर्वत जशाचा तसा भक्कमपणे उभा होता . ही पशुता आहे. असला आतंकवादी देव असण्यापेक्षा तो नसलेलाच बरा . त्याच्या दंड व दया या परंतु अजून जगणे बाकी असल्यामुळे दीनानाथ त्या आजारातून बरा झाला . थोडी शक्ती आल्यावर दोन्ही कल्पनांमधून मी आता मुक्त होणार आहे. एक कठोर दंड अनेक वर्षांच्या प्रेमाला, विश्वासाला कामाला जाऊ लागला .

मातीमोल करतो . गौरी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ; पण एखाद्या वेळी जर मी तुला मारहाण केली एके दिवशी गौरी म्हणाली, “ तुम्ही बरे व्हावेम्हणून मी नवस बोलले होते . तो फेडायचा आहे. पन्नास तर तू माझे तोंड पाहणार नाहीस. अशा भीतीग्रस्त जीवनासाठी मला देवाचे उपकार नको आहेत , ब्राम्हण व गरिबांना अन्नदान करायचे आहे. “ ।

शिळ्या भातात देखील त्याच्यासाठी नैवेद्याचा वाटा काढण्याची गरज नाही . तू जर ब्राह्मणभोजनाचा दीनानाथच्या कपाळावर आठ्या चढल्या . तो म्हणाला, “माझे आयुष्य बाकी आहे म्हणून मी बरा हट्ट धरलास तर मी विष घेईन , हे लक्षात ठेव. “ गौरी भयव्याकूळ नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. झालो. मी काही देवदयेने बरा झालो नाही , म्हणून मी तुला नवस फेडू देणार नाही . मी देवाला दयाळू मानत नाही . “

प्रायश्चित्त

अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये वेळेवर यायचे नसते. थोडे उशिरा येणे त्यांना शोभून दिसते. त्यांचे पद जितके मोठे तितके त्यांनी उशिरा यावे व लवकर जावे. चपराश्याची नोकरी मात्र चोवीस तासांची. बदली चपराशी दिल्याशिवाय त्याला रजा मिळत नाही . बरेली जिल्हा बोर्डाचा हेड क्लार्क बाबू मदारीलाल ऑफिसला अकरा वाजता आला. त्याक्षणी सगळे ऑफिस झोपेतून उठल्यासारखे खाडकन जागे झाले. एका शिपायाने धावत जाऊन त्याची सायकल घेतली. दुसयाने केबिनचा पडदा सरकवला, मुख्य शिपायाने टपाल टेबलावर ठेवले. मदारीलालने पहिला लिफाफा उघडला, पत्रातील मजकूर वाचून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मोठेमोठे आघात झेलतानाही तो इतका कधी घाबरला नव्हता . त्या पत्रातला मजकूर असा होता की , त्याचा एकेकाळचा शालेय सहपाठी असणारा, सुबोधचंद्र हा बोर्डाच्या सेक्रेटरीपदावर येत आहे. शाळेत असताना मदारीलाल सुबोधचा खूप मत्सर करीत असे. त्याच्यावर कुरघोडी करण्याचे अनेक असफल प्रयत्न त्याने केले होते . तोच सुबोध आता त्याचा साहेब बनून येणार होता . मदारीलालने त्याला अपमानित करण्यासाठी केलेल्या शाळा, कॉलेजमधील सर्व गोष्टी , खोटे आरोप, बदनामी हे सगळं सुबोधला आठवत असेल. तो माझ्याशी आता कसा वागेल ? मदारीला स्वरक्षणाचा कोणताच मार्ग सुचेना. सुबोधच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मरण परवडेल असे त्याच्या मनात आले. मदारी व सुबोधच्या कुंडलीतच छत्तीसचा योग होता . दोघे शाळेत एकाच दिवशी दाखल झाले. त्या दिवशीच मदारीच्या मनात पडलेली द्वेषाची ठिणगी आज तीस वर्षांनीही तशीच धगधगती होती . प्रत्येक बाबतीत सुबोध मदारीपेक्षा सरस होता . रंगरूप , बुद्धी, राहणीमान, वर्तन या सर्व बाबतींत सुबोधने वरचढ असणे हा अपराध मदारीने कधीच क्षम्य मानला नाही. पुढे पदवी घेऊन सुबोध निघून

गेला. नापास होऊन मदारी या ऑफिसमध्ये नोकरीला लागला, तेव्हा कुठे त्याचे मन जरासे शांत झाले. सुबोध फौजेत भरती होऊन परदेशात गेल्याचे समजल्यावर त्याला अधिकच हायसे झाले होते; पण आता तोच जुना सलणारा काटा शतपटीने अधिक वेदना घेऊन वर आला. मदारीचे नशीब आता सुबोधच्या हातात गेले होते. येथेही सुबोध त्याच्या वरचढ होता. किती घोर हा ईश्वराचा अन्याय आणि नियतीची कठोरता . थोडा वेळ शांततेत घालवून मदारीलालने इतर सर्व कारकून मंडळीला सरकारकडून आलेला आदेश वाचून दाखवला. सुबोधबद्दल तो सांगू लागला, “ आता तुम्ही सगळे सांभाळून राहा . साहेब कडक स्वभावाचे आहेत. छोटीशी चूकही सहन होणार नाही . मी चहाड्या करत नाही; पण तुम्हाला सावध करतो आहे. येणारा माणूस रागीट व गर्विष्ठ आहे. स्वत: हजारो रुपये हडप करेल; पण एका पैशासाठीही इतराची गय करणार नाही . तुम्ही आता सरकारचेनाही सेक्रेटरी साहेबांचेनोकर आहात . तुमच्यापैकी कुणाला मुलांचा अभ्यास घ्यावा लागेल , कुणाला किराणा आणावा लागेल, तर कुणाला पेपर वाचून दाखवावा लागेल . चपराशी आता ऑफिसमध्ये दिसणारच नाहीत. “ सुबोधविषयी कौशल्याने अशी आग भडकावून दिल्यानंतर मदारीचे मन जरा शांत झाले. त्यानंतर एका आठवड्याने सुबोधचंद्र आला. ऑफिसची सर्वमंडळी स्टेशनवर स्वागतासाठी गेली होती. मदारीला पाहताच ओळख पटून त्याने अति आनंदाने त्याला मिठी मारली व म्हणाला , “ अरे व्वा ! तू इथे कसा ? किती वर्षांनी भेटतो आहेस ? “ मदारी म्हणाला, “ मी इथे तुमच्याच ऑफिसमध्ये हेडक्लर्क आहे. तुम्ही कसे आहात ? “ “ मी एकदम मजेत आहे. बसरा , फ्रान्स , इजिप्त आणि कुठे कुठे फिरून आलो. तू माझ्याच ऑफिसमध्ये आहेस ही किती आनंदाची गोष्ट आहे. माझे नशीब खरेच खूप चांगले आहे. मी खूप पैसे कमावले आणि खर्चही केले.तिथून परतल्यावर कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये काही दिवस चकरा मारल्या .

मग येथे आलो तर तू भेटलास. “ सुबोधकडून हे सर्व ऐकताना मदारीचे काळीज जणू सुयाने चिरले जात होते. लेखणी खरडत राहिल्यामुळे पाचशे रुपयेही साठवता आले नाहीत आणि या बेट्याने मात्र एवढे पैसे जमवले व उधळलेदेखील. त्याने सुबोधला इतर सर्वांचा परिचय करून दिला. सर्वांशी हस्तांदोलन करुन सुबोध म्हणाला, “मला तुमचा अधिकारी नव्हे तर मित्र समजा. तुमचे हेडक्लार्क माझे बालमित्र आहेत . आपण सर्व मिळून चांगले काम करू व बोर्डाचे नाव मोठे करू . मी , तुम्ही, आपण सर्व कुण्या तिसन्याचे नोकर आहोत . हा ! प्रामाणिकपणे आपले कर्तव्य मात्र केले पाहिजे. “ सुबोधचा निरोप घेऊन सर्वजण परतू लागले. एकजण म्हणाला, “ माणूस तर चांगला वाटतोय . “ दुसरा म्हणाला, “ अरे , सुरुवातीला सगळे असेच चांगले बोलतात. “ “ हो , कदाचित हे त्याचे दाखवायचे दात असतील . सुबोधला येऊन एक महिना झाला. त्याच्या प्रसन्न व नन स्वभावामुळे सर्वजण खूश होते. मदारी मात्र । याला अपवाद होता . त्याच्या द्वेषभरल्या दृष्टीला सुबोधमध्ये फक्त अवगुणच दिसत होते. कर्मचारी , बोर्डाचे सदस्य , ठेकेदार या सर्वांना त्याने सुबोधविरुद्ध चिथावण्याचे प्रयत्न केले; पण अपयशी ठरला. वरवर मात्र तो सुबोधशी जिवलग मित्राप्रमाणे वागत होता . सुबोधमध्ये सर्व गुण होते; पण माणसाची पारख करण्याचा गुण तेवढा नव्हता. मदारीला तो जिवलग मित्र मानत होता. एकदा सुबोध कामासाठी बाहेर गेला असताना मदारी त्याच्या केबिनमध्ये गेला. दाराबाहेरचा चपराशी पान खाण्यासाठी बाहेर गेला होता. त्याला टेबलावर पाच हजार रुपयांचे बंडल दिसले . बोर्डाच्या शाळेच्या फर्निचरसाठीचे ते पैसे होते व ठेकेदाराला देण्यासाठी सुबोधने टेबलावर काढून ठेवले होते . एका क्षणात मदारीची नियत फिरली. त्याने ते पैसे खिशात टाकले व तो बाहेर पडला .

स्वत : च्या जागेवर थोडा वेळ बसून राहिला. थोड्यावेळाने एका क्लार्कला बोलावून एक फाइल दिली व साहेबांकडे देण्यास सांगितली. क्लार्क जाऊन लगेच परत आला व साहेब आत नसल्याचे सांगितले . त्यावर नाराजी दाखवत मदारी म्हणाला, “ केबिन उघडी ठेवून कसे काय गेले साहेब बाहेर ? येथे काय सगळी देवमाणसेच आहेत का ? कधी कुणाची नियत कशी बदलेल सांगता येते का ? आपण सज्जन आहोत म्हणून ठीक आहे; पण माणसाच्या स्वभावाची काही खात्री देता येत नाही . त्यांच्या केबिनचा दरवाजा बंद करून घे. “ क्लार्क म्हणाला, “ आता त्यांच्या दाराशी चपराशी आहे. “ मदारी चिडून म्हणाला, “ जेवढे सांगतोय तेवढे कर . चपराशी कुणी साधू आहे का ऋषी आहे ? त्यानेच काही चोरले तर काय करणार ? तीनशे रुपयांच्या जामिनावर सुटून जाईल; पण येथील एक एक कागद लाखमोलाचा आहे. “ बोलता बोलता उठून मदारीने स्वत: दरवाजा बंद केला. थोड्यावेळाने खिशातले पैसे त्याने कपाटात फाइल्सच्या खाली लपवले . तासाभराने सुबोध परतला. केबिन बंद पाहून मस्करीत म्हणाला, “कोणीबंद केली माझी केबिन ! मला कामावरून काढले की काय ? “ मदारी उठून उभा राहत सौम्य राग दाखवत म्हणाला, “ साहेब , एका मिनिटासाठी जरी बाहेर जायचे असेल तर केबिन बंद करत जा . किती महत्त्वाची कागदपत्रे असतात तेथे. आता मीच ते दार बंद केले आहे. “ थोड्या वेळाने पैसे घेण्यासाठी ठेकेदार आला, तेव्हा पैसे टेबलावर नाहीत . हे सुबोधच्या लक्षात आले. त्याने बाहेर येऊन सर्वांना सांगितले. सर्वांनी मिळून सगळीकडे पैसे शोधले; पण सापडले नाहीत. सुबोधच्या मनावर भीतीचे दडपण आले. पैसे चोरीला गेले याविषयी खात्री पटली . तो खचून गेला . चेहरा उतरला , हताश होऊन आजारी माणसासारखा खुर्चीत बसून राहिला .

मदारीलाल आवाजात सहानुभूती आणत म्हणाला, “दहा वर्षे मी येथे काम करतो आहे; पण एका पैशाची वस्तू कधी गहाळ झाली नाही . व्हायचे ते नुकसान तर आता झालेच आहे. आता बँकेतून पैसे । काढ व ठेकेदाराला दे. उगीच बदनामी नको व्हायला. परंतु सुबोधच्या खात्यात तेवढे पैसे नव्हते. तो घरी गेला . इतक्या पैशाची व्यवस्था करणे त्याला जमले नाही. विवशता व दु: ख लपवण्यासाठी केवळ मृत्यूचा आडोसा होता . त्याने त्याच रात्री आत्महत्या केली. त्या रात्री मदारीलालदेखील झोपेवाचून तळमळत राहिला. त्याला क्षणभरही झोप लागली नव्हती . दुसन्या दिवशी सकाळी सुबोधच्या आत्महत्येची बातमी घेऊन चपराशी त्याच्या घरी आला. ती बातमी ऐकून मदारीलालचे डोळे विस्फारले, चेहरा ताणला गेला. तो नखशिखान्त हादरला. एवढा मोठा परिणाम त्याला अजिबात अपेक्षित नव्हता. चपराशी सांगत होता, “पोलीस आले आहेत . डॉक्टरी तपासणी अजून बाकी आहे . खूप लोक जमले आहेत. साहेबांच्या बायको, मुलांकडे बघवत नाही. ते खूपच आक्रोश करत आहेत . तुम्हाला बोलावले आहे. “ मदारीला चक्कर येऊ लागली. दाराला धरत त्याने स्वत: ला सावरले. तो म्हणाला, “ पैशांचा काही विषय निघाला का ? “ चपराशी म्हणाला, “ तीच चर्चा सुरु आहे. सर्वांना वाटते आहे की , आपल्या ऑफिसमधल्याच कुणाचेतरी हे काम आहे; पण कुणावर संशय घेऊ नका, मृत्यूसाठी कुणाला जबाबदार धरू नका अशी चिठ्ठी कलेक्टर साहेबांच्या नावाने लिहिलेली सापडली आहे. “ मदारीचेश्वास जड झाले . डोळे वाहू लागले. तो सुबोधकडे गेला. सर्वांच्या संशयी नजरा आपल्यावर खिळल्या आहेत असे त्याला वाटले. पोलिसांच्या सांगण्यावरून त्याने सावधपणे जबाब लिहून दिला . त्याच वेळी सुबोधची दोन्ही मुले रडत रडत त्याच्या जवळ आली व आईने त्याला बोलावले आहे असे सांगितले. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. “तिला तर माझा काही सशंय आला नसेल ?

सुबोधने माझ्या विरोधात तिला काही सांगितले असेल का ? “ तो आत गेला. रामेश्वरी, सुबोधची पत्नी शोक करत होती. तिला व तिच्या मुलांना त्याला पाहवेना . त्याचा आत्मा त्याचा धिक्कार करू लागला . त्याच्यामुळे त्या कुटुंबाचे सुख मातीत मिसळले होते आणि त्या सर्वांना त्याच्याविषयी फार विश्वास होता . पैसे चोरताना, त्या घटनेचा इतका भीषण परिणाम होईल असे त्याला किंचितही वाटले नव्हते. आत्मग्लानीने त्याला काहीच बोलता येईना . रामेश्वरी म्हणाली, “ भैयाजी, त्यांच्यावर आलेले संकट मला त्यांनी सांगितले होते. असेही म्हणाले की , घाबरण्याचे काही कारण नाही . माझा जवळचा मित्र, मदारीलाल आपल्या मदतीला आहे. त्याच्या ओळखीने पैशाची सोय तो सहज करून देईल; पण नंतर तो दुष्टविचार त्यांच्या मनात का आला असेल ? मलाही मेलीला अगदी गाढ झोप लागली. “ रामेश्वरीबरोबर मदारीलालही रडू लागला. थोड्या वेळाने ती पुन्हा म्हणाली, “ जे व्हायचे होते ते झाले. हे नक्की तुमच्या ऑफिसमधल्या कोणाचे तरी काम आहे. तुम्ही त्याला शोधून काढा . तुमच्याशिवाय आता आम्हाला कोणाचा आधार आहे ? “ सगळे काही खरे सांगून तिची माफी मागावी अशी प्रबळ इच्छा मदारीलालला झाली; पण जीभ रेटली नाही. तिचा एक एक शब्द त्याचे काळीज चिरत गेला. तो भोवळ येऊन खाली कोसळला. मृतदेहाची चिकित्सा झाल्यावर दुपारी सुबोधची अंत्ययात्रा निघाली. मुले लहान असल्यामुळे भडाग्नी देण्यासाठी रामेश्वरी पुढे आली. तिला अडवत मदारीलाल म्हणाला, “भाभी हे काम आता मला करू दे. सुबोध माझा भाऊच होता . जिवंतपणी मी त्याच्यासाठी काही केले नाही आता आमच्या मैत्रीखातर करू दे. “ त्याने भडाग्नी दिला. पुढचे तेरा दिवसांचे सर्व विधी त्याने स्वखर्चाने यथासांग केले . सर्वक्रियाकर्मे संपल्यावर रामेश्वरीने त्याला सांगितले की , मुलांना घेऊन गावी जाण्याचा तिचा विचार आहे. गावात एक कच्चे घर व थोडीशी जमीन होती . थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, “ मी जर

एक सल्ला दिला तर ऐकशील ? “ “ तुमचे का नाही ऐकणार भैयाजी ? दुसरे आहे कोण आम्हाला ? “ “ मग आता गावाकडे जाण्याचा विचार सोडून दे आणि मुलांना घेऊन माझ्या घरी राहा. सगळे काही ठीक होईल . तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. देवकृपेने तुझ्या मुलीलाही चांगले स्थळ मिळेल. “ रामेश्वरीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, “ पण … भैया , जरा विचार करा … “ मदारीलालतिचे बोलणे तोडत म्हणाला, “ आता माझा विचार पक्का आहे आणि तुझे मी काही एक

ऐकणार नाही. दोन भाऊ एकत्र राहत नाहीत का ? सुबोध माझा भाऊ होता ना ? “ मदारीलालने आग्रहपूर्वक त्या सर्वांना स्वत : च्या घरी नेले. आज दहा वर्षे होऊन गेली. मदारीलाल त्या सर्वांचे उत्तम पालनपोषण करीत आहे. मुले कॉलेजमध्ये शिकत आहेत. मुलीचे लग्न एका प्रतिष्ठित घरात करून दिले आहे. मदारीलाल व त्याची पत्नी रामेश्वरीची तन -मन - धनाने सेवा करतात व तिच्या मनाप्रमाणे वागतात. हे सेवाव्रत घेऊन मदारीलाल स्वत: च्या पापाचे प्रायश्चित्त करीत आहे .

00

बालक

गंगूला लोक ब्राह्मण मानतात . तोही स्वत: ला ब्राह्मण समजतो. माझे नोकरचाकर मला दुरून पाहताच नमस्कार करतात. गंगू कधीच करत नाही . बहुतेक माझ्याकडूनच त्याला नमस्काराची अपेक्षा असावी . माझ्या उष्ट्या पेल्याला तो कधी हात लावत नाही . मला वारा घाल असे सांगण्याची हिंमत मी कधी करू शकलो नाही. मी जेव्हा घामाने भिजून जातो तेव्हा जर दुसरा कुणी नोकर तेथे नसेल तर गंगू स्वत : हून पंख्याने मला वारा घालतो ; पण त्यावेळी चेहऱ्यावर माझ्यावर उपकार करीत असल्याचे भाव स्पष्ट उमटलेले असतात. मी मलाही नकळत त्याच्या हातून पंखा काढून घेतो. त्याचा स्वभाव उग्र आहे. कुणाचे बोलणे त्याला सहन होत नाही. त्याला विशेष मित्र कुणी नाहीत. इतर नोकरांबरोबर आपलेपणाने वागणे कदाचित त्याला कमीपणाचे वाटते. गडीमाणसांमध्ये दुर्मीळ असणारा एक गुण त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे त्याला कोणतेच व्यसन नाही. या गोष्टीचे मला नेहमीच आश्चर्य वाटते . तो कधी पूजापाठ करत नाही, कधी नदीस्नानाला जात नाही. एकदम निरक्षर आहे. तरीदेखील तो ब्राह्मण आहे आणि सर्वांनी त्याला तशी प्रतिष्ठा द्यावी असे त्याला वाटते आणि का नाही वाटणार ? पूर्वजांच्या संपत्तीवर , स्वत: ची मिळकत असल्याप्रमाणे लोक जर दिमाखात मिरवतात तर त्याने या प्रतिष्ठेची व सन्मानाची अपेक्षा का करू नये, जी त्याच्या पूर्वजांना प्राप्त होती . तो तर त्याचा वारसा आहे . मी माझ्या नोकरांशी फार कमी बोलतो . छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी त्यांना बोलवत नाही व त्यांनी आपणहून माझ्याकडे येऊ नये असे मला वाटते . हिंगन आणि भैकू ला बोलावून काम सांगण्यापेक्षा हातानेच पाणी घेणे, दिवा लावणे, जोडे घालणे पुस्तके कपाटातून काढणे हे अधिक सोपे आहे असे मला वाटते. नोकरांना माझा स्वभाव माहीत असल्याने तेही अनावश्यक कारणाने माझ्याकडे येत नाहीत . माझी कामे मीच करत असल्याने

स्वातंत्र्य व आत्मविश्वासाची भावना माझ्यामध्ये आहे. असे असताना एके दिवशी सकाळी मी न बोलावताच गंगू आल्यामुळे मी नाराज झालो. हे लोक जेव्हा येतात तेव्हा दुसया नोकरांची चुगली करतात किंवा पैसे मागतात, ते मला अजिबात आवडत नाही. मी एक तारखेला प्रत्येकाचा पगार देत असतो. मध्येच मला कुणी पैसे मागितले तर फार राग येतो. दोन चार रुपयांचा हिशेब ठेवण्याची कटकट पाहिजे कशाला ? आणि महिनाभराचा पगार मिळाल्यावर तो पंधरा दिवसांत त्यांनी उडवायचा कशाला ? मग येतात पुन्हा पैसे मागायला. तक्रार आणि खुशामत या दोन्ही गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत . “ गंगूला पाहून माझ्या कपाळावर आठ्या चढल्या . “ मी त्याला विचारलं , “ काय झाले? मी तर तुला बोलावले नाही . “ गंगूच्या चेहऱ्यावर कधी न दिसणारे नम्रतापूर्ण व लज्जेचे भाव दिसत होते. मी जरा नरमाईने विचारले , “ अरे झाले तरी काय ? काहीच का बोलत नाहीस ? माझी फिरायला जाण्याची ही वेळ आहे. मला उशीर करु नकोस . “ तुम्ही फिरुन या , मी पुन्हा येईन . “ गंगूचा स्वर निराशेचा होता . ती बाब मला अधिक चिंताजनक वाटली. कारण नंतर मी वाचन लेखनात व्यस्त असतो . तेव्हाच हा नेमका येऊन माझे डोके खाईल . मी कडक शब्दात त्याला म्हटलं पगाराची उचल मागायला आला आहेस का ? मी तसे काही करत नाही. “ “नाही मालक , मी तर कधीच उचल मागत नाही. “ “ मग कुणाची तक्रार घेऊन आला आहेस का ? मला चुगल्या केलेले अजिबात आवडणार नाही . “ स्वत : चे मन घट्ट करीत कसेबसे तो बोलला, “ मला मोकळे करा सेवेतून. मी आपली नोकरी आता करु शकत नाही. “

त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. मी स्वत: मानवतापूर्वक वागतो . कधी नोकरांना टाकून बोलत नाही. माझ्यातला स्वामित्वाचा भाव नियंत्रित ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. असे असताना गंगूकडून असा प्रस्ताव पहिल्यांदा यावा याचा मला धक्का बसणे साहजिकच होते . मी जरा कठोर स्वरात विचारले, “ का ? काय झाले ? काय तक्रार आहे तुझी ? “ “ सरकार , तुमच्या इतका चांगला स्वभाव अजून कुणाचा मी पाहिला नाही ; पण गोष्टच अशी आहे की , मी तुमच्याकडे नाही राहू शकत, माझ्यामुळे तुमची बदनामी व्हावी असे मला वाटत नाही मालक. “ मी पार गोंधळून गेलो. जिज्ञासा प्रचंड वाढली. आत्मसमर्पणाच्या भावनेने व्हरांड्यात पडलेल्या खुर्चीवर बसत मी म्हणालो, “ तू असे कोड्यात बोलू नकोस. काय झाले आहे, सरळ आणि स्पष्टपणे

सांग. “

गंगू अति नम्रतेने बोलू लागला, “ ते असे आहे की . .. ती स्त्री नाही का ? जिला - नुकतेच विधवा आश्रमातून काढून टाकले आहे, ती … गोमती देवी… “ “ठिकंय , काढलेय तिला, त्याचे काय ? तुझ्या नोकरीशी तिचा काय संबंध ? “ मी अधीरतेने विचारले . “मला तिच्याशी… लग्न करायचंय बाबूजी. गंगूने आपल्या शिरावरचे ओझे जणू जमिनीवर टाकून दिले . मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिलो. नव्या संस्कृतीचे, सुधारणेचे जरासेही वारे न लागलेला, हा कर्मठ ब्राह्मण त्या कुलटेशी लग्न करायला निघालाय . तिच्याशी ? जिला कुणी सभ्य माणूस दाराशी उभे करणार नाही. तिच्याशी ? गोमतीने आमच्या आळीतील शांत वातावरणात थोडी खळबळ उडवून दिली आहे. काही वर्षांपूर्वी ती विधवाश्रमात आली. तीन - चार वेळा आश्रमातील कर्मचाऱ्यांनी तिचे लग्न लावून दिले; पण प्रत्येक वेळी महिनाभरातच ती पळून

आली होती . आता तिला तिथून हाकलून दिले होते. तेव्हापासून ती याच आळीत एक खोली घेऊन राहत होती व सगळ्या तरुणांच्या चर्चेचा विषय बनली होती. गंगूच्या साधेपणाचा मला रागही आला आणि दयाही आली. या मूर्खाला लग्नासाठी हिच्याशिवाय कुणी दुसरी स्त्री दिसली नाही का ? तीन नवऱ्यांना सोडून पळालेली ती , याच्याजवळ किती दिवस राहील? गंगू ही असा आहे की , एक आठवडाही ती राहू शकणार नाही . मी त्याला सावध करण्याच्या इच्छेने विचारले,” तुला या बाईबद्दल सगळे माहीत आहे का ? “ “ ते सगळे खोटे आहे मालक . लोक विनाकारण तिला बदनाम करत आहेत . “ “ काय सांगतोस काय ? तीन वेळा ती तीन नवऱ्यांपासून पळून आली नाही का ? “त्यांनीच तिला हाकलून दिले तर ती काय करणार ? “ “ कसा बुद्धू माणूस आहेस रे तू? दुरून येऊन, हजारो रुपये खर्च करून कुणी लग्न करते ते काय बायकोला हाकलण्यासाठी ? “ गंगू भावुकतेने म्हणाला, “ मालक, जिथे प्रेम नाही तिथे कोणतीच स्त्री राहू शकत नाही. स्त्रीला केवळ वस्त्र आणि अन्न एवढेच लागते असे नाही ; तिला प्रेमही हवे असते. विधवेशी लग्न लावून तिच्यावर फार मोठे उपकार केले असे त्यांना वाटत असेल. तिने सर्वार्थाने सर्वस्व देऊन त्यांची व्हावे असे त्यांना वाटत असेल; पण दुसऱ्याला आपलेसे करायचे असेल तर आधी आपण त्याचे व्हायला हवे असते . खरी गोष्ट ही आहे. त्याशिवाय तिला काहीतरी आजार आहे, भूतबाधा झाली आहे, कधी कधी बडबड करते, कधी बेशुद्ध पडते… “ “ आणि अशा बाईशी तुला लग्न करायचंय ? लक्षात ठेव , सगळे आयुष्य बरबाद होईल “ “ मला तर वाटते , माझे आयुष्य चांगले सावरले जाईल . या उप्पर त्या देवाची मर्जी. “ गंगूच्या

आवाजात हुतात्म्याचा आवेश होता . “ मग तू हे नक्की ठरवले आहेस का ? “ मी जोर देत विचारलं . “ होय, सरकार . “ “ ठीक आहे. मी तुझा राजीनामा मंजूर करतो आहे. “ मी निरर्थक रूढी परंपरांना मानत नाही; पण एका कलंकित स्त्रीशी लग्न करणारा माणूस माझ्या घरी राहावा हे मला मान्य नव्हते . त्यामुळे मला अडचणी आल्या असत्या . भांडणे , भानगडी , चोरीमारी, पोलीस, कोर्टकचेरी या सगळ्यांची शक्यता होती . या सगळ्या कटकटींपासून दूर राहणेच शहाणपणाचे होते . गंगू एखाद्या भुकेल्या प्राण्यासारखा भाकर तुकड्याकडे आकर्षित झाला होता . ती भाकरी उष्टी आहे, चाळकी आहे, खाण्यास योग्य नाही याची त्याला काहीच पर्वा वाटत नव्हती . त्याची विचारशक्ती नष्ट झाली होती . त्याला माझ्यापासून वेगळे ठेवणेच श्रेयस्कर होते . पाच महिने होऊन गेले. गंगूने गोमतीशी लग्न केले होते . एक कौलारू घर घेऊन ते दोघे राहत होते . ते घरही माझ्याच आळीमध्ये होते . एका छोट्या टपरीमध्ये त्याने चाटभांडार सुरू केले होते . त्यावर त्यांचा निर्वाह होत होता. बाजारात गेल्यावर अधूनमधून भेट व्हायची. तेव्हा मी त्यांची विचारपूस करायचो. त्याच्याबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दल मला एक प्रकारचे आकर्षण वाटत होते; कारण ती एक सामाजिक तसेच मानसिक समस्या होती. त्या परीक्षेत गंगू कसा उतरतो , हे मला पाहायचे होते. गंगू मला सतत हसतमुख दिसायचा. समृद्धी आणि निश्चिंतता ही दोन्ही लक्षणे व त्यांच्याबरोबर येणारा आत्मसन्मानाचा भाव हे सारेच मला गंगूच्या चेहऱ्यावर दिसायचे. रुपया किंवा वीस आण्यांपर्यंत त्यांची रोजची विक्री व्हायची. सर्व खर्च भागवून यातून आठ - दहा आणे वाचू शकतात. त्यावरच त्यांची उपजीविका चालायची. त्याच्यावर नक्कीच कुण्या देवतेचा वरदहस्त होता ; कारण अशा स्तरातल्या लोकांमध्ये साधारणत: दिसते ती निर्लज्जता व विपन्नता, गंगूमध्ये ती थोडीही नव्हती. मनःशांतीमधून येणारे समाधान व आनंद मला त्याच्या चेहल्यावर नेहमी झळकताना

दिसायचा. एक दिवस मी ऐकले की , गोमती गंगूच्या घरातून पळून गेली. का ते सांगता येणार नाही; पण हे ऐकून मला विचित्र आनंद झाला. गंगूच्या सुखी- समाधानी आयुष्याचा एक प्रकारे मला हेवा वाटायचा . त्याचे काहीतरी विपरीत, अनिष्ट व्हावे असे मला वाटायचे व मी त्याची वाट पाहत असायचो. या प्रसंगाने माझ्या मत्सराला दिलासा दिला . जे घडेल असे मला पक्के वाटत होते ते शेवटी घडलेच . आता गंगूला त्याच्या अदूरदर्शीपणाची शिक्षा भोगावी लागेल. बघतोच आता मला कसा तोंड दाखवू शकतो ते. आता डोळे उघडतील त्याचे. आता समजेलत्याला की , जे त्याला या लग्नापासून अडवत होते ते त्याच्या हिताचाच विचार करत होते. स्त्रियांचा काही भरवसा नसतो. त्या कधी दगा देतील काही नेम नाही. असे त्याला अनेकांनी समजावून सांगितले होते ; पण त्याने अजिबात ऐकले नव्हते . आता भेटू दे चांगलाच समाचार घेतो त्याचा. विचारतोच त्याला की , या देवीचे वरदान मिळाले की नाही ? तो तर लोकांनाच दोष देत होता. आता कळाले का चूक कुणाची होती ते ? आता किती समाधानी आहेस तू ? योगायोगाने त्याच दिवशी गंगू बाजारात भेटला. पार घाबरलेला व उदास होता . मला पाहताचत्याचे डोळे भरुन आले. लाजेने नव्हे तर दुःखाने . मला म्हणाला, “ बाबूजी गोमतीने माझा विश्वासघात केला. “ मी कुटिल आनंद उपभोगत ; पण नाटकी सहानुभूती दाखवत म्हणालो, “ मी तर तुला आधीच समजावले होते; पण तू ऐकले नाहीस. आता धीराने घे. दुसरा काय मार्ग आहे ? पैसाअडका पण घेऊन गेली की , काही ठेवले आहे तुझ्यासाठी ! “ । गंगू छातीवर हात ठेवून उत्तरला, “ बाबूजी एका पैशालाही हात लावला नाही तिने . तिचे जे होते तेही सगळे ठेवून गेली आहे. माझ्यात कोणता दोष तिला दिसला कळत नाही. मीच तिच्या लायकीचा नव्हतो , ती तरी काय करेल ? ती शिकली सवरलेली होती, मी असा निरक्षर पडलो. इतके दिवस

गेला.

माझ्यासोबत राहिली हेच खूप झाले. अजून काही दिवस मिळाले असते तर माणसात आलो असतो. तिच्याबद्दल आणखी काय आणि कसे सांगू ? जग तिला काहीही समजू दे, माझ्यासाठी तर देवाचा आशीर्वाद बनूनच ती आली होती . माझी लायकीच केवढी बाबूजी ? दहा - बारा आणे मजुरी मिळवणारा मजूर मी ; पण तिच्या हाताला फार बरकत होती. कधीच काही कमी पडले नाही. “ गंगूच्या या शब्दांनी माझी घोर निराशा झाली. मला वाटले होते तो तिच्या बेइमानीची कथा सांगेल . मग मी त्याला सहानुभूती दाखवेन ; पण त्या मूर्खाचे डोळे अजूनही उघडले नव्हते. अजूनही तिचाच जप करतोय . नक्कीच याच्या मनावर परिणाम झालेला दिसतोय . मी कुटिल उपहासाने बोलणे सुरु केले, “म्हणजे, तुझ्या घरून तिने काहीच नेले नाही ? “ “ काहीच नाही बाबूजी , एका पैशाचीही वस्तू नेली नाही “ “ आणि तुझ्यावर प्रेमही खूप करत होती ? “ “ कसे पटवून देऊ तुम्हाला तिचे प्रेम जन्मभर लक्षात राहील. “ “ मग ती तुला सोडून का गेली ? “ “ तेच तर आश्चर्य आहे बाबूजी “ स्त्री चरित्र हा शब्द कधी ऐकला आहेस ? “ “ असे नका बोलू बाबूजी. कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी तिच्याबद्दल चांगलेच बोलेन . “ “ मग जा आणिशोधून काढ तिला . “ “ होय मालक . ती सापडेपर्यंत मला चैन पडणार नाही. ती कुठे आहे एवढेच समजायला हवेय मला. मी जाऊन तिला घेऊनच येईन आणि माझे मन मला सांगत आहे की , ती परत येईल. ती माझ्यावर रुसून नाही गेलेली . बघा तुम्ही ती नक्की येईलच, आता मी जातो . ती भेटेपर्यंत वणवणहिंडत राहीन. तोपर्यंत जगलो वाचलो तर पुन्हा तुमच्या भेटीला येईन . “ एवढे बोलून तो झपाटल्यासारखा निघून

त्यानंतर काही महिन्यांनी मला जरुरी कामासाठी नैनितालला जावे लागले . तिथे महिनाभर मी राहून परत आलो व कपडेपण बदलत नाही तोवर गंगू माझ्याकडे पोहोचला . एक तान्हे बाळ त्याच्या कुशीत होते. कृष्ण मिळाल्यावर नंदाला पण इतका आनंद झाला नसेल, जेवढा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता . अतिशय तृप्त वाटत होता . मी विचारले, “ काय म्हणताय महाराज ? गोमतीदेवींचा काही ठावठिकाणा लागला की नाही ? तू तिला शोधायला गेला होतास ना ? “ “ होय बाबूजी, आपल्या आशीर्वादाने तिला शोधू शकलो. “ लखनौला बायकांच्या दवाखान्यात भेटली. तिच्या एका मैत्रिणीला हे ठाऊक होते . तिच्याकडूनच समजले मला. लगेच मी लखनौला गेलो व तिला ओढूनच आणले. शिवाय तिच्याबरोबर हा मुलगा पण मिळाला. “ एखाद्या खेळाडूने आपले पदक अभिमानाने दाखवावे, तशा आविर्भावात त्याने ते बाळ माझ्यासमोर धरले. मी उपहासाने विचारले, “ अच्छा! हा मुलगा पण मिळाला तुला ? यासाठीच बहुधा ती पळाली होती . तुझाच आहे ना हा मुलगा ? “ माझा कसला बाबूजी आपला आहे, देवाचा आहे. “ “ लखनौत जन्मला का हा ? “ “ होय बाबूजी, आता एक महिन्याचाच तर आहे. “ “ तुझ्या लग्नाला किती दिवस झाले? “ “ हा सातवा महिना सुरु आहे. “

“म्हणजे हा लग्नानंतर सहाव्या महिन्यात जन्मला ? “ “होय… ना बाबूजी. “ तरी तो तुझा मुलगा आहे? “ “ होय माझा आहे. “ “ काय विचित्र बोलतो आहेस ! “ माझ्या बोलण्याचा अर्थ त्याला समजत होता की नाही की , न कळाल्यासारखा दाखवत होता कोण जाणे .त्याच निष्कपटपणाने म्हणाला, “ मरता मरता वाचली ती बाबूजी . तिचा पुनर्जन्म झाला आहे . तीन दिवस, तीन रात्री खूप त्रास सोसला तिने. “ “ पण सहा महिन्यांत मूल होते हे मी आजच ऐकतो आहे. “ माझा हा बाण मात्र बरोबर बसला. तो हसत म्हणाला , “ असं असं, ते म्हणत आहात का बाबूजी तुम्ही ! माझ्या ते लक्षातच आले नाही. याच गोष्टीला घाबरून गोमती पळाली होती . मी तिला म्हणालो, “ गोमती, मी तुला आवडत नसेल तर तू मला सोडून दे. मी आता लगेच निघून जाईन . पुन्हा कधीच भेटणार नाही. कधी गरज पडली तर मला कळव . मी तुला पूर्ण मदत करेन . तुझ्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही . मला तू आताही तितकीच प्रिय आहेस, आधीपेक्षा थोडीशी जास्तच. माझ्यावरून तुझे मन उडाले नसेल तर माझ्याबरोबर चल. मी कधीच तुझ्याशी बेइमानी करणार नाही. तुला देवी समजून मी तुझ्याशी लग्न

केले नव्हते. तुझ्यावर माझे प्रेम होते व तुझेही माझ्यावर आहे असे समजून मी तुझ्याशी लग्न केले. हा माझा मुलगा आहे. माझा स्वत : चा आहे. जर पेरणी झालेले शेत मी घेतले असेल तर आलेले पीक केवळ दुसऱ्या कुणी पेरणी केली म्हणून मी टाकून देईन का ? असे मी म्हटल्यावर पटले तिला बाबूजी. ती आली माझ्याबरोबर परत . “ एवढे बोलून गंगूजोरात हसला. मी कपडे बदलण्याचेही विसरून गेलो. न जाणे का ; पण माझे डोळे भरून आले. एका सुप्त शक्तीने माझी घृणा दाबून टाकली व माझे हात पुढे झाले. मी त्या निष्पाप बाळाला घेतले व अतिशय प्रेमानेत्याचे चुंबन घेतले. गंगू म्हणाला, “ बाबूजी, तुम्ही फार सज्जन आहात. मी गोमतीला येण्याचा खूप आग्रह केला; पण तिला लाज वाटते तुमच्या समोर यायला. मी , आणि सज्जन ? माझ्या सज्जनतेचा बुरखा आज माझ्या डोळ्यासमोर गळून पडला. मी भावपूर्ण स्वरात त्याला म्हणालो, “ अरे , तिने माझ्यासारख्या कलुषित माणसाकडे का यावे ? चल, मी तुझ्याबरोबर तिच्या भेटीला येतो . तू मला सज्जन मानतोस; पण मी केवळ वरवरचा सज्जन आहे, मनातून मी दुष्टच आहे. खरी सज्जनता तुझ्यात आहे, तिचा सुगंध या बाळरुपी फुलातून दरवळत आहे. “ मी बाळाला माझ्या कुशीत घेऊन गंगूबरोबर निघालो.

अभिनेत्री

नाटकाचा पडदा पडला. तारादेवीने आज शकुंतलेची अप्रतिम भूमिका करून प्रेक्षकांना जिंकले होते. दु: ख आणि तिरस्कारांनी माखलेले शब्दांचे तीर जेव्हा ती दुष्यंतावर सोडत होती, त्या प्रसंगी काहीजण शिष्टाचारविसरून रंगमंचाकडे धावले होते . त्याच वेळी जर मेनकेच्या विमानाने शकुंतलेला नेले नसते तर त्यावेळी झालेल्या गोंधळात पाच - दहा प्राण नक्की गेले असते. मॅनेजरने सर्वांना धन्यवाद दिले. दुस - या दिवशीही तेच नाटक पुन्हा करणार असल्याचे जाहीर केले तेव्हा लोक शांत झाले. सगळे गेले तरी एक राजबिंडा तरुण तेथे थांबला होता . तारादेवीला भेटण्याची परवानगी त्याने मॅनेजरला मागितली; पण मॅनेजरने त्याची उपेक्षा केली. त्याने एका चिठ्ठीवर काहीतरी लिहून तेवढी तारादेवीकडे पोहोचवावी अशी विनंती केली. मॅनेजरने चिठ्ठीवर लिहिलेले नाव वाचले. कुंवर निर्मलकांत चौधरी, ओ. बी . ई. मनेजरच्या चेहऱ्यावर मृदू भाव पसरले . हे नाव धारण करणारी व्यक्ती शहरातील बडी असामी असल्याचे त्याने ऐकले होते. ते खरेही होते . कुंवरजी संस्थानिक घराण्यातील धनवान , साहित्य व संगीत कलेचे जाणकार व दानशूर म्हणून प्रसिद्ध होते. यावेळी मात्र ते एका सामान्य याचकाच्या रूपात मॅनेजरसमोर उभे होते. मॅनेजर ओशाळला. तो म्हणाला, “ क्षमा करावी. मी आधी तुम्हाला ओळखले नाही. आता ही चिठ्ठी तारादेवीकडे पाठवतो. “ “नको आता राहू दे. तिची विश्रांतीची वेळ असेल. मी उद्या पाच वाजता येईन . “ आतुरतेवर संयम ठेवीत व मॅनेजरला धन्यवाद देत ते निघून गेले. तारा आपल्या सुंदर सजवलेल्या खोलीत स्वत : च्या तंद्रीत बसली होती . काल रात्रीचे ते दृश्य पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर तरळत होते . असे प्रसंग जीवनात कधी कधी येतात . प्रेक्षकांच्या गर्दीतील एक सुंदर पुरुषाकडे तिचे लक्ष

वेधले गेले होते. तो इतरांपेक्षा वेगळा होता, शांतपणे उभा होता व तिच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पाहत होता. त्या नजरेने तिला हुरहूर लावली होती . त्याने आजही यावे असे तिला उत्कटतेने वाटत होते . आरशात स्वत : ची प्रतिमा पाहताना सौंदर्याची जाणीव जागृत झाली. आरशात जणू कमल फुलले होते. या फुलाने पस्तीस वसंत ऋतूंची बहार पाहिली आहे. अशी शंकाही कुणाला येणार नाही इतके ते टवटवीत होते. तिची कांती, कोमलता , चपलता, माधुर्य कोणत्याही नवयौवनेला लाजवण्यासारखी होती . आज खूप वर्षांनी ताराच्या मनात प्रेमाचा दीप उजळला होता . वीस वर्षांपूर्वी आलेल्या प्रेमाच्या कडू अनुभवामुळे ती पुरुषांच्या बाबतीत विरक्त झाली होती . त्यांचे प्रेम कपटी असते असा तिचा समज झाला होता . आज मात्र पुन्हा नव्याने हृदयात मधुर वेदनेचा झंकार उमटला. त्या पुरुषाचे सौम्य रूप तिच्या मनात ठसले . काल प्रेक्षकांनी तिच्याकडे आणलेल्या सर्व भेटवस्तू घेऊन दाई खोलीत आली; पण त्या वस्तूंकडे बघावे असेही ताराला वाटले नाही . तेवढ्यात एका कामवाल्या मुलाने तिला कुंवरजींची चिठ्ठी आणून दिली . तिने ते नाव वाचले . नंतर ती भेटवस्तू पाहू लागली. एका डबीमध्ये खऱ्या मोत्यांचा हार होता . त्याबरोबर एक कार्ड होते . कार्डावरही कुंवरजींचे नाव होते . ती लगबगीने मॅनेजरकडे गेली. तिने निर्मलकांतबद्दल चौकशी केल्यावर ते आज संध्याकाळी पाच वाजता येणार आहेत असे त्याने सांगितले. कुंवरजी येण्याची वेळ जवळ आली होती . तारा आरशासमोर बसून श्रृंगार करीत होती . त्यात ती अगदी निपुण होती . गेली पंधरा वर्षं ती त्या नाटक कंपनीत होती . तिच्यावर भाळलेल्या पुरुषांना खेळण्यांपेक्षा अधिक किंमत तिने कधी दिली नाही. आज मात्र सर्व कौशल्य पणाला लावून तिने स्वत: चे सौंदर्य खुलवले होते . वाढल्या वयाचे कसलेही चिन्ह तिच्या शरीरावर उमटले नव्हते . काळाला जणू तिने जिंकले होते . शांती समाधानाचा शोध घेण्याच्या प्रौढवयीन टप्प्यात ती होती ;

पण ते कळणे कुणालाही शक्य नव्हते .

सर्व काही दिले तरी त्याची तृप्ती कशी होणार? ताराची अवस्था तशीच झाली होती . ते तिच्यासाठी दहा मिनिटांत कुंवरजी आले. भेटीचे शिष्टाचार विसरून ती सलज्ज होत मान खाली घालून उभी प्राणही देतील याची तिला खात्री होती ; पण लग्नाबद्दल ते काहीच बोलत नव्हते. तिचे त्यांच्यावर राहिली . मनातील प्रेमभावना तिला तसे करायला लावत होती. तिने गळ्यात घातलेल्या मोत्यांच्या खरे प्रेम होते. लग्नाशिवाय त्या प्रेमाचे पावित्र्य टिकणार नाही असे तिला वाटत होते. हाराकडेत्यांचे लक्ष गेले. त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, “ मी यावेळी येऊन तुला त्रास देत इकडे कुंवरजींचे नातलगही बेसावध नव्हते . ताराच्या जाळ्यातून कुंवरजींना सोडवण्याची तयारी करत असेन तर माफ कर. ही तुझ्या विश्रांतीची वेळ आहे का ? “ ।

होते. त्यांनी जर तिच्याशी लग्न केले तर त्यांच्या सर्व संपत्तीची मालकीण ती होईल व तिची मुले पदर सावरीत तारा म्हणाली, तुम्हाला भेटण्यापेक्षा अधिक आरामदायक काय असणार ? मला वारसदार होतील ही भीती त्यांच्या मनात होती . एखाद्या कुलीन तरुणीशी त्यांनी लग्न करायला हवे मनापासून आनंद झाला आहे आणि या हाराबद्दल मी तुमची आभारी आहे. असेच अधूनमधून भेटणार यासाठी ते कुंवरजींवर दबाव आणू लागले. एका इंग्रज अधिकारी मित्रानेही त्यांना तसाच सल्ला ना ? “

दिला . “ अधूनमधून का ? तुला आवडो किंवा न आवडो मी रोज रोज येणार आहे. “

एका संध्याकाळी कुंवरजी ताराला म्हणाले, “ तारा, आज मी तुला काहीतरी मागणार आहे. नाही “ मन रमवण्यासाठी दुसरी कुणीतरी मिळेपर्यंतच याल ना ? “

म्हणू नकोस. “ ताराच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. ती म्हणाली, “ सांगा ना, काय हवे ? तुम्हाला तारा हसत म्हणाली.

देण्यासारखे काय आहे माझ्याकडे ? “ कुंवरजी गंभीरपणे उत्तरले, “माझ्यासाठी तरी हा प्रश्न मनोरंजनाचा नसून जीवन मरणाचा आहे. तुझ्या “ लग्नाचे वचन हवे आहे मला. “. मनात काय आहे ते मला माहीत नाही ; पण मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. “

हे ऐकताक्षणी आनंदाने तिला रडू कोसळले. ती म्हणाली, “ मी कधीपासून याच शब्दांची वाट पाहत दोन्ही बाजूंनी प्रेमाची साक्ष पटली. प्रेमाच्या आणाभाका झाल्या . दुसऱ्या दिवसाच्या जेवणाचे होते . मी पार निराश झाले होते. फार मोठी परीक्षा घेतलीत माझी. “ “ तसे नाही तारा मी स्वत: ला आमंत्रण देऊन कुंवरजी निघून गेले.

तुझ्या योग्यतेचा मानत नव्हतो. तुझ्यावर प्रेम करणे हा एकच गुण आहे माझ्यात. “ ताराच्या मनात असाच एक महिना पिसासारखा अलगद उडून गेला. कुंवरजी तिला भेटायाला रोज जात होते . कधी आले हा माणूस किती सरळ , निष्कपट , नम्न व उदार आहे . बागेत फिरणे, कधी नौकाविहार तर कधी संगीताचा कार्यक्रम. दोघेही नेहमी एकत्र दिसू लागले. त्यांनी विचारले, मग ? कधी होणार माझा भाग्योदय , फार उशीर करू नकोस तारा . “ ताराने संपत्तीच्या लोभाने कुंवरजींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे, अशी बातमी वाऱ्यासारखी त्यांचा भोळेपणा पाहून तारा स्तब्ध झाली. थोड्या वेळाने चिंतित स्वराने तिने विचारले , “ कायद्याची शहरात पसरली. वास्तवता मात्र वेगळी होती . ताराची खरी दौलत कुंवरजींचे प्रेम होते.

तर काही अडचण येणार नाही ना ? “ प्रेमासाठी आसुसलेल्या तारालाकुंवरजींनी भरभरून प्रेम दिले. ज्या एका शब्दाची तिला अपेक्षा होती । “ ती काळजी नको करुस. मी वकिलांचा सल्ला घेतला आहे. आपण रीतसर वैदिक पद्धतीने लग्न तो मात्र अद्याप त्यांनी उच्चारला नव्हता . तो शब्द होता लग्न . तहानलेल्या माणसाला पाणी सोडून करणार आहोत. लवकरच ती वेळ येणार आहे. ते दुसऱ्या दिवशी येण्याचे सांगून निघून गेले .

तारा काहीच बोलली नाही . पुरुषांच्या हृदयाशी खेळ करणारी ती चतुर ललना इतकी विमूढ का झाली होती ? लग्न एक दिवसावर येऊन ठेपले . तारावर सगळीकडून अभिनंदनाचा व भेटवस्तूंचा वर्षाव होऊ लागला . कुंवरजींनी तिला त-हेत-हेचे मौल्यवान दागिने केले. तारा मात्र खिन्न दिसू लागली . चेहऱ्यावर आनंदाची एकही छटा उरली नाही . तिने कुंवरजींचा विश्वासघात करावा का ? हाच प्रश्न तिला सतत छळत होता . तिला घायाळ करत होता. कुंवरजींनी तिच्यासाठी घराण्याची प्रतिष्ठा , नातेवाईक , सर्वकाही झुगारले होते . अशा विशाल व निष्कलंक मनाच्या कुंवरजींशी कपट करावे का ? नाही ! नाही ! ती इतका नीचपणा करू शकत नाही. कधी नव्हे ते तिचे मन द्विधा झाले. तिचा धिक्कार करू लागले. असे का वाटत होते तिला ? निरपेक्ष प्रेम तिला आजपर्यंत कधीच मिळाले नव्हते, हेच तर याचे कारण नसेल ? ती त्यांचे जीवन , त्यांचा संसार सुखी करू शकेल? तिची निष्ठा कोणतीही गोष्ट साध्य करणारी असली तरी निसर्गाची फसवणूक ती कशी करू शकेल? मावळत्या सूर्याला माध्यान्हीचे तेज कसे येईल ? असंभव ! या वयात परिपूर्ण तारुण्य ती कुठून आणेल ? नाही, तिने कितीही प्रयत्न केले तरी ती कुंवरजींना सुखी करू शकणार नाही. तारा स्वत: चा धिक्कार करु लागली . ओह ! ही वेळच मी का येऊ दिली ? खोटा साजशृंगार करून त्यांना का फसवले ? आता त्यांना कसे सांगावे की मी फक्त शोभेची सुंदर बाहुली आहे. तारुण्य ओसरले आहे. उरल्या आहेत केवळ त्याच्या पाऊलखुणा. प्रेम हेच सत्य आहे. सत्य आणि असत्य दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत . विचारांच्या कल्लोळातून ती बाहेर आली. तिने एक निश्चय केला. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. केवळ सहा तास उरले होते. कुंवरजी तिला नेण्यासाठी सकाळी येणार होते. तिने अंगावरील सर्व दागिने काढून ठेवले . चेहरा स्वच्छ धुतला. पांढरी शुभ्र साडी नेसली . आरशासमोर उभी राहून स्वत: ला । न्याहाळू लागली. रूप तेच होते; पण तेज आणि डोळ्यांतली मोहक चमक दिसत नव्हती .

कुठे जावे याचा विचार ती करू लागली. कुणाला अंदाज येणार नाही असा रस्ता निवडायला हवा . प्रेमाने तिला एक कर्तव्य मार्ग दाखवला होता. त्यावर ती चालणार होती . निश्चयामुळे तिचे दुःख व निराशा थोडी कमी झाली, तरी कुंवरजींना दु: खाचा मोठा धक्का बसणार आहे या कल्पनेने तिचे मन कातर झाले. ती टेबलाजवळ बसून पत्र लिहू लागली. “ प्रियतम , मला क्षमा करा. तुमची दासी बनावे एवढीही माझी योग्यता नाही . कधीच आशा केली नव्हती एवढे प्रेम तुम्ही मला दिलेत, माझ्यासाठी हे दान खूप मोठे आहे. मी आजीवन तुमच्यावर प्रेम करत राहीन . प्रेमाच्या प्रत्यक्ष उपभोगापेक्षा प्रेमाच्या आठवणीत अधिक गोडवा आणि आनंद आहे. मी परत येईन , तुम्हाला भेटेन पण तुमचे लग्न झाल्यानंतरच. माझ्या परत येण्याची तीच अट आहे असे समजा. माझ्यावर नाराज होऊ नका . माझ्यासाठी तुम्ही आणलेले सर्व दागिने तुमच्या होणाऱ्या पत्नीसाठी ठेवून जात आहे. तुमची पहिली भेट, तो मोत्यांचा हार मात्र मी सोबत नेत आहे. माझा शोध घेऊ नका, ही हात जोडून विनंती आहे. मी तुमची आहे आणि सदैव तुमचीच राहीन . तुमची तारा. “ पत्र पूर्ण करून ताराने टेबलावर ठेवले . मोत्यांचा हार गळ्यात घालून ती बाहेर पडली . थिएटरमधून संगीताचा मंद ध्वनी ऐकू येत होता . पंधरा वर्षांचे नाते आज तुटत होते. गंगेच्या दिशेने ती चालू लागली. गंगेकिनारी ती पोहोचली तेव्हा सर्वत्र शांतता होती. पाच- दहा बैरागी शेकोटीजवळ झोपले होते. नदीप्रवाह नागमोडी वळणाने वाहत होता . किनाऱ्यावर एक छोटीशी नाव होती . तिने नावाड्याला हाक मारली . म्हणाली, “ पैलतीरावर जायचे आहे, आत्ता लगेच . दुप्पट पैसे द्यायला मी तयार आहे. “

दुप्पट पैशांचे आमिष मिळताच नावाडी तयार झाला . तारा नावेत बसली. प्रवाहात नाव मंदगतीने चालू लागली. स्वज साम्राज्यात चैतन्य विहरावे तशी ती नौका गंगाप्रवाहात दिसत होती. त्याचवेळी क्षितिजावर एकादशीची चंद्रकोर आपली धवल नौका आकाश सागराला पार करत होती .

पंच परमेश्वर

जुम्मन शेख व अलगू चौधरी यांची मैत्री इतकी घनिष्ठ होती की , शेती आणि सर्व व्यवहार ते मिळून करायचे. परस्परांवर एवढा विश्वास की , हज यात्रेला जाताना जुम्मनने अलगूवर घर सोपवले होते आणि परगावी जाताना अलगूदेखील जुम्मनवर स्वत : च्या घराची जबाबदारी टाकायचा. त्यांच्यामध्ये रोटीबेटीचा किंवा धर्माचा काही संबंध नव्हता ; पण ते समविचारी होते आणि त्यांच्या मैत्रीचा मूलमंत्र तोच होता . दोघे बालमित्र होते. जुम्मनचे वडील, जुमराती शेख दोघांना एकत्र शिकवायचे. अलगूने खूप मनापासून त्यांची सेवा केली होती. त्यांचे पेले, कप विसळणे, त्यांच्या जेवणाची भांडी घासणे , चिलीम भरून देणे अशी कामे करताना त्याने अभ्यासाची पर्वा कधी केली नाही . याचे कारण त्याचे वडील जुन्या विचारांचे होते . गुरुकृपा झाल्याशिवाय विद्या प्राप्त होणार नाही असे त्यांचे मत होते . स्वत: जुमराती शेख यांचा मात्र आशीर्वादापेक्षा सोट्यावर जास्त विश्वास होता . त्यामुळे त्यांचा मुलगा, जुम्मन याने सोट्याच्या जोरावर आजूबाजूच्या गावातदेखील मान मिळवला होता . त्याने तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याची हिंमत कचेरीतील कारकून मंडळीची नव्हती . पोस्टमन, पोलीस शिपाई, तहसीलचेशिपाई सर्वांना जुम्मनची कृपादृष्टी हवीशी वाटे. गावात अलगूचा मान विद्वत्तेमुळे तर जुम्मनचा मान संपत्तीमुळे होता . जुम्मनची दूरच्या नात्यातली एक म्हातारी मावशी होती. ती एकटीच होती . तिचा विश्वास संपादन करून जुम्मनने तिची सर्वमिळकत स्वत : च्या नावावर करून घेतली. दानपत्राची रजिस्ट्री होईपर्यंत त्याने व त्याच्या बायकोने मावशीची खूप काळजी घेतली. शिरा, पुलाव, वेगवेगळे गोडधोड पदार्थ यांचा तिच्यावर प्रेमाने भडिमार केला. पण रजिस्ट्रीच्या मोहोरबंदीने मावशीच्या बडेजावालाही मोहोरबंद केले.

जुम्मनची पत्नी, करीमन भाकरीसोबत कडू शब्दांच्या जहाल भाज्या मावशीला देऊ लागली. जुम्मनदेखील दयामाया विसरला. काही दिवस हे हाल मावशीने सहन केले. जेव्हा सहनशीलता संपली तेव्हा जुम्मनकडे बायकोची तक्रार केली; पण जुम्मनने गृहस्वामिनीच्या कारभारात ढवळाढवळ करणे योग्य मानले नाही. शेवटी एके दिवशी मावशीने त्याला पंचायत भरवण्याची धमकी दिली . हरिणीला जाळ्याकडे जाताना पाहून पारध्याला जसा आनंद होतो तसा जुम्मनला झाला; कारण पंचायतीत तोच जिंकला असता , याविषयी त्याची खात्री होती . त्याच्या उपकाराखाली न दबलेले असे कुणीकिंवा त्याच्याशी वैर घेण्याची हिंमत असलेले असे कुणी पंचक्रोशीत होते तरी कोण ? त्यानंतर कितीतरी दिवस म्हातारी मावशी काठी टेकत टेकत आसपासच्या गावात चकरा मारत होती . कंबर धनुष्यासारखी वाकडी झाली होती . चालताना तिला त्रास होत असे; पण तिच्यावर प्रसंगच तसा बेतला होता . त्याचा निकाल लागणे आवश्यक होते. म्हातारी सर्वांना भेटली. कुणीतिचे नुसते ऐकून घेतले, कुणी तिला टाळले, कुणी जुम्मनला शिव्याशाप दिले , तर कुणी तिलाच हावरट असल्याचा दोष लावला . काही सज्जन लोकांना हास्यरसाचा आस्वाद घेण्याची चांगली संधी मिळाली. ती त्यांनी सोडली नाही. वाकलेली कंबर , सुरकुतलेला चेहरा , पिकलेले केस असा अवतार पाहून हसू नाही का येणार ? तिची बाजू घेऊन सांत्वन करणारी माणसे खूप कमी होती . सगळीकडेफिरून मग ती अलगूकडे आली. काठी जमिनीवर टाकली. थोडा विसावा घेतला.त्याला म्हणाली, “ बेटा ,पंचायतीत तू पण ये. “ अलगू म्हणाला, “मावशी, तू बोलावतेस म्हणून मी येईन ; पण पंचायतीत तोंड उघडणार नाही . जुम्मन माझा मित्र आहे . मी त्याच्या विरोधात काही बोलणार नाही. “ “ का बेटा, मैत्री तुटेल या भीतीने तू प्रामाणिकपणा सोडणार का ? “ धर्मज्ञानाची सारी संपत्ती चोरीस गेली तरी माणसाच्या झोपी गेलेल्या मनाला काही पत्ता लागत नाही ; पण आवाहन ऐकताच ते जागृत होते. मग त्याला कुणी जिंकू शकत नाही .

मैत्री तुटेल या भीतीने प्रामाणिकपणा सोडणार का , हा म्हातारीचा प्रश्न अलगूच्या हृदयात गुंजत राहिला . संध्याकाळी एका झाडाखाली पंचायतीची तयारी केली होती . मोठी सतरंजी , पान, तंबाखू, चिलीम अशी सर्व जय्यत तयारी जुम्मनने केली होती. तो अलगू जवळ बसला. सूर्यास्त झाला. किलबिलणाऱ्या चिमण्यांची पंचायत झाडावर भरली तेव्हा झाडाखालची पंचायत पण सुरु झाली. म्हातारीने आपले गाहाणे पंचमंडळीसमोर सविस्तर मांडले व न्याय करण्याची विनंती केली. रामधन मिश्रने जुम्मनला त्याचा पंच ठरवण्यास सांगितले. जमलेल्या लोकात हितशत्रू अधिक प्रमाणात दिसल्यामुळे जुम्मन म्हणाला, “ पंचांची आज्ञा ही देवाची आज्ञा . मावशीलाच पंच ठरवू दे. माझी काही हरकत नाही. “ जुम्मनचा हेतू ओळखून मावशी म्हणाली, “ बेटा , पंच कुणाचेमित्र किंवा वैरी नसतात . तुझा कुणावर विश्वास नसला तरी अलगूवर आहे ना ? मी त्याला सरपंच ठरवते. “ जुम्मनला मनातून अतिशय आनंद झाला; पण त्याने तो लपवला. अलगू मात्र त्या भानगडीत पडण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, “ माझी व जुम्मनची पक्की मैत्री तुला माहिती नाही का ? “ मावशी गंभीर स्वरात म्हणाली, “ बेटा , मैत्रीखातर कुणी आपला प्रामाणिकपणा सोडत नाही . पंचांच्या हृदयात परमेश्वर असतो . त्याचीच वाणी पंचांच्या तोंडातून बाहेर पडते. “ अलगू त्या पंचायतीचा सरपंच बनला. तो जुम्मनला म्हणाला, “ आपण दोघे बालमित्र आहोत ; पण यावेळी मावशी आणि तू दोघेही मला सारखेच आहात . तुला पंचांसमोर जे निवेदन करायचे आहे ते कर . “ आता डाव पूर्णत : आपल्या हातात आला असा विश्वास जुम्मनला वाटू लागला. तो शांतपणे निवेदन करू लागला, “ पंच महाशय, तीन वर्षांपूर्वी मावशीने तिची मिळकत माझ्या नावावर केली. शेवटपर्यंत तिचा सांभाळ करण्याचे मी कबूल केले होते . तसे मी करतो आहे. तिला मी

आई मानतो . आजपर्यंत मी तिला काही त्रास दिला नाही; पण बायकांमध्ये काही वाद होतात त्याला माझा नाइलाज आहे. मावशी दर महिन्याला माझ्याकडे तिच्या खर्चासाठी पैसे मागते; पण तिच्या मिळकतीचा तितकासा फायदा होत नाही.म्हणून मी पैसे देऊ शकत नाही. शिवाय करारनाम्यातदेखील दरमहा खर्च देण्याची नोंद नाही, नाहीतर मी चुकूनही या भानगडीत पडलो नसतो . बस ! मला इतकेच म्हणायचे आहे. आता पंचांनी त्यांना योग्य वाटेल तो निर्णय द्यावा . अलगू चौधरीचा संबंध कोर्ट कचेरीशी नेहमी असल्यामुळे तो कायदा समजणारा व पाळणारा होता. त्याने जुम्मनची उलट तपासणी सुरू केली. त्याचा प्रत्येक प्रश्न जुम्मनच्या मनावर हातोड्याच्या घावाप्रमाणे बसत होता. त्यांची इतक्या वर्षांची मैत्री वाया गेली असे त्याला वाटू लागले. थोड्या वेळाने अलगूने निर्णय जाहीर केला. तो म्हणाला, “ जुम्मन शेख! पंचांच्या मते मावशीला दरमहा खर्च देण्यात यावा हे नीतीला धरून होईल. तिच्या मिळकतीतून तेवढा फायदा तुला नक्कीच होतो आहे असे पंचांचे मत आहे. हाच आमचा निर्णय आहे. जर तो तुला मान्य नसेल तर मावशीचे दानपत्र रद्द समजण्यात येईल. निर्णय ऐकून जुम्मन सुन्न झाला . मित्राने त्याचा विश्वासघात केला होता. अशाच प्रसंगी खया खोट्या मित्राची परीक्षा होते. ही कलियुगातली मैत्री आहे अशा कपटी , धोकेबाज मित्रांमुळे देशात संकटे पसरली आहेत . कॉलरा, प्लेग हे सर्व रोग त्यांच्या दुष्कर्मांचे दंड आहेत . रामधन आणि इतर पंच मात्र अलगूची प्रशंसा करू लागले. याला म्हणावे पंचायत . दुधाचे दूध व पाण्याचे पाणी केले. मैत्री ही मैत्रीच्या जागी ठीक आहे; पण धर्माचे पालन जास्त महत्त्वाचे. अशा सत्यवादी लोकांमुळे पृथ्वीचा तोल सांभाळून आहे. नाही तर केव्हाच रसातळाला गेली असती . या निर्णयाचा घाव जुम्मन व अलगूच्या मैत्रीच्या मुळावर बसला. त्यांचे बोलणे बंद झाले. दुरावा आला. ते भेटत होते; पण तसेच; जसे ढाल -तलवार परस्परांना भेटतात. मित्राचा सूड घेण्याचा ध्यास जुम्मनने घेतला .

चांगली कमें सिद्धीस जाण्यास फार उशीर लागतो . वाईट कर्माच्या सिद्धतेस ही बाब लागू होत नाही. बदला घेण्याची संधी जुम्मनला लवकरच मिळाली. मागच्या वर्षी अलगूने बटेश्वरहून खिल्लाऱ्या बैलांची एक सुंदर जोडी विकत आणली होती . दुर्दैवाने त्यातील एक बैल जुम्मनच्या पंचायतीनंतर एका महिन्याने मरण पावला. जुम्मनशी केलेल्या विश्वासघाताची ती देवाने केलेली शिक्षा आहे असे जुम्मन सगळीकडे सांगू लागला. जुम्मनने बैलाला विषप्रयोग करून मारल्याचा संशय अलगू व त्याच्या पत्नीच्या मनात आला. दोघांच्या पत्नींमध्ये वाद होऊ लागले. एकदा तर दोघींमध्ये प्रचंड वितंडवाद झाला. व्यंग, वक्रोक्ती, अन्योक्ती आणि उपमा अशा शब्दालंकारांचा वापर करीत दोघी भांडू लागल्या . जुम्मन आणि अलगूने आपापल्या बायकोला कसेबसे समजावून रणभूमी रिक्त केली. उरलेला एक बैल अलगूच्या उपयोगी पडणारा नव्हता . दुसरा योग्य बैलही त्याला सापडला नाही ; म्हणून त्याने तो बैल विकण्याचे ठरवले . गावातल्याच समझू साहूने तो विकत घेतला. समझू आपल्या छकड्यातून गूळ, तूप नेऊन दुसऱ्या गावातील बाजारात विकायचा व बाजारातून तेल, मीठ आणून गावात विकायचा . अलगूचा बैल चांगला असल्यामुळे एकाऐवजी तीन खेपा बाजारात मारता येतील या विचाराने त्याने तो बैल खरेदी केला. बैलाची पूर्णकिंमत लगेच न देता एका महिन्याने देण्याचे ठरले. समझू बैलाला खूपच राबवून घेत होता . एका दिवसात तीन- चार खेपा तो बाजारात करायचा . बैलाच्या चाऱ्यापाण्याची, विश्रांतीची काळजी त्याला नव्हती. अलगूकडे त्याची चंगळ असायची . कधीतरी गाडीला जुंपला जायचा. खेळणे- बागडणे, स्वच्छ पाणी, भरपूर चारा , रोजची स्वच्छता व खरारा अशा सुखांचे ते दिवस होते. समझूकडे आल्यावर अविश्रांत कष्टांमुळे तो एका महिन्यात खंगून गेला. छकड्याचे जू दिसताच त्याचेत्राण गळून जात असे . एके दिवशी चौथ्या खेपेत समझूने त्याच्यावर दुप्पट ओझे लादले होते . दिवसभराचा थकलेला तो

प्राणी, पाय उचलू शकत नव्हता . कसाबसा पाय ओढत तो छकडा ओढत होता. भरभर चालावे म्हणून समझू निर्दयतेने त्याला चाबकाने मारत होता . एका क्षणी तो कोसळला तो कायमचा. समझूने त्याला गाडीपासून मोकळे केले. गाडी आता घरी कशी न्यावी हा प्रश्न त्याला पडला. मदतीसाठी जोरजोरात हाका मारू लागला; पण तो खेड्यातला रस्ता तान्ह्या बाळाच्या डोळ्यांसारखा संध्याकाळ होताच बंद झालेला. कुणीच दृष्टीस पडले नाही. अशा अवेळी मेल्याबद्दलत्याला त्या बैलाचा फार राग आला. रागाच्या भरात त्याने त्याच्यावर आणखी कोरडे ओढले व त्याला शिव्या घातल्या . गाडीत माल असल्यामुळे तो सोडूनही जाता येत नव्हते . रात्र झाली होती. मध्यरात्रीनंतर कधीतरी त्याचा डोळा लागला. सकाळी जाग आल्यावर पाहतो तर काय; गाडीतले सामान गायब . कडोसरीचा दोन अडीचशे रुपये असलेला बटवाही गायब होता. तो घरी पोहोचला. सर्व कहाणी ऐकल्यावर त्याच्या बायकोलाही अतिशय दुःख झाले. अलगूने लबाडी करून असा अवलक्षणी बैल आपल्याला दिल्याची खात्री पटून ती अलगूला बोल लावू लागली . या घटनेला काही महिने झाले. अलगूला बैलाची किंमत अजून मिळालेली नव्हती ; पण ती देण्याची तयारी आता समझूची नव्हती . अलगू जेव्हा त्यांच्याकडे पैसे मागायला जाई, तेव्हा समझू व त्याची बायको दोघेही त्याच्याशी भांडण करीत . पैशांऐवजी एक - दोन महिने आपला बैल अलगूने वापरावा असे त्यांचे म्हणणे होते; परंतु दीडशे रुपयांवर पाणी सोडणे अलगूसाठी सोपे नव्हते . शेवटी गावकऱ्यांच्या सल्ल्यानुसार पंचायत भरवावी व तिचा आदेश मानावा हे दोघांनी मान्य केले . पंचायतीची तयारी झाली. दोन्ही पक्ष आपापले गट मजबूत करू लागले .त्याच झाडाखाली पंचायत भरली. तशीच संध्याकाळची वेळ होती . शेतामधील मटारच्या शेंगांवर कुणाचा अधिकार असावा या विषयावर कावळ्यांची पंचायत सुरु होती . तो प्रश्न सुटेपर्यंत शेताच्या राखणदारावर कावकाव करणे त्यांना आवश्यक होते . झाडांच्या फांद्यावरील पक्षीगणात अशी चर्चा सुरू होती की , माणसे मित्रांचा विश्वासघात सहजपणे करतात आणि म्हणून ते पक्ष्यांना निष्ठुरपणाचा बोल लावू शकत नाहीत .

अलगूची पंचायत सुरु झाली. रामधनने त्याला त्याचा पंच ठरवण्यास सांगितले. तो निर्णय त्याने समझूवर सोपवला . समझूने त्याचा फायदा घेत जुम्मनला पंच ठरवले . जुम्मनचे नाव ऐकून अलगू घाबरला; पण त्याने काही हरकत घेतली नाही. आपल्यावरील जबाबदारीची जाणीव आपल्या संकुचित वर्तनात सुधारणा घडवून आणते. जेव्हा कर्तव्याची वाट हरवून आपण दिशाहीन होतो , तेव्हा हीच जाणीव आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणते . जसे मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यावर स्वैरपणे टीका करणारी पत्रकाराची लेखणी न्यायप्रवण होते किंवा उद्धटपणे वागणारे युवक गृहस्थ धर्मात येताच समंजस बनतात. जबाबदारीचे भान आल्यावर हे परिवर्तन घडून येते . जुम्मनचे असेच झाले. सरपंचाच्या उच्च स्थानावर बसल्याबरोबर त्या पदाच्या जबाबदारीची जाणीव त्याला झाली. त्याच्या मनात आले, यावेळी मी न्याय व धर्माच्या सर्वोच्च आसनावर बसलो आहे. मी जे काही बोलेन ते देववाणीसमान असेल. म्हणून त्यात माझ्या मनातील विकारांचा लवलेशही येता कामा नये. मी सत्यापासून तसूभरही ढळणे योग्य ठरणार नाही. पंचांनी दोन्ही पक्षांशी प्रश्नोत्तरे सुरू केली. त्यांनी आपापले समर्थन केले. समझूने बैलाची किंमत द्यायला हवी यावर पंचांचे एकमत झाले. बैल मरण पावल्यामुळे समझूला थोडी सवलत द्यावी असे दोघांचे मत होते, तर प्राण्याशी निर्दयतेने वागल्याबद्दल त्याला दंड करावा असे अन्य दोघांचे मत होते . शेवटी जुम्मनने निर्णय ऐकवला. तो म्हणाला, “ अलगू चौधरी आणि समझू साहू ! पंचमंडळीने तुमच्या प्रकरणावर योग्य तो विचार केला आहे. समझूने बैलाची पूर्ण किंमत द्यायला हवी . जेव्हा

त्याने बैल विकत घेतला तेव्हा तो आजारी नव्हता . जर त्याच वेळी त्याची किंमत दिली असती तर आज परत मागितली नसती . बैलाला नीट न वागवल्यामुळे हाल होऊन तो मरण पावला आहे. “ रामधन म्हणाला, “ समझूमुळे बैल मेला आहे. त्यासाठी त्याला दंड करायला हवा. “ त्यावर जुम्मन म्हणाला, “ हा प्रश्न वेगळा आहे . त्याच्याशी आपला संबंध नाही. “ समझूने किंमत देण्यासाठी थोडी सवलत मिळावी अशी विनंती केली; पण तो निर्णय जुम्मनने अलगूवर सोपवला. आनंदित होऊन अलगू उभा राहिला. “पंच परमेश्वराचा विजय असो अशी घोषणा त्याने केली. इतरांनी त्याचे अनुकरण केले. प्रत्येकजण जुम्मनच्या न्यायाचे कौतुक करू लागला . यालाम्हणतात न्याय ! हे माणसाचे काम नव्हे . पंचांमध्ये वसणाऱ्या परमेश्वराची ही महती आहे. त्याच्यासमोर खोट्याला खरे किंवा खयाला खोटे कोण म्हणू शकतो ? काही वेळाने जुम्मन अलगूच्या जवळ गेला. त्याला मिठी मारून जुम्मन म्हणाला, “ मित्रा , जेव्हापासून तू माझी पंचायत केली होतीस, तेव्हापासून मी तुझा कट्टर शत्रू झालो होतो. आज मला समजले की , पंचाच्या जागी बसल्यावर कुणी कुणाचा मित्र नसतो की शत्रू नसतो . त्याच्या मनात फक्त न्यायविचार असतो . आज मला पूर्णपणे पटले आहे की , पंचमुखातून देव बोलतो. “ “ अलगूच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली . त्या पाण्याने दोघांची मने निर्मळ केली. मैत्रीची सुकलेली वेल पुन्हा बहरून आली. “

000

सौभाग्याचे शव

मध्यप्रदेशातल्या एका पहाडी गावातील एका छोट्याशा घराच्या छतावर एक युवक कलत्या संध्याकाळच्या स्तब्धतेत मौन बसला होता . चंद्राच्या फिकट प्रकाशात समोरचे डोंगर गंभीर , रहस्यमय , संगीतमय व रमणीय वाटत होते. त्यांचे संगीत, गांभीर्य, गूढत्व या सर्वांना स्वत: त सामावून घेत वाहणाऱ्या नदीचा प्रवाह रूपेरी दिसत होता. त्या युवकाची वेशभूषा फारशी संपन्न नव्हती , मिशा पिळदार नव्हत्या , केस अव्यवस्थित होते, तसेच घड्याळ , चष्मा किंवा कोटाच्या खिशात पेनही नव्हता . चेहऱ्यावर मात्र तेज व स्वाभिमान झळकत होता . बहुधा तो तत्त्वज्ञ असावा किंवा दिखाऊपणा त्याला आवडत नसावा . आत्ममग्न असा तो युवक डोंगररांगांकडे पाहत बसला होता . अचानक नदीवरील पुलावरून येत असणाऱ्या रेल्वेच्या खडखडाटात निसर्गाचे मधुर गायन लुप्त झाले . तेवढ्यात एक युवती तेथे आली व म्हणाली, “ आज एवढ्या लवकर कशी आली गाडी ? कसले वैर आहे तिचे आपल्याशी? “ तिचा हात हातात घेत युवक खिन्नतेने म्हणाला, “ तुला सोडून मला कुठे जायचे नाही. तुझ्याशिवाय तीन वर्षं मी कसा राहू? तिचा कंठ दाटून आला. कातर स्वरात ती उत्तरली, “ ही तीन वर्ष एकदा गेली ना की , नंतर आयुष्यात आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही . एकदा जे ठरवलेय ते आता तडीस न्या . दीर्घकाळाच्या सुखासाठी हे तीन वर्षांचे विरह, दुःख मी सहन करीन. अश्रू लपवण्यासाठी फराळ आणण्याच्या निमित्ताने ती घरात गेली .. त्यांच्या लग्नाला अजून एक वर्षही झाले नव्हते. केशव मुंबई विद्यापीठातून एम. ए. करुन आता नागपूरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होता . सांस्कृतिक व सामाजिक प्रथांवर त्याचा विश्वास होता. प्राध्यापक झाल्यानंतर प्रथेप्रमाणे त्याचे सुभद्रेशी लग्न झाले. केवळ सुटीपुरतेच त्याला गावी यायला मिळायचे. हळूहळू दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. नागपूरहून येताना पहिली गाड़ी व जाताना शेवटची

गाडी तो घेत असे. ते दोन - चार दिवस त्यांना सुंदर स्वप्नासारखे भासायचे. निरोप घेताना दोघांच्याही अणूंचे बांध फुटत . त्याला जाताना ती पाहत राही. त्याला दृष्टीआड करणारे डोंगर तिला अतिशय दुष्ट वाटत . असे नवीन लग्न असतानाच नियतीने त्यांच्यात विरह घडवण्याचे षड्यंत्र सुरु केले. उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती त्याला विलायतेतून मिळाली. शहरातील मित्रांसाठी ती खूप आनंदाची गोष्ट होती. केशव मात्र द्विधा मन :स्थितीत होता . घरी आल्यावर त्याच्या परदेशगमनाला त्याच्या आई -वडिलांकडून व अन्य नातलगांकडून कडाडून विरोध झाला. शहरातल्या कौतुकापेक्षा गावातला विरोध फार कड़वा होता. सुभद्रा मात्र महत्त्वाकांक्षी होती . केशवने सर्वोच्च पदावर जावे असे तिला वाटत होते. तिचा पती तिच्यासाठी देवच होता. ती त्याची उपासक होती . तिला स्वत: साठी काही नको होते. ती पतिक्रता होती व पतीसेवा हा तिचा धर्म होता . विलायतेला जाण्याचे कबूल करेपर्यंत तिने केशवचा पिच्छा पुरवला. सासू- सासऱ्यांनी तिला खूप नावे ठेवली; पण शेवटी परवानगी दिली; परंतु जाण्याची वेळ अगदी जवळ आली आणि सुभद्रेचे मन विचलित झाले. त्याला जाऊ देऊ नये . काटकसरीने राहावे; पण एकत्र राहावे असे विचार तिच्या मनात येऊ लागले . सुटीसाठी इकडे येताना त्याला थोडा जरी उशीर झाला तरी ती किती व्याकूळ होत असे, मग आता त्याच्याशिवाय तीन वर्षं ती कशी राहणार ? पण मनातील आवेगाला दाबून टाकत ती केशवकडे आली व त्याची समजूत घालू लागली. “मला पण तुमच्याशिवाय येणारी ही तीन वर्ष युगांसारखी वाटतात; पण विलायतेत तुम्हाला मिळणाऱ्या मान- सन्मानाचा विचार केला की , तीन दिवसांसारखी वाटतात. तुम्ही तर जहाजावर चढताच समोरच्या निसर्ग सौंदर्यामुळे मला विसरुनही जाल . तिकडे गेल्यावर विद्वानांच्या सहवासात घराची आठवण पण येणार नाही. तुमच्या आठवणी याच माझ्या जीवनाचा आधार होतील. आपला विरह हा संपन्न जीवनासाठी एक तपस्या आहे. तपस्येशिवाय वरदान मिळणार नाही. “ क्षणिक मोहापायी भाग्योदयाची इतकी चांगली संधी सोडणे मूर्खपणा ठरेल हे केशवही समजून

चुकला. तिला म्हणाला, “ तू इथे अजिबात दु: ख करीत राहायचे नाही, नाही तर मला तिकडे अजिबात चैन पडणार नाही. “ पत्र नियमितपणे पाठवा आणि पाहा हं , विलायती मडमांच्या जाळ्यात अडकू नका . “ “ तुला जर संशय येत असेल तर मी जातच नाही. “ “ अहो , मी गंमत केली. तिच्या नजरेत पूर्ण विश्वास होता . “ “ इंद्रलोकातली अप्सरा जरी समोर आली ना , तरी मी तिच्याकडे बघणार नाही. तू मात्र स्वत: ला त्रास करून घेऊ नकोस. नाही तर सगळं अर्धवट सोडून परत येईन . “ दोघांनी एकमेकांना अखेरचे आलिंगन दिले व निरोप घेतला. घरातील सर्वांचा, मित्रांचा निरोप घेऊन केशव स्टेशनवर गेला. एका क्षणात प्रवाशाला घेऊन रेल्वे निघून गेली . आजारपणासारखे सुभद्रेचे दिवस कंटाळवाणे जाऊ लागले. दिवस पहाडासारखे व रात्री वैरिणी बनल्या . रात्री वाटायचे कधी एकदा पहाट होईल, पहाट होताच ती रात्रीची वाट पाहायची. मन रमवण्यासाठी ती काही दिवस माहेरी गेली. सुरुवातीला बरे वाटले; पण मग अधिकच दुर्दशा झाली. लगेच सासरी परतली. कूस बदलली की , रुग्णाला तेवढेच जरा बरे वाटते. सुरुवातीचे पाच - सहा महिने केशवचे पत्र दर पंधरा दिवसांनी नियमितपणे येत असे. त्यात विरहाचे दु: ख कमी व तेथील नावीन्याचेवर्णन अधिक असे; पण तो सुखरूप असल्याचे समाधान सुभद्रेला अधिक होते . पुढे पुढे त्याच्या पत्रांना उशीर होत होत नंतर पत्र येणेच बंद झाले. सुभद्रा फार व्याकूळ झाली. तिच्या दु: खी हृदयावर कुंकर घालणारे एकही वाक्य त्याच्या पत्रात तिला सापडत नसे. पत्र येणेच बंद झाल्यावर त्याला भेटायला लंडनला जाण्याचेतिने ठरवले. त्यानंतर बरेच वाचन करुन तिने समुद्री प्रवासाबद्दल माहिती मिळवली. त्याच्या अभ्यासात तिच्यामुळे अडचणी येऊ नयेत म्हणून त्याला न कळवताच जाण्याचे व तिथेही त्याला प्रत्यक्ष न भेटता गुप्तपणे राहण्याचे तिने ठरवले होते. तिचा हट्ट पाहून माहेरचे व सासरचे सर्वजण तिच्या बेतात सामील झाले व तिला पैशांची मदत केली. इंग्लंडला

जाऊन काय करायचे हे तिने ठरवले नव्हते. कष्ट करणाऱ्यांना पोटाची चिंता राहत नाही, हे तिला माहिती होते. जाताना सासू -सासरे तिच्यासह स्टेशनवर गेले. हात जोडून ती त्यांना म्हणाली, “ माझे तिकडे जाणे त्यांना कळवू नका. नाही तर त्यांना काळजी लागेल व अभ्यासात लक्ष लागणार नाही. “ सासऱ्यांनी तिला आश्वस्त केले. गाडी निघाली. वैभवसंपन्न अशा लंडनच्या एका गरीब वस्तीतल्या वरच्या मजल्यावरील भाड्याने घेतलेल्या एका छोट्या खोलीत सुभद्रा खुर्चीवर बसली आहे . इथे येऊन तिला आज एक महिना झाला आहे. प्रवासात सुरुवातीला मनात असलेल्या शंका कुशंका हळूहळू दूर होत गेल्या . मुंबई बंदरावर तिला जहाजामध्ये जागा सहजतेने मिळाली. आणखी पाच, सहा स्त्रिया त्याच जहाजाने लंडनला जात होत्या. त्यांची छान सोबत तिला झाली. इथे पोहोचल्यावर त्यांची साथ सुटली . त्यांच्यापैकी काहींचे पती उच्च पदस्थ अधिकारी होते. चांगल्या मोठ्या इंग्रज घराण्यांशी त्यांची ओळख होती . त्यांच्या मदतीने सुभद्रेला दोन महिलांना भारतीय संगीत व हिंदी भाषा शिकवण्याचे काम मिळाले. उरलेल्या वेळेत ती शिवणकाम करते. केशवचे घर इथून जवळ असल्यामुळे सुभद्रेने या भागात घर घेतले आहे . काल तिला केशव बसमधून उतरताना दिसला होता. ओह! धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडण्याची तीक्र इच्छा झाली होती . तिला वाटले की, त्याला विचारावे काय हो , तुम्ही इथे येताच बदलून गेलात. मला दिलेली सर्व वचने विसरालात का ? पण फार प्रयत्नाने तिने स्वत: ला सावरले; पण तेव्हापासून आतापर्यंत एक प्रकारच्या धुंदीतच ती आहे. ते तिच्या इतके जवळ आहेत . मनात आले तर ती त्यांना रोज पाहू शकते. त्यांचे बोलणे ऐकू शकते. हो आणि त्यांना स्पर्शही करू शकते . आता ते तिच्यापासून कुठे पळून जाणार त्यांच्या पत्रांची तरी तिला आता कसली आलीय चिंता. संध्याकाळची वेळ होती . धुक्यामध्ये रस्त्यातील दिवे आसवे ढाळणाऱ्या डोळ्यांसारखे निस्तेज दिसत होते . स्त्री - पुरुष फिरायला निघाले होते. सुभद्रा विचार करू लागली. “ या लोकांना आनंदी जीवनाची किती ओढ आहे. जणू काही कुणाला कसलीच काळजी नाही, जणू सर्वजण श्रीमंत आहेत .

हे लोक किती एकाग्रतेने सर्व कामे करतात. जेव्हा जे काम करतील, मनापासून करतील. खेळण्याचा उत्साह आहे तसा कामाचाही उत्साह आहे आणि आम्ही असे आहोत की हसतही नाही , रडत ही नाही , मूक होऊन राहतो. उत्साहाचे चिन्हही दिसत नाही. काम तर दिवसभर इतके करतो की , जेवायलाही फुरसत नाही; पण प्रत्यक्षात पंचवीस टक्के वेळही कामासाठी दिला जात नाही. केवळ काम करण्याचे देखावे करतो . असं वाटतं आपला समाज प्राणशून्य झाला आहे . अवचितपणे तिला रस्त्यात केशव दिसला. ताडकन उठून ती व्हरांड्यात आली. धावत जाऊन त्याला भेटावे असे तिला वाटले. तिथे येऊन जरी तिने अपराध केला असेल, तर तो त्याच्यासाठीच तर केला आहे. जर त्याने नियमित पत्र पाठवले असते, तर ती तिथे आली असती का ? पण… केशव बरोबर ही तरुणी कोण आहे! केशवने तिचा हात धरला आहे. दोघे हसत हसत बोलत आहेत . कोण आहे, ही मुलगी ! सुभद्रेने लक्षपूर्वक पाहिले. ती सावळ्या रंगाची, भारतीय पोशाखातली भारतीय मुलगी होती. बूट घालून दार बंद करीत सुभद्रा एका क्षणात रस्त्यावर पोहोचली; पण आता केशव दिसत नव्हता. तो गेलेल्या दिशेने ती झपझप चालू लागली . कोण आहे ती ? पण ते दोघे जणू अदृश्यच झाले. त्यांना शोधत सुभद्रा किती तरी दूरवर गेली. रात्रीचे बारा वाजले होते . इतका वेळ क्षणाचीही विश्रांती न घेता ती चालत होती . ती परत फिरली. तिच्या घरमालकिणीने तिच्यासाठी ठेवलेले जेवणाचे । ताट तिने खोलीत आणले ; पण जेवणाचेतिला भान नव्हते. जिकडे केशव गेला होता त्या दिशेकडे एकटक पाहत ती व्हरांड्यात उभी राहिली. रात्रीचा एक वाजून गेला; पण केशव परतला नाही . वाट बघण्यातली व्यर्थता तिला जाणवली. कधी तरी नकळत झोप लागली . दुस - या दिवशी सुभद्रा कामावर जाण्यासाठी तयार होत होती. रेशमी साडी नेसलेली एक तरुणी आली व हसत म्हणाली, “नमस्कार ! मी ऊर्मिला; सकाळीच तुम्हाला त्रास देत आहे. तुम्ही कुठे बाहेर निघालात का ? सुभद्रा तिला बसायला खुर्ची देत म्हणाली, “ हो , कामासाठी जात आहे. तुमचे माझ्याकडे काय काम आहे? “ हे बोलता बोलता सुभद्रा तिचे खास बायकी दृष्टीने आलोचनात्मक

निरीक्षण करीत होती. सौंदर्यशास्त्रानुसार ती सुंदर नव्हती. सावळा वर्ण, रुंद चेहरा, चपटे नाक, बुटका व स्थूल शरीरबांधा, डोळ्यावर चष्मा अशी ती होती; पण त्या बरोबरच तिला अतिशय मधुर, विनम्र व संयमित आवाजाचे वरदानही होते . तिची बुद्धिमता लपत नव्हती . सुभद्रा तिच्यापुढे क्षुद्र वाटत होती. ऊर्मिला खुर्चीवर बसत म्हणाली, “माझे काही चुकत असल्यास मला क्षमा करा . तुम्ही कपडे शिवता असे मी ऐकले आहे आणि हे सिद्ध करणारं शिलाई मशीनही इथे दिसत आहे. “ सुभद्रा, “ मी दोघींना भाषा शिकवायला जाते व उरलेल्या वेळेत शिवणकाम करते . तुम्ही कापड आणलं आहे का ? “ उर्मिला “नाही, सध्या मी आणलेलं नाही. असं आहे की माझे लग्न ठरले आहे. मला माझा पोशाख पूर्णत: भारतीय हवा आहे. लग्न वैदिक पद्धतीने होणार आहे. इथे असे कपडे तुम्हीच शिवून देऊ शकता. “ सुभद्रा , “ असा पोशाख तुमच्यासाठी मी अगदी आनंदाने शिवेन . कधीचा मुहूर्त आहे ? “ ऊर्मिला संकोचत म्हणाली, “याच आठवड्यात लग्न व्हावे असे ते म्हणतात ; पण मला मात्र भारतात परत गेल्यावर व्हावे असे वाटते . ते फारच घाई करीत असल्यामुळे आता माझा नाइलाज झाला आहे. अजून कपडे शिवून व्हायचे आहेत असे सांगून सध्या मी त्यांना थांबवले आहे. “ सुभद्रा, “ असं असेल तर मी लवकरात लवकर तुमचे कपडेशिवून देते . “ ऊर्मिला म्हणाली, “ छे! छे! मला तर वाटतं तुम्ही अनेक महिने त्यासाठी घ्यावेत . “ सुभद्रा, “ वा ! या शुभकार्यात मी का बरे विज आणू! मी याच आठवड्यात तुमचे कपडेशिवून देईन आणि त्यांच्याकडून बक्षीस घेईन . “ ऊर्मिला खळखळून हसली. तिच्या हास्याने खोली उजळून निघाली. म्हणाली, “ यासाठी तर ते तुम्हाला अगदी खुशीने बक्षीस देतील आणि तुमचे कृतज्ञ राहतील. लग्नाच्या बेडीत अडकायचे नाही

ही माझी प्रतिज्ञा त्यांच्यामुळेच मोडली आहे. ही बेडी किती आनंदाची असते हे मला आज कळत आहे. तुम्ही तर अशातच इथे आल्या आहात. तुमचे पती कुठे आहेत ? “ सुभद्रा बहाणा करीत म्हणाली , “ ते सध्या जर्मनीत आहेत . संगीत त्यांना फार आवडते . ते शिकण्यासाठी ते तिथे गेले आहेत . “ ऊर्मिला, “ केशवला पण संगीताची फार आवड आहे. “ केशव हे नाव ऐकताच विंचवाने दंश केल्यासारखे सुभद्रेला झाले. तिच्याकडे पाहत ऊर्मिलाने विचारले, “ तुम्हाला आश्चर्य का वाटले? तुम्ही केशवना ओळखता का ? “ सुभद्रेने स्वत : ला सावरून घेतले व उत्तर दिले - “नाही. मी हे नाव कधी ऐकलं नाही . ते काय करतात ? “ केशव हे दुसऱ्या कुणाचेही नाव असू शकते या अपेक्षेने तिने हा प्रश्न विचारला होता . त्या उत्तरावरच तिचे आयुष्य पणाला लागणार होते. ऊर्मिला म्हणाली, “ भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ते इथेशिकण्यासाठी आले आहेत . अजून वर्षही झालेले नाही. त्यांना भेटून तुम्हाला खूप चांगले वाटेल. केशव म्हणजे तेज आणि विद्वत्तेचे साक्षात रूप आहेत. इथले सर्व विद्वान प्रोफेसरही त्यांना मानतात. त्यांच्या इतके सुंदर भाषण मी दुसऱ्या कुणाचे अजून तरी ऐकले नाही . ते अगदी आदर्श जीवन जगतात . माझ्यावर त्यांचे प्रेम बसले याचे मलाच आश्चर्य वाटते; कारण माझ्याजवळ रंगरूप काहीच नाही . केवळ माझे नशीब चांगले आहे म्हणायचे. ठीक आहे तर; मी संध्याकाळी कापड घेऊन येते. “ ऊर्मिलानिघून गेल्यावर सुभद्रेच्या मनाचा बांध फुटला. तिचे जग उजाड झाले, ती अगदी एकाकी पडली. तिच्या सर्व संवेदना बधिर झाल्या . अरे देवा ! हाच का तिच्या प्रेम व भक्तीचा पुरस्कार ! आग्रह करून तिनेच केशवला इकडे पाठवले अन् स्वतःचा सर्वनाश करून घेतला. केशवच्या गतस्मृतींनी तिच्याभोवती फेर धरला. केशवचे प्रेमळ व सोज्वळ रूप , तिच्या किंचितशाही दुखण्याने त्याचे घाबरून जाणे, तिच्या उशाशी बसून तिची सेवा करणे हे सारे सारे तिला आठवू लागले. तोच केशव तिला इतक्या लवकर कंटाळला ! तो तर तिचा प्राण होता, सर्वस्व होता. नाही! नाही ! यात

केशवची काहीच चूक नाही. त्या मुलीनेच गोड बोलून, आपल्या हुशारीची छाप पाडून केशवला जाळ्यात अडकवले आहे. अशिक्षित साधेपणा तर केशवला किती आवडत होता, त्यामुळेच सुभद्रेच्या शिक्षणाचा आग्रह त्याने मानला नव्हता. आता मात्र केशवनी त्या ऊर्मिलेच्या जाळ्यात अडकून तिच्यावर मोठाच अन्याय केलाय . ऊर्मिलेबद्दलचीईर्ष्या आणि वंचनेचे दु: ख यामुळे सुभद्रा भान हरपून बसली. कामावर जाण्याचेतिच्या लक्षात राहिले नाही. बंदिस्त व घायाळ पाखरासारखी ती खोलीतच फिरू लागली . त्यांच्यामध्ये आधीच काही मतभेद, दुरावा असता तर इतके दुःख तिला झाले नसते. हे तर हसता हसता अचानक कुणी खंजीर खुपसावा असे तिला वाटले . जर ती केशवना अयोग्य होती तर त्यांनी तिच्याशी लग्न तरी का केले ? लग्नानंतरही तिला दूर का लोटले नाही ! प्रेमाचा अंकुर का रुजवला ? प्रेमवृक्ष बहरला असताना, तिच्या अंतर्मनात त्याची मुळे खोलवर रुजली असताना आज ते त्याला का उखडून टाकत आहेत ? हृदय भंगल्याशिवाय राहील का ? अचानक तिच्या लक्षात आले की , केशवने त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल ऊर्मिलेला काही सांगितले नसणार . तिला जर समजले तर केशवचेपितळ उघडे पडू शकते. मग याच विचाराने तिच्या मनाचा ताबा घेतला व ते सर्व सांगण्यासाठी ती संध्याकाळी येणाऱ्या ऊर्मिलेची वाट पाहू लागली. सुभद्रा एकसारखी ऊर्मिलेची वाट पाहू लागली. आपण स्वत : च केशवच्या घरी जावं व त्यांना फैलावर घ्यावं असं तिला वाटू लागलं . त्यांना म्हणावे, “ तुम्ही इतके कपटी असाल असे मला वाटले नव्हते. हेच शिकण्यासाठी तुम्ही इथे आलात का ? तुमच्या हुशारीचा एवढाच परिणाम आहे का ? मी तुम्हाला सर्वस्व दिले अन् तुम्ही मला फसवलेत ? इतकीही माणुसकी उरली नाही तुमच्यात ? आता मी जन्मभर तुमच्या नावाने रडत राहू का ? “ पण असे विचार जरी तिच्या मनात येत असले तरी तिचे दुसरे अभिमानी मन तिला बजावत होते की , ज्याने तिचा विश्वासघात केला त्याच्यासमोर जायचे नाही , त्याच्यासमोर आपले दुःख प्रकट करायचे नाही. केशव जर तिचा तिरस्कार करीत असतील तर तीपण

त्यांचा तिरस्कार करेल . रात्र झाल्यावर ऊर्मिला कपडे घेऊन आली. येताच बोलू लागली, “ सॉरी ! मला यायला उशीर झाला. अचानक केशवना कामासाठी जर्मनीला जावे लागणार आहे. अगदी महत्त्वाचे काम आहे . त्यांच्या कामात मदत करण्यासाठी मीपण त्यांच्याबरोबर जावे असे त्यांना वाटत आहे. मला जावेच लागेल अन् तिकडे जाण्याआधीच लग्न करण्याचा आग्रह ते करीत आहेत . त्यामुळे आता उद्या संध्याकाळी आमचे लग्न आहे. उद्या मी साधेच कपडे घालीन . हे कपडे शिवून ठेवा, मी तिकडून आल्यावर घेऊन जाईन . “ कपडे टेबलावर ठेवीत सुभद्रा म्हणाली, “तुला धोका देण्यात येत आहे. “ धोका ? कसला धोका ? काय म्हणायचे आहे तुला ? “ “केशव तुला फसवून तुझ्याशी लग्न करीत आहेत . त्यांनी तुला स्वत: बद्दल सगळे सांगितले आहे का ? काहीच आडपडदा ठेवला नाही ? “ हो, त्यांनी मला सगळे सांगितले आहे. त्यांनी माझ्यापासून काहीच लपवले नाही “ “त्यांचे लग्न झाले आहे. हे पण तुला माहिती आहे. “ “ हो , त्यांनी मला हे पण सांगितले आहे. “ ऊर्मिलाचा चेहरा निस्तेज पडला. हताश होऊन तिरस्काराने तिच्याकडे बघत सुभद्रेने विचारले , “ हे सगळे माहिती असूनही तू त्यांच्याशी लग्न करणार आहेस ? का ? “ “ तू आधी मला हे सांग की , तू केशवना पाहिले आहेस का ? तू त्यांना कसं काय ओळखतेस ? “ “ मी त्यांना कधीच पाहिले नाही. त्यांना ओळखणाऱ्या माझ्या एका मित्राने मला हे सांगितले आहे. “ “ तू जर त्यांना ओळखत असतीस तर मला हा प्रश्न विचारला नसतास. अगं, एकच काय , त्यांनी शंभर लग्ने केली असती तरी मी त्यांना नकार दिला नसता . त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कुणाशी लग्न

करू शकत नाही. त्यांच्या सहवासात मी फार समाधानी असते . माझा आत्मा फुलाप्रमाणे फुलून येतो , प्रकाशमान व विकसित होतो. याचा अनुभव मी नेहमीच घेते . जग मला कितीही नावे ठेवू देत मी त्यांना सोडू शकत नाही. हे खरे आहे की , त्यांचे लग्न झाले आहे; पण त्या पत्नीशी ते कधीच मनाने एकरूप झाले नाहीत . ती अगदीच सामान्य , अशिक्षित मुलगी आहे. तूच विचार कर ना की , केशवसारखा विद्वान, स्वाभिमानी पुरुष अशा मुलीबरोबर कसा समाधानी होईल ? बरं , उद्या तुला माझ्या लग्नाला यावे लागेल हं . “ सुभद्रेचा चेहरा रागाने लाल होऊ लागला होता . केशवने इतक्या काळ्या रंगात तिची प्रतिमा रंगवलेली पाहून तिचे रक्त खवळून उठले. त्या क्षणी ऊर्मिलेला हाकलून द्यावे अशी इच्छा होत होती . तरीपण दुसराच काही विचार करून गंभीरतेने तिने विचारले, “त्यांच्या पत्नीला आता ते हे सगळे कसे सांगणार आहेत ? तिच्याशी कसं वागणार आहेत ? । ऊर्मिला तत्परतेने म्हणाली, “ घरी गेल्या गेल्या ते तिला सांगणार आहेत की , आता ते पती- पत्नी म्हणून राहू शकत नाहीत. तिच्या निर्वाहाची व्यवस्था ते तिच्या मर्जीने करून देतील. याशिवाय अजून ते काय करणार ? हिंदू धर्मात पती - पत्नी विच्छेद होत नाही म्हणून तिला पूर्णत: स्वतंत्र करण्यासाठी ते ख्रिश्चन किंवा मुसलमान होण्यासही तयार आहेत . ते तर आताच तिला पत्र पाठवणार होते की , तिची तयारी असेल तर ती आमच्या बरोबर राहू शकते . मी तिला माझ्या बहिणीसारखेच वागवेन; पण माझे हे विचार केशवना पटत नाहीत. “ “तिच्या निर्वाहाची सर्व जबाबदारी ते उचलणार असतील तर स्त्रीला आणखी काय हवे असते ! “ सुभद्रेच्या स्वरात उपहास भरला होता ; पण त्याकडे दुर्लक्ष करीत ऊर्मिलेने म्हटले, “ ठीक आहे. मी निघते आता जर्मनीहून परत आल्यावर कपडे घ्यायला येईन आणि तू उद्या संध्याकाळी आर्यमंदिरात आमच्या लग्नाला नक्की ये. “ “ दुसऱ्या महत्त्वाच्या कामामुळे मी येऊ शकणार नाही. सॉरी. “ यावर काही न बोलता ऊर्मिला निघून

गेली . काही केल्या सुभद्रेचे चित्त शांत होत नव्हते . प्राणाहून प्रिय असणाऱ्या केशवने दिलेला धोका इतका अकस्मात होता की , तिच्या सर्व कोमल भावना नष्ट झाल्या . प्रतिघातासाठी तिचा अणुरेणू पेटून उठला. असे जर सुभद्रेकडून घडले असते तर ? केशवनी तिला ठारच मारले असते . पुरुषांना सर्व क्षम्य व स्त्रियांना सर्व अक्षम्य असे असते का ? नाही ! सुभद्रा हे स्वीकारूच शकत नाही. तिच्या पत्नीधर्माची, आदशांची तिला पर्वा उरली नाही. अशा पुरुषाच्या पायाची दासी होऊन राहण्याइतकी मी स्वाभिमानशून्य नाही . माझा सर्वनाश करून सुख शोधणाऱ्या पतीला मी क्षमा करू शकत नाही. त्याच्या जीवनाचा अंत करून त्यालाशिक्षा देण्याची भयंकर प्रेरणा तिच्या मनात जागृत होऊ लागली. स्वत: चा धिक्कार करीत मनात येऊ पाहणाऱ्या स्त्री सुलभ विचारांना ती दूर लोटू लागली . ती काय इतकी दुबळी आहे ? तिचे सतीत्व हिरावून घेऊ पाहणाऱ्या दुष्टाला ती काय प्रतिकार करणार नाही का ? केशवने तिच्या सत्त्वाचे अपहरण केले आहे. त्याचा अंत करणे हेच आता सुभदेरचे कर्तव्य नाही का ? या शेवटच्या विचाराने सुभद्रेला ती उत्तेजना दिली, जी तो भयंकर संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक होती. हीच ती अवस्था असते, जेव्हा स्त्रीला पुरुषाच्या रक्ताची तहान लागते. स्वसुरक्षेसाठी मिळवलेले पिस्तूल तिने हातात घेतले. उद्या संध्याकाळी आर्यमंदिरात विवाह विधीसाठी केशव व ऊर्मिला जेव्हा समोरासमोर बसलेले असतील तेव्हा एका गोळीने केशवचा व दुसया गोळीने स्वत : चा अंत करेल . हो ! ती स्वत: चा अंत करेल ; कारण अधम आयुष्य जगण्याची तिची तयारी नाही. हातातल्या पिस्तुलाकडे ती एकटक बघू लागली . संध्याकाळची वेळ होती . आर्यमंदिराच्या अंगणामध्ये विवाहविधी सुरु होता . व्हरांड्यात एका खांबाआड उभी राहून सुभद्रा केशवकडे बघत होती . तीन वर्षांपूर्वी केशवला असेच मांडवात बसलेले चोरून पाहिले होते , ते दृश्य तिच्या नजरेसमोर तरळले. तेव्हा अंत : करणात कोमल भावनांच्या

गुदगुल्या होत होत्या . असीम प्रेम, अपार इच्छा आकांक्षा होत्या . जणू जीवनाची प्रभात उमलत होती . जीवनसंगीत मधुर , सुखद आणि भविष्य उषास्वप्नासारखे सुदंर होते. तो केशव हाच होता का ? सुभद्रेला भ्रम झाला . जणू तो केशव हा नाही, हा तसाच दिसणारा, त्याच नावाचा दुसराच कुणी पुरुष आहे . त्याच्या हसण्यात, डोळ्यांत, शब्दात तिला आकर्षित करणारे काहीच नव्हते . अनोळखी माणसाकडे पाहावे तशी ती त्याला पाहू लागली. आतापर्यंत सुभद्रेच्या मते, केशव इतका रूपवान , तेजस्वी, सौम्य स्वभावी, सुशील पुरुष जगात दुसरा कुणी नव्हता; पण आता तिला वाटू लागले की , त्याच्यात व तिथे असलेल्या इतर तरुणांमध्ये काहीच फरक नाही . तिच्या मनात धगधगणारी ईष्र्येची ज्वाला,त्याला संपविण्याची तिची हिंसक कल्पना , जिने तिला तेथे ओढून नेले होते, ती अचानक शांत झाली . तिच्या मनातील हिंसेची जागा विरक्तीने घेतली . तिच्या हिंसक कल्पनेत एक स्वार्थी ममता होती की , तिचा केशव हा फक्त तिचेच जीवन सर्वस्व आहे. तो अन्य कुणाचा होऊ शकत नाही ; पण आता ते ममत्वच उरले नाही. तो तिचा नाही तर मग तो कुणाचाही असेल तर त्याची तिला काय पर्वा! विवाहविधी संपन्न झाला. अभिनंदनाचा, मंगल गाण्यांचा वर्षाव झाला. मेजवानी सुरू झाली. रात्रीचे बारा वाजले . सुभद्रा तेथेच पाषाणमूर्ती बनून उभी होती . जणू एखादे विचित्र स्वप्न बघत आहे. होय ! जणू एखादी नगरी उद्ध्वस्त झाली, जणू मधुर संगीत बंद पडले, दीपक मालवले. जेव्हा इतर लोक मंदिराबाहेर पडले तेव्हा तीपण बाहेर आली. कुठे जावे तिला सुचेना .तिचे सारे जगच बदलले होते . पूर्ण रात्र ती रस्त्याने भटकत राहिली; पण तिला तिचे घर सापडले नाही. सर्व दुकाने बंद , रस्ते सुनसान. तशात ती तिच्या घराच्या शोधात होती. हाय ! जीवनपथावरही तिला असेच भटकत राहावे लागेल काय ? पोलिसाच्या हटकण्याने ती भानावर आली व तिच्या लक्षात आले की , तिच्या घराच्याच रस्त्यावर ती कधीची फिरत होती . ऊर्मिला सुभद्रेकडे आली तेव्हा सुभद्रा तिचेच कपडे शिवण्यात तन्मय झाली होती . “ तू काल लग्नाला

का आली नाहीस? “ या प्रश्नामुळे सुभद्रेचे लक्षतिच्याकडे गेले. ऊर्मिलातिला अतिशय विलोभनीय भासली. धाकटी बहीण आल्यासारखा आनंद तिला झाला. झटक्न उठून तिला कवेत घेत ती म्हणाली, “ मी आले होते; पण तुझे माझ्याकडे लक्ष गेले नाही. “ “ तू केशवना पाहिलेस ना ? मग सांग बरे त्यांच्याबद्दल मी तुला जे सांगितले ते खोटं होतं का ? “ सुभद्रा प्रेमळपणे हसत म्हणाली, “ मी तुझ्या नाही, माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिले. मला ते तुझ्या योग्य वाटत नाहीत. खरेच तू फसली आहेस. “ ऊर्मिला खळखळून हसत म्हणाली, “ छे! मला तर वाटले की मीच त्यांना फसवले आहे. “ “ एकदा कपडे व दागिने घालून तर बघ. “ “ ठीक आहे; पण मी त्याने काही वेगळी होणार आहे का ? आणि दागिने कुठून आणू? ते मिळायला अजून बरेच दिवस लागतील. “ “ मी माझे दागिने तुला देते . “ सुभद्रेने तिचे सर्व दागिने ऊर्मिलेस परिधान करायला लावले . ऊर्मिलेस हा अनुभव अगदी वेगळाच होता. वरवर नको म्हणाली, तरी मनातून ती खूश झाली. आरशात स्वत: ची रूपवान छबी पाहून ती । आश्चर्यचकित झाली. ती इतकी सुंदर असेल असे तिला वाटले नव्हते . केशवने आपल्याला या रूपात पाहावे असे तिला वाटते . तोच सुभद्रा म्हणाली, “ तुला असे पाहून केशव तुझी दृष्ट काढतील . तू अशीच घरी जा . दागिने तुझ्याकडे राहू दे. इथे नुसते पडूनच असतात . ऊर्मिलेने स्वत : चा पत्ता देत घरी येण्याचे आमंत्रण देऊन तिचा निरोप घेतला. सुभद्रा खिडकीतून तिच्याकडे पाहत राहिली. ईर्ष्या किंवा द्वेषाचा लवलेशही तिच्या मनात उरला नव्हता . जाऊन एक तास उलटत नाही तोच ऊर्मिला परत आली व सुभद्रेस विचारू लागली, “ मी परत तुझा वेळ घेते आहे. केशव बाहेर उभे आहेत . त्यांना आत बोलवू का ? “ एक क्षण…फक्त एक क्षणभर सुभद्रा घाबरली. चटकन उठून टेबलावरील पसारा आवरला,

विस्कटलेले केस नीट करीत उदासीन हसत म्हणाली, “त्यांना का तू त्रास दिलास, जा बोलव त्यांना आत . “ पुढच्या मिनिटात केशव आत आला . सुभद्रेकडे नजर जाताच पायाला चटका बसल्याप्रमाणे धक्का बसून मागे सरकला. तोंडातून हलकासा हुंकार निघाला. सुभद्रा गंभीरतेने व शांतपणे आपल्या जागेवर उभी राहिली व अनोळखी माणसाशी बोलल्याप्नमाणे हात पुढे करीत म्हणाली, “ या ! या ! मि . केशव , अशी सुंदर , विद्वान , सुशील पत्नी तुम्हाला लाभल्याबद्दल तुमचे अभिनंदन . “ केशवचा चेहरा लाज व दु: खाने काळवंडला. तो भ्रमिष्टासारखा उभा होता . एक ना एक दिवस हे घडणारच होते; पण या रीतीने, इतकी अचानक सुभद्रा भेटेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते . या लग्नाविषयी तिला कसे पटवायचे हे त्याने विचारपूर्वक ठरवले होते. ती सर्व तयारी वाया गेली. त्याला पाहून सुभद्रेच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती, दु: ख काहीच उमटले नाही . ती अगदी अनोळखी असल्यासारखी वागत होती . ती इथे कशी, कधी, का आली? काय करते ? तिचानिर्वाह कसा होतो ? या अनेक प्रश्नांचे वादळ त्याच्या मनात थैमान घालू लागले . सुभद्रेच्या धिक्कार व क्रोधाला सामोरे जाण्याची त्याची तयारी होती ; पण अशी अनपेक्षित भेट व गर्वयुक्त उपेक्षेसाठी तो तयार नव्हता. ती प्रेममूर्ती सुभद्रा इतकी कठोर बनली आहेम्हणजे तिला सर्व समजले आहे हे त्याच्या लक्षात आले. सर्वांत मोठा धक्का म्हणजे तिने सर्व दागिने ऊर्मिलेला देऊन टाकणे हा होता . तो पराभूतासारखा खुर्चीत बसला. तिच्या अभिनंदनास एका शब्दानेही उत्तर देऊ शकला नाही . ऊर्मिलेने केशवला सांगितले, “हिचे पती सध्या जर्मनीला गेले आहेत . बिचारी संगीताच्या शिकवण्या व शिलाई काम करून स्वत: च्या पायावर उभी आहे. ते महाशय जर मला भेटले तर त्यांच्या या भाग्याबद्दल अभिनंदन करेन . हे ऐकून केशव काहीच बोलू शकला नाही. सुभद्राच म्हणाली, “ ते माझ्यावर नाराज आहेत . तुझ्या अभिनंदनाने तर आणखीन रागावतील. “ ऊर्मिला आश्चर्याने म्हणाली, “त्यांच्या प्रेमामुळे तरतू आपले घरदार सोडून येथे आलीस. येथे कष्ट करून राहते आहेस. तरी ते तुझ्यावर नाराज आहेत ? आश्चर्यच आहे म्हणायचे. “

सुभद्रा त्याच प्रसन्न मुखाने म्हणाली, “ पुरुष आणि प्रकृती हे आश्चर्याचेच विषय आहेत . मि . केशवना कदाचित हे पटणार नाही. “ ऊर्मिलेने केशवकडे उत्तरासाठी प्रोत्साहक नजर टाकली; पण केशव तसाच अचेतन बसून राहिला. त्याच्या मनावर हा नवा घाव होता. त्याला चूप बसलेले पाहून ऊर्मिलेने त्याच्या बाजूने सफाई दिली, “ स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार आहेत असे यांचे मत आहे. बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसे केशवचे झाले. धैर्य एकवटून तो म्हणाला, “ लग्न हा एक प्रकारचा करार आहे, तडजोड आहे. वाटेल तेव्हा तो तोडण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना आहे. “ ऊर्मिलाने त्याचे समर्थन करीत म्हटले, सुसंस्कृत व सभ्य समाजात ही चळवळ फार जोरात चालू आहे . “ सुभद्रा आक्षेप घेत म्हणाली, “ एखादा करार तोडायचा असेल तर काहीतरी कारण असले पाहिजे ना ? “ केशव स्वत : च्या भावनांचा कौल घेत म्हणाला , “ जर पुरुषाला असे वाटले की , या बंधनातून मुक्त । झाल्यावरच आपण अधिक सुखी होऊ , तर एवढे कारण पुरेसे आहे. तसेच जर स्त्रीला वाटले की , ती दुसऱ्या पुरुषाबरोबर… सुभद्रा त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणाली, “ माफ करा मि . केशव, तुमच्याशी वाद घालण्याइतकी मी बुद्धिमान नाही. मला वाटते की , लग्न ही केवळ तडजोड किंवा करार नसून एक अनुबंध आहे. हा अनुबंध जेव्हा जन्मभर सांभाळला जातो तेव्हा तोच आदर्श असतो. मी भारताविषयी बोलत नाहीय . तिथे तर स्त्री पुरुषांची दासी आहे. मी इंग्लंडविषयी बोलत आहे. इथे कितीतरी स्त्रियांशी मी बोलले आहे. वाढणाऱ्या घटस्फोटांनी त्याही असमाधानीच आहेत . पावित्र्य व स्थिरता हे विवाहाचे उच्चतम आदर्श आहेत . पुरुषांनी नेहमीच त्यांचा भंग केला आहे व स्त्रियांनी नेहमीच ते निभावले आहेत . पुरुषांचा हा अन्याय स्त्रियांना कुठल्या दिशेला नेईल हे सांगता येणार नाही. “ या गंभीर व संयमी

बोलण्याने सुभद्रेने विषय थांबवला व सर्वांसाठी चहा मागवला. थोड्या वेळाने तिथून जाताना न राहवून केशवने तिला विचारले, “ इथे अजून किती दिवस राहणार आहात ? काही हवे असल्यास मला जरूर सांगा. “ सुभद्रा, “ या मदतीबद्दल धन्यवाद ! “ तो पूर्ण दिवस केशव अस्वस्थ होता. ती फक्त त्याच्यासाठीच तेथे आली होती, हे त्याला कळून चुकले होते. तिच्या असीम त्यागाचा विचार त्याच्या काळजाचा थरकाप उडवत होता .तिचे येणे त्याला समजले असते तर कदाचित तो ऊर्मिलेच्या आकर्षणात गुरफटला नसता. चौकीदारासमोर चोर घरात घुसू शकत नाही. सुभद्रेला भेटून त्याची कर्तव्य भावना जागृत झाली. तिची क्षमा मागण्यासाठी तो आतुर झाला. तिच्याकडून त्याला सर्व जाणून घ्यायचे होते . तिने केलेली मूक उपेक्षा त्याला असह्य झाली. दिवस कसातरी घालवून रात्री दहा वाजता एका प्रोफेसरांना भेटण्याचे निमित्त करून तो सुभद्राकडेनिघाला . ती त्याच्याशी बोलेल की नाही अशी भीती त्याला वाटत होती . त्याच्या आजारपणात ऊर्मिलेने त्याची खूप सेवाशुश्रूषा करून त्याला मरणाच्या दारातून परत आणले होते . त्यामुळे तो तिच्या प्रेमात ओढला गेला . सुभद्रेला सांगण्यासाठी त्याने ही कथा रचली होती . ती ऐकल्यानंतर सुभद्रा त्याला नक्कीच माफ करेल यात शंका नव्हती ; पण आता पुढे काय ? तो दोघीवर सारखेच प्रेम करू शकतो का ? एकत्र राहण्यास कदाचित ऊर्मिला तयार होईल; पण सुभद्रा होईल का ? तिच्या विनवण्या करून तिला तयार करण्याचा विचार तो करू लागला. सुभद्रेवरील प्रेमाचा त्याला नव्याने साक्षात्कार झाला व त्याला झडझडून भानावर आणू लागला. आता त्याला समजले की , सुभद्रेचे त्याच्या मनातील स्थान अढळ आहे . ऊर्मिला तिची जागा कधीच घेऊ शकणार नाही. ऊर्मिलेबद्दल त्याला वाटत होते ते प्रेम नसून आसक्ती होती, जी पंच पक्वानांना बघून निर्माण होते. ती खरी भूक नव्हती . विलासिनी ऊर्मिला इतका त्याग कधीच करू शकणार नाही . मन घट्ट करून तो सुभद्रेच्या घरी पोहोचला. घरात अंधार होता . तेवढ्यात घरमालकीण तिथे आली

व सुभद्रा घर सोडून गेल्याचे तिने सांगितले. केशव स्तंभित झाला व उतावीळपणे विचारू लागला , “निघून गेली ? कुठे गेली ? आपले सगळे सामान नेले का ? काही सांगून गेली का ? “ घरमालकीण उत्तरली, “ कुठे गेली ते मला माहीत नाही आणि सामान इथे कुणासाठी ठेवणार ? “ पण तिच्या मैत्रिणीसाठी एक पाकीट ठेवून गेली आहे. त्यावर सौ . केशव असे नाव आहे. केशव खचून गेला . खोल श्वास घेत म्हणाला, “ते पाकीट मला दाखवता का ? मीच केशव आहे. माझी पत्नी काही हरकत घेणार नाही. “ घरमालकिणीने ते पाकीट त्याला दिले. पाकीट घेऊन केशव घाईत निघाला . त्यात काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो अधीर झाला . जवळच्याच बागेत जाऊन

दिव्याखाली बसून त्याने थरथरल्या हाताने व धडधडल्या हृदयाने पाकीट उघडले . पाकिटात एक पिवळ्या रंगाची साडी, एक कुंकवाचा करंडा , केशवचा एक फोटो व एक पत्र होते . केशवने पत्र उघडून वाचले. त्यात लिहिले होते , “ ताई ! मी जात आहे. हे माझ्या सौभाग्याचे शव आहे. ते थेम्स नदीत विसर्जित करायचे आहे. तुम्हा दोघांच्या हातून हा विधी झाल्यास फार चांगले. तुझी सुभद्रा. “ केशवच्या वर्मावर घाव नेमका बसला . दुःखावेगाने त्याने तिथेच गवतावर स्वत : ला झोकून दिले.

कॅप्टन साहेब

जगतसिंहासाठी शाळेत जाणे हे क्चिनाइनच्या कडू जहर गोळ्या खाणे किंवा माशाचे तेल पिणे यापेक्षा कमी अप्रिय नव्हते . तो एक स्वच्छंद व उनाड स्वभावाचा तरुण होता . कधी तो पेरुच्या बागेमध्ये जायचा व माळ्याच्या शिव्याशापांसोबत पेरुही आवडीने खायचा . कधी नावेत बसून नदीतून भटकंती करायचा तर कधी कोळ्यांच्या सोबतीने पैलतीरावरील खेड्यात फिरून यायचा. लोकांच्या शिव्या खाणे त्याला आवडत असावे; कारण तो तशी संधी जराही सोडायचा नाही. घोडेस्वारांच्या मागे जाऊन जोरात टाळी वाजवून त्यांना दचकावणे, चालत्या टांग्याला मागून ओढून धरणे, म्हाताऱ्या लोकांच्या चालण्याची नक्कल करणे या त्याच्या आवडीच्या गोष्टी होत्या . आळशी माणूस काम तर काही करत नाही, शिवाय व्यसनांचा गुलाम बनतो. व्यसने पूर्ण करायला पैसे तर लागतातच. संधी साधून जगतसिंह घरातून पैसे चोरायचा. पैसे मिळाले नाहीत तर भांडी आणि कपडे उचलण्यातही त्याला संकोच वाटत नसे. घरातल्या बाटल्यादेखील एक एक करून त्याने चोरबाजारात पोहोचवल्या होत्या . जुन्या काळातील अनेक वस्तू त्याच्या घरात होत्या . त्यापैकी एकही त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. या चौर्यकलेत तो सर्वांना आश्चर्य वाटण्याइतका निपुण होता . एकदा तो खांबावरुन आपल्या दोन मजली घराच्या छतावर चढून आत उतरला व पितळेची मोठी परात घेऊन त्याच मार्गाने परतला. घरातल्या कुणाला त्याची थोडीदेखील चाहूल लागली नाही . त्याचे वडील भक्तसिंह ठाकूर हे पोस्टमास्तर होते . खूप प्रयत्न करुन त्यांनी शहरातली ही जागा मिळवली होती . खेड्यापेक्षा शहरात राहणे त्यांना नुकसानकारक ठरत होते . तिकडे फुकटात मिळणारा भाजीपाला, सरपण इत्यादी शहरात मिळणे बंद झाले होते. पोस्टातले सर्व कर्मचारी अनेक वर्षतेथेच असल्यामुळे ते त्यांच्यावर दबाव टाकू शकत नव्हते किंवा त्रासही देऊ शकत नव्हते. अशा

त्रासदायक परिस्थितीमुळे ते आधीच गांजले होते . त्यात जगतसिंहाचे वागणे त्यांच्या मनस्तापात अतिशय भर घालणारे होते. अनेकदा त्यांनी त्याला चोप दिला होता . तो शरीराने चांगला भरदार होता . वडिलांचा हात धरला तर ते जागचे हालूही शकले नसते; पण तो आज्ञाधारकपणे मार सहन करीत असे . वडिलांना विरोध करण्याचा उद्धटपणा त्याने कधी केला नाही ; पण त्या धाकदपटशाचा परिणामही स्वत : वर करून घेतला नाही . घरात पोळ घुसल्यावर व्हावी तशी तो घरात आल्याबरोबर आई व बहिणींची आरडाओरड सुरु होत असे. मग तो आल्या पावली परत बाहेर जाई. असे कधी कधी दोन दोन - तीन तीन दिवस तो घराबाहेरच काढी. अशावेळी त्याला बऱ्याचदा उपासमार सहन करावी लागे. घरचे लोक त्याचे तोंडही पाहू इच्छित नव्हते; पण त्यांच्या या तिरस्काराने तो अधिकच कोडगा झाला होता . कामकाज करण्याबद्दल तो अजिबात द्विधा व्हायचा नाही ; कारण त्याला ते करायचेच नसायचे… तो कुठेही राहायचा , झोपायचा, मिळेल ते खायचा . त्याच्या चौर्यकलेचा अंदाज घरातील लोकांना आल्यावर ते सावध राहू लागले व मग एखाद्या वस्तूवर हात मारणे त्याच्यासाठी कठीण होऊ लागले. एकदा तर पूर्ण महिनाभर हाती काहीच लागले नाही. गांजा - चरसवाल्यांची उधारी खूप थकली. ते तगादा लावू लागले. हलवाईदेखील मिठाईंच्या उधारीबाबत कडू बोलू लागला . बिचाऱ्या जगतला घराबाहेर पडण्याची सोय उरली नाही. शेवटी एक दिवसत्याचे भाग्य उजळले. भक्तसिंहांनी पोस्टातून दुपारी घरी येताना एक विमा रजिस्ट्रीचे पाकीट आणले. पोस्टात कुणाकडून ते गहाळ होऊ नये म्हणून त्यांनी ते स्वत: च्या कोटाच्या खिशात ठेवले होते . पैशांच्या लोभाने जगतसिंहाने त्या खिशात हात घातला तर नेमके ते पाकीट त्याच्या हाती लागले . ते पाकीट त्याने फोडून बघितले , आत बऱ्याच नोटा होत्या . तो काहीसा गांगरला . पोस्टाचे पाकीट फोडण्यात चूक झाली हे त्याला जाणवले; पण पाकीट फोडले गेले होते, ते तसेच्या तसे चिकटवणे अशक्य होते. पाखराच्या शिकारीला गेल्यावर चुकून माणूस मारला

गेल्यावर शिकाऱ्याची व्हावी तशी त्याची गत झाली. वडिलांना गोत्यात आणणारे कृत्य त्याच्याकडून घडले. त्याबाबत पश्चात्ताप, दुःख, लाज या सर्व भावना त्याच्या मनात दाटून आल्या ; पण चूक कबूल करून शिक्षा भोगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती . त्याने पैसे पाकिटात ठेवले व तो बाहेर निघून गेला. उन्हाळ्याची दुपार होती . सगळे निवांत झोपले होते; पण जगतच्या नशिबात झोप कुठली ? आज तर त्याची चांगलीच कणिक तिंबली जाणार होती . त्यामुळे घरी न थांबता चांगले पाच- दहा दिवस घराबाहेरच राहणे त्याला योग्य वाटत होते; पण बाहेर राहणेही सोपे नव्हते. कारण घेणेकरी बरेच होते . बाहेरगावी जाणेच अधिक चांगले होईल असा त्याने विचार केला. त्यासाठी पैसे लागणारच होते. त्याच पाकिटातले पैसे घ्यायला काय हरकत आहे ? नाहीतरी पैसे गेल्याचा आळ आपल्यावर येणारच होता , मग एखादी नोट घेतलीच तर काय बिघडले ? बाबाजवळ पैसे आहेतच ते भरपाई करतीलच; असा विचार ठरल्यानंतर तो परत घरी आला. त्या फोडलेल्या पाकिटातील दहा रुपयांची नोट त्याने काढली. त्याच क्षणी एक अफलातून कल्पना त्याला सुचली . हे सगळेच पैसे घेऊन दुसऱ्या गावी जाऊन एखादे दुकान टाकले तर ! मग तर फार मजा येईल. एवढ्या तेवढ्यासाठी त्याला चोरी करावी लागणार नाही. थोड्याच दिवसांत भरपूर कमाई करून तो घरी परतेल, मग सारेजण त्याला पाहून किती आनंदित होतील ! त्याने ते पाकीट पुन्हा काढले. त्यात एकूण दोनशे रुपये होते . एवढ्या रकमेत दुधाचे दुकान खूप चांगले चालू शकेल. मुरारीच्या दुकानात त्याने पाहिलेच होते. दोन- चार कढया, दोन- चार पितळी ताटे आणि दूध एवढेच तर लागते. मुरारी या धंद्यात किती थाटात जगतो . शिवाय जुगार , चरस यांचाही नाद करतो . मुरारीप्रमाणे धंदा करायचा या कल्पनेचा पगडा त्याच्या मनावर पक्का बसला. स्वत: वर ताबा राहिला नाही . भावनेच्या प्रवाहात वाहून गेला. त्याने ते सगळे पैसे घेतले व घराबाहेर पडला. त्याच दिवशी संध्याकाळी तो मुंबईला निघून गेला. दुसऱ्याच दिवशी भक्तसिंहांवर अफरातफरीचा गुन्हा दाखल झाला . मुंबईत मैदानावर बँड वाजत होता . राजपूत रेजिमेंटचे जवान कवायत करीत होते . कॅप्टनच्या

आदेशानुसार विविध प्रकारच्या कवायती त्यांनी केल्या. जेव्हा कवायत संपली तेव्हा कॅप्टन समोर एक तरुण उभा राहिला. त्याने फौजी सलाम ठोकला.कॅप्टनने विचारले, “ नाव काय आहे ? “ “ जगतसिंह. “ “ काय काम आहे ? “ मला फौजेत यायचे आहे. भरती करन घ्या . “ “बिलकूल नाही. “ “ मी राजपूत आहे. “ “ खूप मेहनत करावी लागेल. “ “ मेहनतीला मी घाबरत नाही . “ “ परदेशी एडनला बहुतेक जावे लागेल. “ “ मी आनंदाने जाईल . “ कॅप्टनच्या लक्षात आले की , हा तरुण स्वतंत्र वृत्तीचा, हजरजबाबी व हिंमतवाला आहे. त्याला लगेच फौजेत भरती करून घेण्यात आले. तिसऱ्या दिवशी त्याची रेजिमेंट एडनला रवाना झाली. जसजसे जहाज किनान्यापासून दूर जाऊ लागले, तसतसे त्याचे मन व्याकूळ होऊ लागले . असोशीने तो किनाऱ्याच्या दिशेने बराच वेळ पाहत होता . त्याला रडू कोसळले. प्रथमच आपल्या माणसांची आठवण आली. त्याचे घर ,त्याचे गाव,त्याचे गांजाचे दुकान, ते मित्र , ते भटकणे. त्याने दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले. इतका बेचैन झाला की , समुद्रात उडी मारावी असे वाटले . एडनमध्ये येऊन जगतला तीन महिने झाले. परदेशी नावीन्याचे आकर्षण अनेक दिवस त्याच्या मनात होते . हळूहळू जुन्या आठवणी जागृत होऊ लागल्या . आईचा प्रेमळपणा, वडिलांचा राग, बहिणींचा तिरस्कार , नातलगांचा धिक्कार सगळेच आठवू लागले . आई त्याला सगळ्यांपासून सांभाळून घेत

होती हे त्याला प्रकर्षाने जाणवू लागले. आईच्या आठवणींनी तो अस्वस्थ होऊ लागला. स्वतः आजारी असताना त्याच्या आजारपणात तिने घेतलेली काळजी, रात्रंदिवस त्याच्याजवळ बसून राहणे , त्याची सतत काळजी करणे. आता आईची भेट कधी होईल ? होईल की नाही ? दु: खावेग व नैराश्याच्या भरात तो तासन्तास समुद्रकिनाऱ्यावर बसून राही. स्वत : च्या दुष्कृत्यांची लाज व पश्चात्तापामुळे घरी परत जाण्याची इच्छा तो मारून टाकत असे. तरी एकदा अजिबात न राहवून त्याने आईला पत्र लिहिले . पत्रात त्याने त्याच्या चुकांची क्षमा मागितली. त्याने अत्यंत भक्तिरसपूर्ण पत्र लिहिले. शेवटी आश्वासन दिले की , “ आई मी फार मोठ्या चुका केल्या आहेत , त्याबद्दल मला खरेच पश्चात्ताप होतो आहे. मी जर जगलो, वाचलो तर नक्कीच चांगले काहीतरी करून दाखवेन , तेव्हा तुला तुझ्या मुलाची लाज वाटणार नाही. “ पत्र पोस्टात टाकल्या क्षणापासून तो उत्तराची वाट पाहू लागला. एक महिना झाला तरी उत्तर आले नाही. त्याला काळजीने घेरले. आई आजारी असेल का ? बाबा रागवले असतील का ? काही संकट तर त्यांच्यावर आले नसेल? तो अतिशय घाबरला . त्याच्या कॅम्पच्या आवारात एका झाडाखाली जवानांनी शाळीग्रामची स्थापना केली होती . नेहमी त्याची चेष्टा करणारा जगत , आता तेथे जाऊन बसत होता . एकदा तेथेच बसला असताना एकजण त्याचेपत्र घेऊन आला. देवाचे आभार मानून त्याला हात जोडत त्याने पत्र उघडले. त्यात लिहिले होते , “ अफरातफरीच्या गुन्ह्यात तुझे वडील सध्या तुरुंगवास भोगत आहेत . आई अतिशय दुःखात असून खूप आजारी आहे. हा तिचा शेवटचाच आजार आहे. सुटी घेऊन तू ताबडतोब घरी निघून ये. “ चिठ्ठी वाचून जगतचे अवसान गळाले. कॅप्टनकडे जाऊन त्याने सुटीची मागणी केली; पण कॅप्टनला शिस्त पाळणे भाग होते . तो म्हणाला , आत्ता मी तुला लगेच रजा देऊ शकत नाही. “

“ मग, मी राजीनामा देतो , तो घ्या ; पण मला घरी आईसाठी जाणे भाग आहे. “ “ आत्ता मी तुझा राजीनामाही घेऊ शकत नाही. “ “ तुला थांबावेच लागेल. लढाईला तोंड फुटले आहे, तुला लवकरच मोहिमेवर जावे लागेल. “ “ काय ? लढाई सुरू झाली ? अरे देवा ! म्हणजे आता मला घरी जाता येणार नाही. “ सव्वाचार वर्ष सरली. संध्याकाळ झाली आहे. नैनी जेलच्या दारापाशी खूप गर्दी झाली आहे . कितीतरी कैदी आज सुटका झाल्याच्या आनंदात आहेत . त्यांना घेण्यासाठी घरचे लोक आले आहेत . भक्तिसिंह मात्र अजूनही त्याच्या अंधार कोठडीत मान खाली घालून निश्चल बसले आहेत . देह अस्थिपंजर व कंबर वाकून कमान झाली आहे. त्यांचीपण शिक्षा संपली आहे; पण त्यांच्या घरुन कुणी त्यांना घ्यायला आलेले नाही. येणार तरी कोण? दुसऱ्या कैद्याने त्यांचा खांदा हलवत भानावर आणले व विचारले , “कुणी आले आहे का तुला घ्यायला ? “ “ माझ्या घरी कुणी नाही, मला घ्यायला येण्यासारखेही कुणी नाही . या लोकांनी राहू दिले तर इथेच राहीन म्हणतो. “ आज चार वर्ष संपल्यावर भक्तसिंहांना आपल्या परागंदा मुलाची आठवण झाली . ज्या मुलामुळे त्यांचा सर्वनाश झाला, अब्रू धुळीस मिळाली, त्याची आठवण ही इतके दिवस असह्य होती ; पण आज निराशा व दुःखाच्या अथांग सागरात बुडताना त्याचीच आठवण त्यांना काडीचा आधार देऊ लागली. तो बिचारा कोणत्या परिस्थितीत आहे कोण जाणे ! लाख दुर्गुणी असेल; पण पोटचा पोर आहे. वंशाचा दिवा आहे. मी मेलो तर रडणारा तोच आहे आणि घोटभर पाणी पाजणाराही तोच आहे. मी मात्र कधीच त्याला प्रेमाने वागवले नाही . एवढ्या तेवढ्यावरून मी त्याच्याशी फार दुष्टपणे वागलो . एकदा पाय न धुता स्वयंपाकघरात गेल्यामुळे मी त्याला उलटे टांगून शिक्षा दिली होती . बोलताना आवाज थोडा मोठा झाला तर कितीदा त्याला खूप मार दिला . मी कधीच त्याचा आदर

केला नाही. त्याचीशिक्षा मी आता उतारवयात भोगत आहे. जिथे प्रेम नाही तेथे परिवार तरी कसा टिकणार ? सकाळ झाली. आशेचा सूर्योदय झाला. आज त्याची किरणे फार कोवळी व मधुर होती . हवा सुखद , आकाश मनोहर , वृक्षराजी हिरवीगार व पक्ष्यांचा कलरव अतिशय गोड होता . इतक्या रम्य व उजळ सकाळी भक्तसिंहांच्या सभोवती घोर अंधार होता . जेलर साहेब आले. सर्व कैद्यांना एका रांगेत उभे केले गेले. एकेकाचेनाव घेऊन ते सुटकेचे पत्र देऊ लागले. सर्व कैद्यांच्या चेहऱ्यावर आशा झळकत होती . ज्याचे नाव येई तो आनंदाने पुढे जाऊन पत्र घेताना वाकून नमस्कार करी . त्या कठीण काळात सोबत करणाऱ्या कैदी मित्रांना मिठी मारून निरोप घेत बाहेर निघून जाई . त्याच्या घरचे धावत जवळ येऊन त्याला मिठीत घेत . कुणी पैसे वाटे, तर कुणी मिठाई. कुणी जेलच्या कर्मचाऱ्यांना इनाम देत होते , जणू ते त्या नरकातले देव होते . शेवटी भक्तसिंहांचे नाव आले. ते उदासपणे जेलरच्या हातून पत्र घेऊन बाहेर येऊन बसून राहिले . कुठे जावे हा प्रश्न त्यांना पडला होता .

अचानक घोड्याच्या टापांचा आवाज त्यांना ऐकू आला. त्या दिशेने त्यांनी पाहिले . एक लष्करी अधिकारी घोड्यावरून त्यांच्या दिशेने येत होता. लष्करी गणवेषात तो अतिशय रुबाबदार दिसत होता. त्याच्यामागे एक घोडागाडी येत होती. त्याला पाहताच जेलच्या शिपायांनी बंदुका खांद्यावर सरळ घेत ओळीत उभे राहून त्याला लष्करी सॅल्यूट केला . भक्तसिंह विचार करू लागले, ज्याला नेण्यासाठी ही घोडागाडी येत आहे तो किती नशीबवान आहे . एक मी असा कमनशिबी आहे की , ज्याला कुणाचाच आसरा नाही. तो लष्करी अधिकारी इकडे तिकडे शोधक नजरेने पाहत घोड्यावरून उतरला व सरळ भक्तसिंहांच्या समोर येऊन थांबला . भक्तसिंहांनी त्याला निरखून पाहिले . क्षणात ओळख पटली व आश्चर्यचकित होऊन उठत ते उद्गारले , “ अरे , बेटा जगतसिंह ! “ जगतसिंह डोळे पुसत त्यांच्या पायाशी वाकला.

स्वत्व रक्षण

मीर दिलावर अलीकडे एक चांगल्या कुळातला घोडा होता . त्याचा रंग गडद तपकिरी होता. आयुष्यातली अर्धी कमाई हा घोडा घेण्यासाठी खर्चावी लागली असे ते म्हणत; परंतु हा घोडा त्यांना पलटणीतून फार स्वस्तात मिळाला होता, ही गोष्ट खरी होती . पलटणीत तो बेकार ठरल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याचा लिलाव केला होता . मीर दिलावर कोर्टात लेखनिक होते. त्यांचे घर शहराबाहेर होते . घरापासून कोर्ट तीन मैलांवर होते . म्हणून त्यांना येणे-जाणे करण्यासाठी घोड़ा आवश्यक होता , हा घोडा त्यांना सहज मिळाला. गेल्या तीन वर्षांपासून तो मीर साहेबांकडे होता . तसा तो अगदी नियंग होता; पण स्वाभिमानाची मात्रा जरा अधिक प्रमाणात होती . त्याच्या मनाविरुद्ध त्याच्याकडून काम करून घेणे अवघड होते . मनाविरुद्ध कामाला जुंपल्यास तो स्वत : चा अपमान समजत असे . तरी मीर साहेबांना तो स्वस्तात मिळाल्यामुळे ते फार आनंदात होते . घोड्यासाठी मोतद्दार ठेवणे त्यांना झेपण्यासारखे नव्हते . म्हणून ते स्वत : च घोड्याची सर्व कामे करत . सकाळ - संध्याकाळचा खरारा ते मनापासून करायचे. त्यामुळे घोडा पण त्यांच्यावर प्रसन्न होता. खुराकाचे प्रमाण जर कधी थोडेफार कमी झाले तरी तो राग मानायचा नाही . मालकाबद्दल त्याला सहानुभूती व आत्मीयता वाटायची. स्वामिभक्तीमुळे तो काहीसा अशक्त झाला होता . तरीपण साहेबांना वेळेवर कोर्टात नेऊन सोडत असे. त्याची संथ चाल त्याच्या आत्मिक संतोषाची द्योतक होती. धावणे हे त्याच्या गंभीर स्वभावाच्या विरुद्ध होते . रविवारची विश्रांती हे तत्त्व मात्र त्याने जिवापाड जपले होते . मीर साहेब रविवारच्या सुटीच्या दिवशी त्याला विशेष खरारा करीत, स्वच्छ आंघोळ घालीत, पोहायला नेत. या सुटीच्या दिवशी घोड्याला मनस्वी आनंद होत असे. एरवी दिवसभर कोर्टाच्या

आवारात झाडाला बांधून घ्यावे लागे व वाळके गवत खावे लागे . उन्हात सगळे शरीर भाजून निघे. रविवारी मात्र त्याची मज्जा असायची. गर्द सावली, हिरवेगार गवत असायचे, त्यामुळे रविवारची विश्रांती तो त्याची हक्काची मानू लागला होता व कुणीही त्याचा हक्क हिरावून घेऊ शकत नसे. खुद्द मीरसाहेबांनीही त्याला सुटीच्या दिवशी बाजारात नेण्याचे प्रयत्न केले होते; पण त्याने त्या बाबतीत मालकालाही जुमानले नव्हते . मीरसाहेबांना लगाम जवळदेखील आणू दिला नाही. शेवटी त्यांनी हार पत्करली. घोड्याच्या स्वाभिमानाला धक्का देऊन स्वत: च्या अवयवांची परीक्षा घेणे त्यांना मान्य नव्हते . मुंशी सौदागरलाल हे मीरसाहेबांचे शेजारी होते. त्यांचा कोर्सशी काही संबंध नव्हता . ते लेखनिक नव्हते किंवा कर्मचारीही नव्हते . त्यांना कधी कुणी काम करताना पाहिले नव्हते ; पण वकील आणि अधिकारीवर्गात त्यांना मोठा मान होता. मीरसाहेबांचे ते बालमित्र होते . ज्येष्ठाचा महिना होता . लग्नसराईची धामधूम होती . बँडवाले, रोषणाईवाले, पालखीचे भोई , विनोदी कलाकार , प्रवचनकार , भटजी यांचा भाव भलताच चढला होता . त्यामुळे ते लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लावत होते. याच धामधुमीत सौदागरलालच्या मुलाचेही लग्न ठरले होते. लग्न , वरात या सर्वांची व्यवस्था त्यांनी जवळजवळ पूर्ण केली होती ; पण नवऱ्या मुलासाठी त्यांना पालखी हवी होती , त्या बाबतीत मात्र नेमकी अडचण आली. ऐनवेळी भोईनी धोका दिला. घेतलेला इसारही परत दिला. सौदागरलाल त्यांच्यावर अतिशय संतप्त झाले. नुकसानभरपाईच्या दाव्याची धमकी देऊन पाहिली ; पण उपयोग झाला नाही. दुसरा पर्याय घोड्याचा होता. घोड्यावरून त्याची वरात काढावी असे त्यांनी ठरवले. वरात निघण्याचा मुहूर्त संध्याकाळी सहाचा होता . चार वाजता ते मीरसाहेबांकडे गेले व म्हणाले, “ तुझा घोडा मला देतोस का ? नवया मुलाला स्टेशनपर्यंत न्यायचं आहे. पालखी मिळाली नाही . घेऊन जाऊ का त्याला? “

” आज रविवार आहे माहीत आहे ना ? त्याचा आज सुटीचा दिवस. “ “माहीत आहे रे; पण घोडाच ना तो ! त्याला कसली आलीय सुटी ? स्टेशनपर्यंतच तर जायचे आहे. असे किती लांब आहे ते! “ “ घोडा तुझाच आहे. विचारतोस कशासाठी ? पण तो अंगाला हात लावून घेणार नाही आज, असे मला वाटते . “ “ अरे , ठोक दिला तर भूतसुद्धा नाचते. तुम्ही याला जरा जास्तच लाडावून ठेवलंय म्हणून तो ही लबाडी करतो . एकदा त्याच्या पाठीवर बसले तर तो काय उतरवणार आहे का ? “ ठीक आहे, घेऊन जा . तुमच्या निमित्ताने त्याचा हट्टी स्वभाव बदलला तर माझ्यासाठी ते फायदेशीरच होईल . “ मुंशींनी तबेल्यात पाय ठेवताच घोडा साशंक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला. त्याच्या आरामात व्यत्यय आणल्याचा निषेध फुरफुर आवाज करून त्याने व्यक्त केला. बँडबाजाच्या ढम्म , पों पों ने तो अधिकच त्रासला होता. मुंशी त्याचा कासरा सोडू लागले. तेव्हा तो कान ताठ करत सावध झाला व अभिमान सूचक भाव दाखवत हिरवे गवत खाऊ लागला . परंतु मुंशीही कसलेले खेळाडू होते. त्यांनी घरून थोडे चणे मागवले व घोड्यासमोर ठेवले. बऱ्याच । दिवसांनी आवडीचे खाद्य दिसताच त्याने त्याचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली व मुंशीजीकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकला. जणूत्याला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली. मुंशींच्या दारात वाजंत्री वाजत होती . लग्नासाठी नटूनथटून नवरा मुलगा घोड्यासाठी तिष्ठत होता. शेजारपाजारच्या बायका त्याला निरोप देण्यासाठी आरती घेऊन उभ्या होत्या . पाच वाजले होते . तेवढ्यात मुंशी व घोडा दोघे तेथे पोहोचले. वाजंत्रीवाले पुढे सरकले. एकाने धावत जाऊन घोड्यासाठी साज आणला . घोड्याला तयार करण्याचे ठरले. पण लगाम पाहताच तो तोंड फिरवू लागला. मुशीजींनी त्याला

थोपटले , चुचकारले, चणे देऊ केले. तरी घोडा तोंड उघडेना . मग त्यांचा तोल सुटला , चाबकाचे सप सप सपकारे ते त्याच्या तोंडावर , नाकावर मारू लागले. नाकातून रक्त आले. बिचारा घोडा विवश झाला. इतका मार त्याने कधीच खाल्ला नव्हता . मीरसाहेब तर त्याच्याशी फार प्रेमळपणे वागत . पुन्हा मार मिळण्याच्या भीतीने त्याने तोंड उघडले व लगाम घालून घेतला. मुंशीजींचा विजय झाला . त्यांनी लगेच जीन चढवली. नवरा मुलगा उडी मारून त्याच्यावर स्वार झाला . नवरा मुलगा घोड्यावर बसताच घोडा भानावर आला. तो विचार करू लागला की , थोड्याशा चण्यांच्या बदल्यात मी माझ्या तत्त्वाचा त्याग कसा काय केला? मला काही स्वातंत्र्य, अभिमान आहे की नाही ? दर रविवारी आराम करण्याचा माझा अधिकार सोडून आज मी ही हमाली का करु ? हे लोक मला कुठे नेणार आहेत ? हा मुलगा तर चांगली मांड घेऊन बसला आहे. त्यावरून मला चांगलेच पळवणार दिसतोय . आधीच मला खूप मारले आहे. शिवाय आता हा अजून पळवणार , चाबूक मारणार . पुन्हा खायला तरी देतील की नाही कोण जाणे . असे स्वाभिमानी विचार करून एकही पाऊल पुढे टाकायचे नाही असानिर्धार त्याने केला . पुन्हा त्रास देऊ लागले तर या स्वाराला घेऊन खाली लोळन घेईन . मग काय करतील ? देतील सोडून आपणहून . मला असे वागवलेले मीरसाहेबांनाही अजिबात आवडणार नाही. उद्या त्यांना कचेरीत मलाच न्यावे लागणार आहे . घोड्यावर बसलेल्या नवऱ्या मुलावर स्त्रियांनी फुले उधळली, त्या मंगलगाणी गाऊ लागल्या . काही लोक वराती पुढे चालू लागले; पण नेमका घोडा त्या क्षणी अडूनच बसला. एकही पाऊल पुढे टाकेना . नवरा मुलगा त्याचा लगाम खेचू लागला, काठीने टोचू लागला; पण घोड्याने आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून घेतले. मुंशी फारच संतापले. त्यांचा स्वत : चा घोडा असता तर त्यांनी गोळीच घातली असती. घोड्याचा अडेलतट्टपणा पाहून एका मित्राने सुचवले की , पाठीमागून काठी मारली तर तो आपोआप धावायला

लागेल. मुंशीजींनी हा प्रस्ताव मान्य केला व घोड्याच्या मागे जाऊन काठीने अनेकदा वार केले; पण घोड्याने पाऊल उचलले नाही . एकदा उचलले ते पुढचे दोन्ही पाय एकदम आकाशाच्या दिशेने . नवरा मुलगा पडता पड़ता थोडक्यात वाचला. पुन्हा उचलले ते मागचे दोन्ही पाय हवेत झटकले, मुंशीजी थोडक्यात वाचले . दुसऱ्या मित्राने सुचवले की , जळते लाकूड शेपटीजवळ धरले तर आगीच्या भीतीने घोडा धावायला लागेल. हा प्रस्तावही स्वीकारला गेला. त्याचा परिणाम असा झाला की घोड्याची शेपटी थोडीशी जळाली. त्यामुळे त्याने दोन -तीन उड्या जागच्याजागी मारल्या ; पण पुढे अजिबात सरकला नाही. पक्का सत्याग्रही होता . असल्या प्रयत्नांनी त्याचा संकल्प अधिकच दृढ झाला होता . सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. पंडितजी घाई करू लागले, “ चला, लवकर काय ते करा . वरात निघण्याचा मुहूर्त टळून जाईल. “ पण गोष्ट आपल्या हातातली नव्हती . घाई करणार तरी कशी ? घोडा का अडला असेल यावर वरतीमध्ये चर्चा होऊ लागली. ते सुचतील तसे उपाय सांगू लागले. एकजण म्हणाला, “ मारपीट करून काही होणार नाही. चण्यांचा तोबरा त्याच्यासमोर धरून चाला. खाण्यासाठी भरभर चालेल. “ हा प्रयत्नदेखील केला; पण साध्य काही झाले नाही . कोणत्याही किमतीत घोडा आपले तत्त्व सोडायला तयार नव्हता . दुसऱ्याने सुचवले , “याला थोडी दारू पाजा, नशा चढली की चौखूर उधळेल. “ मग दारुची बाटली आणली गेली . एका थाळीत दारु टाकून घोड्यासमोर ठेवली . घोड्याने तिचा वासही घेतला नाही. आता काय करावे ? दिवेलागण झाली. मुहूर्त टळला. अनेक त्रास सहन करूनही घोडा मनातून खूश होता. त्याच्या विश्रांतीत विघ्न आणणाऱ्या लोकांची फजिती पाहून त्याला फार आनंद होत होता . ते आता मारणार नाहीत याची त्याला खात्री पटली. पुढची खेळी ते काय करतात

याची तो वाट पाहू लागला . तेवढ्यात अजून एकाने सुचवले की , “ आता शेवटचा एक उपाय करून बघू. शेतात खत घालण्याची दोन चाकी गाडी मागवा. तिच्यावर या घोड्याचे पुढचे दोन पाय ठेवू. गाडी आपण ओढून नेऊ . मग तर याचे मागचे पाय उचलत याला चालावेच लागेल. “ बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे मुंशीजींना हा उपाय वाटला. त्यांनी ती दुचाकी गाडी मागवली. चार - पाच जण काठ्या घेऊन घोड्याला घेरून उभे राहिले . नवऱ्या मुलाने लागाम खेचून धरला. दोघांनी त्याचे पुढचे पाय जबरदस्तीनं उचलून गाडीवर ठेवले. हा उपाय हाणून पाडण्याचे घोड्याने ठरवले होते; पण जेव्हा गाडी चालू लागली तेव्हा त्याचे मागचे पाय आपसूकच उचलले गेले . त्याने न चालण्याचा खूप प्रयत्न केला; पण असफल झाला. सगळ्यांना हर्षवायू झाला . एकच गलका झाला . चालला, चालला . लोक जोरजोरात टाळ्या वाजवून हसू लागले. हा घोर अपमान घोड्याला असह्य झाला; पण त्याचा नाइलाज झाला होता , तरी त्याने धीर सोडला नाही. मनात विचार केला की , अशी गाडी ओढत किती दूरपर्यंत जाऊ शकतील हे लोक ? गाडी थांबली की , मी पण थांबेन , पाय गाडीत ठेवायलाच नको होते . तीच माझी मोठी चूक झाली. थोड्यात वेळात त्याचा अंदाज खरा ठरला . शंभर एक पावले गाडी ओढल्यावर लोक थकले. स्टेशन तर तीन मैल लांब होते. इतक्या दूरवर घोड्यासह गाडी खेचून नेणे शक्य नसल्याची खात्री त्यांना पटली. गाडी थांबताक्षणीच घोड्याने पाय खाली घेतले. नवरा मुलगा लगाम खेचून पुन्हा फटक्यांची वर्षा करू लागला. मान, पाय , डोके , तोंड सगळीकडे मार बसू लागला. घोड्याच्या नाकातून परत रक्त येऊ लागले. पायावर जखमा झाल्या तरी तो दृढनिश्चयी घोडा आपल्या प्रतिज्ञेवर ठाम उभा राहिला. भटजी म्हणाले, “ आता मुहूर्त तर टळलाच आहे. “ अतिक्रोधाने मुंशीजींना रडू कोसळले. लग्नाला जाताना नवऱ्या मुलाने जमिनीवर पाय ठेवायचा नसतो असा रिवाज होता . तो न पाळणे म्हणजे

प्रतिष्ठेला धक्का व कुळाला कलंक लागण्यासारखेच होते; पण या घोड्यापुढे काही इलाज चालेना , आता पायी चालण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते . तो दीनदुबळा घोडा त्या सर्व लोकांवर मात करीत विजयी ठरला होता. मुंशीजी त्याच्यासमोर आले व रुद्ध स्वरात त्याला म्हणू लागले, “ बाबा रे, मीरसाहेबांकडे तू आहेस हे तुझे भाग्य समज. मी जर तुझा मालक असतो तर आज तुझे एकही हाड शिल्लक राहिले नसते . तुझ्यामुळे मला आज हेही कळाले की , प्राण्यांनादेखील स्वत्व असतं आणि ते प्राणपणाने त्याचे रक्षण करु शकतात. तू इतका कट्टर तत्त्वनिष्ठ असशील असे मला वाटले नव्हते . “

नवया मुलाला ते म्हणाले, “खाली उतर बेटा , आता वरातीबरोबरचे लोक स्टेशनवर पोहोचलेही असतील. आपणही आता पायीच जाऊ . इथे असलेले लोक आपल्या जवळचेच नातलग आहेत . यातले कुणी आपल्याला हसणार नाही; पण हा लग्नाचा कोट मात्र काढून टाक . नाहीतर रस्त्यातले इतर लोक लग्नाला पायी चालल्याचे पाहून हसतील. “ घोड्याकडे वळून ते म्हणाले, “ चल रे घोड्या! तुला मीरसाहेबांच्या हवाली करतो. “

विकतचे दुखणे

त्या दिवसात चांगले दूध मिळण्याची फारच मारामार होती . कितीतरी डेअरी आणि गवळी तपासले ; पण काही फायदा झाला नाही. त्यांच्याकडून सुरुवातीचे काही दिवस दूध चांगले मिळायचे, नंतर ते पाणीदार होत जायचे. खूप विचारांती एक गाय पाळावी असे ठरवले. चढ्ढा या माझ्या मित्रासोबत । भागीदारी करून एक गाय घेतली . भांडवल, खर्च, दूध या सर्वांत दोघांचा समसमान हिस्सा ठेवण्याचा करार केला. माझे घर लहान होते आणि शेणाची मला किळस वाटायची. मित्राचे घर मोठे होते , त्यामुळे गाय त्याच्याकडे राहील व म्हणून तिच्या शेणावर त्याचा पूर्ण अधिकार राहील असे ठरले . सारवण, गोवऱ्या किंवा आयुर्वेदिक औषध यासाठी शेणाचा वापर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला करारानुसार दिले होते . गाय घेतल्यानंतर रोज ताजे व निर्भेळ दूध घरी येऊ लागले. रोजच्या एका त्रासातून सुटका झाली. मी गरम गरम दूध पीत होतो आणि आनंदगाणी गात होतो. पहिला आठवडा असाच आनंदात गेला; पण हळूहळू पुन्हा पहिले पाढे पंचावन्न . परत जुन्या तक्रारी सुरु झाल्या . दूध केवळ नावाला उरले. त्यात साय किंवा गोडीचा पत्ताच उरला नाही. पूर्वी मी तक्रारी करून मन मोकळे करायचोकिंवा दूधवाला बदलायचो. आता तसे करण्याचा प्रश्नच उरला नव्हता . आपलेच दात अन् आपलेच ओठ. भीक मिळाली नाही तर भिकाऱ्याने राग तरी कुणावर काढावा ? माझा मुलगा त्या पाणचट दुधाला तोंड लावेनासा झाला. घरात रोज कटकट सुरू झाली. माझ्या बायकोला माझ्या मित्राचा संशय होता. एकीकडून ती नोकराला आदेश द्यायची, घेऊन जा हे दूध अन् फेक त्यांच्या तोंडावर. दुसरीकडून मी त्याला अडवायचो. बायको उपहासाने म्हणायची, “ वा ! लाखात एक असा आहे तुमचा मित्र . एवढीही लाज नाही वाटत त्याला? असले पातळ दूध पाहून आपल्याला काय वाटत असेल हे न समजण्या इतका बावळट आहे का तो ? ते काही नाही . आता

गायीला आपल्या घरी आणा. घाण वास येईल, डास होतील; पण निदान दूध तरी चांगले मिळेल. पैसे खर्च केल्याचा आनंद तरी मिळू द्या . चड्ढा माझा जुना व जवळचा मित्र होता . तो हा गैरप्रकार करणे शक्य नव्हते . त्याची बायको किंवा नोकर यांची ही लबाडी असू शकते; पण त्याबद्दल तरी मी मित्राजवळ कसे बोलणार ? सुदैवाने तीन महिन्यांनी त्याची बदली झाली. मी एकटा गायीला पाळू शकत नव्हतो . भागीदारी संपली आणि अर्ध्याकिमतीत गाय विकून टाकली. त्यादिवशी मी सुटकेचा नि :श्वास सोडला . पुन्हा विचार करून मी एक बकरी पाळायची ठरवले. अंगणाच्या एका कोपऱ्यात ती राहिली असती. तिचे दूध माझा नोकरही काढू शकत होता . थोडासा चारा भुसा टाकला की झाले. कामच ते किती ! शिवाय बकरीचे दूध तर जास्तच चांगले, पाचक आणि आरोग्यवर्धक . प्रकृतीला ना उष्ण , ना थंड. योगायोगाने माझ्या मसुद्यांची नक्कल उतरवणारे पंडितजी या बाबतीत जाणकार निघाले. त्यांच्याजवळ सहज एकदा बकरीचा विषय काढला. त्यांनी एका बकरीचे इतके गुणगान केले की , तिला न पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो. चांगल्या वाणाची, उंचीपुरी, मोठ्या कासेची ती बकरी नुकतीच व्याली होती व तिची किंमत पंचवीस रुपये होती. एका वेळी ती दोन अडीच शेर दूध देणारी होती . म्हणून किंमत जरा जास्त वाटली तरी पंडितजींच्या विश्वासावर मी ती विकत घेतली. जेव्हा ती माझ्या घरी आली, तिला पाहून मी चकित झालो. ऐकल्यापेक्षा ती अधिक गुणसंपन्न दिसली . मी तिच्यासाठी पाण्याचेमातीचे भांडे, चारा, भुसा यांची सोय केली. संध्याकाळी नोकराने दूध काढले . ते खरेच अडीच शेर निघाले. मग तर माझ्या मनात आनंदाचे उधाण आले. दुधाचा प्रश्न इतक्या दिवसांनी सुटला. हे आधीच सुचले असते तर किती बरे झाले असते . भल्या पहाटे व संध्याकाळी मी तिची शिंगे धरून ठेवायचो तेव्हा नोकर दूध काढायचा. चांगल्या दुधासाठी एवढा त्रास काही विशेष नव्हता . बकरी कसली, ती कामधेनूच होती . तिला दृष्ट लागू नये म्हणून बायकोने तिच्या कासेसाठी खोळ शिवली आणि गळ्यात निळ्या मण्याची माळ घातली.

घरातले उरले सुरले आता देवीजी तिला प्रेमाने भरवू लागल्या . पण… एका आठवड्यात दुधाचे प्रमाण कमी झाले. नक्कीच तिला दृष्ट लागली असणार . पंडितजींना विचारले तेव्हा ते म्हणाले, “ साहेब, ही खेड्यात जमीनदाराकडे वाढली आहे. तेथे ती दिवसभर मोकळेपणाने मळ्यात चरत होती. इथे तुम्ही तिला सारखे बांधून ठेवता. त्यामुळे दूध कमी झाले असेल. तिला तरा मोकळ्या जागी फिरायला नेत जा . “ आता आली का पंचाईत ? बकरीला शहरात कुठे फिरवणार आणि कोण ? तिच्यासाठी मला आता घर बदलणे भाग होते. मी शहरापासून लांब अशा ठिकाणी एक घर घेतले. तिथून माझे ऑफिस तीन मैल लांब होते; पण चांगल्या दुधासाठी मी त्याच्या दुप्पट अंतर चालण्यास तयार होतो . नवे घर मोकळे व प्रशस्त होते. घरासमोर मोठे अंगण होते. थोड्या अंतरावर आमराई होती . तिच्यापुढे भाजीमळे होते. बकरीसाठी रोज थोडा हिरवा पाला देण्याविषयी एका माळ्याशी बोलणी केली. इतके सारे प्रयत्न केल्यावर शेरभर दूध निघू लागले; पण शुद्ध दुधाचे समाधान काही थोडथोडके नव्हते. नोकरीचाकरी करण्याच्या तुलनेत बकरी चारणे, हे कमी दर्जाचे काम आहे असे मी अजिबात मानत नाही. अनेक देवादिकांनीही पशुपालन केले आहे. भगवान श्रीकृष्ण गायी राखायचे. कशावरून त्यांच्या कळपात बकन्या नव्हत्या ? प्रभू येशू व हजरत मोहम्मद यांनीही मेंढ्या राखल्या . सामान्य माणूस मात्र रुढींचा दास आहे. त्याच्या पूर्वजांनी जे केले नाही, ते तो कसा करेल ? नवीन मार्गावर चालण्याचा संकल्प सर्वांनाच करता येत नाही. तेवढे सामर्थ्यत्याच्यात नसते . चाकोरीबाह्य काम करणे त्याला कमीपणाचे वाटते . माझ्या नोकराचीही तीच गत होती . तो माझ्या ऑफिसमधला नोकर असल्याने बकरी चारायला नेणेत्याला कमीपणाचे वाटायचे. तिला चरायला मोकळे सोडून तो खुशाल झोपा काढायचा. माझी बकरी खरे तर फार सभ्य व सुसंस्कृत होती; परंतु दुसम्यांच्या शेतमळ्यात जाण्याचा अधिकार तिला नाही . हे ती समजू शकली नाही . त्यामुळे एक दिवस एका

मळ्यात ती घुसली. कोबीचे वाफे तिने उखडून टाकले. माळ्याने तिचे कान पकडून तिला माझ्यासमोर उभे केले व माझ्याशी रागारागाने भांडू लागला, “साहेब , तुमच्या बकरीने माझ्या मळ्याचा सत्यानाश केला आहे. तिला पाळण्याची एवढी हौस असेल तर घरात बांधून ठेवा . तुमच्याकडे पाहून आज मी गय करतो आहे. पुन्हा जर ती मळ्यात घुसली तर तिची तंगडी मोडेन किंवा कसायाकडे पाठवीन. “ तेवढ्यात त्याची बायकोही तेथे आली. तिनेदेखील त्याची री ओढत त्याच्या विचारांचे जोरदार समर्थन केलं . बापरे ! मी तर भीतीने अगदी थिजून गेलो. एवढी बोलणी मी आजवर कधीच ऐकून घेतली नव्हती. मी अवाक्षरही बोलू शकलो नाही . बकरीचा गळा घोटावा व नोकराला दीडशे हंटर मारावे असे मात्र वाटले. हा सगळा गोंधळ ऐकून माझी बायको बाहेर आली. परिस्थिती समजून घेत तिने मात्र वरचा स्वर लावला. ती माळ्याला म्हणाली, “ काय बडबड लावली आहे ? शेवटी मुके जनावर आहे ते. चुकून आली एकदा मळ्यात, तर काय जीव घेणार तिचा ? त्यापेक्षा स्वत : च्या मळ्याला कुंपण घाला. स्वत : ची चूक अन् आमच्यावर खापर ? चला, निघा इथून नाही तर आत्ता पोलिसांना बोलावून घेते . मग कळेल तुम्हाला इंगा. “ तिचे ओरडणे ऐकून त्या दोघांनी काढता पाय घेतला. मी बायकोला म्हणालो, “ आपल्यामुळे त्या गरिबांचे नुकसान झाले. वर तू त्यांनाच रागावलीस, हा काय न्याय झाला का ? “ बायकोने मोठ्या दिमाखात उत्तर दिले, “ अहो, त्यांना सहज पळवून लावले यासाठी माझे आभार माना. अशा अडाणी लोकांशी असेच कडकपणे वागायला हवे. दुसरा काही उपाय नाही. “ झाल्या प्रकाराचा खुलासा नोकराला मागितला, तर तो म्हणाला, “ साहेब ! बकरी चारणे माझे काम नाही तुम्ही दुसरा माणूस बघा. “ एवढ्याशा कामासाठी नवा माणूस मला परवडणार नसल्यामुळे मी स्वत: तिला संध्याकाळी मळ्यात चारायला नेण्याचा निर्णय घेतला . दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून जरा लवकर परतलो व बकरीला फिरायला घेऊन गेलो. थंडीचेदिवस

होते. ऑफिसमधून आल्यावर घरी आराम करण्याऐवजी बकरीच्या मागे पळण्याची कवायत मला करावी लागली होती; पण त्या दिवशी तिने जरा जास्त दूध देऊन माझ्या श्रमाचेसार्थक केले. झाडाखालच्या वाळक्या पानांऐवजी ताजी हिरवी पाने तिलादिली, तर अधिक चांगले होईल असे मला वाटले. माळ्याच्या परवानगीचा विचार नंतर करू असे ठरवून मी आकडा बांधलेला एक लांब बांबू आणला. बकरीसह मळ्यात गेल्यावर आकड्याने झाडावरची पाने तोडण्यास सुरुवात केली. ते करताना कुणी मला पाहत तर नाही ना , हे मी चोरदृष्टीने इकडेतिकडे बघत होतो. अचानक तोच माळी दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहिला. तो म्हणाला, “ काय हे साहेब ! हा बांबू तुमच्या हातात शोभत नाही . बकरी पाळणे हे आम्हा गरिबांचे काम. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचे नाही. “ मला काही बोलणे सुचले नाही . “ यात काय वाईट आहे ? आपली कामे आपण करावीत. त्यात कसली आलीय लाज ? “ अशी उत्तरे मला खोटी व अवास्तव वाटू लागली. पांढरपेशी आत्मप्रौढीच्या भावनेने माझे तोंड बंद केले. माळ्याने पुढे होऊन झाडाखाली पडलेला पाला गोळा केला व माझ्या घरी नेऊन टाकला. झाडाखाली उरलेला चौपट पाला गोळा करून त्याने त्याच्या घरी नेला . अडाणी असली तरी ही माणसे किती चलाख असतात . त्यांची कोणतीही गोष्ट स्वार्थाशिवाय नसते. दुसऱ्या दिवशी पुन्हा बकरीला त्याच मळ्यात नेण्यास मला लाज वाटू लागली. तो माळी मला बघून पुन्हा टोमणे मारील याचा माझ्या मनावर ताण आला. त्याच्या नजरेतून उतरणे मला फारच लाजिरवाणे वाटत होते. आमच्या सन्मान व प्रतिष्ठेचे जे दंडक समाजाने घालून दिले आहेत त्याचे पालन करायलाच हवे, नाहीतरी लोकात हसू होऊन अप्रतिष्ठा व्हायची. या विचारांनी मी घरीच बसून राहिलो; पण बकरीला फिरण्याची चटक लागली होती . ती तिच्या स्वातंत्र्यावर पाणी सोडण्यास अजिबात तयार नव्हती . कर्कश बें ! बें ! आवाजात निषेध व्यक्त करून ती माझ्या कानाचे पडदे फाडू लागली. बायकोही आरडाओरड करून गोंधळात भर टाकू लागली. रागाच्या भरात मी बकरीला

काठीने चांगला चोप दिला; पण तिने सत्याग्रह मोडला नाही. शेवटी नाइलाजाने रात्री आठ वाजता त्या भरथंडीत मी बकरीला घेऊन मळ्यात गेलो . सापाच्या भीतीने मी खरे तर अंधारात जायला फार घाबरलो; पण या बकरीमुळे मला काय काय सहन करावे लागत होते. कदाचित मागच्या जन्मात मी बकरी असेन व ती माझी मालकीण असेल. त्याचे प्रायश्चित्त मी या जन्मात भोगत असेन. माझ्यावर हे संकट आणणाऱ्या त्या पंडिताचे तळपट व्हावे असे मला वाटू लागले. हा गृहस्थाश्रम एक जंजाळ आहे . मला जर मूल झाले नसते तर या हेकट प्राण्याची खुशामत मला कशाला करावी लागली असती ? आणि मोठे झाल्यावर तरी हे मूल माझे कोणते पांग फेडणार आहे ? तुम्ही माझ्यासाठी कोणती संपत्ती ठेवली ? माझ्यासाठी एवढे काय केले असा मलाच उलट जाब विचारेल. त्या रात्रीची शिक्षा भोगून घरी परतायला रात्रीचे नऊ वाजून गेले होते . त्या रात्री बकरी मेली असती तरी मला तिळमात्र दुःख झाले नसते . दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुटी होती. रात्रीच्या वेठबिगारीतून सुटका मिळवण्यासाठी मी एक युक्ती केली. बकरीच्या गळ्यात एक लांब दोरी बांधून तिचे एक टोक एका झाडाला बांधले. चरू दे रात्रीपर्यंत किती चरायचे ते असे म्हणत मी एक छान झोप काढली . संध्याकाळी बायको, मुलगा व मुलाला सांभाळणाऱ्या नोकराला घेऊन सिनेमाला गेलो. रात्री आल्यानंतर कंदील घेऊन बकरीला आणायला गेलो. पाहतो तर काय ? तिच्या गळ्यातली लांब दोरी दोन- तीन झाडांभोवती गुंडाळली गेली होती व त्या गुंत्यात बकरी अशी अडकली होती की , तिला एक पाऊल पुढे टाकता येत नव्हते. अरे देवा ! एकदा असे वाटले की तिला तसेच टाकून जावे. मरू दे मेली तर ; पण राहवले नाही . कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात मोठ्या मुश्किलीने तासभर झटून तो गुंता सोडवला व तिला घरी आणले. त्या जीवघेण्या थंडीत हातपाय कापत होते आणि काळीज रागाने धगधगत होते . बकरीला चारण्याची ती युक्ती जास्तच त्रासदायक ठरली. आता काय करावे काही सुचत नव्हते. दुधाचा प्रश्न नसता तर फुकटात दिली असती कुणालाही .

संध्याकाळ होताच हिचे कर्कश व अशुभ आवाजात असे ओरडणे सुरु होई की , घरात बसवणार नाही. पुराणशास्त्रात असे लिहिले आहे की , बकन्यांचा आवाज देवापर्यंत पोहोचत नाही. स्वर्गात गंधर्व गायन ऐकण्याची सवय असणाऱ्या देवांना तिचा आवाज कसा आवडणार ? तिच्या आवाजाला घाबरून मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्याआल्या बाहेर पळ काढला; तरी पण तिचा आवाज माझा पाठलाग करत होता. एका निरुपद्रवी बकरीला मी सांभाळू शकत नाही ; एवढे माझे मन दुबळे असल्याची मला स्वत: ला लाज वाटत होती आणि रागही येत होता . रात्रभर तर मी बाहेर राहू शकत नव्हतो . केव्हातरी घरी जावेच लागणार आणि गेल्यावर तेच कर्कश गीत माझे स्वागत करणार . अचानक माझे लक्ष एका उंबराच्या हिरव्यागार झाडाकडेगेले. त्याच्या फांद्या फार उंचावर नव्हत्या बकरीसाठी त्याचा पाला न्यावा अशी इच्छा मला झाली. अंधार पडत असल्यामुळे कुणी मला पाहणार नाही या गोष्टीचा दिलासा होता . मी झाडावर चढलो. हिरवा पाला तोडून खाली टाकू लागलो. तेवढ्यात एकाएकी कुठून तरी बकऱ्यांचा एक कळप तेथे आला व मी खाली टाकलेल्या पाल्यावर तुटून पडला. मी वरूनच त्यांना हाकलू लागलो; पण त्यांनी मला दाद दिली नाही . एकेकीची तंगडी तोडण्याच्या इराद्याने मी खाली उतरू लागलो. अचानक माझा पाय घसरला व मी खाली आपटलो. कंबरेला जोरात मार लागला. डोळ्यापुढे अंधारी आली. अधिक उंचावरून पडलो नाही हे नशीब. नाहीतरतिथेच हुतात्मा झालो असतो . मी पडल्यामुळे दचकून बकऱ्या पळून गेल्या . उरलेल्या पाल्याचा गठ्ठा करून खांद्यावर टाकला व वाटणारी लाज दडपून टाकत घराकडेनिघालो. घर तीन- चार फलांगावर राहिले तेव्हा मी चालण्याचा वेग वाढवला. मला कुणी पाहू नये असे वाटत असताना नेमके नको तेच झाले . मागे भेटलेला तोच माळी समोरुन येताना दिसला. त्या क्षणी माझी काय गत झाली विचारू नका. त्याला टाळून जावे असा दुसरा रस्ताही नव्हता. रस्त्याच्या दुतर्फा उंच बांध होते व त्यावर निवडुंग उगवले होते. त्यामुळे बांधावरूनही मी जाऊ शकत नव्हतो . त्याने मला ओळखू नये म्हणून मी मजुरासारखे

धोतर वर खोचले, चाल बदलली आणि मान खाली घालून चालू लागलो. जणू तो भयंकर वाघ माझ्यावर झडप घालणार होता . मी मनात देवाचा धावा करू लागलो. हे देवा, तू विघ्नहर्ता आहेस. या दुष्टाचा आवाज जाऊ दे. काही क्षणांसाठी तरी तो आंधळा होऊ दे; पण तो क्षण आला. आम्ही समोरासमोर जवळ आलो. त्याचा राक्षसी आवाज कानावर आदळला, “ ए! कोण आहे रे? कुठला तोडलाय पाला ? “ माझ्या पायाखालची जमीन दुभंगली अन् मी आत खचत गेलो. अंगावर काटा आला,मेंदूत जाळ झाला, शरीराला लकवा मारला, उत्तर देण्याची शुद्ध राहिली नाही . मी वेगाने दोन -तीन पावले धावलो. प्राण वाचवण्याची ती प्रतिक्षिप्त क्रिया होती . तोच एका दांडगट हाताच्या धक्क्याने खांद्यावरचा पाल्याचा गठ्ठा खाली पडला. नंतर काय झाले ते मला आठवत नाही . मी जेव्हा भानावर आलो, तेव्हा माझ्या दारात होतो . फीट आल्यासारखा घामाने निथळत होतो . त्या बकरीमुळे माझ्यावर आलेली संकटे, मला खावी लागलेली बोलणी, टोमणे आणि तिचा तो घृणास्पद, कर्कश व माझे खच्चीकरण करणारा आवाज हे सर्व मला सलत होते. त्याशिवाय दुसरे काही मला जाणवत नव्हते . मला बघताच बायकोने तक्रार केली, “ आज बकरीला न घेताच कुठे गेला होता ? हिच्या ओरडण्याने मला जीव नकोसा करून टाकला. लोक कसे काय इतक्या बकऱ्या पाळतात देव जाणे. “ “ अगं! बकऱ्या पाळण्यासाठी कुत्र्यासारखे चलाख डोके लागते. तिला धीर देत मी म्हटले, “ आज ओरडू देत कितीही. उद्या सकाळी उठल्याबरोबर हिला घराबाहेर काढतो बघ . “ दुसऱ्या दिवशी सकाळी या काळ्या पीडेपासून कशी सुटका करून घ्यावी या काळजीत बसलो होतो . अचानक माझे लक्ष एका धनगराकडे गेले . तो बकन्यांचा कळप घेऊन चालला होता. मी त्याला बोलावले व माझी बकरी चारायला नेतोस का असे विचारले . आठ आणे महिन्याच्या बोलीवर तो तयार झाला. मी स्वखुशीने त्याला एक रुपया कबूल केला. त्यामुळे तो जरा गोंधळला व

बकरीविषयी खोलात जाऊन चौकशी करू लागला . मी म्हटले, “ अरे , बकरी फार साधी आहे. एका । वेळेस शेर सव्वाशेर दूध देते ; पण मलाच तिचे तोंड बघायचे नाही. “ माझ्यासारखे बिनगरजू गिहाईक त्याला प्रथमच भेटले असावे. रोज दूध आणून देईन असे सांगून तो बकरी घेऊन निघून गेला. घरातून बकरी काय गेली, जणू मोठे पाप गेले असे वाटते. पहिल्या महिनाभरात धनगराकडून दूध येत होते . नंतर बकरी गाभण राहिल्याचे समजले. मी गायीच्या दुधाचा रतीब लावला. धनगर महिन्यातून एकदा त्याचा ठरलेला एक रुपया घेण्यासाठी येत होता. मी कधीही बकरीची चौकशी केली नाही. तिची आठवण आली तरी माझ्या काळजाचा थरकाप होत होता . माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्यात तो धनगर जर तरबेज असता तर त्याचा पगार त्याने सहज दुप्पट करून घेतला असता. असाच एके दिवशी तो माझ्याकडे आला. त्याच्यासोबत माझी बकरी व तिची दोन कोकरेही आली. बकरी आल्या आल्या तिला बांधण्याच्या जागी गेली, मग अंगणात आली व माझ्या बायकोकडे ओळखीच्या नजरेने बघू लागली. बायकोला फार आनंद झाला होता. तिने एक कोकरु उचलून घेतले . घरात शिल्लक असलेला भुसा बकरीला खायला दिला . जणू फार दिवसांनी जिवलग मैत्रीण भेटली होती . बकरीचा झालेला त्रास, ती कटुता , ते वैर कशाचाही लवलेश नव्हता . ती कधी

बकरीला तर कधी कोकरांना प्रेमाने चुचकारत होती. ती मला म्हणाली, “ किती सुदंर आहेत ना दोघे ? एक आपण ठेवून घ्यायचे का ? “ “ का ? अजून समाधान पूर्ण झालेच नाही का बकरी पाळण्याचे? “ मी तिला फटकारले . थोड्या वेळाने बकरी निघून गेली. तिची कोकरेही उड्या मारत तिच्या मागे पळाली . बायकोचेडोळे भरून आले. जाताना धनगर म्हणाला, “ साहेब, उद्यापासून दूध आणत जाईन . “ “ अरे , पण तिच्या कोकरांना दूध लागेल ना ? “ बायकोने विचारले. “ बाईसाहेब, ते बच्चे किती दिवस दूध पिणार ? शिवाय सध्या बकरी रोज दोन शेर दूध देतेय. आतापर्यंत फारसे देत नव्हती म्हणून आणत नव्हतो. “ मला त्या रात्रीचा तो मर्मभेदक प्रसंग आठवला. मी म्हणालो, “ दूध आण किंवा नको आणूस तुझी मर्जी; पण बकरीला मात्र इकडे कधीच आणू नकोस “ त्या दिवसापासून तो धनगर किंवा ती बकरी कधीच दिसले नाहीत . मी पण कधी शोध घेतला नाही . बकरी व कोकरांच्या आठवणीने बायकोच्या डोळ्यात मात्र कधी कधी पाणी येते.

00

बोध

पंडित चंद्रधर एका उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक होते . त्यांच्या शिक्षकीपेशाचा त्यांना नेहमी पश्चात्ताप व्हायचा . कारण महिनाभर वाट पाहिल्यावर पंधरा रुपये पगार हातात पडायचा. तोही जणू फक्त पाहण्यापुरता . तो असा येई अन् असा लगेच गायब होई . ना खाण्यापिण्याचा आनंद ना कपडालत्त्याचे सुख . दुसऱ्या एखाद्या खात्यात नोकरी मिळाली असती तर हातात चार पैसे खुळखुळले असते . पंडितजींच्या शेजारी दोन महाशय राहत होते. एक फौजदार ठाकूर अतिबलसिंह आणि दुसरे तहसीलमधील कारकून मुंशी वैजनाथ. दोघांचा पगार पंडितजीपेक्षा फार जास्त नव्हता; पण तरी ते चैनीत राहायचे. कचेरीतून येताना ते मुलांसाठी खाऊ आणायचे. त्यांना पैसे द्यायचे. त्यांच्या घरात भारी किमतीच्या टेबलखुर्त्यां व गालिचे होते . ठाकूर संध्याकाळी आरामखुर्चीत बसून सुगंधी पेयाचा आस्वाद घेत . मुंशींना खाण्यापिण्याचे व्यसन होते. आपल्या सुसज्ज खोलीत बसून ते बाटल्यांवर बाटल्या रिचवायचे. नशा चढली की , हार्मोनियम वाजवायचे. त्या दोघांचा सगळ्या आळीत रुबाब होता . त्यांना पाहून दुकानदार उभे राहून नमस्कार करायचे. चार पैशांची वस्तू त्यांना एका पैशात मिळायची. लाकूड, इंधन फुकट मिळायचे. त्यांचा थाटमाट पाहून पंडित स्वत: च्या नशिबाला दोष द्यायचे. त्यांना एवढेही माहिती नव्हते की , पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो ? पर्वत रचनांची जुजबी माहितीही त्यांना नव्हती. तरी देवाने त्यांना फार समृद्धी दिली होती. पंडितजींवर त्यांची कृपादृष्टी होती . कधी कधी त्यांच्याकडून दूध, भाजी पाठवले जायची; पण त्या बदल्यात ठाकुरांच्या दोन व मुंशीच्या तीन मुलांवर पंडितजींनी लक्ष द्यावे व चांगले संस्कार देऊन त्यांना सुधारावे, अशी

काही अपेक्षा होती. आपली अपेक्षा ते अशा काही अनुग्रहपूर्ण पद्धतीने सांगत की , जणू पंडितजी त्यांचे नोकर आहेत. पंडितजींना त्यांचे वागणे असह्य होई; पण नकार देऊन नाराज करण्याचे धैर्यही त्यांच्यात नव्हते . त्यांच्या ओळखीचे फायदेही त्यांना मिळायचे, त्यामुळे ते आपला अपमान विषाच्या घोटासारखा गिळून टाकायचे. दुसऱ्या खात्यात बदली व्हावी म्हणून त्यांनी खूपदा प्रयत्न केले होते . अनेक विनंती अर्ज, खुशामती करूनही त्यांची आशा सफल झाली नाही. शेवटी त्यांनी स्वत : ची हार मानली व ते शांत झाले. एवढे मात्र खरे होते की ,त्यांचे काम अगदी चोख होते . शाळेत ते वेळेवर जात , उशिरापर्यंत थांबत , मन लावून मुलांना शिकवत . त्यांच्या या गुणांमुळे त्यांचे वरिष्ठ खूश होते . वर्षातून त्यांना कधी बक्षीस द्यायचे व वेतनवाढीच्या वेळी त्यांच्याकडेविशेष लक्ष द्यायचे; पण या शिक्षण विभागातील वेतनवाढ म्हणजे नापीक जमिनीतल्या शेतीसारखी. हाती यायला मोठेच भाग्य लागायचे. गावकरी त्यांना खूप मान द्यायचे. त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असायची. कुणी त्यांच्या घरी पाणी भरून देई , कुणी त्यांच्या बकरीसाठी पाला तोडून आणी. पंडितजीसाठी हेही पुष्कळ होते . एकदा श्रावण महिन्यात ठाकूर व मुंशी यांनी सहकुटुंब सहपरिवार अयोध्या यात्रेला जाण्याचे ठरवले . यात्रा सहलीत आलतूफालतू माणसाची कामासाठी गरज असते; म्हणून त्यांनी पंडितजींना सोबत येण्यास भाग पाडले. अयोध्या यात्रेची फुकट संधी तेही टाळू शकले नाहीत . बिल्हौर स्टेशनहून रात्री एक वाजता गाडी सुटणार होती . हे सर्वजण स्टेशनवर आले. जेव्हा गाडी आली तेव्हा हजारो प्रवाशांची एकच गर्दी उसळली. त्या गडबडीत मुंशी एका डब्यात व पंडित ठाकुरांसह दुसऱ्या डब्यात चढले. ते दोघे ज्या डब्यात चढले त्यात सुदैवाने फक्त चार प्रवासी होते. ते सगळे झोपले होते. दहा माणसांची जागा चौघांनी अडवली हे पाहून ठाकुरांना राग आला. एकाला ते उठवू लागले. तो प्रवासी झोपल्या झोपल्याच म्हणाला, “ मी का उठू ? तुम्हाला जागा देण्याचा मी ठेका घेतला

आहे का ? “ ठाकूर म्हणाले, “ आम्ही पण पैसे देऊन तिकीट काढले आहे. “ “ ज्याला पैसे दिले त्यालाच जागा मागा, जा . “ तोंड सांभाळून बोल. असा कोण टिकोजीराव आहेस रे? “ त्यावर प्रवासी म्हणाला, “ ही तुमची पोलिस चौकी नाही. तुम्हीच जरा सांभाळून बोला. मी तोच आहे, ज्याच्यावर तुम्ही फसवणुकीचा खोटा आरोप लावला व त्यातून सुटण्यासाठी पंचवीस रुपयांची लाच घेतली होती . “ ठाकूर, “ ओहो ! आता ओळखलेय मी तुला. अरे खरे तर माझ्यामुळे तू सुटलास. खटला भरला असता तर शिक्षा झाली असती. मी तर तुला सवलत दिली. “ प्रवासी म्हणाला, “ गाडीत उभे राहण्याची मी पण तुम्हाला सवलतच दिली आहे. ढकलून दिले असते तर गाडीखाली चेंदामेंदा झाला असता . “ तेवढ्यात दुसरा प्रवासी उठला व हसत म्हणाला, “ काय झाले फौजदार साहेब ? मला का नाही उठवले ? “ ठाकूर म्हणाले, “ ती पेटी खाली ठेवा. बसायला तरी जागा होईल “ “ मग तुम्हीच का नाही खाली बसत . तुमचा रुबाब कमी व्हायला ही काही पोलिस चौकी नाही. “ “ तुझे पण माझ्याशी वैर आहे का ? मी तर तुला कधी पाहिलेही नाही . “ “ तुम्ही नाही पण तुमच्या लाठीने मला पाहिले आहे. परवाच्या मेळ्यात मी शांतपणे नाटक पाहत होतो; पण तुम्ही मला लाठीचा प्रसाद दिला. तेव्हा मी चूप राहिलो. जखम हृदयाला झाली होती . आज औषध मिळाले. “ असे बोलून त्याने आणखीनच पाय ताणले व रागाने पाहू लागला. पंडितजी हे सगळे चूपचाप पाहत होते. पुढच्या स्टेशनवर त्यांनी ठाकुरांना दुसऱ्या डब्यात नेले. तिकडेमुंशींची अवस्था आणखीनच बिकट होती . डब्यात पाय ठेवायला जागा नव्हती . सारी रात्र

त्यांनी जागून काढली. खिशात बाटली आणली होती. प्रत्येक स्टेशनवर तीर्थ नाशन सुरू होते . या सगळ्याचा परिणाम पोटदुखीत झाला. उलट्या होऊ लागल्या . झोप येत होती ; पण गर्दीत ते शक्य नव्हते. असह्य झाले तेव्हा एका स्टेशनवर खाली उतरले . घाबरलेली बायको मुले व सामान घेऊन पाठोपाठ उतरली. त्या गडबडीत एक पेटी गाडीतच राहिली. त्यांना उतरलेले पाहून फौजदार व पंडितजीही उतरले . मुंशींना आज जरा जास्तच झाली आहे हे त्यांना समजले . थोड्याच वेळात मुंशींची प्रकृतीबिघडली. ताप, जुलाब, पोटदुखी सुरु झाली . सगळे शरीर ताणले. सर्वजण घाबरले. त्यांना कॉलरा झाला असावा अशी शंका घेऊन स्टेशन मास्तरने त्यांना स्टेशन बाहेर नेण्याचा आदेश दिला. ते सर्वजण बाहेर आले. एका झाडाखाली मुंशींना झोपवले. जवळच जिल्हा बोर्डाचा दवाखाना असल्याचे समजले. फौजदार तिकडे गेले. चोखेलाल हा कंपाउंडर होता ; पण त्याला सगळे लोक डॉक्टर म्हणत. तो पण बिल्हौरचाच होता . त्याच्या सांगण्यावरून मुंशींना डोलीत घालून दवाखान्यात आणले; पण व्हरांड्यात येण्याची परवानगी मिळाली नाही. मुंशींनी त्याला ओळखले व विचारले , “मला ओळखले नाही का तुम्ही ? मला तपासा जरा . जीव जायला आलाय माझा. “ “ ते तर माझे कामच आहे; पण माझी फी दहा रुपये द्यावी लागेल . “ फौजदारांनी विचारले, “ या दवाखान्यात कसली फी ? “ “ तशीच, जशी यांनी माझ्याकडून वसूल केली होती , सारा भरायला तहसीलमध्ये जातो तेव्हा हे मुंशी बळजबरीने त्यांचा हिस्सा वसूल करतात. नाहीतर दिवसभर काम होत नाही . आता माझी पाळी आहे. दहा रुपये द्या ; त्यांना मी औषध देतो. इथेच थांबणार असाल तर रोजचे दहा रुपये लागतील. “ फौजदारांनी मुंशींच्या बायकोकडे पैसे मागितले, तेव्हा तिला त्या गाडीत विसरलेल्या पेटीची आठवण झाली. ती रडू लागली. फौजदाराने दहा रुपये चोखेलालला दिले. रात्री मुंशींना थोडे बरे वाटू लागले, तरी दुसऱ्या दिवशी औषध घेणे गरजेचे होते. फौजदारांकडे जास्त पैसे नव्हते . मुंशीच्या

बायकोचा एक दागिना बाजारात वीस रुपयांना विकला व त्यातून औषधाचा खर्च भागवला. रात्रीपर्यंत ते बरे झाले व प्रवास पुढे सुरू झाला. गाडीत बसल्यावर मात्र डॉक्टरला खूप शिव्या घातल्या . अयोध्येला पोहोचल्यावर राहण्यासाठी जागेचा शोध घेतला. पंड्याच्या घरी, धर्म शाळेत किंवा एखाद्या झाडाखालीही त्यांना मुक्कामास जागा मिळाली नाही. यात्रेसाठी लोकांची खूप गर्दी होती . मग मोकळ्या मैदानात वळकट्या सोडून ते सर्वजण झोपले. तेवढ्यात ढग आले व पावसाला जोरात सुरुवात झाली. विजा कडाडू लागल्या. सगळे घाबरले; पण जाणार तरी कुठे ? अचानक एक माणूस नदीच्या बाजूने कंदील घेऊन येताना दिसला. तो जवळ आल्यावर त्याचा चेहरा पंडितजींना ओळखीचा वाटला; पण नक्की ओळख पटली नाही . जवळ आल्यावर पंडितजींकडे बारकाईने पाहत त्याने विचारले , “ तुम्ही पंडित चंद्रधर ना ? “ “ हो , तुम्ही मला कसे ओळखलेत ? “ । तो माणूस पंडितजींना वाकून नमस्कार करीत म्हणाला, “ मी तुमचा विद्यार्थी, कृपाशंकर. माझे वडील बिल्हौरच्या पोस्टात होते . “ पंडितजींना आता नीट आठवले. ते प्रसन्न होत म्हणाले, “ ओहो! कृपाशंकर ! अरे तेव्हा तू खूप बारीक दिसायचास . आठ नऊ वर्षे तरी झाले असतील . “ “ होय गुरुजी. येथे मी सध्या नगरपालिकेत नोकरी करतो. तुम्ही आज योगायोगाने भेटलात , फार आनंद वाटतो आहे. कधी आलात येथे? “ “ आजच आलो. माझ्यासोबत दोघेजण व त्यांची मुलेबाळे आहेत. उतरण्याची सोय कुठेच झाली

नाही. “ “ एकूण कितीजण आहात तुम्ही ? “ “ आम्ही दहाजण आहोत. एखादी लहानशी जागा मिळाली तरी चालेल. “ “ लहानशी का ? खूप मोठी जागा देतो . माझे घर मोठे आहे. चला, माझ्या घरी आरामात राहा. तुमच्यासाठी काही करण्याचे थोडे तरी भाग्य मला मिळू द्या . “ कृपाशंकरने हमाल बोलावून सर्व सामान घरी नेले. नोकरांनी सर्वांची सर्वव्यवस्था झटपट करून दिली . स्वयंपाकाचा दरवळ पसरू लागला. कृपाशंकर अतिशय नम्रतेने त्यांची सर्व व्यवस्था पाहत होता . त्याचा आनंद चेहल्यावर स्पष्ट दिसत होता. त्याच्या नम्रतेने सर्वच मोहित झाले. सर्वांची जेवणे झाली. ते झोपले; पण पंडित चंद्रधरांना झोप येईना . प्रवासात घडलेल्या सर्व घटनांचा ते विचार करू लागले . रेल्वेतील भांडणे, दवाखान्यातले लुबाडणे या पार्श्वभूमीवर कृपाशंकरची शालीनता व मदत उठून दिसत होती . शिक्षकाचे महत्त्व आज त्यांना समजले. ते सगळे तीन दिवस अयोध्येत राहिले. कृपाशंकरमुळे त्यांना कसलीही अडचण आली नाही. परत जाताना तो स्टेशनवर आला. पंडितजींच्या पाया पडताना त्याचे डोळे भरून आले होते. आठवण ठेवा, असे त्याने नम्रतेने सांगितले. घरी परतल्यावर पंडितजींच्या स्वभावात मोठा बदल झाला. दुसन्या खात्यात बदलीसाठी त्यांनी पुन्हा कधीच प्रयत्न केला नाही .

सभ्यतेचे रहस्य

खरेतर जगातल्या अनेक गोष्टींचा अर्थच मला लागत नाही . जसे की , सकाळी उठल्या उठल्या लोक केस का कापून घेतात ? केसांचेही ओझेन पेलवण्याइतके पुरुष नाजूक झालेत का ? सगळ्या शिकल्या सवरलेल्या लोकांचे डोळे इतके खराब का झाले ? त्यांची बुद्धी चालेनाशी झाली की दुसरे काही कारण असेल ? कोणती तरी पदवी पदरात पाडून घेण्याचा हव्यास लोकांना का लागला आहे ? इत्यादी इत्यादी. तूर्त मी हे प्रश्न जरा बाजूला ठेवतो आहे . सध्या मला एक नवीन प्रश्न पडला आहे, ज्याचे उत्तर कुणाकडेच नाही . तो प्रश्न असा आहे की , सभ्य कोणाला म्हणावे व असभ्य कोणाला म्हणावे ? सभ्यतेची लक्षणे कोणती ? या प्रश्नाकडे वरवर पाहिले तर एखाद्या लहान मुलानेही याचे उत्तर द्यावे इतका तो साधा व सोपा वाटतो; पण बारकाईने विचार केला तर त्याची खोली लक्षात येईल. कोट, पॅन्ट, टाय , कॉलर असा पोशाख करणे, टेबलावर जेवण घेणे, दिवसातून अनेकवेळा चहा, कोको पिणे, रस्त्याने चालताना सिगारेट ओढणे ही सभ्यतेची लक्षणे आहेत का ? असतील तर संध्याकाळी दारू पिऊन रस्त्यावरून अडखळत फिरणाऱ्या , इतरांची छेड काढण्यात गंमत मानणाऱ्या त्या गोऱ्या इंग्रजांनाही सभ्य म्हणता येईल का ? कदापि नाही. तर मग आता यातून हे सिद्ध झाले आहे की , सभ्यता ही वेगळीच गोष्ट आहे. तिचा संबंध शरीरापेक्षा मनाशी जास्त आहे . माझे मित्र अगदी थोडे व निवडक आहेत . रत्नकिशोर राय हे त्यापैकी एक. ते अतिशय सहृदय , उदार , उच्चशिक्षित व मोठ्या पदावर आहेत . पगार भरपूर आहे; पण तो त्यांना पुरत नाही. ते लाच घेतात का मला माहीत नाही; पण बोलणारे काहीजण तसेही बोलतात . जिल्ह्यातील रयतेच्या कल्याणासाठी ते सतत जिल्हाभर दौरे आखत असतात, हे मला माहिती आहे. यातील मजेचा भाग असा की , कागदावर

जितके दौरे दाखवून ते भत्ते घेतात, वास्तवात तेवढे दौरे ते करत नाहीत. घरीच मित्रांसोबत गप्पाटप्पा करत असतात. त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंका घेण्याची हिंमत कुणामध्येही नाही. ते अतिशय सभ्य पुरुष आहेत , यात कुणाला शंका नाही . एकदा मी रायना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो . त्यावेळी त्यांच्या दमडी नावाच्या नोकरावर ते संतापलेले होते. त्याची खरमरीत कानउघाडणी करत होते. दमडी त्यांचा चोवीस तासांचा घरगडी होता . काही अंतरावरील एका गावातत्याचे घर होते. जेवणासाठी त्याला घरी जावे लागायचे. काल रात्री तो गेला असताना त्याच्याकडे अचानक पाहुणे आले व त्यामुळे तो कामावर परत आला नव्हता . त्या चुकीबद्दल त्याचा एक रात्रीचा पगार कापणार असल्याचे रायसाहेबांनी जाहीर केले. दमडी गयावया करत त्यांची माफी मागत होता . ती त्याची फालतू बडबड आहे, असे त्यांना वाटत होते . त्याबद्दल त्यांनी त्याला दोन रुपयांचा दंडही ठोठावला. दमडी डोळे पुसत निघून गेला. त्याने दिवसभर काम केले होते. फक्त रात्री झोपायला तो तेथे नव्हता . त्याची ही शिक्षा त्याला मिळाली होती . पगार तर कटलाच; पण वर दंडही बसला. घरी बसून भत्ते उकळणाऱ्या लोकांना कुणी जाब विचारत नाही . त्यांना दंडही भरावा लागत नाही. खरेतर कायमची आठवण राहील अशी शिक्षा त्यांना व्हायला हवी ; पण ते पकडले जाणे अवघड असते. दमडी जर हुशार असता तर रात्री उशिराने येऊन गुपचूप झोपला असता ; पण तो स्वभावाने पडला गरीब, त्याला ही युक्ती सुचली नाही. दमडीकडे सहा गुंठे जमीन होती व खाणारी तोंडेही तितकीच होती. बायको , दोन मुली, दोन मुले सगळेजण शेतात राबराब राबत होते; पण पोटापुरतेही मिळत नव्हते. एवढ्याशा जमिनीतून काय सोने उगवणार होते? ते सगळे जर शेती ऐवजी मजुरी करू लागले तर आरामात राहू शकतील ; पण स्वाभिमानी शेतकऱ्याला स्वत: ला मजूर म्हणवून घेणे अपमानास्पद वाटते. ते टाळण्यासाठी दमडीने दोन बैलही सांभाळले होते . त्यांच्या चारापाण्यावर त्याच्या पगाराचा बराच मोठा भाग खर्च होत असे . तरी मजुरी करणे त्यांना मंजूर नव्हते. शेतकऱ्याला जी प्रतिष्ठा असते ती मजुराला कशी असणार ?

भले मग त्या मजुरीत रोज का पैसे मिळेनात . शेती करण्यासोबत मजुरी करणे थोडे कमी अपमानास्पद होते. त्याचे बैल त्याच्या प्रतिष्ठेचेरक्षक होते. त्यांना विकले तर तोंड दाखवायला जागा राहणार

नाही.

एकदा थंडीच्या दिवसात बैल विकून गरम कपडे शिवण्याविषयी रायसाहेबांनी त्याला सांगितलं ; पण बैल विकले तर जातीत तोंड कसे दाखवणार ? मुलींची लाने कशी होणार ? या निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे दमडी तयार झाला नाही. दमडीविषयी या सर्व गोष्टी मला सांगून रायसाहेब पुढे म्हणाले , थंडीमुळे जीव गेला तरी चालेल; पण यांना दाराशी बैल हवाच. माझ्याकडे बघा. जन्माष्टमीच्या उत्सवावर आमच्याकडे अनेक पिढ्यांपासून हजारो रुपये खर्च व्हायचा. माझे वडील वारल्यानंतर लगेचच मी तो खर्च बंद केला व दरवर्षांचे चार - पाच हजार रुपये वाचवले. कुणाकडे लग्न ठरले तर मांडवाचे लाकूड आमच्याकडून दिले जायचे. माझे वडील दुसऱ्यांकडून झाड विकत घेऊन ती रीत पाळायचे. मी तेही बंद केले व वर्षांचे पाचशे रुपये वाचवले. लोकांनी काही दिवस बरीच बडबड केली. कुणी मला नास्तिक , तर कुणी ख्रिश्चन ठरवले. थोड्या दिवसांनी सगळे आपोआप शांत झाले . आता त्या मागण्या घेऊन कुणीही माझ्याकडे फिरकत नाही. “ माझ्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहिला. दोघात सभ्य कोण ? कुलप्रतिष्ठेसाठी प्राणांची पर्वा न करणारा दमडी की कुलप्रतिष्ठेला वाऱ्यावर सोडणारे रतनकिशोर राय ? रायसाहेबांच्या कचेरीत एक महत्त्वपूर्ण खटला दाखल झाला होता. शहरातला एक श्रीमंत माणूस खुनाच्या आरोपात अडकला होता . जामीन मिळवण्यासाठी त्याचे हरत- हेने प्रयत्न सुरू होते. अनेकांच्या शिफारशी, अनेक भेटवस्तू रायसाहेबांकडे पोहोचल्या ; पण काही फायदा झाला नव्हता. श्रीमंत माणसाच्या अब्रूचा प्रश्न होता . शेवटी नाइलाजाने त्याच्या पत्नीला रायसाहेबांच्या पत्नीकडे बोलणी करण्यासाठी पाठवले. रात्री दहाच्या सुमारास त्या दोघींमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या . शेवटी वीस हजारांच्या आमिषाला रायसाहेबांची पत्नी भुलली. तिने रायसाहेबांना ती गोष्ट सांगितली. त्यांनी

तत्त्वज्ञाचा आव आणत हावरटपणा केल्याबद्दल तिला खूप दूषणे दिली. तिच्यामुळे त्यांच्या नि :पक्षपातीपणाचे क्रत मोडावे लागणार आहे असे म्हणत शेवटी ते नाइलाजाने तयार झाले. जेव्हा त्या पती - पत्नीचे असे नाटक रंगले होते तेव्हा दमडीच्या बाबतीत वेगळेच काही घडत होते . त्यावेळी कामावरून सुटी घेऊन तो सरपंचाच्या शेतात जोंधळ्याची कापणी करत होता . त्याच्या बैलांसाठी चाऱ्याची एकही काडी शिल्लक नव्हती . तो चारा विकतही घेऊ शकत नव्हता . दोन्ही बैल भुकेले होते. दमडीकडे आशाळभूतपणे बघत शेपट्या उभारून ते हंबरत होते. दमडीचे हात चाटत होते. तो फार दुःखी झाला. अपरात्री केव्हातरी त्याला जाग आली. त्याने पाहिले, बैल अजून उभेच होते. ती चांदणी रात्र होती . दमडीला बैलांच्या डोळ्यात उपेक्षा, याचना , भुकेची वेदना स्पष्ट दिसली . त्याचे डोळे भरून आले. शेतक -यांना त्यांचे बैल मुलांइतकेच लाडके असतात. मनाशी काहीतरी ठरवून तो उठला. चारा आणण्यासाठी विळा घेऊन बाहेर पडला. गावाबाहेरील शेतात जोंधळाचे पीक उभे होते. वृत्तीने तो चोर नसल्यामुळे रात्रीपुरते भागेल एवढा चारा त्याने कापला. योगायोगाने तिकडून एक पोलिस चालला होता .त्याचे लक्ष दमडीकडे गेले. एखादे सावज सापडावे तसा आनंद त्याला झाला. त्याने दमडीला थांबवून दरडावले. दमडीचे अवसान गळाले. खरे काय ते सांगून अगदी थोडासा चारा घेतल्याचे त्याने चाचरत कबूल केले. चोरी ती चोरीच, थोडी असो की जास्त, असे म्हणून पोलिसाने त्याला ठाण्यात नेले व चोरीची केस नोंदवली . त्याचाही खटला रायसाहेबांच्या कचेरीत आला. दमडीला अडकलेले पाहून त्यांना सहानुभूतीऐवजी फार राग आला. ते म्हणाले, “ तुझ्यामुळे माझी आज बदनामी झाली. तुझे काय रे, वर्ष सहा महिने शिक्षा भोगून तू मोकळा होशील . माझी मान मात्र खाली जाणार . मी चोर , बदमाश लोकांना नोकरीवर ठेवतो असेच लोक म्हणणार . तू माझा नोकर नसतास तर मी तुला अगदी साधी शिक्षा दिली असती ; पण मी भेदभाव केला असे कुणी म्हणू नये म्हणून कडक शिक्षा देणार आहे. “ दमडीला त्यांनी सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याच दिवशी खुनाच्या खटल्यातील त्या

श्रीमंत माणसाला जामीन मिळाला . या दोन्ही घटना माझ्या कानावर आल्या. आता माझी अशी पक्की खात्री झाली आहे की , कौशल्याने गैरवर्तन करण्याचा गुण म्हणजेच सभ्यता . तुम्ही कितीही वाईट काम करा; पण ते उघडकीस येऊ देऊ नका. ते करणे जर तुम्हाला जमले तर तुम्ही सभ्य आहात, सज्जन आहात; पण हा विशेष गुण जर तुमच्यात नसेल तर तुम्ही असभ्य आहात , बावळट आहात , बदमाश आहात हेच आहे सभ्यतेचे रहस्य .

मुक्तिधन

भारत देशात सर्वांत फायदेशीर व्यवसाय जर कोणता असेल तर तो आहे सावकारीचा. कोणत्याही भानगडींशिवाय यापेक्षा जास्त फायदा देणारे व्यवसाय फारच कमी आहेत. यामुळेच येथे सावकारीचा धंदा तेजीत चालतो. गरजेपेक्षा थोडे जास्त पैसे बाळगणारा डॉक्टर , वकील, सरकारी नोकर , जमीनदार , कुणीही हा व्यवसाय करू शकतो. आपल्या संपत्तीचा सदुपयोग करण्याचे सर्वोत्तम साधन हेच आहे. लाला दाऊदयाल यापैकी एक होता. कोर्टात एका वकिलाचा सहायक म्हणून तो काम करायचा. पगारातून होणाऱ्या बचतीचा वापर तो सावकारीच्या धंद्यासाठी करायचा. पैसे फेडण्याच्या बाबतीत उच्चवर्णीय लोक अतिशय त्रासदायक असतात, असे अनेकांनमाणे त्याचेही मत होते . त्यांना कर्ज देण्यापेक्षा पैसे विहिरीत टाकलेले बरे, असे त्याला वाटायचे. म्हणून पैशाचा व्यवहार तो फक्त खालच्या स्तरातील लोकांशी करायचा . एके दिवशी कोर्टातून घरी जाताना त्याने एक विचित्र घटना पाहिली. एक मुसलमान आपली गाय विकण्यासाठी रस्त्यावर उभा होता . भोवती बरीच माणसे जमली होती. त्यापैकी काहींना गाय हवी होती; पण गाय कोणाला विकावी याचा निर्णय तो गरीब घेऊ शकत नव्हता. त्याची गाय छान , सुदृढ व दुभती होती . शेजारी तिचे वासरु होते. गाय बघून दाऊदयालला मोह झाला. त्याने चौकशी केली. तो गायवाला म्हणाला, “ साहेब , माझे नाव रहमान. मी पचौलीहून आलो आहे. ही गाय एका वेळी तीन शेर दूध देते . स्वभावाने इतकी गरीब आहे की , लहान मुलगाही दूध काढू शकेल. “ गायीची किंमत रहमानने पन्नास रुपये सांगितली . साहेबाने तीस रुपये सांगितले. बरीच घासाघीस । होऊन पस्तीस रुपयांवर सौदा ठरला. एकाला गाय हवी होती तर दुसन्याला पैसा हवा होता . तेवढ्यात तेथे एक माणूस आला. त्याला ती गाय आवडली. त्याने रहमानला चाळीस रुपये देण्याची तयारी

दाखवली; पण रहमानने त्याला नकार दिला. गायीला घेऊन तो दाऊदयाल बरोबर चालू लागला. तो म्हणाला, “ साहेब, तुम्ही हिंदू आहात . तुम्ही हिचा चांगला सांभाळ कराल याची मला खात्री वाटते . बाकीचे लोक कसाई वाटत होते. त्यांनी पन्नास रुपये दिले असते, तरी त्यांना दिली नसती. मी फार अडचणीत आहे साहेब ; म्हणून हिला विकावे लागत आहे. हिला मी फार प्रेमाने सांभाळले आहे. आणखी एक विनंती करू का ? हिला मारू नकोस असे तुमच्या गुराख्याला सांगा . दाऊदयाल चकित झाला . अरे देवा ! या अशा माणसामध्ये किती सहृदयता आहे. हा गरीब स्वत : चे पाच रुपयांचे नुकसान करून घेऊन मला गाय विकतो आहे. ती कसायाच्या हाती पडू नये याची काळजी घेतो आहे. गरिबांमध्येही इतका समजूतदारपणा असतो तर…! घरी आल्यावर त्याने रहमानला पैसे दिले. गायीकडे प्रेमळ नजरेने पाहत दाऊदयालला नमस्कार करून तो निघून गेला. रहमान हा एक गरीब शेतकरी होता . गरिबांचे शत्रू सगळेच असतात . जमीनदाराचा वाढीव कर भरण्यासाठी त्याला पैसे हवे होते .म्हणून नाइलाजाने त्याला गाय विकावी लागली . पचौली गावात मुसलमानांची अनेक घरे होती . महायुद्धामुळे अनेक वर्षे अडलेला हजयात्रेचा मार्ग या वर्षी मोकळा झाला होता . गावातील अनेक माणसे हजयात्रेच्या तयारीस लागली होती . रहमानची म्हातारी आई त्याच्या मागे लागली. शेवटची इच्छा पूर्ण कर असा आग्रह तिने धरला. मातृभक्ती हा ग्रामीण मातीचा विशिष्ट गुण आहे. रहमानमध्येही तो होता ; पण पुरेसे पैसे कुठून आणणार ? त्याला दाऊदयालची आठवण आली. दाऊदयाल हिशोबात फक्का व खरा होता. वसूल करताना तो कुणाला फसवत नसे; पण मुदत उलटून गेली तर मात्र सरळ कोर्टात दावा दाखल करायचा. काही दिवस विचारात घालवल्यानंतर रहमान त्याच्याकडे गेला व कर्जाची मागणी केली. दाऊदयालने त्याला ओळखले . तो म्हणाला, “ मी तुला वायद्यावर पैसे देईन . वायदा चुकवलास तर अजिबात गय करणार नाही. बोल, पैसे कधी परत करशील? “

” सरकार दोन वर्षांचा वेळ द्या , रहमान म्हणाला, ठीक आहे. जर दोन वर्षांनी दिले नाहीस तर शेकडा बत्तीस रुपये च्याज लावीन . तुझ्यावर दावा लावणार नाही एवढीच सवलत तुला देतो . “ “ जशी तुमची इच्छा साहेब , मी तुमच्याच हातात आहे रहमानला दोनशेऐवजी एकशे ऐंशी रुपये मिळाले. कागद तयार करणे, बक्षिसी, दलाली यात वीस रुपये कटले. तो घरी परतला . घरी साठवलेला गूळ विकून आणखी थोडे पैसे मिळवले. पत्नीची समजूत काढून आईला घेऊन तो हजयात्रेला गेला. वायद्याची दोन वर्ष संपली. लाला दाऊदयालने तगादा लावला . त्याने रहमानला घरी बोलवून पैशांची मागणी केली. रहमान लाचारीच्या स्वरात म्हणाला, “ साहेब , मी आता फार अडचणीत आहे . हजहून आल्यापासून आई सारखी आजारी आहे. तिच्या औषधपाण्याचा खर्च सुरु आहे. ती आहे तोपर्यंत तिची सेवा मला करू द्या साहेब. पोटपाणी तर जन्मभरासाठी मागे लागलेच आहे. यंदा पाणी नसल्याने पीकही चांगले आले नाही. अजून एक वर्षांची सवलत द्या . आई बरी झाली की , माझे मोठे ओझे कमी होईल. “ “ ठीक आहे; पण व्याज बत्तीस रुपये प्रमाणे लावीन , दाऊदयाल म्हणाला. रहमान कबुली देऊन घरी गेला. पाहतो तर आईची शेवटची घटका जवळ आलेली. त्याच्या नशिबात होती म्हणून तिची शेवटची भेट झाली. त्याच्याकडे ममतेने पाहत आशीर्वाद देऊन तिने कायमचे डोळे मिटले. रहमान आधीच गळ्यापर्यंत बुडाला होता, आता पाणी डोक्यावरून वाहू लागले . आईच्या क्रियाकर्मसाठी शेजाऱ्यांकडून उधार पैसे घेऊन त्याने वेळ निभावली; पण तेवढ्यावर भागणार नव्हते. दानधर्म, प्रार्थना , कुराणपठण , कबर बांधणी, नातलगांना जेवण हे सर्वविधी आवश्यक होते . ते केल्यानंतरच आईच्या आत्म्याला शांती मिळणार होती . पुन्हा खर्चाचा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्याला पुन्हा दाऊदयालची आठवण आली; पण परत त्याच्याकडे जावे की नाही अशी द्विधा मन :स्थिती त्याची झाली.

एक वर्षांची वाढीव मुदत मागून फक्त तीन दिवस झाले होते. आता पैसे देण्याऐवजी धक्के मारून हाकलून देईल, असे निराशाजनक विचार करत तो दाऊदयालकडेच गेला. दुसरा पर्याय त्याला दिसत नव्हता . लाला दाऊदयाल कोर्टातून घरी आला होता व स्वभावानुसार किरकोळ कारणांवरून गडीमाणसांवर चिडचिड करत होता . त्यातच रहमान त्याच्या समोर आला. त्याला पाहून रागाचा पारा आणखी चढला. तो ओरडून म्हणाला, “ तू परत का आलास रे बाबा ? माझ्यामागे का लागला आहेस ? मला अजिबात वेळ नाही तुझ्याशी बोलत बसायला. “ तेवढे ऐकून रहमान एवढा हताश झाला की , काही न बोलता आल्या पावली परत फिरला . कोण जाणे कशी; पण दाऊदयालला त्याची दया आली. त्याने त्याला परत बोलावले व काम विचारले. रहमानला रडू आवरेना . त्याची आई गेल्याचा अंदाज दाऊदयालला आला. त्याने विचारले, “रहमान, तुझी आई वारली का ? “ “ हो साहेब, आज तिसरा दिवस आहे. “ “ रडू नकोस बाबा. सगळे देवाच्या मर्जीने घडत असते. तुझ्या हाताने तिची सेवा झाली आहे. अजून काय हवे ? “ “ साहेब, थोडे काम होते; पण कसे सांगू? माझा अल्ला जाणतो की , मला एकही पैसा कुठूनही मिळणार नाही ; पण आईच्या क्रियाकर्मासाठी पैसे हवे आहेत . ते जर मी करू शकलो नाही; तर जन्मभराचा पस्तावा राहील. आज तुम्ही नाही म्हणू नका. मला दोनशे रुपयांची गरज आहे. “ आधीच तीनशे रुपये चढले आहेत तुझ्यावर. अजून दोनशे मागतोस . दोन वर्षांत सुमारे सातशे रुपये होतील ठाऊक आहे का ? “ “ साहेब, अल्लाच्या दयेने दोन एकरांत ऊस लावला तर पाचशे रुपये मिळतील . वायद्यानुसार मी तुमचा पैसा तुम्हाला देईन .

दाऊदयालने त्याला दोनशे रुपयेदिले. त्याच्या नरमाईने वागण्याचे लोकांना खूप आश्चर्य वाटले… शेती एखाद्या अनाथ बाळासारखी असते. हवापाणी अनुकूल असेल तर धान्याचा राशी लागतात . नसेल तर वाऱ्यावर डोलणारे पीक दगाबाज मित्रासारखा धोका देते . गारपीट, धुके , दुष्काळ, पूर , टोळधाड, कीड, वादळ, आग, वीज या शत्रूपासून ते वाचले तर जोमात येते. नाहीतर भुईसपाट होते . रहमानने त्याच्या बायको मुलांसह रात्रंदिवस जिवापाड कष्ट केले. त्याचे फळही चांगले मिळाले. ऊस इतका वाढला की त्यात हत्ती लपून राहावा . सारा गाव आश्चर्यात बुडाला. आता रहमान सर्व संकटातून पार होणार अशी सर्वांची खात्री झाली . पण विधीलिखित कोण बदलणार ? मार्गशीर्ष चालू होता. रहमान बांधावर बसून राखण करत होता . अंगावर पांघरायला फक्त एक जुनी चादर होती. म्हणून त्याने उसाची वाळकी पाने गोळा करून शेकोटी पेटवली. अचानक जोरात वारे वाहू लागले. जळती पाने उडून पिकात पडली. पिकाने पेट घेतला. आगीच्या ज्वाला तुटणाऱ्या ताऱ्यांच्या वेगाने दूरवर झेप घेऊ लागल्या . हा हा म्हणता त्यांनी सगळे शेत कवेत घेतले व जाळून राख केले. रहमानची सगळी स्वप्ने या राखेत मिसळली. तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. तो पूर्ण खचला. दाउदयालच्या कर्जाची काळजी भुतासारखी त्याच्या मानगुटीवर बसली. त्याला स्वत: ची किंवा बायकोमुलाची काळजी नव्हती . अन्नवस्त्राशिवाय राहण्याची सवय शेतकऱ्याला असतेच. त्याला काळजी होती ती कर्ज फेडण्याची . “ त्यांच्यासारख्या सज्जन माणसाला मी आता कसे तोंड दाखवू? गहाण टाकण्यासाठी शेतही नाही आणि विकण्यासारखे बैलही नाहीत. मी तर माझ्याकडून सगळे प्रयत्न केलेत . आता सारे अल्लाच्या

संपल्यामुळे तो पैसे मागायला आला होता. शेताची परिस्थिती डोळ्यासमोर होती; पण तो रहमानला म्हणाला, “ तुझ्या उसाचा मक्ता आम्ही घेतला नव्हता . तेव्हा आता काही कारणे न सांगता साहेबांकडे चल. “ नोकराने त्याचा हात ओढत म्हटले व फेटा बांधण्याची संधी न देता तो रहमानला घेऊन निघाला. त्या पाच कोसांच्या प्रवासात रहमान काही बोलला नाही. मान खाली घालून तो सतत अल्लाची करुणा भाकत होता . तीच आता त्याचा आधार होती . दाऊदयाल दाराशी शतपावली करत होता. रहमानने त्याचे पाय धरले व म्हणाला , “ दया करा साहेब , फार संकटात सापडलो आहे. सगळ्यात चांगला ऊस माझ्या शेतात होता ; पण जळून गेला. शेत झाडून साफ केल्यासारखे झाले आहे. असे झाले नसते. तर तुमच्या कर्जातून नक्कीच मोकळा झालो असतो . “ मग आता काय करायचे ? पैसे देतोस की दावा ठोकू तुझ्यावर ? “ “ तुमची मर्जी असेल तसे करा. तुमचे देणे फेडायचे आहे एवढेच माझ्या ध्यानीमनी आहे. दोन वेळा वायदा केला; पण पूर्ण करू शकलो नाही. आता मी वायदा करत नाही . जेव्हा जे काही मिळेल ते तुम्हाला आणून देईन. मेहनत मजुरी करेन , अर्धपोटी राहीन; पण कसेही करून तुमचे पैसे देईन . या उप्पर तुमची मर्जी. ” “ दाऊदयाल स्मित हास्य चेहल्यावर खेळवत विचारु लागला , “ आता, यावेळी तुझी सगळ्यात मोठी इच्छा कोणती आहे ते सांग बरे . “ “ तुमचे सगळे पैसे द्यावेत हीच एकमेव इच्छा आहे माझी. “ “ ठीक आहे. मग असे समज की , तू माझे पैसे मला दिले आहेस. “ “ नाही नाही साहेब, असे बोलू नका. इथे नाही देऊ शकलो, तरी देवाघरी द्यावेच लागतील. “ “नाही रहमान, आता तू काळजी करू नकोस . मी तुझी परीक्षा पाहत होतो . “

हाती. “

सकाळची वेळ होती . बांधावर उभे राहून रहमान उद्ध्वस्त शेताकडे बघत होता . तेथे दाऊदयालचा नोकर आला . त्याच्या हातात काठी होती . त्याला बघून रहमानचे प्राण कंठाशी आले. मुदत

” सरकार , असे करू नका. इतके मोठे ओझे घेऊन मी सुखाने मरु शकणार नाही . “ “ अरे कसले ओझे ? तुझ्याकडून माझे कोणतेही येणे बाकी नाही. काही असले तरी मी ते माफ केले आहे. तू आता मला एकही पैसा देणे लागत नाहीस . इथेही नाही आणि परलोकातही नाही . खरेतर मीच तुझा कर्जदार आहे. मी ते तुला परत करतो आहे. तुझी गाय अजून माझ्याकडे आहे. आतापर्यंत तिने मला कमीत कमी आठशे रुपयांचे दूध दिले आहे. दोन वासरांचा नफा झाला तो वेगळाच . तू जर ही गाय कसायालादिली असतीस, तर माझा एवढा फायदा झाला असता का ? त्यावेळी तू पाच रुपयांचेनुकसान सोसून गाय मला विकलीस. तुझी ती सज्जनता मी विसरलो नाही. त्या उपकाराची फेड करणे माझ्या ताकदीच्या बाहेर आहे. तू गरीब आणि अडाणी असून गायीचे प्राण वाचवण्यासाठी पाच रुपयांचेनुकसान सहन करतोस. अरे, तुझ्यापेक्षा शंभरपटीने मी वरचढ आहे. मग मी चारपाचशे रुपये माफ केले तर कोणती मोठी गोष्ट आहे ? माझ्यावर नाही; पण माझ्या धर्मावर तू नकळतपणे ते उपकार केले आहेस. मीसुद्धा तुला कार्यासाठी पैसे दिले होते. बघ, झाली की नाही तुझी माझी बरोबरी ? तुझी दोन्ही वासरे तुला हवी तेव्हा घेऊन

जा . तुझ्या शेतीसाठी उपयोगी पडतील . तू प्रामाणिक आणि सभ्य आहेस. तुला मी कधीही मदत करायला तयार आहे . आता तुला जेवढ्या पैशांची गरज आहे, तेवढे मी तुला द्यायला तयार आहे. “ रहमानला वाटले की , कुणीतरी देवदूत आपल्याशी बोलतो आहे. माणूस उदार असला तर देवदूत आहे, नीच असला तर सैतान आहे. या दोन्ही मानवी प्रवृत्ती आहेत . दाऊदयालचे आभार मानण्यासाठी रहमानला शब्द सुचेना . अश्रू आवरत तो म्हणाला, “ साहेब , तुमच्या या भलेपणाचे फळ अल्ला तुम्हाला जरूर देईल . मी आजपासून स्वत: ला तुमच्या गुलाम मानतो आहे. “ “ नाही रे, तू माझा मित्र आहेस. “ “ नाही साहेब , गुलाम. “ “गुलामीतून सुटका होण्यासाठी गुलामजे पैसे देतो त्याला मुक्तिधन म्हणतात . तु तुझे मुक्तिधन पूर्वीच दिले आहेस. आता चुकूनही हा शब्द तोंडातून काढू नकोस. “

सव्वा शेर गहू

एका गावात शंकर नावाचा एक गरीब व साधाभोळा शेतकरी राहायचा. तो कुणाच्या अध्यात मध्यात नसायचा. अतिशय सरळमार्गी होता . मिळाल्यास जेवायचा, नाहीतर चणेफुटाणे खाऊन पोट भरायचा. तेही न मिळाले तर नुसते पाणी प्यायचा आणि रामनामाचा जप करीत झोपून जायचा ; पण जेव्हा कधीतरी एखादा पाहुणा,विशेषत : एखादा साधू दाराशी आला तर जगरहाटीनुसार वागणे शंकरला भाग पडायचे. तो स्वत : उपाशी राहू शकायचा; पण साधूला कसे उपाशी ठेवणार ? देवांचे भक्त ना ते ? एके संध्याकाळी असेच एक साधू महात्मा त्याच्या घरी आले. तेजस्वी मूर्ती होती . पितांबर नेसले होते. जटाधारी, कमंडलू, खडावा , डोळ्यावर चष्मा असे त्यांचे रूप होते. एकंदरीत ते तपस्था , गाडीतून देवस्थानाची परिक्रमा व योगसिद्धी प्राप्ती यासाठी श्रीमंता घरी रुचकर भोजन घेणारे महंत वाटत होते. शंकरच्या घरात भाकरीचे पीठ होते; पण एवढ्या थोर माणसाला भाकरी कशी वाढणार ? शंकर काळजीत पडला. गव्हाचे पीठ उसने मागत तो गावात फिरला; पण त्याला मिळाले नाही . गावात सगळे मनुष्यप्राणी राहत होते, देव एकही नव्हता , तर मग देवाचे अन्न कसे मिळणार ? सुदैवाने गावातल्या पुरोहिताकडे थोडे गहू होते. त्यांच्याकडून शंकरने सव्वाशेर गहू उसने घेतले व बायकोला दळण्यासाठी दिले. साधू महाराजांनी जेवण केले व चांगली झोप काढली. पहाटे आशीर्वाद देऊन निघून गेले . पुरोहित वर्षातून दोन वेळा धान्याची रास उचलायचा. शंकरने विचार केला की , खळे झाल्यावर नेहमीपेक्षा थोडे जास्त गहू पुरोहिताला दिले की प्रश्न मिटेल . चैत्रात जेव्हा पुरोहित आला तेव्हा सुमारे दीड घडा गहू शंकरने त्याला दिले व त्याच्या उपकारातून आता मोकळे झालो असे त्याने गृहीत

धरले. त्याने तसे काही पुरोहिताला उघडपणे म्हटले नाही, पुरोहितानेही कधी मागितले नाही ; पण ते सव्वाशेर गहू चुकते करण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल हे तेव्हा त्या साध्याभोळ्या शंकरला कुठे माहीत होते ? त्या प्रसंगाला सात वर्ष लोटली. दरम्यान पुरोहित सावकार बनला होता. शंकर शेतकरी होता तो मजूर बनला. त्याचा छोटा भाऊ मंगल वाटणी करून वेगळा झाला होता . दोघे भाऊ एकत्र होते. तेव्हा शेतकरी होते. वेगळे झाल्यावर मजूर बनले . वाटणी होऊ नये यासाठी शंकरने खूप प्रयत्न केले; पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता . दोन भाऊ शत्रू झाले. प्रेमाचे, दुधाचे, रक्ताचे नाते तुटून गेले. वंशवृक्ष मुळापासून उखडला गेला. शंकरने सात दिवस अन्नाचा एक कण घेतला नाही . ज्येष्ठाच्या कडक उन्हातही तो दिवसभर काम करायचा . भीषण दु: ख व कष्टाच्या अतिरेकाने त्यालाबिछान्यावर खिळवले. आता पोट भरायचे तरी कसे ? पाचबिघे जमीन होती, ती अर्धीच राहिली . बैल एकच राहिला. शेती कशी करणार ? शेवटी अशी वेळ आली की , शेती फक्त प्रतिष्ठेची खूण बनली व पोटासाठी मजुरी करावी लागली . एके दिवशी मजुरी करून शंकर घराकडे जात होता . पुरोहिताने त्याला वाटेत अडवले व म्हणाला, “ शंकर, कधीपासून तुझ्याकडून साडेपाच मण गहू मला येणे आहे. त्याविषयी तू शब्दही बोलत नाही. फुकटात पचवायचा विचार आहे का ? उद्या माझ्याकडे ये आणि तुझ्या देण्याघेण्याचा हिशोब कर . “ शंकरला फार आश्चर्य वाटले . तो म्हणाला, “कधी घेतले होते मी गहू ? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझ्याकडे छटाकभर धान्य किंवा एक पैसाही उधार राहिलेला नाही . “ “ अरे , याचेच तर फळ भोगतो आहेस . आज खायला मिळायची मारामार आहे. “ असे म्हणून पुरोहिताने सात वर्षांपूर्वी शंकरला दिलेल्या सव्वाशेर गव्हाविषयी सांगितले . ते ऐकून शंकरला काय बोलावे हे सुचेना . केवढा हा स्वार्थ! सव्वाशेर धान्य अंड्याप्रमाणे उबवले आणि मला गिळणारे केवढे मोठे पिशाच्च आज त्यातन उभे केले. इतक्या वर्षांत एकदा जरी म्हणाले असते तर गह मोजन दिले

असते. उघडपणे तो म्हणाला, “महाराज , मी कधी बोलून दाखवले नाही ; पण खळ्यातून बऱ्याच वेळा शेर, दोन शेर गहू दिले आहेत . आज तुम्ही साडेपाच मण मागत आहात . एवढे मी कुठून आणू? “ तू जे दिले म्हणतोस त्याचा हिशोब तर वहीत काही लिहिलेला नाही. तुझ्या नावावर साडेपाच मण आहेत . कुणाकडूनही हिशोब लावून घे व देऊन टाक . मग वहीतून तुझे नाव खोडून टाकतो, नाहीतर अजून वाढत जातील. “ “ का गरिबाला सतावता महाराज ? मलाच खायला दोन घास मिळत नाहीत . तुम्हाला कुठून आणून देऊ ? “ कुठूनही आण , मी छटाकभरही कमी घेणार नाही . नाही दिलेस तर देवाघरी गेल्यावर सुद्धा यावेच लागतील. मी सोडणार नाही . “ बिचारा पापभिरु शंकर घाबरला. तो शिकला- सवरला असता तर म्हणाला असता की बरे आहे, आता देवाच्या घरी गेल्यावरच देईन ; पण तो इतका तार्किक व व्यवहाराचतुर नव्हता . एक तर कर्ज, ते ही ब्राह्मणांचे. फेडले नाही तर सरळ नरकातच जाणार. तो म्हणाला, “ महाराज, तुमचे देणे मी येथेच आणि याच जन्मात फेडणार . या जन्मीचेदुर्भाग्य पुढच्या जन्मापर्यंत कशाला बाकी ठेवू ? पण तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात . राईचा पर्वत केलात तुम्ही . ब्राह्मण असून असे वागलात ? त्याचवेळी मागितले असते तर आज माझ्यावर एवढा भार पडला नसता. तुमचे देणे मी देणारच आहे; पण देवाघरी तुम्हालापण जाब द्यावा लागेल. “ “ देवाघरची भीती तुलाच आहे. मला काय होणार ? तेथे सगळे आमचेच बांधव आहेत . ऋषिमुनी , देवता सगळे ब्राह्मणच आहेत . काही कमी - जास्त झाले, तर घेतील सांभाळून . तू गहू कधी देतोस तेवढे बोल. आता मी थांबायला तयार नाही . आधीच सात वर्ष उशीर झाला आहे. गहू देऊ शकत नसशील, तर त्याची किंमत देईन असा कागद लिहून दे. “

हतबल होत शंकर म्हणाला, “ द्यावे तर लागणार आहे. मला गहू काय आणि कागद काय ? कोणत्या हिशोबाने किंमत ठरवणार ? “ पुरोहित मानभावीपणे म्हणाला, “ बाजारभाव रुपयाला पाच शेराचा आहे. तुझ्यासाठी मी सव्वापाच शेराचा लावतो. “ शंकर म्हणाला, “ मी बाजारभावाप्रमाणेच देतो . पावशेराची सवलत घेऊन पाप कशाला घेऊ ? “ हिशोब केला तर गव्हाची किंमत साठ रुपये झाली. करारनामा केला. व्याज शेकडा तीन रुपये ठरले . वर्षभरात रक्कम न दिल्यास व्याज शेकडा साडेतीन रुपये ठरवले. स्टॅम्प व कागदपत्राचे एक रुपया बारा आणे हा खर्च शंकरलाच करावा लागला . सगळ्या गावाने पुरोहिताची निंदा केली; पण त्याच्या माघारी . सगळ्यांनाच सावकाराकडे कधीतरी काम पडतेच. समोर कोण बोलणार ? वर्षभर शंकरने खडतर कष्ट उपसले. मुदतीच्या आत पैसे फेडण्याचेत्याने क्रत घेतले. तसेही आधी दुपारी चूल पेटायची नाही . चण्याफुटाण्यांवर गुजारा व्हायचा. आता तेही बंद झाले. फक्त मुलासाठी भाकरी केली जायची. शंकरला रोज एक पैशाची तंबाखू खाण्याची सवय होती. आता ते व्यसनही सुटले. पूर्वीचे कपडे फेकण्याच्या लायकीचे होते , ते आता शरीर झाकण्यापुरते मर्यादित झाले. शेकोटीसमोर बसून शिशिरातील हाडे फोडणाऱ्या कडाक्याच्या थंडीवर त्याने मात केली. त्याच्या या कष्टांचे फळ अपेक्षेपेक्षाही जास्त मिळाले. वर्षाच्या शेवटी त्याच्याकडे साठ रुपये जमले . ते साठ रुपये आता व व्याजाचे पंधरा रुपये नंतर द्यावे असे ठरवून तो पुरोहिताकडे गेला; पण पंधरा रुपयांसाठी आणखी थांबण्याची पुरोहिताची तयारी नव्हती . तो म्हणाला , “माझी पै नि पै चुकवशील तेव्हाच कर्जातून मोकळा होशील . जा , आधी माझे उरलेले पंधरा रुपये घेऊन ये . “ शंकर गयावया करत म्हणाला, “ माझ्यावर दया करा महाराज आता रात्रीच्या भाकरीचाही भरवसा उरलेला नाही. मी कुठे पळून जाणार आहे का ? तुमचे पैसे मी लवकरच देईन . “

” ते काही मला चालणार नाही. आज जर माझे सगळे पैसे मिळाले नाहीत तर आजपासून शेकडा साडेतीन रुपये व्याज सुरू होईल . हे आणलेले साठ रुपये वाटले तर इथेच ठेव किंवा परत ने . “ “ हे आणलेले तर ठेवून घ्या कुठून तरी पंधरा रुपये मागून आणतो, शंकर म्हणाला . शंकरला गावात कुणीच मदत केली नाही . कारण पुरोहिताच्या तावडीतील सावजाला वाचवण्याचे साहस कुणात नव्हते . क्रियेस प्रतिक्रिया हा नैसर्गिक नियम आहे. शंकरचा संयम आता निराशेत रूपांतरित झाला . हे कर्ज फेडणे अशक्य असेल, तर प्रयत्न तरी का करायचे असा विचार तो करू लागला. कर्जाचे ओझे मणभराचे असो की सव्वामणाचे, त्याने काय फरक पडणार ? त्याचा उत्साह मावळला. कष्ट करण्याविषयी तिरस्कार वाटू लागला. आशा हीच उत्साहाची जननी आहे. शंकर तर आशाहीन व उदासीन झाला. गेले वर्षभर त्याने मारलेल्या इच्छा आता उरावर पाय देऊन चढल्या . शंकरने मजुरीचा पैसा त्या पूर्ण करण्यावर खर्च करणे सुरू केले. तंबाखूसोबत गांजा व चरसाचा नाद लागला. जणूत्याच्यावर काही देणे बाकी नव्हते , अशाप्रकारे तो वागत होता . पैसे फेडण्याची चिंता त्याने सोडून दिली . अशाप्रकारे तीन वर्ष गेली. त्या काळात पुरोहिताने एकदाही पैशाची मागणी केली नाही. चतुर शिकाऱ्याप्रमाणे योग्य वेळी अचूक नेम साधण्यात तो तरबेज होता . आधीपासून सावजाला सावध करणे त्याच्या नीतीविरुद्ध होते. मग एकदा त्याने शंकरला बोलावून घेतले व त्याचा हिशोब दाखवला. जमा केलेले साठ रुपये धरून शंकरकडून आता एकशेवीस रुपये येणे बाकी होते . शंकर म्हणाला, “ एवढे पैसे मी या जन्मात देऊ शकत नाही . पुढच्या जन्मात देईन. “ “ मी तर याच जन्मात वसूल करेन . मुद्दल नाही तर व्याज तरी द्यावेच लागेल तुला; पुरोहिताने बजावले.

” आता माझ्याकडे एक झोपडी व एक बैल आहे. ते घेऊन टाका. “ “ ते माझ्या काय कामाचे? मला द्यायला अजून तुझ्याकडे बरेच काही आहे. “ “ अजून काय आहे ? “ तू स्वत: तर आहेस . मला मजुरांची गरज आहे. तू आता व्याज म्हणून माझ्याकडे मजुरी कर. नंतर सोयीने मुद्दल फेडून टाक . तुझी काही मालमत्ता नाही. एवढी मोठी रक्कम मी कशाच्या भरवशावर सोडू? तू व्याजही फेडू शकत नाहीस तर मुद्दलाची काय कथा ? “ महाराज, व्याजाच्या बदल्यात काम केले तर काय खाऊ ? “ “ तुझ्या बायको, मुलाला हातपाय चालवता येत नाहीत का ? तुला मी रोज अर्धा शेर जव, वर्षातून एक कांबळे व एक सदरा देईन . अजून काय पाहिजे ? लोक तुला सहा आणे मजुरी देतात ; पण मी देणार नाही, कारण माझे पैसे फेडण्यासाठी मी तुला कामावर ठेवत आहे. “ “ महाराज, ही तर गुलामी झाली. “ “ गुलामी समज की मजुरी समज. पैसे वसूल केल्याशिवाय तुझी सुटका नाही. तू पळालास तर तुझा मुलगा कर्जफेडेल. “ पुरोहिताच्या निर्णयावर काही अपील नव्हते. मजुराची बाजू कोण घेणार ? पळून तरी कोठे जाणार ? दुसऱ्या दिवसापासून सव्वाशेर गव्हाच्या बदल्यात जन्मभराच्या गुलामीची बेडी शंकरच्या पायात अडकली. पूर्वजन्मीचे भोग मानून तो स्वत: ची समजूत घालत होता . पूर्वी कधी न केलेली कामे त्याच्या बायकोला करावी लागत होती . दोन वेळेच्या भाकरीसाठी मुले तळमळत होती. मुकाट्याने सहन करण्याशिवाय शंकरला गत्यंतर नव्हते . ते गहू एखाद्या शापासारखे आजन्म त्याच्या डोक्यावर राहिले. अशाप्रकारे शंकरने बारा वर्ष गुलामी केली. त्यानंतर या खडतर जगाचा निरोप घेत देवाघरी गेला. त्याचे एकशेवीस रुपये अजून बाकी होते. तो देवाघरी गेल्यामुळे पुरोहिताने त्याचा नाद सोडला व

त्याच्या तरुण मुलाची मानगूट धरली. आजही तो मजुरी करत आहे. त्याची सुटका कधी होणार हे देवच जाणे . वाचक हो ! ही कथा काल्पनिक समजू नका. असे अनेक शंकर व अनेक पुरोहित या जगात आहेत .

बलिदान

माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा त्याच्या नावावर मोठा परिणाम होतो. मौजे बेला येथील मंगरु ठाकूरला फौजदार झाल्याबरोबर मंगलसिंह असे मानाचे नाव मिळाले . त्याला मंगरू म्हणण्याची कुणाचीहिंमत राहिली नाही . तसेच कल्लू हा साधा गवळी होता . त्याने ठाणेदार साहेबांशी मैत्री केली व गावचा सरपंच झाला. त्यामुळे त्याचे नाव कालिकादिन झाले . कुणीत्याला कल्लू अशी हाक मारली तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते . असाच अजून एका नावात बदल झाला; पण तो विरुद्ध दिशेने . हरखचंद्र हा जेव्हा प्रतिष्ठित व श्रीमंत होता तेव्हा त्याचा थाट काही वेगळाच होता. वीस वर्षांपूर्वी त्याची खूप मोठी शेती होती . अनेक नांगर चालायचे. त्याच्याच कारखान्यात साखर तयार व्हायची. त्याचा साखरेचा व्यवसाय मोठा होता . परदेशातून साखर आयात होऊ लागल्यामुळे त्याचा धंदा बसला. कारखाना बंद पडला . ग्राहक गेले. जमीन गेली. तोही मनाने खचला. तेव्हापासून हरखचंद्रचा हरखू झाला. वयाच्या सत्तरीत डोक्यावर खताची टोपली घेऊन तो शेतात जातो . त्याच्याकडे आता केवळ पाच बिघे जमीन , दोन बैल व एक नांगर आहे; पण सुंभ जळाला तरी पीळ मात्र गेलेला नाही. चेहऱ्यावरचे गांभीर्य, बोलण्यातला रुबाब, स्वाभिमान या सर्व बाबी अजून टिकून आहेत. आजही पंचायतीत त्याच्या शब्दाला मान आहे. हरखूने आपल्या आयुष्यात कधी औषधपाणी घेतलेले नाही . बऱ्याच वेळा तो आजारी पडायचा . अश्विन महिन्यात तर मलेरियाने हमखास हैराण व्हायचा; पण औषध न घेता पाच - दहा दिवसांत बरा व्हायचा. या वर्षीही तो कार्तिकात आजारी पडला. त्याने आधी पर्वा केली नाही; पण ते दुखणे यमाचा परवाना घेऊन आले होते. तो खाटेला खिळला. त्याला औषधांची गरज वाटू लागली .

त्याचा मुलगा गिरधारी त्याला मुळ्या उगाळून घ्यायचा , कडुनिंबाचा काढा द्यायचा ; पण फायदा झाला नाही. आपला शेवटचा प्रवास सुरु झाल्याची खात्री हरखूला पटली . एके दिवशी मंगलसिंह त्याला भेटायला गेला. औषध घेण्याची गरज असल्याचे त्याने हरखूला सांगितले व काळजी दाखवली. हरखू नाइलाजाने तयार झाला. क्विनाइन घेऊन येतो असे सांगून मंगलसिंह निघून गेला. दुसऱ्या दिवशी कालिकादिन गेला. तोही औषधाबद्दल बोलला . त्यालाही औषध आणून देण्याविषयी हरखूने सांगितलं ; पण आजारी माणसाला बघायला जाणे आणि त्याला औषध नेऊन देणे या दोन गोष्टी अगदीच वेगळ्या आहेत . पहिली गोष्ट घडते ती शिष्टाचारामुळे . दुसरी गोष्ट घडण्यासाठी सहानुभूतीची आवश्यकता असते. हरखू बाजेवर पडून असायचा मंगलसिंह व कालिकादिन नजरेस पडले की औषधाबद्दल विचारायचा. दोघेही उत्तर न देता सटकून जायचे. औषध फुकटात येत नाही, हे जणू हरखू विसरला होता. त्याने कधी पैसे देण्याचा विषय काढला नाही ; औषधही त्याच्यापर्यंत आले नाही. असे पाच महिने अतिशय त्रास सोसून नेमक्या होळीच्या दिवशी त्याने शेवटचा श्वास घेतला. गिरधारीने त्याची वाजत गाजत मोठी अंत्ययात्रा काढली . सर्वक्रियाकमें व्यवस्थित केली. आसपासच्या अनेक ब्राम्हणांना बोलावले . गावात ती होळी साजरी झाली नाही. त्यासाठी काही लोकांनी हरखूच्या नावाने बोटे मोडली; पण उघड नाही, मनातल्या मनात. शोकप्रसंगात सण साजरा करण्याइतके निर्लज्ज त्या गावात कुणी नव्हते . ते काही शहर नव्हते. शहरात कुणी कुणाच्या सुखदु: खात सहभागी नसते. लवकरच हरखूच्या शेतावर गावकऱ्यांची आशाळभूत नजर पडली. ती जमीन मिळावी यासाठी अनेक जण लाला ओंकारनाथच्या मागे लागले . ओंकारनाथ जमीनदार असल्यामुळे कोणती शेती कुणाला कसायला द्यायची हे त्याच्या अधिकारात होते . तो मात्र सर्वांना टाळत होता . त्याच्या मते , गिरधारीचा त्या शेतावर मुलगा या नात्याने हक्क होता . त्याने कमी नजराणा दिला तरी त्यालाच शेती द्यावी, असा त्याचा विचार होता. सर्वक्रियाकर्मातून मोकळा झालेल्या गिरधारीला त्याने बोलवून

घेतले व त्याला म्हणाला, “ या शेतीचाच तुला आधार आहे , ती तूच कर. आजकाल जमिनीचे भाव किती वाढले आहेत ते तुला माहीतच असेल. तू आठ रुपये बीघा या दराने सारा देतोस. मला आता दहा रुपये मिळत आहेत. शिवाय नजराणाही जास्त मिळू शकतो . तुला मी एक सवलत देतो . सायचे पैसे तेवढेच म्हणजे आठ रुपये राहू देत साऱ्याचा भाव; पण नजराणा म्हणून तू मला शंभर रुपये दे. “ गिरधारी म्हणाला, “ सरकार , सगळे पैसे वडिलांच्या क्रियाकर्मात खर्च झाले व यंदा पीकही चांगले झाले नाही . सध्या माझ्या घरात दोन वेळचे जेवण मिळण्यास अडचण आहे. कुठून देऊ मी तुमचा नजराणा? फार तर बैल विकून पन्नास रुपये देऊ शकतो. ओंकारनाथ चिडून म्हणाला, “ हे पैसे घेऊन मी मजा मारतो असे तुला वाटते काय ? माझी अवस्था मलाच ठाऊक आहे. पटवारी, तहसीलदार , कधी हे साहेब तर कधी ते साहेब येतात. सगळे माझेच पाहुणे असतात. त्यांचा पाहुणचार करावा लागतो. त्याचा हजार बाराशे रुपये वर्षाला मला खर्च येतो. त्यांना खूश नाही केले तर माझी ते बदनामी करणार , वर त्यांची वाकडी नजर सहन करावी लागणार, ते काही नाही . नजराणा आणून दे एका आठवड्यात , नाहीतर जमीन दुसऱ्या कुणाला देऊन टाकतो. “ शंभर रुपये जमवणे ही गिरधारीसाठी अशक्य गोष्ट होती . बैल विकू शकत नाही, घर कुणी घेणार नाही , उधारी कुणी देणार नाही . झाडे विकून तेवढे पैसे येणार नाहीत. मोडायला घरात एक दागिना नाही. एकच साखळी होती ती वाण्याकडे गहाण पडली. गिरधारी व त्याची पत्नी सुभागी दोघे काळजीत पडले. तोंडाची चव व रात्रीची झोप दोन्ही गायब झाल्या . हातातून शेती जात असल्याची जाणीव काळजाला डागण्या देत होती .. शेती ही गिरधारीच्या जीवनाचा एक हिस्सा होती . तिचा प्रत्येक कण त्याच्या घामाने भिजला होता. चोवीसा, बावीसा, नालेवाला, तळेवाला ही त्याच्या शेतांची नावे लेकरांच्या नावांप्रमाणे सतत त्याच्या ओठांवर खेळत असायची. त्याच्या सर्व आशा- आकांक्षा या शेतांवरच विसंबून होत्या .

त्यांच्याशिवाय जगणे हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. आता ती शेतीच त्याच्यापासून हिसकावली जाणार होती . जीव घाबरा झाला की , गिरधारी शेतात जाऊन कितीतरी वेळ पाहात राहायचा . निरोप घेत असल्यासारखा त्यांच्याकडे पाहत राहायचा. डोळ्यातून घळाघळा अश्रू वहायचे. असा एक आठवडा गेला. तो शंभर रुपये जमवू शकला नाही. शंभर रुपये नजराणा व दहा रुपये बिध्याप्रमाणे आपली शेती कालिकादिनने घेतली हे त्याला आठव्या दिवशी समजले. त्याने एक थंड नि :श्वास सोडला. त्या दिवशी घरात चूल पेटली नाही. जणू हरखू त्याचदिवशी मेला . सुभागी चूपचाप बसून अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नव्हती . रागाच्या भरात ती कालिकादिनच्या घरी गेली . त्याच्या पत्नीशी तिने जोरदार भांडण केले व आपला संताप बाहेर काढला . ती म्हणाली , “कालचा वाणी आजचा शेठ! चाललाय शेती करायला. माझ्या शेतात कोण नांगर घालतो ते बघतेच मी . चांगले फोडून काढेन त्याला. “ काही बघ्यांनी सुभागीची बाजू घेतली. सगळे वैभव असताना कालिकादिनने असे करायला नको होते. नशिबाने हातात पैसा आहे म्हणून गरिबाचा असा जीव घ्यायचा का ? सुभागीला वाटले ती जिंकली व ती शांत झाली. पाण्यात हलकेसे तरंग उठवणारा वारा झाडांना मुळांपासून उखडून टाकू शकतो . बोलून बोलून सुभागीचे मन हलके व्हायचे; पण गिरधारीची अवस्था फार बिकट होती . तो दारात बसून चिंता करीत राहायचा. आता माझे काय हाल होतील? हा जन्म मी कसा रेटायचा ? मुले कुणापुढे हात पसरतील ? मजुरी करावी का ? मजुरीचा विचारही त्याला सहन व्हायचा नाही . मजुरी म्हणजे अधम चाकरी. स्वावलंबी व सन्मानाचे जीवन इतके वर्षे जगल्यानंतर मजुरी करण्यापेक्षा मरणे कितीतरी पटीने चांगले असे त्याचे मत होते . आतापर्यंत तो गावातला एक प्रतिष्ठित गृहस्थ होता . त्याच्याकडे पैसा नव्हता; पण मान होता . गावाच्या बाबतीत बोलण्याचा त्याला अधिकार होता . सुतार, न्हावी , कुंभार, भटजी, भाट , चौकीदार

हे सर्व त्याला मान द्यायचे; पण आता काय ? आता त्याचा मानही त्याच्या शेतांबरोबर निघून गेला. आता दुसन्याची गुलामी करण्याची वेळ ओढवली. संध्याकाळी बैलांना गोठ्यात कोण नेईल ? गाणी म्हणत ते नांगर ओढणे आता विसरायला हवे. सळसळती पिके पाहून त्याला किती अनिवार आनंद व्हायचा. खळ्यातली धान्याची रास पाहून तो स्वत : ला राजा समजायचा. आता टोपल्या भरभरून धान्य कोण आणेल ? त्या सगळ्या सुखांना तो पारखा झाला. कालिकादिनचा हेवा करणारे दोन - चार जण गिरधारीचे सांत्वन करायचे; पण तो त्यांच्याशीही मोकळेपणाने बोलायचा नाही . आपण आता सर्वांच्या नजरेतून उतरलो आहोत असे त्याला वाटू लागले. हरखूच्या क्रियाकर्मासाठी केलेला खर्च हा विनाकारण होता असे मात्र त्याला कधी वाटले नाही . कुणी तसे म्हटले तर त्याला खूप वाईट वाटायचे. सर्वक्रियाकमें विधीपूर्वक करून तो वडिलांच्या ऋणातून मुक्त झाला ही त्याची भावना होती. ज्यांनी दिवसातून चार वेळा खाऊ घातले त्यांना मरणानंतर पिंड पाण्यासाठी तळमळत कसे ठेवणार ? आता नाशिबात जे असेल ते होऊ दे. अशाप्रकारे तीन महिने सरले . आषाढ आला. आकाशात काळे ढग आले. शेतकरी नांगरणीची तयारी करू लागले . सुतार नांगर दुरुस्तीच्या कामाला लागले. गिरधारी वेड्यासारखा घरातून बाहेर व आत असा येरझाया करू लागला . त्याने आपले नांगर तपासले . एकही चांगल्या अवस्थेत नव्हता. कशाची मूठ तुटली होती. कशाचा फाळ सैल झाला होता , जोखडावरची खुंटी निघाली होती . तो धावत धावत रज्जू सुताराकडे गेला व म्हणाला, “ चल रज्जू माझे नांगर खराब झालेत . दुरुस्ती करून दे. “ । रज्जूने काही न बोलता त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिले व आपले काम करू लागला. मग गिरधारी भानावर आला. मुकाट्याने घरी परतला. गावात सगळीकडे धावपळ चालली होती . बियाणांचा शोध सुरू होता. कोणते बियाणे कुठे पेरायचे, पेरणी केव्हा करायची यावर सल्लामसलत चालली होती. हे सगळे पाहून गिरधारी पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडू लागला .

एके दिवशी संध्याकाळी मंगलसिंह गिरधारीकडे आला. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्याने बैलांचा विषय काढला. बैलांना बिनकामाचे ठेवून पोसण्यापेक्षा विकून टाकावे व तो स्वत : बैल घेण्यास तयार आहे असे त्याने सांगितले . गिरधारीने काही उत्तर देण्याच्या आधीच तेथे तुलसी वाणी आला. थकलेली उधारी वसूल करण्यासाठी तो आला होता. गिरधारीने अजून काही दिवसांची सवलत देण्याची विनंती केली; परंतु शेती नसल्याने कशाच्या भरवशावर ही सवलत द्यावी असे वाणी म्हणू लागला . त्यानंतर मंगल व तुलसीत काही गुप्त इशारे झाले व कुरकुर करीत तुलसी निघून गेला. मग गिरधारी मंगलसिंहाला म्हणाला, “ मला तुलसीचे पैसे द्यायचे आहेत म्हणून हे बैल मी तुम्हाला विकतो आहे. शिवाय तुम्हीच घेतले तर घरातले घरात राहिल्यासारखे होईल . निदान अधूनमधून मी त्यांना बघायला येईन . “ “ आत्ता लगेच मला गरज नाही ; पण घरी एकदा बोलून मग काय ते ठरवतो; पण हा तुलसी फार बदमाश आहे. कदाचित तुझ्यावर दावाही करेल, “ मंगलसिंह म्हणाला. सरळ मनाच्या गिरधारीवर ही धमकी मोठा परिणाम करून गेली. स्वस्तात सौदा करण्याची ही नामी संधी चलाख मंगलसिंह सोडणार नव्हताच . ऐंशी रुपयांची बैलजोडी साठ रुपयांत ठरली. गिरधारी बैलांकडे दु: खपूर्ण नजरेने पाहत होता. जणू ते शेवटचेच डोळे भरून पाहणे होते. “माझ्या शेतात कष्ट उपसणारे , माझे अन्नदाते , माझ्या जीवनाचा आधार, ज्यांच्या खाण्यापिण्याची काळजी मी स्वत: च्या मुलांपेक्षा जास्त केली, ते हे दोघे, माझे डोळे; माझी स्वप्ने माझ्यापासून दूर चालले आहेत . “ बैलांचे जाणे त्याला सहन होत नव्हते . गिरधारी मंगलसिंहाच्या खांद्यावर डोके टेकवून रडू लागला . आतल्या खोलीत सुभागी रडत होती . त्याचा छोटा मुलगा हातातली काडी काठीसारखी उगारून त्याचा निषेध करत होता . त्या रात्री गिरधारीने एकही घास घेतला नाही. बाजेवर नुसता पडून होता. सकाळीचिलीम भरून सुभागीने तिकडे नेली तेव्हा तो बाजेवर दिसला नाही. दिवस डोक्यावर आला तरी तो आला नाही. मग मात्र सुभागीच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे रडणे ऐकून शेजारी धावत

आले. सगळीकडे शोध सुरू झाला; पण गिरधारी सापडला नाही . संध्याकाळ झाली. काळोख दाटू लागला . सुभागी दारात कंदील ठेवून गिरधारीची वाट बघत बसली होती. तिला पावलांची चाहूल लागली. ती उठली, धावत बाहेर गेली . तिला दिसले की , गिरधारी बैलांच्या डोणीजवळ उभा आहे. ती म्हणाली, “ अहो, तिथे काय करता ? घरात या . कुठे होता दिवसभर ? “ बोलत बोलत ती त्याच्या जवळ जाऊ लागली. काही उत्तर न देता गिरधारी मागे मागे सरकू लागला व थोडे दूर जाऊन अदृश्य झाला. सुभागी घाबरून किंचाळली व बेशुद्ध पडली . दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे कालिकादिन नांगर घेऊन आपल्या शेतात पोहोचला तेव्हा थोडा अंधार होता . त्याचे लक्ष बांधाकडेगेले. तेथे गिरधारी उभा होता. बैलांना सोडून कालिकादिन त्याच्याकडे जात म्हणू लागला, “ अरे गिरधारी ! काय विचित्र माणूस आहेस तू ? तू इथे आहेस आणि तिकडे सुभागी रडून हैराण झाली आहे. कुठे गेला होतास ? तो जसाजसा गिरधारीच्या जवळ जात होता , तसा गिरधारी मागे मागे जाऊ लागला. मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत त्याने उडी घेतली. कालिकादिनने एक किंकाळी फोडली व नांगर, बैल तेथेच सोडून पळ काढला . सगळ्या गावात एकच गोंधळ उडाला. लोक वेगवेगळे तर्क -वितर्क करू लागले. गिरधारीच्या शेतात

जाण्याचे धैर्य कालिकादिनमध्ये उरले नाही . गिरधारी गायब होऊन सहा महिने झाले आहेत . त्याचा मोठा मुलगा आता एका वीटभट्टीवर मजुरी करतो आहे. महिन्याला वीस रुपये तो कमावतो. तो आता सदरा आणि इंग्रजी बूट वापरतो . जेवणात ज्वारीच्या ठिकाणी गहू आला आहे. असे असले तरी गावात त्याला आता प्रतिष्ठा नाही; कारण तो मजूर बनला आहे. सुभागी आपल्याच गावात परक्यासारखी दबकत वावरते . ती आता पंचायतीत बसू शकत नाही; कारण ती आता मजुराची आई आहे . कालिकादिनने गिरधारीची शेते लाला ओंकारनाथला परत दिली आहेत. कारण अजूनही शेतांमध्ये गिरधारी फिरताना दिसतो . संध्याकाळ झाली की तो बांधावर बसतो. कधी कधी रात्री तिथून रडण्याचा आवाज येतो. तो कुणाशी बोलत नाही. कुणाला त्रास देत नाही. फक्त आपल्या शेतांना बघत फिरत राहतो. दिवे लागण झाली की , तिकडचा रस्ता निर्जन होतो . कुणीतरी ती शेती घ्यावी असे लाला ओंकारनाथला खूप वाटते; पण गावकरी त्या शेतांचे नाव घ्यायलाही घाबरत आहेत .

अनमोल रत्न

प्रेमभंग झालेला दिलफिगार एका काटेरी झाडाखाली व्याकूळ होऊन अश्रू ढाळत बसला होता . सौंदर्याची साक्षात मूर्ती असणाऱ्या राणी दिलफरेबवर त्याचेजिवापाड प्रेम होते. छानछौकी प्रेमी तरुणासारखा तो थिल्लर नव्हता. साधाभोळा पण प्रेयसीसाठी वाटेल ते खडतर तप करणारा व प्रेमाची याचना करणारा निष्ठावंत सच्चा प्रेमी होता . त्याच्या खऱ्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी दिलफरेबने त्याला सांगितले होते की , जगातील सर्वांत अनमोल असणारी वस्तू जर त्याने तिच्यासाठी आणली, तर ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल . तशी वस्तू न आणता परत आला, तर तात्काळ सुळावर चढवले जाईल. स्वत: च्या भावना व्यक्त करण्याची व प्रेमिकेचे सौंदर्य एकवार डोळाभरून पाहण्याची किंचितही संधी त्याला मिळाली नाही … दिलफरेबच्या आदेशानुसार चोपदारांनी त्याला धक्के देऊन हाकलून दिले . आज तीन दिवस झाले . हे भलते संकट ओढवून घेतलेला बिचारा प्रेमी त्या पठारावरील काटेरी झाडाखाली बसून त्या अनमोल वस्तूचा विचार करतो आहे. अशी वस्तू मला मिळवता येईल ? अशक्य ! पण ती वस्तू आहे तरी कोणती ? अमृत ? खुसरोचा राजमुकुट ? इराणच्या बादशहासाठी प्रत्यक्ष देवतांनी बनवलेला प्याला? परवेजची दौलत ? नाही, या गोष्टी तर नक्कीच नाहीत; पण यापेक्षा मौल्यवान वस्तू कोणत्या ? आहेत त्या ? मला कशा मिळतील ? या अल्ला! या कठीण प्रसंगात माझी मदत कर. दिलफिगारचे मन विचारांच्या वावटळीत सापडले होते . बुद्धी अजिबात चालत नव्हती . मुनिरशामीला हातिमसारखा मदतनीस मिळाला होता. मलाही तसा कुणीमिळाला तर! भले ती वस्तू मला मिळो न मिळो; पण ती आहे तरी कोणती एवढे कळायला हवे. घागरी एवढा मोती, समुद्राचे गीत, दगडाचे

काळीज , मृत्यूचा आवाज आणि यापेक्षाही मौल्यवान गोष्टीचा शोध घेण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो; पण जगातील सर्वांत अनमोल वस्तू कोणती ? माझ्या कल्पनेपलीकडची आहे ती . रात्र झाली. आकाशात तारे चमचम करू लागले. दिलफिगार देवाचेनाव घेत उठला व चालू लागला. तो चालतच राहिला. भुकेला, तहानलेला, थकव्याने अर्धमेला झालेलादिलफिगार अनेक वर्षे अनेक शहरातून , उजाड वाळवंटातून शोध घेत फिरत राहिला. त्याचे शरीर हाडांचा सापळा दिसू लागले. काट्यांनी पायांची चाळणी केली. कपड्यांची लक्तरे झाली ; पण त्याचा शोध सुरूच राहिला. एके दिवशी असाच भटकत भटकत तो एका मैदानात पोहोचला . तेथे खूप लोक जमले होते . अनेक फेटेधारी व दाढीधारी विद्वान व धर्मगुरुही चर्चा करीत होते . मैदानात एक सूळ उभा केला होता . अनेक खुनांचे आरोप असलेल्या व काळा चोर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कैद्याला आज सुळावर चढवले जाणार होते . काय चालले आहे हे बघण्यासाठी दिलफिगार तेथे थांबला. थोड्याच वेळात हातापायात बेड्या घातलेल्या त्या कैद्याला तेथे सैनिकांनी आणले. फासाचा दोर त्याच्या गळ्यात टाकला. तेवढ्यात तो कैदी ओरडला, “ त्या देवासाठी , मला क्षणभरासाठी मोकळे करा . माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. त्याचे बोलणे ऐकून सर्वत्र शांतता पसरली. धर्मगुरूनी त्याला इच्छा पूर्ण करण्याची परवानगी दिली. त्याच गर्दीमध्ये एक राजबिंडा, निरागस लहान मुलगा काठीचा घोडा करून खेळत होता. त्या खेळाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर कमळासारखा फुलला होता . असा निर्मळ आनंद फक्त बालपणीच मिळतो व तो आपण जन्मभर विसरू शकत नाही . त्या बालकावर पापाची सावली अजून पडली नव्हती . स्वार्थाची धूळही त्याला लागली नव्हती . तो काळा चोर फासावरून उतरला. त्या लहान मुलाकडे गेला. त्याने प्रेमाने त्याला जवळ घेतले . हजारो नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या . त्या काळ्या चोराला त्याचे स्वत: चे असेच निर्मळ हास्य व निरागस बालपण , आई - वडिलांचे प्रेम सारे काही

आठवले होते . केलेल्या अपराधांचा आता शेवटच्या घटकेला पश्चात्ताप होऊ लागला. तो पश्चत्ताप आसवांच्या रुपाने डोळ्यांतून ओघळू लागला. दिलफिगार झटक्यात त्याच्या जवळ गेला. डोळ्यातून वाहणारा एक अश्रुबिंदू त्याने हातात झेलला. त्याचे मन त्याला ग्वाही देऊ लागले की , निश्चितच हा पश्चात्तापाचा अश्रू सर्वांत अनमोल आहे . आपल्याला मिळालेल्या यशाच्या आनंदात दिलफिगार आपली प्रेयसी, दिलफरेबच्या मीनोसवाद शहराकडे निघाला. पोहोचल्यावर भेटीची परवानगी घेऊन तो महालात गेला. दिलफरेब एका सोनेरी पडद्याआड बसली होती. अनमोल वस्तू दाखवण्याचा तिने आदेश दिला . दिलफिगारने तिला तो अश्रूचा थेंब दाखवला व त्या प्रसंगाचे सविस्तर व भावपूर्ण वर्णन केले. थोडा वेळ विचार करुन ती म्हणाली, “दिलफिगार , तू आणलेली वस्तू निश्चितच जगातील एक अमूल्य अशी भेट आहे. तुझी हुशारी व धैर्याला मी मानले आहे; पण ही काही सर्वाधिक अमूल्य वस्तू नाही . त्यामुळे तू पुन्हा एकदा प्रयत्न कर त्यासाठी मी तुला जीवदान देते . माझ्या प्रियकरात जे गुण असावेत असे मला वाटते , ते तुझ्यात आहेत . कधीतरी तू नक्की यशस्वी होशील. “ प्रेयसीचे बोलणे ऐकून अपयशी व निराश दिलफिगार थोडा धीट झाला. तो म्हणाला, “ तुझ्या भेटीची संधी माझ्या नशिबात कधी आहे ते माहीत नाही; पण एकदा तरी तुझ्या रूपाची झलक दाखवून माझ्यावर दया कर. त्यामुळे पुढे येणाऱ्या संकटांशी सामना करण्याचे बळ मला मिळेल. “ हे ऐकून दिलफरेबला राग आला व तिने चोपदाराकरवी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तिच्या त्या कठोर वागण्याने दिलफिगारच्या मनाला मोठी ठेच लागली. आता कुठे जावे याचा विचार तो करू लागला . तो प्रार्थना करु लागला, “ हे हजरत पैगंबर ! तुम्ही सिकंदरला अमृताच्या विहिरीचा मार्ग दाखवला होता . मला मदत करणार नाही का तुम्ही ? सिकंदर सगळ्या जगाचा राजा होता . मी एक घरदार नसलेला प्रवासी आहे. माझा तुम्ही उद्धार करणार नाही का ? हे महान जिबरिल! तू अल्लाचा खास दरबारी आहेस. माझ्यावर थोडीतरी दया कर. दिलफिगारच्या प्रार्थना फळास आल्या नाहीत

व तो पुन्हा सुचेल त्या दिशेला भटकू लागला . एके संध्याकाळी थकव्याने गलितगात्र होऊन तो नदीकाठी पडला होता . थोड्या वेळाने त्याचे लक्ष थोड्या अंतरावरील चितेकडे गेले. एक तरुण नववधू त्या चंदनाच्या चितेवर बसली होती . मांडीवर तिने प्रिय पतीचे डोके घेतले होते. जमलेली माणसे तिच्यावर फुलांचा वर्षाव करीत होती . चिता पेटवण्यात आली. ज्वालांनी तरुणीला वेढून टाकले. तिच्या चेहऱ्यावर पावित्र्य झळकत होते . थोड्याच वेळात ते कोमल शरीर राखेचा ढीग बनले. पतीवरील पवित्र व अमर प्रेमाची ती अखेरची लीला होती . सगळेजण निघून गेल्यावर दिलफिगार त्या चितेजवळ गेला. त्याने फाटक्या सदस्यामध्ये मूठभर राख बांधून घेतली. जगातली सर्वांत अमूल्य वस्तू सापडल्याच्या खात्रीने तो दिलफरेबकडे निघाला. प्रेयसीचे हृदय जिंकणे आता निश्चितपणे शक्य आहे, असा आत्मविश्वास त्याला वाटत होता . दिलफरेबने या पराक्रमी प्रियकराला लगेच दरबारात बोलावून घेतले. पडद्याच्या आडून तिने वस्तूसाठी हात पुढे केला. दिलफिगारने मोठे धैर्य एकवटून त्या हाताचे चुंबन घेतले व आणलेली राख तिच्या तळहातावर ठेवली. काळजाचेपाणी करणाऱ्या शब्दात त्या सर्व घटनेचे वर्णन केले . दिलफरेबने ती राख कपाळावर टेकवली. थोड्या वेळाने ती म्हणाली, “दिलफिगार , तू खरेच तुझे प्राण माझ्यावरून ओवाळून टाकले आहेस. ही राख खूपच मौल्यवान आहे; पण यापेक्षाही काहीतरी अधिक मौल्यवान आहे, तेव्हा तू आता परत जा . तिचा शोध घे . यावेळी तुला यश मिळावे म्हणून मीही प्रार्थना करेन. “ एवढे बोलून ती सोनेरी पडद्याआडून बाहेर आली. क्षणमात्र त्याला दर्शन देऊन विजेसारखी पडद्याच्या आड परत लुप्त झाली. तिच्या रूपदर्शनाने मंत्रमुग्ध झालेल्या दिलफिगारला चोपदारांनी बाहेर काढले. मात्र यावेळी धक्के न मारता हाताला धरून नेले . दिलफिगारचा धीर आता पूर्णतया सुटला. आपल्या कमनशिबाची खात्री त्याला पटली . प्रेयसीविरुद्ध तक्रार करण्यासाठी एक हाडही शिल्लक राहणार नाही इतक्या खोल दरीत उडी मारून जीव द्यावा असे त्याला वाटू लागले. त्या निश्चयाने तो उठला व बेभानपणे एका उंच पर्वतावर चढू

लागला.शिखरावर पोहोचल्यावर खोल दरीत उडी मारण्याच्या क्षणी एक वृद्ध माणूस अचानक माझ्या कुशीत ये. कारण आता तेवढीच जागा माझी स्वत: ची राहिली आहे. दुर्दैवाने तू अशा वेळी तेथे अवतीर्ण झाला. त्याने हिरवे कपडे घातले होते. डोक्यात हिरवा रुमाल आणि हातात जप माळ आला आहेस की , तुझे आदरातिथ्य मला करता येत नाही. हा देश आता आमचा राहिला नाही . होती. तो दिलफिगारला धीर देणाऱ्या स्वरात म्हणाला, “दिलफिगार ! अरे तू वेडा झालाय का ? आमच्याच भूमीवर आता आम्ही परके झालो आहोत. तरी पण शत्रूला आम्ही दाखवून दिले आहे की , अरे, आत्महत्या करणे हे तर भित्रेपणाचे लक्षण आहे. प्रेममार्गावर चालताना सर्वांत आधी हवा तो आम्ही राजपूत देशासाठी प्राणांचेही बलिदान करतो. “ दृढनिश्चय. तू धीर सोडू नकोस. पूर्वेकडेहिंदुस्थान नावाचा देश आहे. तेथे तुझी इच्छा पूर्ण होईल . पुढे तो हसत म्हणाला, “ तू माझ्या घावावर हे कापड का लावतो आहेस ? वाहून जाऊ दे सगळे रक्त तुला हवे ते मिळेल. “ एवढे बोलून तो महात्मा अदृश्य झाला .

माझ्या शरीरातून . माझ्या देशात गुलाम म्हणून जगण्यापेक्षा मरण चांगले. यापेक्षा सुंदर मृत्यू असू दिलफिगारला नवीन उत्साह व उमेद मिळाली. तो पर्वतावरून खाली उतरला व हिंदुस्थानच्या दिशेने शकत नाही. “ बोलता बोलता त्याने ते कापड काढून टाकले . निघाला. घनदाट जंगले, आग ओकणारे वाळवंट, दुर्गम घाट व अलंध्य पर्वत या सर्वांना पार करून हळूहळू त्या शूराचा आवाज क्षीण झाला. शरीराची सारी चेतना विझली. “ भारतमाता की जय “ तो अनेक दिवसांनी हिंदुस्थानच्या पवित्र भूमीवर पोहोचला. एका झऱ्याच्या शीतल पाण्यात त्याने म्हणून त्याने प्राण सोडला. त्याच्या छातीतून रक्ताचा शेवटचा थेंब वाहून आला. एका देशभक्ताने स्नान केले व प्रवासाचा शीण घालवला. थोडी विश्रांती घेऊन परत चालू लागला. संध्याकाळच्या त्याचे कर्तव्य पार पाडले होते . दिलफिगारवर त्या प्रसंगाचा गहन प्रभाव पडला . रक्ताच्या त्या सुमारास तो एका ओसाड मैदानावर पोहोचला .

थेंबापेक्षा अधिक मौल्यवान काही असू शकत नाही अशी ग्वाही त्याचे मन त्याला देऊ लागले . तेथेत्याला फार भयानक दृश्य दिसले . जिकडेतिकडे घायाळ च मृत सैनिक पडलेले होते . रक्ताचा तो थेंब घेऊन दिलफिगार आपल्या देशाकडे रवाना झाला. दिलफरेबला भेटायला गेला तेव्हा ती सडा होता . आकाशात कावळे व गिधाडे गिरक्या घालत होती . ती एक रणभूमी असल्याचेत्याच्या नेहमीप्रमाणे राजघराण्याच्या रिवाजानुसार सोनेरी पडद्याआड बसली होती. वस्तू घेण्यासाठी तिने लक्षात आले . अगदी जवळून त्याला कण्हण्याचा आवाज आला. तो त्या दिशेने गेला . त्याने पाहिले । आपला तळहात पडद्यातून बाहेर काढला . त्या मेंदीभरल्या तळहाताचे चुंबन घेऊन त्याने तो रक्ताचा की , धिप्पाड पुरुष जमिनीवर घायाळ होऊन पडला होता. पराक्रमाचे तेज त्याच्या मुखावर होते ; पण । थेंब तिच्या हातावर ठेवला. संपूर्ण हकीकत त्याने आवेश भरल्या स्वरात सांगितली. ती संपल्याक्षणी प्राण जाण्याच्याच बेतात होते. त्याच्या छातीतून रक्ताची धार वाहत होती . दिलफिगारने सदयाची अचानक तो पडदा दूर सरला गेला. दिलफरेब सोनेरी मसनदीवर मोठ्या दिमाखात बसली होती. चिंधी फाडून त्याच्या घावावर दाबून धरली व विचारले, “ हे शूरवीरा , तू कोण आहेस? “ तो वीर ती उठून पुढे आली व तिने दिलफिगारला आलिंगन दिले. राजगायिकांनी मधुर गायन सुरु केले. पुरुष आवेशात म्हणाला, “ या तलवारीची धार तू आज पाहिली नाहीस का ? मी या भारतमातेचा आनंदोत्सव सुरू झाला. दिलफरेबने त्याला मोठ्या आदराने मसनदीवर बसवले. गायन संपल्यावर ती सुपुत्र आहे. “ त्याचा चेहरा रागाने लाल झाला. दिलफिगार म्हणाला, “हे वीरा ! मी तुझा शत्रू नाही . हात जोडून दिलफिगारला म्हणाली, “दिलफिगार ! माझ्यासाठी तू प्राणांचीही पर्वा केली नाहीस. एक परदेशी प्रवासी आहे. इथे काय घडले ते कृपा करून मला सांग . “

माझी प्रार्थना ईश्वराने ऐकली व तुला यशस्वी करून सुखरूप परत आणले. आजपासून तू माझा तो घायाळ सैनिक मृदू आवाजात म्हणाला, “ तू जर प्रवासी असशील तर माझ्या अगदी जवळ , स्वामी आहेस व मी तुझी दासी. “

तिने सेवकाकडून एक रत्नजडित मंजूषा मागवली. ती उघडून तिने एक पट्टिका काढली. त्या पट्टिकेवर सुवर्णाक्षरात लिहिले होते. “ देशाच्या रक्षणासाठी वाहिलेला रक्ताचा शेवटचा थेंब हे जगातील सर्वांत अनमोल रत्न आहे. “

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus