एका वारात सात ठार - सचित्र - मराठी

एका वारात सात ठार - सचित्र - मराठी

एका वारात सात ठार

फ्रायर

एका वारात सात ठार

मराठी : अश्विनी बर्वे

छोटा शिंपी ओरडला, आणि कपड्याने माश्यांना मारत म्हणाला, “हे घ्या “.

एक दिवस एक छोटा शिंपी आपल्या दुकानात बसून शिवणकाम करत होता. तेव्हा माश्यांचा कळप आला आणि त्याच्या दुपारच्या जेवणावर म्हणजे त्याच्या चटणी पोळी वर बसला . त्याने रागाने त्यांना शुक शुक केले. पण माश्यांवर त्याचा काही असर पडला नाही.

त्यांनी त्याची गोड चटणी खाऊन टाकली .

जेव्हा एकाच वारात सात माशा मेल्या तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले . स्वतःवर खुश होत तो म्हणाला , ठीक आहे, मी एका झटक्यात सात माश्यांना मारून टाकले. “

छोट्या शिंप्याला आपल्या पराक्रमाचा एवढा गर्व झाला की त्याने एका पट्टावर लिहले

“ एक वार आणि सात ठार “ नंतर तो आपले भाग्य आजमावयाला निघाला .

जेव्हा तो शहराच्या बाहर पोहचला तेव्हा शिंप्याने चिवचिव ऐकली, जमिनीवर एका छोटा पक्षी होता, त्याला त्याने

खिशात ठेवले .

त्याने आपला पट्टा बांधला, दुकान बंद केले , रात्रीच्या खाण्यासाठी

__ पनीरचा एक तुकडा आपल्या खिशात घातला.

” प्रवासात मला या पक्ष्याची सोबत चांगली होईल. ” असे म्हणून तो आनंदाने पुढे चालू लागला .

” चल बघू तुझ्यात किती ताकद आहे,” राक्षस म्हणाला आणि त्याने एक दगड उचलला आणि तो दाबून त्याच्यातून पाणी काढले. “ जरा तू पण प्रयत्न कर , तो म्हणाला .

थोड्याच वेळात शिंप्याला एक राक्षस भेटला . शिंप्याने प्रसन्नपणे त्याला, “ शुभ सकाळ “ म्हटले . राक्षस ओरडला , “ तू निघ इथून , नाहीतर तुझी हड्डी पसली एक करेन ”. “ तुला माहित नाही मी कोण आहे,” असे म्हणत शिंप्याने

आपल्या पट्टावरची ओळ वाचली. राक्षसाला वाटले की शिंप्याने एकाच वारात सात लोकांना ठार मारले होते . “ एका वारात सात ठार ” त्याने लोळत आपल्या असभ्य

वागण्याची माफी मागितली .

शिंप्याने पटापट विचार केला , दगड उचलण्याचे नाटक करत त्याने आपल्या खिशातून पनीरचा तुकडा बाहेर काढल आणि त्याच्यातून पाणी निघेपर्यंत त्याला दाबले. शिंपी म्हणाला, “हे तर खूप सोप्पे आहे .”

” अरे व्वा !” राक्षस हैराण होत म्हणाला ,” तर मग हे करून दाखव , त्याने एक दगड उचलला आणि एवढ्या दूर फेकला की तो

नजरेसमोरून गायब झाला. “

“ हे तर अगदी सोप्पे आहे , शिंपी म्हणाला , त्याने पटकन खिशातून पक्षी काढला आणि राक्षसाला कळण्याच्या हात त्याने पक्ष्याला हवेत सोडून दिले.

पक्षी उडून नजरेच्या पार गेला .

” पण मला खात्री आहे की हे जे काम मी तुला सांगणार आहे ना ते तू करू शकणार नाही,” राक्षस म्हणाला . “हे पडलेले झाड आहे ना त्याला माझ्या

महालापर्यंत नेण्यासाठी मला मदत करत .” “ यात काय मोठं आहे,” छोटा शिंपी म्हणाला .

थोड्याच वेळात राक्षसाला आराम करण्यासाठी थांबावे लागले आणि बसावे लागले. तेव्हा तो

छोटा शिंपी फांद्यामधून बाहेर आला आणि त्याला मदत करण्याचे नाटक केले आणि । विचारले , “ तू तर एवढ्या लवकर थकला? “ राक्षसाने आपला राग लपविण्याचा प्रयत्न केला आणि धूर्तपणे म्हणाला, “ खरतर तर तू दिसतो छोटा पण खूपच ताकदवर आहेस .

चल माझ्या घरी चल आणि माझ्या भावांना भेट . “

.

एका झटक्यात राक्षसाने ते झाड आपल्या खांद्यावर घेतले आणि तो चालू लागला . ते वजनदार झाड उचलल्याने राक्षसाला श्वास लागत होता तेव्हा हा चतुर शिंपी झाडाच्या फांदीवर

आरामात बसला होता .

मग छोटा शिंपी राक्षसांच्या सहा भावांना भेटला .

जेव्हा शिंप्याने त्यांना सांगितले की त्याने त्यांच्या भावाला कसे हरवले . तेव्हा ते सगळे दिग्गज राक्षस जोरात हसले . त्यांनी शिंप्याला स्वादिष्ट अन्न खायला घातले. आणि मग त्याला झोपण्याची

खोली दाखवली. छोटा शिंपी खाली गालिच्यावर झोपला कारण त्याला दिलेला

पलंग खूप मोठा होता. त्यारात्री दोन राक्षस हळूच शिंप्याच्या खोलीत शिरले .

त्यांनी जड अशा गदेने पलंगाला खूप मारले. “ चल त्या उंदराचा आता

मृत्यू झाला असेल,” असे एकाने दुसऱ्याला म्हटले.

पलंगाला मारण्याच्या आवाजामुळे शिंप्याला जाग आली आणि तो हळूच आपल्या खोलीच्या बाहेर आला. त्याने त्या दोघा राक्षसांना बोलतांना ऐकले , “ त्यांनी त्या

शिंप्याला मारून टाकले. ”

नंतर राक्षस झोपले आणि मग शिंप्याने हळूच राक्षसाच्या डोक्यावर एक सफरचंद फेकले .

” तू मला का मारले ? “ दुसरा राक्षस ओरडला. मग त्याने आपल्या जवळच्या भावाला जोरात मारले.

शिंप्याने अजून एका राक्षसाच्या डोक्यावर सफरचंद फेकले. त्यामुळे तिसऱ्या राक्षसाने आपल्या चवथ्या भावाच्या नाकावर मारले .

यामुळे थोड्याच वेळात राक्षसांमध्ये भयंकर मारामारी सुरु झाली. शिंप्याने एका सुरक्षित ठिकाणी बसून राक्षसांची लढाई पाहिली .

जोपर्यंत सर्व राक्षस धारतीर्थ पडत नाही तोपर्यंत ही लढाई चालू होती . मग शिंप्याने सर्व राक्षसांना एका दोऱ्याने बांधले. आणि परत तो

आपल्या भाग्याच्या शोधात बाहेर पडला .

सकाळी शिंपी शहरात पोहचला. तिथे लोक घाबरून इकडे तिकडे धावत होते. सगळीकडे सैनिक उभे होते.

“ एवढा सगळा आरडाओरडा का आहे ? ” छोट्या शिंप्याने विचारले. एक सैनिक म्हणाला, “ राक्षस , राक्षस सगळ्या प्रवाशांना लुटत आहेत , आमची घरे नष्ट करत आहेत , आमची गाईगरे खात आहेत . या राक्षसांनी इतका कहर माजवला आहे की , जी व्यक्ती आम्हांला या राक्षसांच्या तावडीतून सोडेल त्याच्याशी राजा आपल्या राजकन्येचे लग्न लावून देणार आहे.” “ ठीक आहे , आता तुम्हांला त्या राक्षसांची चिंता करण्याची गरज नाही . कारण मी त्यांना आता पुरते संपवले आहे.” शिंपी म्हणाला .

छोट्या शिंप्याने सांगितलेल्या गोष्टीवर सैनिकांचा प्रथम विश्वास बसला नाही. पण शेवटी ते त्याला राजाजवळ घेवून गेले. “ तू ? तुझा सारखा छोटा माणूस त्या दिग्गज राक्षसांना कसे बरे हरवू शकतो ? “ राजाने शिंप्याची खिल्ली उडवत म्हटले. “माझे बहादुर सैनिक सुद्धा त्या राक्षसांना मारण्यात नाकाम राहिले.” पण राजकुमारीला तो छोटा शिंपी इतका

आवडला की ती त्याची कोणतीही गोष्ट मानण्यास तयार झाली .

“ महाराज आपण स्वतः चला आणि आपल्या डोळ्यांनी बघा मी त्या राक्षसांचे

कसे हाल केले आहेत ते “शिंपी म्हणाला . “ त्यानंतर त्याने राजा , सैनिक आणि नगरवासीयांना राक्षसांच्या महालात नेले .

जेव्हा राजाने धारतीर्थ पडलेल्या राक्षसांचे हातपाय बांधलेले पाहिले , तेव्हा तो म्हणाला, “हे काम तर कमीत कमी दहा लोकांचे वाटते . ”

राजाने सगळ्या राक्षसांना देशातून हाकलून दिले ..

मग त्यादिवशी छोट्या शिंप्याचे आणि राज्कुमारीचे लग्न झाले . सगळे नगरवासी ओरडले, “ बहादूर छोट्या शिंप्याचा विजय असो. ”

… आणि छोट्या शिप्याने राक्षसांना धमकी दिली की जर ते परत आले तर तो त्यांची

हड्डी- पसली एक करेन .

छोटा शिंपी महालात राहू लागला , खरच त्याचे नशीब चांगले होते. स्वतःला हे नेहमी लक्षात राहावे म्हणून शिंपी नेहमी निळ्या रंगाचा पट्टा बांधायचा आणि त्यावर लिहलेले असायचे,

“ एका वारात सात ठार “.

समाप्त

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus