अमेलिया एरहार्ट - अमेरिकी महिला वैमानिक - कॉमिक - मराठी
आनंदी गोपाळ ह्या भारतीय महिलेने ज्या प्रकारे भारतांत वैद्यकीय क्ष्रेत्रांत क्रांती केली त्याच प्रमाणे अमेलिया एअरहार्ट ह्या युवतीने पाश्चात्य देशांत वैमानिक क्षेत्रांत क्रांती केली. अमेलिया एक बंडखोर प्रवृत्तीची स्त्री होती. अमेरिकेतील कॅन्सस ह्या गरीब प्रदेशांत ती जन्माला आली होती पण तिचे आई वडील गरीब नव्हते. लहानपणीच ती आपली बद्दल घेऊन उंदरांची शिकार करत असे आणि विज्ञानात तिला विशेष रस होता. ज्या वयांत इतर मुली शिवणकाम करत त्या वयांत ती गणित आणि विज्ञान विषयांत प्राविण्य मिळवत होती.
तिने शिक्षण पूर्ण करून कॉलेज मध्ये प्रवेश केला आणि नंतर वैमानिक बनण्याचे प्रशिक्षण ती घेत होती. तिला विमान चालवणे अत्यंत आवडत होते १९३० मधील विमाने जास्त प्रगत नव्हती आणि संपूर्ण अटलांटिक महासागर विमानाने पार करणे खूप खातीं मानले जायचे. अमेलियाने ते साध्य तर केलेच पण इतर अनेक प्रकारच्या धाडसी वैमानिक मोहिमेत ती सहभागी झाली.
तिच्या कर्तृत्वाने ती संपूर्ण जगांत अत्यंत प्रसिद्ध झाली आणि आणेल तरुण मुले मुली तिच्यापासून प्रेरित झाली. आपल्या अनुभवावर तिने एक खूप गाजलेले पुस्तक सुद्धा लिहिले.
अमेलियाने संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम करण्याचे ठरवले.आणि त्या प्रयत्नात तिचे प्लॅन प्रशांत महासागरावर कुठे तरी गायब झाले. मागील अनेक दशके तिच्या प्लेन चा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला पण ती कधीही सापडली नाही.