सात चीनी बहिणी - सचित्र - मराठी
सात चीनी बहिणी
मराठी : अश्विनी बर्वे
एकेकाळी चीन मध्ये सात बहिणी एकत्र राहत होत्या आणि एकमेकींची काळजी घेत होत्या .
प्रत्येकीचे दाट , काळे चमकदार केस आणि तेजस्वी डोळे होते . प्रत्येक बहीण उंच होती. शिवाय सातवी जी छोटी मुलगी होती .
पण प्रत्येक बहीण एकदुसरीपासून वेगळी होती
तीसरी बहन पाचशे आणि त्याच्याही पुढे मोजू शकत
होती .
सहावी बहीण जगातले सगळ्या स्वादिष्ट नूडल सूप करू शकत होती.
चौथी बहीण कुत्र्यांबरोबर बोलू शकत होती.
पाचवी बहीण कितीही उंचीवरून आणि कितीही वेगात फेकलेला चेंडू
ती झेलू शकत असे .
दुसऱ्या बहिणीला कराटे येत होते . किक, चॉप, ही - याह !
पहिली बहीण वाऱ्याचे वेगाने
स्कूटर चालवायची.
आणि सातवीं बहीण ? ती काय करू शकत होती हे कोणालाच निश्चित माहित नव्हते कारण ती खूप छोटी होती आणि अजून पर्यंत तिने एकही शब्द बोलला नव्हता.
लांब , खूप दूर , पुलाच्या पलीकडे, जंगलाच्या दुसऱ्या टोकाला , एका पहाडावर एक भयंकर ड्रगन राहत होता . एक दिवस तो झोपेतून उठला , त्याला खूप भूक लागली होती . त्याने जोरात श्वास घेतला, एखाद्या स्वादिष्ट पदार्थाचा सुगंध येत आहे. ते सहाव्या बहिणीने केलेले नुडल्सचे सूप होते !
ड्रगन उडत पहाडावरून खाली, जंगलाच्या दुसऱ्या बाजूला आणि पलाच्या या या बाजुला जिथे सात बहिर्णीचे घर होते तिथे आला .
सगळ्या बहिणी आपआपल्या कामात मग्न होत्या त्यामुळे कोणीही ड्रगनला येतांना पाहिले नाही .
पहिली बहीण आपली स्कूटर चमकवत होती, दुसरी बहीण काळा बेल्ट मिळवण्यासाठी कराटेचा सराव करत होती. तिसरी बहीण तांदूळ मोजत होती. चवथी बहीण एक भटक्या कुत्र्यांबरोबर गप्पा मारत होती. पाचवी बहीण चेंडू उंच फेकून झेलत होती. सहावी बहीण थोडे नडल घेण्यासाठी त्याच वेळी स्वयंपाकघरात गेली होती . आणि सातवी बहीण घरात फरशीवर लोळत होती .
RILE
- ड्रगनने जेव्हा स्वयंपाक | घरात लपून पाहिले तेव्हा
त्याला गोल - मटोल सातवी बहीण दिसली. तो स्वादिष्ट सूप , विसरून गेला. त्याऐवजी त्याने र छोट्या मुलीला झटकन पकडले.
- HELP !
__ मग उडत तो पूल ओलांडून जंगलाच्या दुसऱ्या टोकाला त्याच्या गुहेत निघून गेला .
पण जसे त्याने सातव्या बहिणीला खाली ठेवले आणि तो मीठ आणायला गेला , तेवढ्यात ती पहिला शब्द बोलली आणि ते शब्द होते - मदत करा .
सहा बहिणीनी सातव्या बहिणीला शोधणे चालू केले तेवढ्यात तिचा आवाज । त्यांनी ऐकला. त्यांना लगेच समजले की तो तिचाच आवाज आहे .
” सातवी बहीण संकटात आहे ,” मोठ्या बहिणीने ओरडन सांगितले. ती पटकन आपल्या स्कटरवर स्वार झाली.” आपल्याला तिला वाचवायला हवं . “
मदद करा! मदद करा!
बाकी बहिणी तिला मागे लटकल्या. पहिली बहीण जी चपळ आणि शक्तिशाली सुद्धा होती. तिने आपल्या बहिणींना ओढून पुलाच्या पार नेले.
पुलाच्या पुढे एक दाट जंगल होते , तिथे खूप झाडी होती. एवढी झाडे बघून तिसरी बहीण दोन दोन झाडं मोजू लागल
आता सातव्या बहिणीचे ओरडणे खूप मोठ्या आवाजात होते . बहिणी पहाडावर जावू लागल्या आणि लवकरच त्या ड्रगनच्या गुहेजवळ जाऊन पोहचल्या.
MINS
त्यांना धुराचा वास येवू लागला आणि घाबरवणारे आवाज येवू लागले. चवथ्या बहिणीने लक्षपूर्वक आवाज ऐकले .
ड्रगन कुत्र्यांसारखे बोलत नाही. तरीही ती ड्रगनचे काही काही बोलणे समजत होते .
ड्रगन म्हणत होता, मदतीसाठी ओरडून काहीच उपयोग होणार नाही. तू माझे रात्रीचे खाणे आहे! ” आणि अचानक सातव्या बहिणीने दुसरा शब्द बोलला, आणि तो होता, नाही !
NO !
Saestha
” जर तुम्ही तिला बाहेर घेवून आला नाहीत तर आपल्याला पस्तावे लागेल , महाराज!” चवथी बहीण जी कुत्र्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
ड्रगन ने ओरडणे बंद केले. ती मुलगी काय म्हणत होती ? त्याला फक्त एवढेच कळले , । “तिला बाहेर आणा, महाराज !” पण आज पर्यंत कोणीच त्याच्याशी बोलण्याचे साहस केले नव्हते . त्याला एवढे आश्चर्य वाटले की त्याने सातव्या बहिणीला तोंडात धरून धावतच तो बाहेर आला.,
दुसरी बहीण पुढे आली. मग विजेच्या गतीने तिने हवेत उडी मारली आणि ड्रगनच्या हनुवटीवर तिने वार केला . “ ही - याह!”
पाचव्या बहिणीने मागे मागे अधिक मागे होत आणि मग वर वर अधिक वर उडी मारून सातव्या बहिणीला चेंडूसारखे पकडले.
ड्रगन एवढा हैराण झाला की तो हु हु ओरडला . आणि सातवी बहीण त्याच्या तोंडातून निसटून बाहेर आली .
जेव्हा ड्रगनने पाहिले की त्याचे रात्रीचे खाणे गेले , तेव्हा तो जमिनीवर पडला आणि रडायला लागला . भूक लागली आहे , भूक लागली आहे , “ असे म्हणत तो रडायला लागला . चवथी बहीण त्याचे बोलणे समजू शकत होती कारण कुत्रे आणि ड्रगनच्या भाषेत “ भूक लागली आहे याला समान शब्द होता. __ “ तो खूप भूकेला आहे ,” त्याने आपल्या बहिणींना सांगितले . तेव्हा सगळ्या बहिणीनी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना तो खूप दुबळा , वाळलेला आणि उदास दिसला .
Saal
पहिल्या बहिणीने सातव्या बहिणीला पाठीवर घेतले आणि ती पटकन स्कूटरवर बसली. बाकीच्या बहिणी तिच्या मागे लटकल्या आणि सगळ्या वाऱ्याच्या वेगाने पहाडावरुन खाली येवू लागल्या .
“उद्या सहावी बहीण त्याच्यासाठी थोडे सूप घेवून येवू शकते, ” पहिल्या बहिणीने सांगितले . “पण आता आपल्याला सातव्या बहिणीला घरी घेवून जावे लागेल. ती खूप थकली आहे आणि तिचे डायपर सुद्धा बदलायचे. ” __ “ बहिणीनो चला घरी!” सातवी बहीण ओरडून म्हणाली. ती फार लवकर बोलायला शिकत होती .
पण त्या जेव्हा जंगलाजवळ केल्या तेव्हा पहिली बहीण थांबली. जातांना सातव्या बहिणीच्या ओरडण्यामुळे रस्ता सापडला. पण आता या घनदाट जंगलातून रस्ता कसा शोधायचा?
“चिंता करू नका ,” तिसरी बहीण म्हणाली, जातांना मी झाडं मोजली होती. आपल्याला पाचशे झाडे ओलांडून जायचे आहे
आणि जेव्हा तिसऱ्या बहिणीने दोन दोन करून पाचशे झाडे मोजली तेव्हा साती बहिणी पुलाजवळ येवून पोहचल्या.
689980
स्कूटरवरून सगळ्यांनी पूल पार केला आणि त्या आपल्या घरी आल्या.तिथे सगळ्यांनी सहाव्या बहिणीने केलेले स्वादिष्ट नूडल सूप मज़ेत खाल्ले .
समाप्त
आणि सातव्या बहिणीने मोठी झाल्यावर काय केले ? ती जगातली सगळ्यात चांगली कथा -कथक झाली. आणि ती हिच कहाणी सगळ्यात आधी सांगत असे .