भूत पकडणारा न्हावी - सचित्र - मराठी

भूत पकडणारा न्हावी - सचित्र - मराठी

भूत पकडणारा न्हावी बंगाल मधली लोककथा

भूत पकडणारा न्हावी

मराठी : अश्विनी बर्वे

बंगाल मधली लोककथा

JAWAT

JAN

बंगालच्या छोट्या गावात एक न्हावी राहत होता, त्याला त्याचा व्यवसाय फार आवडायचा . तो लोकांचे केस कापतांना आणि दाढी करून देतांना त्यांना साऱ्या रोचक गोष्टी सांगत असे . पण जर कोणी न्हाव्याला दुःखी कहाणी सांगितली तर तो त्या माणसाला त्याचे पैसे परत करत असे आणि म्हणे की , या पैशाची माझ्यापेक्षा तुलाच जास्त गरज आहे,” त्यामुळे न्हावी रोज रिकाम्या हाताने घरी येत असे .

Hindi

W

न्हाव्याच्या बायकोला आपल्या नवऱ्याचा प्रामाणिकपणा आवडत होता . पण ती तिच्या पतीच्या या सवयीला कंटाळली होती . एके दिवशी पत्नीने न्हाव्याला सांगितले , “ घरात नेहमीच खायला काही नसते . तुमच्या उदारतेच्या नादात तुम्ही घरच्या लोकांच्या गरजा विसरून जातात. “

मग न्हाव्याच्या बायकोने त्याच्या हातात वस्तरा, कात्री , आरसा आणि कंगवा दिला, “ आमच्या खाण्याची व्यवस्था होईपर्यंत घरी परत येवू नका.”

त्यानंतर नाव्हाने दुसऱ्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटले अनोळखी लोकांकडून कामाचे पैसे घेणे सोपे जाईल . मग त्याने आपल्या हत्याऱ्यांची पिशवी उचलली आणि दूर दुसऱ्या गावात जायला निघाला. रात्री वडाच्या झाडाखालून न्हाव्ही चालला होता, तेव्हा त्याला ते झाड झोपण्यासाठी चांगले वाटले .

RANVVIYAN

त्या झाडावर एक बहुत राहत होते . जेव्हा न्हावी घोरू लागला, तेव्हा भूत झाडावरून खाली उतरले आणि ते जोर जोरात हसू लागले ,

ओरडू लागले. “ हा ! हा! हा ! आज रात्रीसाठी मला खूप चविष्ट खाणं मिळालं .” भुताचा आवाज ऐकून न्हावी जागा झाला .

.

IBUPREDIOS

तसं तर न्हावी खूप घाबरला होता. पण त्याने पटकन विचार केला आणि तो ही जोरजोरात ओरडायला लागला, “ हा ! हा ! हा ! ” मला तुझी काही भीती नाही , मी भूत पकडणारा न्हावी आहे!” मग न्हाव्याने आपल्या पिशवीतून आरसा काढला आणि तो आरसा भुताच्या चेहऱ्यासमोर धरला. “बघ, या भयंकर भुताला , ज्याला मी आता- आता पकडलं आहे. मी तुलाही पकडून या पिशवीत बंद करेन . पळून जाण्याचा प्रयत्न करू नको. तू जिथे जाशील तिथून माझी पिशवी तुला शोधून काढेल .”

भुताने प्रथमच आपल्या आयुष्यात आरसा पहिला होता.याआधी त्याने आरसा पाहिलाच नव्हता. त्यामुळे तो स्वतःचे प्रतिबिंब ओळखू शकला नाही . “हुजूर, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण कृपा करून तुम्ही मला त्या पिशवीत एका भयंकर भूता बरोबर टाकू नका.”

” ठीक आहे,”न्हावी म्हणाला, “ आज रात्री मी तुझ्या झाडाखाली झोपतो . सकाळपर्यंत तू मला एक हजार सोन्याच्या मोहरा आणून दे, नाहीतर तुला पिशवीत बंद करून टाकतो. ” भुताने आपली नजर त्या पिशवीवर टाकली, आणि तो तिथून छुमंतर झाला.

HiiHING

FEN

hirHINI

E

RAL

जेव्हा सकाळी न्हावी उठला , तेव्हात्याने त्याला एक हजार सोन्याच्या मोहरा दिल्या .

” खूप छान,” न्हावी म्हणाला ., “माझा अजून एक आदेश ऐक .माझ्या घराजवळ एक मोठे गोदाम बांध आणि उद्या सकाळ पर्यंत ते तांदुळाने भरून टाक . तेव्हाच मी तुला माझ्या जादूमधून मुक्त करेन. ” “ उदया पर्यंत हे सगळं करणं शक्य नाही ,” भूत हात जोडून म्हणालं . “ माझ्या आदेशाचं पालन कर, नाही तर तुझं सारं जीवन या बंद पिशवीत सडून जाईल . ” त्यानंतर भुताने एक खोल श्वास घेतला आणि तिथून ते निघून गेले .

INITION

घरी आल्यावर न्हाव्याने आपल्या बायकोला सोन्याने भरलेला हंडा दाखवला. न्हाव्याने तिला भुताची सगळी कहाणी सुद्धा सांगितली. “ मी तुमच्या हुशारीवर खूप खुश आहे,” पत्नी खुश होवून म्हणाली . “ चला आता आपली गरिबी नष्ट होण्याचे दिवस आले आहेत .. “

.

xxx+T

AAAAAAAAAAADMAASA

MISSED

PAR

II

ISAll

भुताने खूप मेहनत केली. गोदाम केल्यानंतर तो एक एक करून तांदुळाच्या गोण्याने ते भरू लागला. जेव्हा भुताच्या काका तरंगत तिथे आला. त्याने कधी भुताने एवढी मेहनत केल्याचे बघितले नव्हते. तेव्हा काका जोरात ओरडला, “ तू हे सगळं काय करतो आहे ? “

RE

JUITED

INTROLPATI

SIANSWhi

NAL

5

भुताने रागारागाने हळू आवाजात सांगितले, “ या घरात एक खूप शक्तिशाली माणूस राहतो . तो भूतांना पकडण्यात उस्ताद आहे . मला आज संध्याकाळ पर्यंत हे काम संपवायचं आहे , नाहीतर तो आपल्या पिशवीत मला बंद करेल . आणि तिथे आधीच एक भयानक भूत कैदेत आहे .

काकाला आपल्या पुतण्याचा खूप राग आला. “ अरे गाढव , तुला एवढंही माहित नाही की मनुष्याची कोणतीही ताकद आपल्यावर काम करू शकत नाही. तू आता माझ्याबरोबर चल. आपण त्या माणसाला चांगली अद्दल घडवू. मग तो भूतांना मान द्यायला शिकेल .”

त्यानंतर दोन्ही भुते न्हाव्याच्या घराच्या खिडकी जवळ गेले. मग काका भुताने जोर जोरात हसून म्हटले, “ हा! हा! हा!” आज मी या माणसाला खाऊन टाकणार . चल पुतण्या आपण दोघे मिळून खाऊन टाकू. आपण त्याला शिजवून खाल्ले तर अधिक चांगले होईल .”

पण काका भुताला आश्चर्य वाटले जेव्हा त्याने पाहिले की न्हाव्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती त्याला दिसली नाही .

.

मग न्हाव्याने पुतण्या भुताला म्हटले, “तू माझा आदेश पाळला आणि सगळी कामे केली. आता तू मुक्त आहे.” मग काका भूताकडे बघत न्हावी म्हणाला , “ आता तुझ्या जागी या भुताला पिशवीत बंद करतो.

हे ऐकून काका भुताला राग आला. “ एका भूता बरोबर असे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली ? “ ते ओरडले . तेव्हाच न्हाव्याने मोठा आरसा काका भुताच्या चेहऱ्या समोर ठेवला. “ या भूता बरोबर आयुष्य काढायला तुला कसे वाटेल ? “

काका भूत आपल्या पुतण्यापेक्षा जास्त अक्कलवान नव्हता . “ हुजूर , आपण काही पण करा पण या भयानक भुताच्या बरोबर मला पिशवीत बंद करू नका. मी तुमच्यासाठी दोन हजार सोन्याच्या मोहरा घेवून येईन . यापेक्षाही मोठे गोदाम तांदुळाच्या पोत्याने भरून देईन . ” “ ठीक आहे, “ न्हावी म्हणाला. “ जर तू ते केले तर मी तुला सोडून देईन .” काका भुताने त्याचा शब्द पाळला. त्यानंतर काका भूत आणि पुतण्या भूत न्हाव्याला बघताच दूर पळून जायचे.

त्यानंतर न्हाव्याने आपले बाकी दिवस आनंदात लोकांचे केस कापत , दाढी करत , आणि लोकांना रंजक गोष्टी सांगत घालवले. आता तो यावर एवढा खुश होता की , तो गरजू लोकांना मनापासून मदत करू शकत होता .

ना मनापा.

अत

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus