फातिमा आणि तंबू - सचित्र - मराठी

फातिमा आणि तंबू - सचित्र - मराठी

फातिमा आणि तंबू

इद्रिस शाह

फातिमा आणि तंबू

दूर पश्चिमेकडील देशात फातिमा नावाची मुलगी राहात होती . ती सुतकताईचा व्यवसाय करणाऱ्या एका धनिक व्यापाऱ्याची मुलगी होती. त्याने फातिमालाही सूत काढायचे कौशल्य शिकवले होते .

एके दिवशी फातिमाचे वडील म्हण व्यापारासाठी मी भूमध्य समुद्रातल्या बेटांवर चाललोय . तूसुद्धा चल. कदाचित तुला तिथे एखादा सुस्वरुप , सुस्थितीत असलेला तरूण आयुष्याचा

जोडीदार म्हणून भेटेल.”

मग ते जहाजाने वेगवेगळ्या बेटांवर जाऊ लागले . वडील व्यापार -उदीम करण्यात मग्न झाले आणि फातिमा आपल्या भावी पतीचे स्वप्न बघण्यात दंग झाली .

एके दिवशी ग्रीक बेट क्रीट येथे जात असताना समुद्रात भयानक वादळ आले आणि त्यात त्यांचे जहाज फुटले.

समुद्राच्या लाटांसोबत फातिमा इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहराच्या किनारी वाहात आली. ती अर्धवट बेशुद्धावस्थेत होती . तिचे वडील समुद्रात बुडाले. त्यामुळे फातिमा पुरती निराधार झाली.

जहाजाच्या दुर्घटनेमुळे आणि वडिलांच्या मृत्युमुळे तिला मानसिक धक्का बसला. तिला तिचा भूतकाळ फारसा आठवेनासा

झाला .

किनाऱ्यावरील वाळूत भटकत असताना विणकरांच्या एका कुटुंबाने तिला पाहिले. ते कुटुंब गरीब होते . पण त्यांनी फातिमाला मोठ्या प्रेमाने आपल्या घरी नेले . त्यांनी तिला कापड विणण्याचे कौशल्य शिकवले.

अशा प्रकारे, फातिमाने एक नवीन आयुष्य सुरू केले . एकदोन वर्षांनंतर ती पुन्हा आनंदी दिसू लागली. तिने आपल्या नवीन आयुष्याशी चांगलेच जुळवून घेतले .

श्रीसकर

एके दिवशी फातिमा काही कामासाठी समुद्रकिनारी गेली. त्याचवेळी तिथे गुलामांचा व्यापार करणारी एक टोळी आली. त्यांनी फातिमाला पकडून आपल्यासोबत नेले. __ असहाय फातिमाने खूप आक्रोश केला. पण गुलामांच्या व्यापाऱ्यांनी तिला कोणतीही सहानुभूती दाखवली नाही . व्यापारी तिची विक्री करण्यासाठी तिला इस्तंबूल शहरात घेऊन गेले. पुन्हा एकदा फातिमाची स्वप्ने बेचिराख झाली .

बाजारात गुलामांची खरेदी करण्यासाठी काही लोक आले . त्यातील एक माणूस त्याच्या लाकडी वखारीत जहाजाची शिडे बनवत असे . या कामासाठी तो गलाम शोधत होता.

दुःखीकष्टी फातिमाला पाहून त्याने तिची खरेदी करायचे ठरवले. दुसऱ्या कुणा मालकाच्या तुलनेत आपण फातिमाला एक सुसह्य आयुष्य देऊ शकू, असे त्याला वाटले.

तो माणूस फातिमाला घेऊन घरी गेला. फातिमाला आपल्या पत्नीची दासी म्हणून ठेवू , असा त्याचा हेतू होता . पण तो घरी पोहोचला तेव्हा त्याला एक वाईट बातमी समजली. सामानाने भरलेले त्याचे जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे आता त्याच्याकडे शिडे बनवण्यासाठी मजूर ठेवण्याइतपतही पैसा उरला नाही. तो , फातिमा आणि त्याची पत्नी या तिघांनाच यापुढे हे काम करावे लागणार होते .

गुलामांच्या व्यापाऱ्यांच्या तावडीतून सुटका केल्याबद्दल फातिमा आपल्या मालकाशी कृतज्ञ होती. तिने या मालकाकडे मन लावून काम केले. तिची निष्ठा आणि मेहनत पाहून मालकाने तिला गुलामगिरीतून मुक्त केले. आता फातिमा तिच्या मालकाची विश्वासू मदतनीस बनली .

फातिमा शीड बनवण्याच्या कामात कुशल झाली होती . हे काम ती आनंदाने करत असे. एके दिवशी तिचा मालक तिला म्हणाला , “ फातिमा, तू माझी प्रतिनिधी म्हणून आपली शिडं घेऊन जावा शहरात जा . तिथे शिडं विकून चांगला नफा कमावून ये. “

फातिमाचा प्रवास सुरू झाला. पण चीनच्या किनाऱ्यापासून थोडे दूर असताना तिचे जहाज एका चक्रीवादळात सापडून फुटले. पुन्हा एकदा ती लाटांसोबत एका अनोळखी प्रदेशाच्या किनाऱ्यावर येऊन पडली .

फातिमाला रडू अनावर झाले . तिला वाटू लागले , “ मला हवं तसं काहीच घडत नाहीए. दरवेळी आयुष्याचं गाडं सुरळीत चालू लागलं की काही ना काही दुर्घटना होते आणि माझ्या साऱ्या आशा- आकांक्षा धुळीला मिळतात. ”

” माझं नशीबचं खोटं ! जेव्हाजेव्हा मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तेव्हातेव्हा त्याचा शेवट दुःखातच होतो. या साऱ्या दुर्दैवी गोष्टी माझ्याच वाट्याला का ? “ याचे उत्तर काही तिला मिळाले नाही . शेवटी ती किनाऱ्यावरच्या वाळूतून उठून चालू लागली .

चीनमध्ये ना कुणी फातिमाबद्दल ऐकले होते , ना कुणी तिच्या दुःखाबद्दल जाणत होते . पण तिथे एक आख्यायिका प्रसिद्ध होती - एक अनोळखी स्त्री चीनमध्ये येईल आणि ती चीनच्या सम्राटासाठी तंबू उभारेल.

चीनमध्ये त्याकाळी कुणाला तंबू बनवता येत नसे . त्यामुळे तेथील लोक ही भविष्यवाणी खरी ठरण्याची आतुरतेने वाट बघत होते .

अशी स्त्री चीनमध्ये आल्यावर आपल्याला लगेच कळावे , यासाठी सम्राट आपल्या दुतांना वर्षातून एकदा देशातील सर्व लहानमोठ्या गावांत आणि शहरांत पाठवत असे . दुतांनी अनोळखी स्त्रीचा शोध घेऊन तिला राजदरबारात हजर करावे, हेच काम त्यांच्यावर सोपवले होते.

SH APRINR )

臨時础营的外國女

फातिमा चीनच्या समुद्रकिनारी वाहात आली त्याचवेळी सम्राटाचे दुतही त्या भागात पोहोचले .

त्यांनी एका दुभाष्यामार्फत संवाद साधून फातिमाला आपल्यासोबत सम्राटाकडे चलण्याची विनंती केली.

फातिमाला सम्राटासमोर नेले तेव्हा सम्राटाने तिला विचारले , “ तुला माझ्यासाठी तंबू बनवता येईल का ? ”

“ हो, का नाही ?” फातिमा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली .

मग फातिमाने एक दोरखंड मागितला. पण त्यांच्याकडे दोरखंड उपलब्ध नव्हता.

फातिमाला वडिलांकडे शिकलेले सूतकताईचे काम आठवले. त्यानुसार तिने स्वत: च अंबाडीच्या देठांपासून दोरखंड बनवला .

मग तिने एक मजबूत कापड मागितले . पण त्यांच्याकडे कापडही उपलब्ध नव्हते . फातिमाला अलेक्झांड्रियात शिकलेले विणकाम आठवले. त्यानुसार तिने स्वत : च तंबूचे कापड बनवले .

98090000

त्या

.

मग फातिमाला तंबू उभारण्यासाठी मजबूत खांबांची गरज होती . पण चीनमध्ये असे खांब मिळाले नाहीत. तेव्हा तिला इस्तंबुलमध्ये शिकलेले जहाजाचे शीड बनवण्याचे काम आठवले . त्यानुसार तिने स्वत : च मजबूत खांब बनवले .

सगळी सामग्री तयार झाल्यावर फातिमाने आपल्या अनेक प्रवासांमध्ये बघितलेले विविध प्रकारचे तंबू आठवून पाहिले .

SADEE

DEEPAPER

आणि शेवटी मनासारखा तंबू आठवल्यावर तसाच…. सुंदर आणि सुबक तंबू तयार केला.

सम्राटाने हा तंबू बघितला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना . त्याने फातिमाची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे वचन तिला दिले . फातिमाने चीनमध्ये स्थायिक होण्याचे ठरवले आणि तेथील एका देखण्या राजपुत्राशी लग्न केले . उरलेले आयुष्य आपल्या मुलाबाळांसोबत तिने अतिशय सुखात घालवले .

समाप्त

फातिमाला जाणवले की सुरुवातीला आपल्याला आलेले अनुभव कटू वाटले होते . पण याच कटू वाटणाऱ्या अनुभवांनी तिच्या आयुष्यात सुखाची पेरणी केली.

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus