विसकटलेला चिमणा - सोवियत बालसाहित्य - मराठी

विसकटलेला चिमणा - सोवियत बालसाहित्य - मराठी

कॉन्स्तन्तिन

पाउस्तोवस्की विसकटलेला चिमणा

अनुवाद : अनिल हवालदार सजावट : वालेरी पेरेबेरीन

रादुगा प्रकाशन

मॉस्को

भिंतीवरच्या जुन्या घड्याळातील खेळण्यामधील सैनिकाच्या आकाराच्या लोखंडी लोहाराने हातोडा वर उचलला . घड्याळ टिकटिकले आणि लोहाराने जड हातोडा छोट्या तांब्याच्या ऐरणीवर आदळला . जलद टोलाचा प्रतिध्वनी खोलीत घुमला , पुस्तकांच्या कपाटाखाली घरंगळत गेला व विरून नाहीसा झाला .

लोहाराने ऐरणीवर आठ वेळा प्रहार केले . नववा प्रहार करण्याचीही त्याची इच्छा होती , पण त्याच्या हाताला झटका बसला व हात हवेतच अधांतरी थांबला . तशा उगारलेल्या हाताने तो आख्खा तासभर उभा राहिला . नऊ वेळा ऐरणीवर प्रहार करायची वेळ भरेपर्यंत .

मारीया खिडकीशी उभी होती . पण तिने मागे वळून पाहिले नाही . ती जर वळली असती तर तिच्या चाहुलीने पेत्रोवना दाई नक्की जागी झाली असती आणि मारीयाला तिने झोपायला पिटाळले असते .

पेत्रोवना दिवाणावर डुलकी घेत होती आणि आई नेहमीप्रमाणे थिएटरला गेली होती . ती थिएटरमध्ये नर्तिका होती , पण मारीयाला मात्र कधीही बरोबर घेऊन जात नसे .

थिएटर प्रचंड मोठे होते . त्याला दगडी गोल खांब होते . त्याच्या छपरावर मागील पायांवर उभे झालेले ब्राँझचे घोडे होते . डोक्यावर पुष्पचक्र धारण केलेल्या माणसाने त्या घोड्यांचे लगाम खेचून धरले होते . तो माणूस खूप ताकदवान आणि बीट असावा . छपराच्या अगदी टोकाशी त्या बेफाम घोड्यांना थांबवण्यात त्याला या आले होते . घोड्यांचे पुढचे पाय चौकावर अधांतरी होते . त्या माणसाने जर ब्राँझच्या घोड्यांना आवरून धरले नसते तर केवढा अनर्थ माजला असता , ह्याची मारीया मनातल्या मनात कल्पना करायची . ते घोडे छपरावरून खाली चौकात खण

खणाट आणि दणदणाट करत पोलीसांपाशी कोसळले असते

गेले काही दिवस आई फार बेचैन होती . हेमाराणीच्या भूमिकेची ती तयारी करत होती आणि बॅलेच्या पहिल्याच प्रयो गाला मारीयाला व पेत्रोवनाला नेण्याचे तिने कबूल केले

होते .

पहिल्या प्रयोगाला दोन दिवस उरले होते तेव्हा आईने पेटीमधून पातळ काचेचा बनवलेला छोटा फुलगुच्छ बाहेर काढला . मारीयाच्या वडिलांनी आईला तो भेट दिला होता . मारीयाचे वडील खलाशी होते आणि कुठल्यातरी दूरच्या देशाहून त्यांनी तो छोटा फुलगुच्छ आणला होता . __ नंतर मारीयाचे वडील युद्धावर गेले होते , त्यांनी फॅसिस्टांची अनेक जहाजे बुडवली , दोनदा त्यांची स्वतःची , जहाजे बुडाली होती , ते जखमी झाले होते , पण जिवंत राहिले होते . आता ते परत दूर , “ कामचात्का ” अशा विचित्र नांवाच्या ठिकाणी गेले होते , लौकर परत येणार नव्हते , केवळ वसंताच्या मोसमात

घरी येणार होते . आईने काचेचा फुलगुच्छ हाती घेतला आणि हलक्या आवाजात काही शब्द ती त्याला उद्देशून बोलली . हे आश्चर्यकारक होते , कारण यापूर्वी आई वस्तूंशी कधीही बोलली नव्हती .

“ पाहिलंस ? आई कुजबुजली , “ तुला फार वाट पहावी लागणार नाही . “ “ कशाची वाट पाहणार ? “ मारीयाने विचारले . .

” तू लहान आहेस . अजून तुला काही समजत नाही , “ आई उत्तरली . “ तुझ्या वडलांनी हा गुच्छ मला भेट दिला होता आणि सांगितलं होतं – हेमाराणीच्या भूमिकेत जेव्हा तु पहिल्यांदा नाचशील , तेव्हा राजवाड्यातल्या नत्याच्या प्रसंगानंतर न विसरता तुझ्या पोषाखाला हा गुच्छ टोचून लाव . तेव्हा मला समजेल की , ह्यावेळी तु माझी आठवण केली होतीस . “

“ मला समजलं सगळं , ” चिडलेली मारीया म्हणाली . “ काय समजलं तुला ? ”

” सगळं ! “ मारीया उत्तरली आणि तिचा चेहरा लाल झाला . तिच्यावर कुणी अविश्वास दाखवलेला तिला आवडत नसे

.,

..

.

立 。

,

,

下一个

. . . . .

PS.

中式 Tit,

119

:

:

आईने काचेचा गुच्छ स्वतःच्या टेबलावर ठेवला आणि मारीयाला दटावले की , साधा करंगळीचासुद्धा स्पर्श त्या गुच्छाला करायचा नाही , कारण तो खूप नाजुक होता .

ह्या संध्याकाळी गुच्छ मारीयाच्या पाठीशी टेबलावर पडला होता आणि चमकत होता . शांतता एवढी विलक्षण होती की , भोवताली सर्व झोपल्याचे भासत होते : सगळं घर , खिडक्यांखालची बाग , फाटकापाशी खाली बसलेला व हिमवर्षावामुळे जास्त जास्त पांढरा बनत चाललेला सिंह . झोपले नव्हते फक्त मारीया , घर उबदार ठेवणारा रेडिएटर आणि हिवाळा . मारीया खिडकीतून बाहेर पहात होती , रेडिएटर आपले उबदार गाणे हळू आवाजात गुणगुणत होता आणि हिवाळा आकाशातून संथपणे सतत हिमवर्षाव करत होता . हिमकण रस्त्यावरच्या दिव्याजवळून उडत जात होते आणि जमिनीवर त्यांचे थर बसत होते . एवढ्या काळ्याकुट्ट आका शामधून असे पांढरेशुभ्र हिमकण कसे कोसळत होते हे मात्र समजत नव्हते . आणखीसुद्धा समजत नव्हते का , ऐन हिवाळ्याच्या आणि गोठलेल्या थंडीच्या दिवसात , आईच्या टेबलाजवळच्या करंडीत तांबडी मोठी फले कशी उमलली होती . त्यापेक्षाही समजत नव्हता पांढरा कावळा . खिडकीसमोरच्या झाडाच्या फांदीवर तो बसला होता आणि अजिबात डाळा न लववता मारी

याकडे टक लावून पाहात होता . पेत्रोवना खिडकीमधील वरची छोटी चौकट केव्हा उघडेल त्याची कावळा वाट पहात होता . खोलीत ताजी हवा खेळवण्यासाठी पेत्रोवना छोटी खिडकी उघडायची आणि मारीयाचे तोंड धुवायला , दात घासायला तिला घेऊन जायची . __ पेत्रोवना आणि मारीया खोलीतून गेल्या रे गेल्या की कावळा छोट्या खिडकीतून आत यायचा , नजरेला प्रथम दिसेल ती वस्तू चोचीत पकडायचा आणि फडफडत वेगाने पसार व्हायचा .

घाईगडबडीत स्वतःचे पंजे गालीचावर पुसायला तो विसरायचा आणि टेबलावर ओले ठसे मागे ठेवून जायचा ..

दरवेळी खोलीत परतल्यानंतर पेत्रोवना हात उडवून ओरडायची : “ डांबरट ! परत काहीतरी चोरून नेलंस ! “

HER

VO

3 .

मारीयासुद्धा हात उडवायची आणि ह्यावेळी कावळ्याने काय पळवून नेले ह्याचा शोध घेण्यासाठी पेत्रोवनाबरोबर खोलीभर धावाधाव करायची . बहुतेक वेळा साखर , बिस्कीट अथवा सॉसेज असे खाण्याचे पदार्थ कावळा लंपास करायचा .

हिवाळ्यात कावळा एका स्टॉलमध्ये रहायचा . उन्हाळ्यात ह्या स्टॉलमध्ये आइस्क्रीम विकत असत . कावळा महाधर्त आणि कंजूस होता . चोरलेल्या सर्व वस्तूंचा खजिना त्याने स्टॉलच्या फटींमधून लपवला होता . चिमण्यांनी चोरू नये म्हणून !

कधी कधी कावळ्याला स्वप्न पडायचे की , चिमण्यांनी स्टॉल मध्ये घूसखोरी केली आहे आणि गोठलेले सॉसेजचे तुकडे, सफरचं दाच्या साली व टॉफीचे चांदीचे कागद त्या पळवत आहेत . अशा वेळी कावळा झोपेतच चिडून काव काव ओरडायचा व कोपऱ्या वरचा पोलीस त्यामुळे दचकून आजूबाजूला पहात कानोसा घेऊ लागायचा . स्टॉलमधून येणारी काव काव त्याने आजपर्यंत अनेक वेळा ऐकली होती व त्याला आश्चर्य वाटत होते . खूपदा तो स्टॉलपाशी आला होता आणि रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश

टाळण्यासाठी डोळ्यांवर हातांचा आडोसा धरून त्याने स्टॉलमध्ये डोकावून पाहिले होते . पण स्टॉलमध्ये अंधार होता आणि फक्त तळाशी मोडलेले खोके पडलेले दिसायचे . __ एकदा कावळ्याची स्टॉलमध्ये एका छोट्या , विसकटलेल्या चिमण्याशी गाठ पडली . त्या चिमण्याचे नांव होते पाश्का .

चिमण्यांचे आयुष्य मोठे कठीण बनले होते . ओट धान्य मिळेनासे झाले होते , कारण शहरात आता घोडे जवळजवळ शिल्लक राहिले नव्हते . पाश्काचे आजोबा कधी कधी जुन्या आठवणी सांगायचे . म्हाताऱ्या चिमण्याचे नांव होते “ चिचकिन . “ ते म्हणत की , पूर्वीच्या काळी चिमण्यांचे कळप नेहमी घोडागाड्यांच्या तळापाशी सबंध दिवसभर भिरभिरत असायचे , कारण तेथे घोड्यांच्या तोबांच्या पिशव्यांमधून भरपूर ओट जमिनीवर सांडलेले असायचे .

आता शहरात मोटारींचा सुळसुळाट झाला होता . त्यांना ओट खायला घालत नाहीत , सुस्वभावी घोड्यांप्रमाणे त्या ओट मजेने चघळत नाहीत . घाणेरडा वास येणारे कसलेतरी विषारी पाणी पितात . चिमण्यांची संख्या रोडावली . काही चिमण्या

N

खेड्यांमध्ये घोड्यांपाशी रहायला गेल्या , तर काही चिमण्या समुद्रकिनाऱ्यानजीकच्या बंदरगावांना गेल्या . बंदरगावांना बोटींमधून धान्याची चढ - उतार होते व त्यामुळे तेथे चिमण्यांची चंगळ चालते .

“ पूर्वीच्या काळी , ” चिचकिन सांगायचा , “ चिमण्यांच्या कळपात दोन - तीन हजार चिमण्या असायच्या . हवा कापत हा कळप जेव्हा उडू लागायचा तेव्हा केवळ माणसेच नव्हे , तर घोडागाड्यांचे घोडेसुद्धा मागच्या पायांवर घाबरून उभे रहायचे आणि खिंकाळायचे: देवा रे , वाचव ! ह्या चिमण्यांचा काही बंदोबस्त करता येणार नाही का ?

“ आणि बाजारांमध्ये चिमण्यांच्या काय जोरदार मारामाऱ्या व्हायच्या ! पिसांचे ढग उडायचे . आता तशा झुंजी घडणं शक्य नाही … “

पाश्काने स्टॉलमध्ये प्रवेश केला आणि तेथे कसल्याही वस्तु र चोच मारायची संधी मिळण्यापूर्वीच कावळ्याने त्याच्यावर चाल केली व मस्तकावर प्रहार केला .

पाश्का खाली पडला , त्याने डोळे मिटले आणि मेल्याचे सोंग केले . ।

कावळ्याने त्याला स्टॉलबाहेर फेकले आणि जगातल्या सगळ्या चिमण्यांच्या चोर जमातीला उद्देशून शिव्या घालत तो रागाने कावकावला .

पोलीसाने सभोवार पाहिले आणि तो स्टॉलपाशी आला . पाश्का बर्फावर पडला होता . वेदनेने त्याच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडत होत्या . त्याने हळच चोचीची उघडझाप केली .

” हात तुझी बेघर भटक्या ! “ पोलीस म्हणाला . त्याने हातमोजा काढला , त्यात पाश्काला गुंडाळले व स्वतःच्या खिशात ठेवले . चिमण्या , तुझं आयुष्य फार कठीण दिसतंय ! “ __ पाश्का पोलीसाच्या खिशात पडून डोळ्यांची उघडझाप करत होता . अपमान आणि भुकेपायी रडत होता . अन्नाचे काही कण खायला मिळाले तर किती बरे होईल ! पण पोलीसाच्या खिशात पावाचे कण सापडले नाही . तेथे फक्त निरुपयोगी तंबाखूचे कण

होते .

सकाळी पेत्रोवना आणि मारीया बागेत फिरायला गेल्या . पोलीसाने मारीयाला जवळ बोलावले आणि कडक आवाजात विचारले :

” तुम्हाला एखादा चिमणा हवा आहे का ? घरात पाळायला ? “

मारीयाने त्याला उत्तर दिले की , चिमणा पाळायची तिची खूप खूप इच्छा होती . पोलीसाच्या लाल , वारा-पाऊस खाल्लेल्या चेहऱ्यावर एकदम चुण्या पडल्या . तो हसला आणि पाश्का सकटचा हातमोजा त्याने खिशातून बाहेर काढला .

“ घ्या ! हातमोजासकट . नाहीतर तो गारठून जाईल . हातमोजा मला नंतर आणून द्या . माझी कामाची पाळी बारा वाजेपर्यंत आहे . “

मारीयाने पाश्काला घरी आणले , त्याची पिसे ब्रशाने सरळ केली , त्याला खाऊ घातले आणि मोकळे सोडले . पाश्का बशीच्या कडेवर बसला , बशीतला चहा प्यायला , नंतर लोहाराच्या डोक्यावर जाऊन बसला . तेथे त्याला डुलकी लागणार होती . पण लोहाराला संताप आला . त्याने आपला हातोडा उगारला आणि पाश्कावर प्रहार करण्याची त्याची इच्छा होती . पाश्का फडफड आवाज करत दुसऱ्या ब्राँझच्या डोक्यावर जाऊन बसला . विख्यात परीकथालेखक इवान क्रीलोव यांचा तो अर्धपुतळा होता क्रीलोव

यांच्या गुळगुळीत डोक्यावर तोल सावरून बसणे पाश्काला खूप अवघड गेले . संतापलेल्या लोहाराने ऐरणीवर हातोड्याचे प्रहार करायला आरंभ केला - त्याने अकरा वेळा प्रहार केले .

मारीयाच्या खोलीत पाश्का सबंध दिवसभर राहिला . संध्याकाळी म्हातारा कावळा छोट्या खिडकीतून कसा आत आला आणि टेबलावरील माशाचा तुकडा त्याने कसा पळवला , हे पाश्काने पाहिले . तांबड्या फुलांच्या टोपलीमागे त्यावेळी पाश्का लपला व गुपचूप बसून राहिला .

तेव्हापासून पाश्का दररोज मारीयाला भेटायला येऊ लागला . ती त्याला खाऊ घालायची तेव्हा तिच्या उपकारांची परतफेड कशी करावी याबाबत पाश्काच्या मनात विचार यायचे. एक दिवस त्याने बागेतल्या झाडावर सापडलेला गोठलेला काटेरी सुरवंट आणून दिला . पण मारीयाने तो सूरवंट काही खाल्ला नाही आणि पेत्रोवना खूप चिडली व तिने सुरवंट खिडकीबाहेर फेकून दिला .

तेव्हा म्हाताऱ्या कावळ्यावर सूड घेण्यासाठी म्हणून पाश्काने स्टॉलमधील कावळ्याने चोरलेल्या वस्तू पळवायला आरंभ केला व त्या वस्तू तो परत मारीयाकडे आणून टाकू लागला . कधी सुकलेल्या फळाच्या रसाच्या वडीचा तुकडा , कधी केकचा तुकडा ,

.

ਕਲ

1

ਲਲਲ ਲਈ

ਲਈ

.

ਕਰ ਸ

. ਕੀਤੀ

.

ਗਈ

2॥

.

4 .

ਕਰਣ

3

कधी टॉफीवरचा लाल कागद . ___ कावळा केवळ मारीयाच्या घरातच नव्हे , तर आणखीही काही घरांमधून चोऱ्या करत असावा , कारण पाश्का कधी कधी चुकून दुसऱ्यांच्या वस्तू मारीयाकडे आणून टाकायचा : कंगवा , पत्ता , फाऊंटनचे सोनेरी टोक .. .

ह्या वस्तू घेऊन पाश्का खोलीत उडत यायचा , त्या वस्तूंना फरशीवर टाकायचा , खोलीत काही घिरट्या घालायचा व छोट्या झुपकेदार तोफगोळ्याप्रमाणे खिडकीमधून तीरासारखा नाहीसा व्हायचा

ह्या संध्याकाळी पेत्रोवना झोपली होती . कावळा छोट्या खिडकीमधून कसा आत येतो हे बघण्याची मारीयाची इच्छा होती . तिने यापूर्वी हे कधीही पाहिले नव्हते . .

मारीया खर्चीवर चढली . तिने छोटी खिडकी उघडली आणि कपाटामागे ती दडून बसली . सुरवातीला खिडकीमधून मोठमोठे हिमकण उडत आत आले आणि फरशीवर वितळले . मग अचानक खरवडण्याचा आवाज झाला . कावळा अंग चोरून खिडकीमधून आत आला , आईच्या टेबलावर उड्या मारत फिरला , त्याने आरशात पाहिले , तेथे तसाच रागीट कावळा पाहन त्याने पिसे फुलवली . मग तो कावकावला , झटकन त्याने काचेचा गुच्छ

चोचीत पकडला आणि खिडकीमधून तो पसार झाला .. मारीया किंचाळली . पेत्रोवना जागी झाली . ती विव्हळ लागली आणि रागे भरू लागली . थिएटरमधून आई जेव्हा परतली , तेव्हा ती खूप वेळ रडत बसली . तिच्याबरोबर मारीयासुद्धा रडली . पेत्रोवना म्हणाली की , हताश होण्याचे कारण नव्हते , कारण जर मूर्ख कावळ्याने काचेचा गुच्छ बर्फात टाकून दिला नाही , तर तो परत मिळण्याची शक्यता होती .

सकाळी पाश्का उडत आला . विश्रांतीसाठी तो कीलोवाच्या ब्राँझच्या डोक्यावर बसला . गुच्छ चोरीला गेल्याची बातमी त्याने ऐकली , आपली पिसे फुलवून तो विचारात गढला . ___ नंतर , जेव्हा आई तालमीसाठी थिएटरला गेली , तेव्हा पाश्का तिच्या पाठोपाठ

गेला .

विजेच्या एका खांबावरून दुसऱ्या खांबावर उडत , झाडांवर बसत , अखेरीस तो १२

:

:

以上

.

可。

,

,

:

,

:

1.37%

学 ;

.

以上。

: :

./

.。

थिएटरपर्यंत पोहोचला . तेथे ब्राँझच्या घोड्याच्या तोंडावर तो थोडा वेळ बसला , त्याने स्वतःची चोच स्वच्छ केली , पंजाने पापणी खाजवली , चिव चिव केली आणि तो उडून गेला .

संध्याकाळी आईने मारीयाला समारंभप्रसंगीचा शुभ्र फ्रॉक घातला . पेत्रोवनाने तपकिरी रंगाची शाल खांद्यावर टाकली आणि तिघीही एकत्र थिएटरला गेल्या . नेमक्या ह्याच वेळी , चिचकिनच्या आज्ञेनुसार पाश्काने आसपासच्या सगळ्या चिमण्यांना गोळा केले . काचेचा गुच्छ जेथे लपवून ठेवलेला होता त्या कावळ्याच्या स्टॉलवर हल्ला चढवण्याचा चिमण्यांचा बेत होता .

अर्थातच चिमण्यांनी एकदम स्टॉलवर झडप घातली नाही . आसपासच्या झाडांवर आणि घरांच्या छपरावर बसून तास-दोन तासपर्यंत त्यांनी कावळ्याला टोमणे मारून खूप चिडवले . तो संतापेल आणि स्टॉलमधून बाहेर येईल अशी त्यांची अपेक्षा होती . तेव्हा खुल्या रस्त्यावर लढाई झाली असती , स्टॉलप्रमाणे दाटी झाली नसती व कावळ्यावर चारही बाजूंनी हल्ला करणे शक्य झाले असते . पण कावळा धूर्त होता . चिमण्यांचा कावा त्याने ओळखला व तो स्टॉलमध्येच बसून राहिला .

शेवटी चिमण्यांनी धैर्य एकवटले आणि स्टॉलवर एकामागून एक झेपावायला त्यांनी सुरुवात केली .

तेथे अशी काही घुमाळी माजली की , स्टॉलभोवती लोकांची गर्दी जमा झाली .

पोलीस धावत आला . त्याने स्टॉलमध्ये डोकावून पाहिले व तो एकदम मागे सरला . सबंध स्टॉलभर चिमण्यांची पिसे उडत होती व त्यांच्यामधून काहीही पाहणे अशक्य होते . ___ “ वा ! ही खरी हातघाईची लढाई चाललीय ! “ पोलीस म्हणाला .

मारामारी थांबवावी म्हणून पोलीसाने स्टॉलच्या दारावर खिळ्यांनी ठोकलेल्या फळ्या उचकटायला आरंभ केला ..

ह्याच वेळी थिएटरमध्ये वाद्यवृंदामधील व्हायोलिनवादकांनी आणि सेलोवादकांनी आपापल्या धनुकल्या उंचावल्या होत्या .

एका उंच माणसाने आपला फिकट हात उंचावला व सावकाशपणे त्या हाताची

फाय

LER

हालचाल केली . भारी मखमाली पडद्यावर लाटा उमटल्या आणि हलकेच तो बाजूला झाला .

एक मोठ्ठी सूर्यप्रकाशित सुंदर सजवलेली खोली मारीयाच्या दृष्टीस पडली . तेथे भारी कपड्यांनी नटलेल्या दोन कुरूप बहि णी , दुष्ट सावत्र आई आणि सडपातळ बांध्याची , सुंदर दिसणारी व जुन्या भुरकट पोषाखामधील मारीयाची आई - अशा सगळ्या जणी उभ्या होत्या .

“ हेमाराणी ! मारीया अस्फुटपणे उद्गारली . तिचे डोळे रंगमंचावर खिळून राहिले . __ नंतर निळ्या , गुलाबी , सोनेरी प्रकाशांच्या उधळणीमधून चांदण्यात न्हाणारा राजवाडा तेथे अवतरला . आणि त्या राज वाड्यातून धावत जाताना मारीयाच्या आईने जिन्यावर बिलोरी काचेचा सँडल हरवला ..

आईच्या दुःखानुसार आणि आनंदांनुसार संगीताचे दुःखी आणि आनंदी सूर उमटत होते , म्हणून मनाला खूप बरे वाटत होते . जणू सर्व वाद्ये सजीव , भल्या मनाची माणसे होती . उंच वाद्यवृंदसंचालकासह ती सगळी वाद्ये आईला मदत करत होती . हेमाराणीला मदत करण्यात तो उंच माणूस एवढा गुंतला

होता की , त्याने एकदाही मागे वळून प्रेक्षागृहाकडे पाहिले नाही . हे फार वाईट होते , कारण प्रेक्षागृहात चमकत्या डोळ्यांची आणि लाल लाल गालांची खूप मुले बसलेली होती .

कधीही खेळ न पाहणारे आणि कॉरीडॉरमध्ये कार्यक्रमपत्रिकांचे छोटे गढे व दुर्बिणी घेऊन उभे राहणारे म्हातारे द्वारपालसुद्धा आता हळच चवड्यांवर चालत आत आले होते , आपल्यापाठी त्यांनी दारे हलकेच बंद करून घेतली होती व मारीया च्या आईला ते पहात होते . त्यांच्यातल्या एकाने स्वतःचे डोळे टिपले . त्यात आश्चर्य नव्हते , कारण मारीयाची आई त्याच्या दिवंगत मित्राची मुलगी होती व तो मित्रही त्याच्यासारखाच एक द्वारपाल होता . मारीयाची आई फार छान नाचत होती .

शेवटी , बॅलेचा अखेरचा प्रसंग सुरू झाला होता . संगीताचे उंच आनंदी सूर उमटत होते . सर्वांच्या चेहयांवर स्मित उमटले होते . अशा आनंदाच्या क्षणी हेमाराणी

१८

.

1

.

.

.

.

.

.

. . 11

. . .

IP :

.

.

.

,

,

13

:

A

:

.

.

:二了了 ,

.

.

an

च्या डोळ्यांमध्ये मात्र आसवे का , असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटत होता . एवढ्यात जिन्यांवरून आणि कॉरीडॉरमधून वेगाने आत घुसून एक छोटा विस्कटलेल्या पिसांचा चिमणा रंगमंचाकडे उडत गेला . त्या चिमण्याने जोरदार मारामारी केली असावी असे त्याच्या अवतारावरून स्पष्ट दिसत होते .

चिमण्याने रंगमंचाभोवती एक प्रदक्षिणा घातली . त्याच्या चोचीमध्ये बिलोरी काचेच्या डहाळीसारखी काहीतरी वस्तू चमकत होती .

प्रेक्षागृहातून कुजबुजीची लाट गेली . वृंदसंचालकाने हात वर उचलला . वाद्यवृंदाने वाजवणे थांबवले . मागील रांगांमधील प्रेक्षक कुतूहलाने उठून पाहू लागले . चिमणा हेमाराणीपर्यंत उडत गेला . तिने हात पुढे केले व चिमण्याने तिच्या हातांच्या ओंजळीत छोटा काचेचा फुलगुच्छ टाकला . हेमाराणीने थरथरत्या बोटांनी स्वतःच्या पोषाखावर तो गुच्छ टोचून लावला .

वृंद- संचालकाने हातातील छडी फिरवली आणि वाद्यवृंदाने संगीताने थिएटर भरून टाकले . टाळ्यांच्या कडकडाटामुळे थिए टरमधील दिवे थरथरले . चिमणा छताकडे उडाला , मोठ्या बिलो री काचेच्या झुंबरावर बसला व स्वतःची पिसे नीट करू लागला .

हेमाराणी झुकून अभिवादन करत होती आणि तिचा चेहरा हसरा होता . मारीया ला जर आधी माहीत नसते , तर ही हेमाराणी म्हणजेच तिची आई होती , हे तिने कधीच ओळखले नसते .

नंतर घरी जेव्हा सगळे दिवे विझवण्यात आले आणि रात्रीने खोलीत प्रवेश करून सर्वांना झोपण्याची आज्ञा केली , तेव्हा मारीयाने आईला विचारले :

” जेव्हा तू गुच्छ पोषाखाला टोचून लावलास , तेव्हा पपांची तुला आठवण

झाली ? “

” होय , “ आईने क्षणभर गप्प राहून उत्तर दिले . “ तू रडतेस का ? “ “ कारण मला आनंद होतोय की , तुझ्या पपांसारखी छान माणसं जगात आहेत . “ “ हे खरं नाही , “ मारीया पुटपुटली . “ आनंद होतो तेव्हा हसतात . “

“ छोटा आनंद झाला , तर हसतात , “ आई म्हणाली , “ पण खूप मोठ्ठा आनंद झाला तर रडतात . आता तू झोप ! “

मारीया झोपली . पेत्रोवना झोपली . आई खिडकीपाशी गेली . खिडकीजवळच्या झाडाच्या फांदीवर पाश्का झोपला होता . सर्वत्र शांतता होती . आकाशामधून सतत होणारा हिमवर्षाव त्या शांततेत भर घालत होता . आईच्या मनात आले की , त्या हिमाप्रमाणेच लोकांवर आनंदी स्वप्नांचा आणि परीकथांचा वर्षाव होतो .

9 .

.

1

10

,

其实

, , , , 于是,

,

,

,

КОНСТАНТИН ПАУСТОВСКИЙ Растрепанный воробей на языке маратхи

K. PAUSTOVSKY The Ruffled Sparrow

in Marathi

© मराठी अनुवाद , रादुगा प्रकाशन , १९८५ सोविएत संघात मुद्रित

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus