बृहद् विमानशास्त्र

बृहद् विमानशास्त्र

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी गोयल नावाचे एक सरकारी अधिकारी शिवकर तळपदेंचे चिरंजीव दिनकरराव यांच्याकडे आले. त्यांनी या विमानाचे भाग व काही कागदपत्रे गोळा करून दिल्लीला नेली. दिनकरराव यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विनाजींनी शिवकर तळपदेंच्या विमान प्रयोगासंदर्भातील उरलेली सर्व कागदपत्रे बंगळुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्सला सुपूर्द केली. प्राचीन विमान विद्येवर आधारलेल्या प्रयोगाची बातमी इतर प्रांतात पोहोचल्यानंतर पं. शिवकर तळपदे यांना या विषयावर बोलण्यासाठी ठिकठिकाणांहून आमंत्रणे आली. त्यांची भडोच, अहमदाबाद, पुणे आदी ठिकाणी व्याख्यानेही दिली. विमाननिर्मिती व उड्डाणाचे प्रयोग करण्यासाठी पं. शिवकर तळपदे यांनी अहमदाबाद येथील व्याख्यानात आर्थिक मदतीची मागणी परतफेडीच्या बोलीवर जनसमूहास केली होती. त्यांना पन्नास हजार रुपये देणारे एक हजार देणगीदार हवे होते. परंतु त्यात त्यांना अपयश आले व विमान संशोधनाची प्रगती तेथेच थांबली, अशी माहिती प्रताप वेलकर यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. शिवकर तळपदे यांचे 1916मध्ये निधन झाले. 1907मध्ये तळपदे यांनी ‘प्राचीन विमानविद्येचा शोध’ ही पुस्तिका लिहिली, मात्र त्यात आपल्या 1895च्या विमानोड्डाणाच्या प्रयोगाबद्दल त्यांनी एकही अक्षर लिहिलेले नाही. त्याचबरोबर तळपदे यांच्या कार्याची फारशी दखल त्यांचे समकालीन व पुढच्या पिढ्यांनीही घेतली नाही. 1952-53च्या दरम्यान ‘केसरी’चे संपादक ग. वि. केतकर यांनी विमान विद्येवर लिहिलेल्या तीन लेखांपैकी एका लेखात तळपदेंच्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तळपदेंबाबत गो. ग. जोशी यांनी 18 जून 1978रोजी ‘लोकसत्ता’त विस्तृत लेख लिहिला होता. इतकीच त्यांच्या कार्याची मराठी माणसांनी घेतलेली ठळक दखल! भारतातील विमानोड्डाणाचा पहिला प्रयोग शिवकर तळपदे यांनी केला होता. तो कितपत शास्त्रीय होता की नव्हता, हा वाद यापुढेही रंगत राहील. मात्र एका ध्येयाने पछाडून एखादी व्यक्ती आपले सारे आयुष्य त्यातच व्यतीत कशी करते, याचे तळपदे हे आदर्श उदाहरण आहेत.

source

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus